दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Sep 2018 - 9:54 pm
गाभा: 

'घृतम पिबेत' हे दोन शब्द संस्कृतात वेगळ्या कारणाने चर्चेत असतात. घृत म्हणजे तुपाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी शक्ती स्रोत ही त्याची ओळख. तुप दिसले की पटकन गट्टम करावे वाटणे स्वाभाविक असते पण त्या आधी बर्‍या पैकी प्रक्रीया दूधाला वीरजण लावून होत असते, म्हणजे सार्‍या एनर्जीचा खरा स्रोत दुधात असतो याचा विसर पडत रहातो. तसे पहाता सगळीकडचे तुप खर म्हणजे तुपच असते तरीही भारतीय संस्कृतीत तुपाला साजुकता हा गूणही अभिप्रेत असतो हे लक्षात घ्यावे लागते. मी तुपाचे हे उदाहरण रुपक म्हणून वापरलय लेखन विषय माझी चालू असलेली सद्य मालिकेतला कमी चर्चीला गेलेला एक नाजूक विषय.

माझ्या अलिकडल्या एका धाग्यावरुन मला 'अहिंसक' हा शब्द शेलक्या पद्धतीने बहाल केला गेला :) माझे लेखन लांगुलचालक नसले तरी मिपावरील परंपरावाद्यांना ते मवाळ वाटत असणे स्वाभाविक असावे त्यातून हे प्रमाणपत्र बहाल झाले असावे. विषय केवळ मिपावरील परंपरावाद्यांचा नाही बहुतांश परंपरवाद्यांना अबकड आणि हळक्षज्ञ समुहातील संघर्षाची उकल केवळ जहालतेतून शक्य आहे असे वाटत असते (प्रत्येक वेळी हि गोष्ट सुस्पष्टपणे बोलून दाखविली गेली नाही तरीही) . अलिकडेच अबकड आणि हळक्षज्ञ समुहातील संघर्षाबद्दलचा 'मुल्क' नावाच्या चित्रपटाबद्दल माझे मत मिपावर मी नोंदवले पण त्यातील एक विषय शिल्लक होता. 'मुल्क' चित्रपटातला आविर्भाव हे जहाल तुप खातात तर तेही जहाल तुपच खातात, लोणी जहाल, ताक, जहाल, दही जहाल म्हणजे तुप लोणी ताक दही या सर्वांची जहालता एकाच पारड्यात मोजलेली पण या सर्वा मागे 'दूध' आणि त्याला लावलेल्या 'वीर'जणाचाही संबंध असतो, दूध ते तूप हि प्रक्रीया प्रत्य़क्षात प्रत्येकवेळी स्थलकाल परिस्थिती समुह सापेक्ष वेगळी जटील काँप्लेक्स असते हे त्या चित्रप्टातून अथवा तथाकथीत पुरोगाम्यांकडून गुलदस्तात ठेवण्याचा प्रयत्न होत रहातो का याची साशंकता वाटते. नाही यावेळी हा धागा मी तथाकथीतांवर टिका करण्यासाठी काढलेला नाही तर उलटपक्षी नाण्याची वेगळी बाजू अभ्यासण्याच्या दृष्टीने काढला आहे.

कथित पुरोगामी सिंप्लिफिकेशन म्हणजे झालेल्या कोणत्याही 'शक्ती प्रदर्शनांना' हिंदूंच्या बाजूने सहसा सावरकरवाद आणि/किंवा संघ संस्कृती जबाबदार असते. इथे मला पडणारा पहिला प्रश्न सावरकर आणि संघ नसते तर हिंदूंच्या बाजूची शक्ती साधना झाली नसती का ? अलिकडे वाँशिंग्ट्न पोस्टचा एक लेख थायलेंड, मयन्मार आणि श्रीलंकन या देशातील बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य संघर्ष बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय असूनही कसे गंभीर रुप घेऊ शकतो या कडे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करतो. अशी उदाहरणे मिळाली की संघर्षाला धर्म नसतो असा निष्कर्ष चटकन काढता येतो; पण या निष्कर्षाची निसटती बाजू ही की वीरजण असल्याशिवाय दूध फुटत नाही कींवा दही सुद्धा लागत नाही. आणि सारी वीरजणं सारखी नसतात.

सावरकर आणि संघ नसते तरीही दुधाचे फुटणे टळले असते की तुपा पर्यंत नेणार्‍या प्रक्रीया टळल्या असत्या ? वस्तुतः महात्मा गांधी सुद्धा आधिकार मागण्यासाठी ताक घुसळतच होते आणि अंहिसेची महिमा गायली तरी हातात ' गीतेतील उपदेशाचे' वीरजण बाळगून असतं. दूधाचे दही लागण्यासाठी दूध अती तापलेले अथवा अती थंड असून चालत नाही, (जिथपर्यंत दुधाचीच गोष्ट आहे तिथपर्यंत ४५ अंश सेल्सियस तापमानावर चांगले लागते असे शास्त्रीय परिक्षणे सांगतात) हे त्यातल्या त्यात म. गांधींना बर्‍यापैकी उमगले असावे का -प्रत्येकवेळी म.गांधी बरोबरच होते असा इथे दावा नाही- चुभूदेघे.

माझे काही पुर्वग्रह आहेत ते कदाचित चुकीचेही असू शकतील, १९४७ च्या आधी जहालवादाचे जे स्वरुप सावरकरांना अपेक्षीत असेल ते १९४७ नंतरही अपेक्षीत राहीले असेल या बद्दल व्यक्तिशःसाशंकता वाटते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सावरकर शब्दपुजा नाकारण्यावर भर देणार्‍यातले असल्यामुळे, सावरकरांच्या शब्दपुजेचे अट्टाहास सोडून कालानुरुप विवेका आधारीत निर्णयांचे आवाहन सावरकर समर्थकांना करण्याचा एक मार्ग सावरकर मागे ठेऊन गेलेले दिसतात. संघाचा गाभा सुविहीत प्रशिक्षण आणि संघीय शीस्तीवर असल्यामुळे शीस्तशीर प्रशिक्षीतांचा संयम हकनाक सुटणे अवघड असते. यांच्या संघटनेत सामील न होता प्रेक्षादीर्घेतील समर्थकातील एक मोठा भाग न बरसणारा केवळ गरजणारा आहे नुसताच दुध, दही, लोणी तुपावर यापैकी कशावरतरी ताव मारणारा असावा, आपण नुसताच तर ताव मारतो अशी त्यांची सहसा भूमिका असते. न बरसणार्‍या नुसत्या गर्जना ऐकुनही एखाद्याला चेव येऊ शकतो हे गर्जना करणार्‍यांच्या ध्यानी मनी नसते हे खरे. संयम सोडून तापलेल्या दुधात वीरजण टाकले तर दुध फुटण्याची भिती असते, हे संयम सोडण्याची भाषा करणार्‍यांना लक्षात येत नाही. 'सहन करु नका पण संयम ठेवा' अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे. पण खर म्हणजे हिंदू संस्कृतीत वापरावयाचे तुपाची सात्विकता आणि ते कोणत्या पद्धतीने मिळवावे या बद्दल बर्‍यापैकी अटी असाव्यात हे गर्जणार्‍यांच्या बहुतांशांच्या नजरेतून सुटत असावे. गीता स्व अधिकारांचे रक्षणास प्रोत्साहन देत असतानाच, हिंदू परंपरा षड रिपुंचा त्याग हा केवळ संतांसाठी सांगत नसावी शत्रुबुद्धी विनाशायचा पाढा रोज म्हणणे आणि बाणवणे अभिप्रेत असते, त्या शिवाय भर सात्विक तुपाचेही प्राशन मोजक्याच प्रमाणावर करणे ते तुपाचा उपयोग दिवा असो वा यज्ञ विधीवत सात्विकतेने करण्यावर भर असावा. भारतीय / हिंदू संस्कृतीत धर्म शब्दाचा अर्थ इंग्रजी प्रमाणे रिलीजन होत नसून धर्म शब्दाच्या नैतिकमुलेय आणि न्याय्यता या महत्वाच्या बाजू आहेत. 'प्रेम आणि युद्धात सर्व काही माफ हे वचन भारतबाह्य संस्कृतीतीतील -वीरजणातील- असावे. साम दाम दंड भेद हे एका नंतर एक क्रमाने करावे लागतात भेदला पोहोचण्याचा एकदम शॉर्टकट घेऊन नव्हे आणि सामचा मार्ग बर्‍या पैकी प्रतिपक्षाचा अभ्यास पूर्वपक्ष करुन वाद विवाद करुन विश्वास संपादन, दूतांकरवी निगोशीएशन, मग दाम मग दंड असा लांबचा अभिप्रेत असावा. कृष्णनितींच्या तडजोडी रेअर ऑफ रेअर केस मध्ये सुचवलेल्या आहेत उठताबसता नव्हे. भारतीय / हिंदू संस्कृतीत न्यायदानाची जबाबदारी शासकाची असते, सर्वसामान्यांनी कायदा हातात घेणे सहसा अभिप्रेत नसते. शासक चुकत असेल तर त्याच्या दरवाजा समोर उपोषणाला बसावे , शाप द्यावेत किंवा देवाची करुणा भाकावी - आता लोकशाही काळात पुढच्या निवडणूकीत नव्या सत्तेस मतदान करता येते - किंवा न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येतात. तर एकुण सात्विक संताप व्यक्त करणे वेगळी बाब आहे पण प्रत्यक्षात कायदा हातात घेण्यास भारतीय / हिंदू संस्कृती सहजानुमती देत नसावी, आणि या बाबतीत हिंदू संस्कृतीतील वीरजण आणि दूध ते तूप ही प्रक्रीया वेगळी आणि अधिक सुयोग्य / उत्तम पद्धतीने उत्क्रांत होत गेलेली आहे. आणि हा फरक आत्मसात आणि विषद करण्यात प्रेक्षादीर्घेतील समर्थक मंडळींनी आत्मपरिक्षण आणि गरजेनुसार त्या दिशेने अधिक प्रयत्न करण्याची निकड असावी.

याच नाण्याची अजून एक बाजू खिजवण्यासाठी नव्हे तर फॅक्ट्सकडे भावने एवजी वस्तुनिष्ठतेने पहाता यावे म्हणून
यातील काही शक्ती वादींचा एक सूर 'आमच्या हातात सत्ता आली ना !' असा असतो ह्यात सुद्धा बोलाची कढी बोलाचा भात आणि काँग्रेसच्या नावे बोटे मोडून मनातला राग शांत करुन घेणे हा उद्देश्य अधिक. भारताच्या इतिहासात जिथे कुठे हिंदूंना सत्ता मिळाली मुस्लीम द्वेषाने खरेतर टोक गाठलेले दिसत नाही. केरळ, तामीळनाडू, आसाम, उत्तराखंड, नेपाळ या भागात सर्व काळात मुस्लीम सत्ता केवळ ओझरता स्पर्श करु शकल्या येथील बहुतेक काळ जातीय भाग बाजूस ठेवला तर धर्मीय दृष्टीने बर्‍यापैकी गुण्या गोविंदाचा असावा. १७१५ नंतर मुघल सत्ता कमकुवत झाल्या पंजाब आधी शीख मिसल आणि नंतर सावकाश रणजीतसिंगच्या अधिन झाला मध्यंतरात पेशवाई येऊन गेली. गेल्या मुस्लिमेतर राजवटींनी फारसे द्वेषकारण केले नाही ही जशी जमेची बाजू, तसे बाजू जमेची असलेल्या परिस्थितीत तुम्हाला अपेक्षीत बदल संबंधीत समुहात करता आले नसावेत तसे असते तर तुमच्या दृष्टीने आज समस्या शिल्लक असण्यास कारण उरत नाही. जी गोष्ट वस्तुतः तुमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वभावात नाही ती ओढून ताणून बसवण्याच्या वल्गना अनावश्यक आणि अनाकलनीय वाटतात. होते काय की पूर्वपक्ष करुन शास्त्रार्थाने जेवढे लोक आपलेसे करता येतील यासाठी लागणारा अभ्यास कमी पडतो.

विरोधीपक्षाची स्ट्रॅटेजी विरुद्धबाजूच्या ५ % कर्मठांना आणि १५ % परंपरावाद्यांना बाजूस पाडून उरलेल्यांना जमेल त्या मार्गाने खिंडीत पकडण्याची असते; तर दुसर्‍याबाजूस हि मंडळी अविश्वासाने कि आत्मविश्वासाच्या अभावाने प्रतिपक्षाच्या कुणावरही विश्वास ठेऊ इच्छित नाही. म्हणजे एक बाजू १०० + प्रतिपक्षाचे ८० अशी दिसते तर दुसरी बाजू ५ % कर्मठांना आणि १५ % परंपरावादी = २० % उरलेली असते. त्यांनी तुमचे २० % उदारमतवादी त्यांच्या बाजूस वळवले तर तुम्ही ही त्यांच्यातले २० टक्के उदारमतवादी तुमच्याकडे वळवून घ्या. १०० शी लढण्यापेक्षा ८० शी लढणे सोपे असते ह्या सोप्या गणितात इकडची मंडळी कमी पडतात.

बरे १९४७चे प्रश्न आजही शिल्लक आहेत का ? तशी स्थिती बहुधा नसावी, कदाचित वाढत्या शिक्षणामुळे असेल आजही तुरळक धार्मिक कारणांवरुन दंगली होत असल्या तरी १९९३ नंतर टिव्हीमुळे आहे त्या बातम्या चटकन लोकाम्च्या घरात पोहोचत असल्या तरी काही अपवादात्मक स्थिती वगळता दंगलींची संख्या कमी होत गेली असण्याची बरीच शक्यता असावी. किमान रस्त्यावरील संघर्षांची कारणे कमी झाली असावीत. पुर्वी मंदिरांतील मुर्तीचा शेंदुर गळून पडला, एखादा प्राणी मारुन टाकला तरी वातावरण तंग होत असे , अशा प्रसंगांची संख्या कमी झालेली आहे, मिरवणूकी व्यवस्थापन पोलीसांकडून पुर्वीपेक्षा अधिक चांगले होते त्यासाठी ते अधिक तंत्र सुसज्ज सुद्धा आहेत, मेनरोडवरची दुकाने रुंदीकरणात जाऊ नयेत म्हणून दुकानांच्या समोर अनधिकृत धाम्रिक स्थळे बनवली जात आणि पालिकांनी कारवाई केली की धार्मीक कारण दाखवून परिस्थिती पेटवली जाई, आता सर्वोच्च आणि उच्च न्यायालये अनधिकृत धर्मस्थळे अस्तित्वात येऊ नयेत म्हणून अधिक सजग आहेत. पुर्वी आंतरधर्मीय संबंधातील मुलींचे वय निश्चिती अवघड असे त्यामुळे अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचे आरोप होत आता. महिलांना पळवणे सोपे राहीले नाही आणि वयाचा दाखला आणि जबानीची निश्चिती अधिक विश्वासार्ह होत आहे. तरीही समस्या होतात पण त्या सार्वजनिक हिंसाचारात कमी प्रमाणात रुपांतरीत होतात. मुस्लीम समाजातील पर्सनल लॉचे प्रश्न व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्यघटनेस दिलेले आव्हान या दृष्टीने महत्वाचे नक्कीच आहेत पण तसे पहाता त्यांच्यामुळे हिंदू धर्मीयांना सरळ संबंध नाही -आणि येत्या काळात त्यातही सकारात्मक बदल नक्कीच होतील. देश विरोधी घोषणा राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान या विरोधात कायद्यांची उपलब्धता आहे. अगदी भारत माता शब्दास उपयोग सावकाशीने वाढत असला तरी राष्ट्रप्रेम अधिक मोकळ्या मनाने व्यक्त केले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सशस्त्र होऊन संघर्ष करण्याची कारणे खरे पहाता कमी होत चालली आहेत.

एक राग सेक्युलॅरीझम बद्दल आहे त्याचे कारण सेक्युलॅरीझमच्या मुळ तत्वाची भ्रष्ट भेसळयुक्त लांगुलचालन आवृत्ती आहे, शुद्ध भेसळ विरहीत सेक्युलॅरीझम आणि शुद्ध हिंदू उदारतावाद एकमेकांची जुळी भावंडे. अगदी टोकाच्या क्षोभक टिकांना परास्थ करण्याची क्षमता भारतीय तत्वज्ञान आणि तर्कशास्त्रात असूनही गेली हज्रार वर्षे आम्ही ज्यात अधिक सक्षम आहोत ते केवळ दुसर्‍या बाजूचा व्यवस्थीत अभ्यास न केल्यामुळे कमी पडतो ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

आता तुफैल चतुर्वेदी चे युट्यूब पहा तशा विचारसरणीने केवळ माथी चिंतीत होतात पण दुसर्‍या बाजूच्या वैचारीक कमतरतांची शास्त्र शुद्ध अभ्यास आणि माहिती ठेवणे आणि चर्चा संवादातून परास्त करण्यात मंडळी कशी कमी पडतात एकुण काय परिणाम होतो ते राजीव मल्होत्रा आणि मीनाक्षी जैन यांच्या या युट्यूब चर्चेतून लक्षात यावे.

एवढे सगळे सांगणे म्हणजे परंपरावाद्यांचा दबाव नको आहे का ? तर सेक्युलॅरीझम मधील भेसळ घालवण्यासाठी दबाव हवेच पण हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणूनही शेवटी तुम्हाला सेक्युलॅरीझम एवढीच उदारमतवादी व्यवस्था इतर धर्मीयांमुळे नव्हे तुमच्या अंतर्गत विवीधतेमुळे राबवावीच लागणार तेव्हा दबाव टाका पण आपले वैचारीक वादाची क्षेत्रे अधिक चांगल्या पद्धतीने निवडा आणि अभ्यासपुर्ण वाद करा. तुमचा अभ्यास व्यवस्थीत असेल तर दुसर्‍या बाजू वैचारीक विवादात फार पुढे जाऊ शकणार नाहीत याची नक्कीच ग्वाही देता येते हा आत्मविश्वास महत्वाचा असावा. असो.

*** या विषयावरील माझे धागा लेख ***

* रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

* संघ भाजपाने याचा विस्तार करावा

* दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2018 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार, लेखन एकदा दोनदा वाचले आणि लक्षात आलं की इथे लिहिण्याचा स्कोप आहे, अभ्यास आहे की नाही ते माहिती नाही पण परंपरावाद्यांचा वैचारिक सूर कसा असतो यावर लिहिता येईल असे वाटते. वेळ असला की हजर होईन. तो पर्यन्त ही केवळ पोच.

-दिलीप बिरुटे

ट्रम्प's picture

27 Sep 2018 - 5:54 pm | ट्रम्प

मस्त सणसणीत चपराक हाणली पुरोगामीनां !!!
हिंदू धर्मावर टीका करणे हे आज सध्या फॅशन बनू पाहत आहे , आणि जे हिंदू लोक हिंदू धर्मावर टीका करतात तेच ते चप्पलखाऊ पुरोगामी होत .

भाषा थोडी जड वाटली! पण लेख आवडला!

.