✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

म
माहितगार यांनी
Sat, 03/12/2016 - 14:16  ·  लेख
लेख
जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व. संघावर विरोधकांकडून होणार्‍या काही प्रचलीत टिकेतील उणिवा निदर्शनास आणल्या आहेत - आधार नसलेल्या टिका करु नयेत, निगेटीव्ह मार्केटींगने आधार नसलेल्या टिकाकारांचा जनाधार हरवू शकतो असे मलाही वाटते- त्याच वेळी रास्व संघावर नेहमीच्या टिकांपेक्षा रमेश ओझांनी काही वेगळी टिका केलेली दिसते. १) संघाकडे 'हिडन अजेंडा' असल्याचा प्रचार केला जातो, ९० वर्षांपर्यंत एखादी संघटना एकच एक अजेंडा रचू शकते पुढील ९० वर्षांचा विचार करुन कट वगैरे रचू शकते असे रमेश ओझांना वाटत नाही. माझ व्यक्तिगत मत संघ समर्थकांमध्ये परंपरावाद नक्कीच आहे, रास्व संघाच्या शाखा तशा खुल्या मैदानांवर भरतात, मीही दूरुनच मैदानांवर पाहतो, मोदी निवडून येई पर्यंत माझ्या जवळच्या मैदानावर सकाळी ८०+ वयाचे काही वयोवृद्ध पारंपारीक पोषाख घालून थोडीफार एक्सरसाईज करताना पाहीले आहेत पण तरुणवर्ग मोदी निवडून येईपर्यंत दिसला नव्हता, आता मोदी निवडून आल्यावर एखाद दुसरा तुरळक तरुण कोणत्याही पोषाखा शिवाय असलेली ५-१० कच्ची बच्ची गोळा करून एखाद्या दिवशी अधून मधून सराव करताना दिसतो. उर्वरीत १०० एक मुले स्वतंत्र प्लेग्रूप मधून त्याच मैदानावर खेळताना दिसतात, म्हणजे मिडीयात दाखवले जाते तेवढे रास्वसंघाच्या शाखांचे प्रस्थ नविन पिढीततरी शिल्लक आहे का या बद्दल साशंकता वाटते. २) रमेश ओझांनी एक टिका संघाच्या वैचारीक गोधळावर केली आहे, - किमान मटा वार्ताहाराने केलेल्या वृत्तांकनात गोंधळ आहे का काय अशी शंका वाटते - संघ लोकशाहीचेही समर्थन करतो आहे आणि धर्म हा आधार ठेऊन काही विषीष्ट धर्मांशी संघर्ष करतो आहे असे रमेश ओझांना म्हणावयाचे असावे (चुभूदेघे) इथे रमेश ओझांचे म्हणणे अंशतः पटते की लोकशाहीत तुम्हाला तुमच्या सर्वच मतदारांशी जुळवून घ्यावे लागते -गोव्यातील राजकारणाच्या निमीत्ताने ह्या प्रक्रीयेस अंशतः सुरवात झाली असावी आणि इतर राज्यातही राजकारण जसे करावे लागेल तसे अधिक जमवून घ्यावे लागेल, जुनी पिढी जशी मागे पडेल तसे त्यातून विचारातील संकुचितता कमी होईल हा माझा व्यक्तिगत आशावाद ३) रमेश ओझांनी लोकशाही बरोबर रास्व संघ सनातन आणि उदात्त हिंदू धर्माचे समर्थन करतो यास वैचारीक गोंधळ म्हटले आहे. वस्तुतः माझ्या मते सनातनेचे-पारंपारीकतेचे आग्रह आणि उदात्ततेचे आग्रह ह्या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत सर्व पारंपारीकता उदात्त असतीलच अथवा नसतीलच असे सरसकट सांगणे कठीण असते प्रत्येक परंपरेचा स्वतंत्र विचार करावयास हवा आणि परंपरेत उदात्ततेची बाजू जिथे कमी पडते तिथे परंपरा चटकन नाकारली जावयास हवी, कोणत्याही लोकशाहीतील परंपरावादी संघटनाप्रमाणे संघ आणि भाजपातील परंपरावादी सुधारणावाद्याम्च्या दबावापुढे काळाच्या ओघात बदलत जातात पण लगेच बदलत नाहीत. आणि नेमके इथे संघ विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य बनतो. हिंदू धर्माची उदात्त बाजू कुणालाही कोणत्याही पद्धतीने इश्वर प्रार्थनेचे स्वातंत्र्य देते तेव्हा तुम्हाला काही विशीष्ट धर्म ग्रंथातील जेवढा भाग अत्यावश्यक म्हणून नाकारावयाचा आहे तेवढाच नाकारावा सरसकट नाकारण्याची गरज नसावी, 'भारतात जे राहतात त्यांना हिंदू म्हणतात' - 'भारतात जे कोणी राहतात त्यांना हिंदू म्हणू' आणि 'भारतात जे कोणी राहतात ते हिंदूच असावेत' या वाक्यांमध्ये सुक्ष्म पण महत्वाचे फरक आहेत. * 'भारतात जे राहतात त्यांना हिंदू म्हणतात' या व्याख्येची मर्यादा बघा हे हिंदू परदेशात जाऊन राहतात तेव्हा त्यांना काय म्हणतात ? * 'भारतात जे कोणी राहतात त्यांना हिंदू म्हणू' हि व्याख्या वस्तुतः अंशतः उदात्त असू शकते तुम्ही कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास स्वातंत्र्य आहात एका मुस्लिम ख्रिश्चन अथवा ज्यु व्यक्तिस हिंदू असण्यासाठी काहीच करावयाचे नाही केवळ भारतीय असावयाचे आहे. त्याचा 'भारतात जे कोणी राहतात ते हिंदूच असावेत' आणि 'सनातन नाहीत ते हिंदू नाहीत' असे म्हटले की हि व्याख्या संकुचित होते, आणि संघाचे नेतृत्व नेमके या ठिकाणी उदात्ततेची तळी उचलून न घेता इस्वर प्रार्थना करणार्‍या लोकांनी कोणत्या दिशेस पाहून प्रार्थना करू नये हे सांगते -नव्या संघ नेतृत्वासोबत यात जरा बदल झाला असावा आणि संघ असे न कबुल करता बदलतही असतो- तुम्ही प्रार्थना कोणत्या दिशेने करावी हे जिथे सांगता तिथे तुमच्या उदात्त मुल्याची घसरणच होत नाहीए तुम्ही तुमच्या स्वतःच्या धर्मातील कोणत्याही पद्धतीने इश्वर प्रार्थनेच्या स्वातंत्र्याच्या मुलभूत तत्वाला नाकारता आहात हे लक्षातच घेतले जात नाही. संघाचे विरोधकही या नेमक्या मुद्द्यावर टिका करताना दिसत नाहीत तर रमेश ओझा म्हणतात तसे साप साप म्हणून तिसरीकडेच रिकाम्या जागेवर काठ्या मारताना दिसतात म्हणून संघाच्या टिकाकारांची टिकाही अभ्यासपूर्ण आणि तर्कसुसंगत होताना दिसत नाही. म्हणुन संघ आणि संघाचे टिकाकार दोन्हीही वैचारीक गोंधळात अडकले आहेत असे एक तटस्थ निरिक्षक म्हणून म्हणता येऊ शकते का ? ४) १९४० च्या दशकातील संघाची भूमिका प्रगतीशील नव्हती असे काहीसे रमेश ओझांना म्हणावयाचे असावे असे त्या वृत्तांकनातील एका मुद्यावरुन माझा समज झाला (चुभूदेघे) पण पुन्हा तेच की संघाचे टिकाकार संघ (तसे कोणतेही परंपरावादी पक्ष) काळाच्या ओघात -बदल स्विकारल्याचे जाहीरपणे न स्विकारता- बदलत जाताना दिसतात भारतीय घटना असो, भारतीय लोकशाही असो भारताचा तिरंगा असो हे संघ सावकाशपणे स्विकारत जाताना दिसतो, मागचे नेतृत्व लोकांनी कोणत्या दिशेने प्रार्थना करु नये ते सांगत होते आजचे संघाचे नेतृत्व कोणत्या दिशेने प्रार्थना करु नये यावर भाष्य करताना दिसत नाही अर्थात पुरोगामी भूमिका जेवढ्या ठळकपणे संघाने घेऊन पुरोगामीत्व काय असते ते तुम्हीच आमच्याकडून शिका असे विरोधकांना छाती ठोकपणे सांगण्यासाठी लागणारी उदात्तता हिंदू धर्मात आहे पण ती हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्वाचा दावा करणार्‍या संघात कमी पडते का ? - पुरोगामीत्वाच्या बाबतीत ज्युडायिक धर्मीय मागे पडले तर समजता येते हिंदू धर्मीय पुरोगामीतेत मागे पडण्याचे कारन नसावे जसे सनातन हिंदुत्ववाद असू शकेल त्या पेक्षा मोठी संधी पुरोगामी हिंदूत्ववादास हिंदू धर्मात इंट्रिसिकली आहेच त्याचा पुरोगामी लोक पुरेसा वापर करतात का या बद्दल साशंकता वाटते. खासकरुन संघ भाजपाचा जो फिल्डवरचा कार्यकर्ता आहे तो टोकाचा परंपरावाद जोपासतो आणि संघ-भाजपातला पुरोगामी फिल्डवर काम करतना तेवढा दिसत नाही त्यामुळे संघ भाजपा सारख्या संघटनांचे नेतृत्वातील मोठा भाग परंपरावादाच्या प्रभावाखाली असल्याचे चित्र निर्माण होते आणि विरोधकांना त्यांच्या परंपरावादातील टोकावर तोंडसूख घेण्याची आयती संधी मिळते असे काही होते का ? इथे अजून एक मुद्दा विरोधकांना संघावर टिका करण्यासाठी उपलब्ध असतो तो म्हणजे संघ-हिंदुत्ववादी समर्थक स्वतःच्या पुरोगामित्वाचा जो काही टेंभा मिरवताना दिसतात त्याचे खरे क्रेडीट पुरोगाम्यांनी कधीतरी मागे प्रेशर दिले असते आणि परंपरावादी अपरिहार्यतेने बदलले असतात तुम्ही स्वत: होऊन पुरोगामीत्वात कोणता पुढाकार घेतला या प्रश्नास परंपरावाद्यांकडील उत्तरास मर्यादा येऊ शकते पण विरोधक या मुद्द्यावरुन टिका करताना दिसत नाहीत, म्हणजे पुरोगामी भूमिकेची मशागत पुरोगाम्यांनी करावयाची, दबावाच्या खाली न बोलता काळाच्या ओघात बदलायचे आणि पुन्हा पुरोगामी म्हणून पुरोगाम्यांएवजी परम्परावाद्यांनीच क्रेडीट घ्यायचे असे काही होताना दिसते का? लोकशाहीतील राजकीय सहभागातून अपरिहार्यतेने संघ-भाजपा कोणत्यान कोणत्या वळणावर अतीटोकाच्या परंपरावाद्यांना बाजूला करुन बहुजनवादाची कास धरेलच अर्थात मतांच्या राजकारणात उघडपणे कबूल करुन खात्रीची मते देणारा परंपरावादी मतदारही जाहीरपणे दूर करता येत नाही आणि मते वाढवायची तर पुरोगामी आणि नवीन मतदारवर्ग मिळवणे आणि टिकवणे आले -मग परंपरावाद्यांच्या खांद्यावर बसताना चेहरा पुरोगामीतर असला पाहीजे पण परंपरावाद्यांना आपलाच आहे असे वाटले पाहीजे अशा दुविध स्थितीतून सातत्याने राईट ऑफ सेंटर परंपरावादी पक्षांना जावे लागते आणि तिच कसरत संघ-भाजपाच्या बाबतीतही होते का ? ५) या सर्वा पेक्षा विरोधकांच्या हातचे खरे कोलीत असावे अशी टिका रमेश ओझा करतात ती म्हणजे "संघाने आजवर एकही आंदोलन पूर्णत्वास नेले आणि त्यातून काही हाती लागले, असे आजवर कधीही झाले नाही. एकही मोठे सामाजीक काम, बाबा आमटेंसारखी मोठी व्यक्तिमत्वे, एखादी संकल्पना किंवा मान्यवर विचारक संघाने घडविल्याची उदाहरणे दिसत नाहीत. ज्यांना समाजातील सर्वोत्कृष्ट म्हणावे, अशी माणसे संघासोबत फारच कमी आहेत. संघातील या बुद्धीदारीद्र्याचे कारण काय आहे याचा विचार करावा" इति रमेश ओझा. रमेश ओझांच्या या टिकेशी शंभर टक्के सहमत होता येईल का हे कदाचित विवाद्य असेल पण संघावर टिका करून त्यांना डिफेन्सीवला ठेवतानाच उत्तरादाखल संघ-भाजपाला सतत रचनात्मक काम आणि सकारात्मक व्यक्तिमत्वे उदाहरण म्हणून उत्तरा दाखल द्यावी लागतील, उत्तर व्यवस्थित द्यायचे असेल तर रचनात्मक आणि सकारात्मक घडण करणे आले, तसे संघानी न करताच संकुचित स्वरुपाची उदाहणे समर्थकांनी पुढे ठेवली कि टिकेची आयती संधी म्हणून अ‍ॅडव्ह्कसी पॉईंट ऑफ व्ह्यू विरोधकांनी संघ-भाजपावर टिका करावयाचीच असेल तर तेच ते त्यांच्या शाखा आणि नथुराम हे उगाळून कोळसा झालेले मुद्दे पुन्हा उगाळण्यापेक्षा रमेश ओझांचे वाक्य जसेच्या तसे शंभरवेळा पाठ करुन पुन्हा पुन्हा म्हटले तरी हरकत नाही. फक्त रिस्क एवढीच कि संघ समर्थ प्रत्युत्तर म्हणून तुमचे स्वतःचे रचनात्मक काम दाखवा म्हणतील तर ते दाखवण्यास टिकाकारांपाशीही उपलब्ध असावयास हवे किंवा कसे. ६) धागा लेख संपवताना संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करण्यात ना संस्कृती संवर्धन निटसे होते न धर्म संवर्धन निटसे होते आणि हि गल्लत जगातील सर्वच परंपरावादी करतात, पण संस्कृती आणि धर्म वेगवेगळे प्रोमोट करण्याचा पर्याय / मार्ग हिंदुत्ववादी स्वतःहून बंद करत असतात का अशी साशंकता मला नमुद कराविशी वाटते. उपरोक्त टिका जशिच्या तशी स्विकारावी असे नाही रमेश ओझा काय किंवा माझ्या टिकेत काय उणीवा असतील -किमान माझी टिका राजकीय अथवा धार्मीक द्वेषातून नक्कीच नाही- कदाचित मला माझी मते बदलावी लागतील तर बदलेनही. पण दुसर्‍या बाजूने शक्यतो टिकेस उत्तर द्यायचे म्हणून देण्या पेक्षा मनाचा खुलेपणा जोपासल्यास आत्मपरि़क्षणाची संधी म्हणून टिकेकडे पाहून मग टिके बद्दल चर्चा केल्यास संघ-भाजपा समर्थकांनाच या चर्चेचा अधिकाधीक लाभ घेता येऊ शकेल अशी आशा आहे. लास्ट बट नॉट लिस्ट मटाचे वृत्तांकन मुळापासून वाचावे मला ते जसे च्या तसे कॉपीपेस्ट करता आलेले नाही. *** या विषयावरील माझे धागा लेख *** * रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ? * संघ भाजपाने याचा विस्तार करावा * दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
19202 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

६) धागा लेख संपवताना संस्कृती

नाना स्कॉच
Sat, 03/12/2016 - 14:26 नवीन
६) धागा लेख संपवताना संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करण्यात ना संस्कृती संवर्धन निटसे होते न धर्म संवर्धन निटसे होते आणि हि गल्लत जगातील सर्वच परंपरावादी करतात, पण संस्कृती आणि धर्म वेगवेगळे प्रोमोट करण्याचा पर्याय / मार्ग हिंदुत्ववादी स्वतःहून बंद करत असतात का अशी साशंकता मला नमुद कराविशी वाटते. +कैक वेळा!! संस्कृती सुंदर शिल्प निपजते अन धर्म आधारित परंपरावादी त्यावर जीर्णोद्धाराच्या नावाने ऑइल पेंटचे फटकारे मारतो! काय बोलणार!
  • Log in or register to post comments

संघावर टीका करणाऱ्यांचं तर सोडूनच द्या

बोका-ए-आझम
Sat, 03/12/2016 - 15:35 नवीन
संघाच्या कट्टर समर्थकांनाही संघ हा काय प्रकार आहे ते अजून समजलेलं नाही. मुळात संघावर उत्तरं द्यायची सक्ती करता येईल का? भाजप हा राजकीय पक्ष असल्यामुळे लोकांना उत्तरदायी आहे असं म्हणता येईल. संघ हा राजकीय पक्ष नाही. ती एक सांस्कृतिक संघटना आहे असं संघ स्वयंसेवकांचं म्हणणं आहे. संघाचे विरोधक त्याची तुलना सिमी किंवा लष्कर ए तोयबा यासारख्या संघटनांशी करतात. नाझी किंवा फॅसिस्ट संघटना आणि संघ यांच्यात खूप साधर्म्य आहे हे अनेक पत्रकार मित्रांकडून ऐकलेलं आहे. संघ १९२५ मध्ये स्थापन झाला तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक स्थित्यंतरं देशात आणि जगात आलेली आहेत. त्यानुसार संघाची भूमिकाही बदललेली आहे. माझ्या मते संघाचं एक contribution मान्य करावंच लागेल - एक genuine विरोधी पक्ष त्यांनी आधी जनसंघ आणि नंतर १९८० पासून भारतीय जनता पक्षाच्या नावाने भारताला दिला. त्या आधी जे पक्ष काँग्रेसविरोधी होते त्यातले कम्युनिस्ट हे देशाच्या काही भागांत - उदाहरणार्थ केरळ, खूप प्रभावी होते पण त्यांना अखिल भारतीय स्थान नव्हतं. प्रजा समाजवादी पक्ष आणि मिनू मसानींचा स्वतंत्र पक्ष हे काँग्रेसला पर्याय उभा करु शकले नाहीत. १९७७ च्या जनता पक्ष प्रयोगात सारे विरोधी पक्ष भारतीय लोकदलाच्या झेंड्याखाली लढले पण जास्तीत जास्त जागा जनसंघाला मिळाल्या. पुढे इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्ष दुर्बळ झाला आणि भाजप रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर एकदम पुढे आला. १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचं सरकार फक्त १३ दिवसांच्या कारकीर्दीनंतर पडलं तेव्हा विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सभागृहात बहुमत मिळू दिलं नव्हतं. मला वाटतं - संघ आणि भाजप या दोघांसाठी हा एक landmark क्षण होता. अजाणतेपणी इतर पक्षांनी भाजपला एवढं महत्त्व दिलं होतं. त्याचं कारण जरी या इतर पक्षांनी धर्मनिरपेक्षतेचं संरक्षण वगैरे कारण दिलं असलं तरी भाजप एक वेगळा राजकीय पर्याय म्हणून समोर आल्याची ही अप्रत्यक्ष कबुली होती. २०१४ चा विजय हा संघ आणि भाजप या दोघांसाठीही अभूतपूर्व असला तरी सरकार चालवणं आणि विरोधी पक्षात राहून टीका करणं या गोष्टी वेगळ्या आहेत हे त्यांना लवकरात लवकर समजून घ्यायला पाहिजे. भारतीय मतदारांनीही एकाच पक्षाला सत्तेत दीर्घकाळ न बसवता दोन्हीही राष्ट्रीय पक्षांना - भाजप आणि काँग्रेस - संधी दिली पाहिजे.
  • Log in or register to post comments

एकही मोठे सामाजीक काम, बाबा

विवेकपटाईत
Sat, 03/12/2016 - 16:26 नवीन
एकही मोठे सामाजीक काम, बाबा आमटेंसारखी मोठी व्यक्तिमत्वे, एखादी संकल्पना किंवा मान्यवर विचारक संघाने घडविल्याची उदाहरणे दिसत नाहीत. बाबा रामदेवाना सर्वोकृष्ट म्हणणार नाही. (आज लाखो शेतकर्यांचे भल त्यांनी केल आहे, शिवाय भारताच्या गायींचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी ५०० कोटींची विशाल गौ शाळा / नंदी शाळा वर्षभरातच तैयार होणार आहे). येत्या काही वर्षांतच भारतीय गायी हि १० किलो पेक्षा जास्त दूध देताना दिसतील. बाकी आज जे समाज सेवक आणि दलित उद्धारक म्हणून समाजात मिरवितात त्यांनी दलितांसाठी काही एक केलेले नाही. एखाद वर्ष हि जो कुणी संघाच्या शाखेत गेलेला असेल, तो खर्या अर्थाने पुरोगामी बनतो. अधिकांश शिक्षित लोक संघाशी जुळलेले आहे, संघात जाणारा भाजीवाला हि शिक्षित आणि काही वर्षात सुखवस्तू हि बनतो. (आमच्या गल्लीतच पटरीवर भाजी मांडणारा, २० एक वर्ष आधी संघाच्या शाखेत जाऊ लागला होता, आज त्याचे घर माझ्या घरापेक्षा चांगले आहे, कारण संघाच्या शाखेतल्या इतर शिक्षित लोकांचा सहवास आणि आपुलकी त्याला मिळाली, शिवाय बाजार हि..
  • Log in or register to post comments

पटाईत सर आये और साथ में

नाना स्कॉच
Sat, 03/12/2016 - 16:47 नवीन
पटाईत सर आये और साथ में पतंजलि ण लाये ऐसे हो नै सकता म्हणे मी
येत्या काही वर्षांतच भारतीय गायी हि १० किलो पेक्षा जास्त दूध देताना दिसतील.
सर मुदलातच नाही तर व्याजात कसे येणार????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

भारताच्या गायींचे दुग्ध

नाव आडनाव
Sat, 03/12/2016 - 17:04 नवीन
भारताच्या गायींचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी ५०० कोटींची विशाल गौ शाळा / नंदी शाळा वर्षभरातच तैयार होणार आहे). येत्या काही वर्षांतच भारतीय गायी हि १० किलो पेक्षा जास्त दूध देताना दिसतील. मला वाटतंय तुम्हाला भारतीय गाय म्हणजे गावरान गाय म्हणायचंय आणि १० किलो म्हणजे १० लिटर, बरोबर? गावरान गायीचं दूध उत्पादन वाढवण्यसाठी काय आणि कसे प्रयत्न करण्यात येणार आहेत हे थोडक्यात लिहू शकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

देशाच्या मागासलेल्या भागात

आनन्दा
Sat, 03/12/2016 - 18:39 नवीन
देशाच्या मागासलेल्या भागात संघाच्या हजारोंच्या संख्येने शाळा विद्या भारती च्याच २०,००० हून शाळा आणि ६५००० हून जास्त एकल विद्यालय आहेत. मोठ्या शहरातल्या कुठल्या हि झुग्गी कालोनीत जा बहुतेक गरीब, दलित, मागासलेल्या विध्यार्थाना शिकविताना संघाचे लोक दिसतीलच. सरस्वती शिशु मंदिर हि निम्न मध्यम वर्गीय लोकांसाठी आहेतच. संघाचे स्वयं सेवक प्रसिद्धी पासून दूर राहतात एवढेच.
हेच लिहायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

बाकीच्या गोष्टी चर्चा

आनन्दा
Sat, 03/12/2016 - 18:41 नवीन
बाकीच्या गोष्टी चर्चा करण्यायोग्य असतील, पण हा कामाचा मुद्दा निर्विवाद असत्य आहे. संघाचे प्रचंड काम आहे. पण ते डोळ्यात भरत नाही. माझ्या स्वतःच्या घरात पूर्णवेळ स्वयंसेवक असल्यामुळे मी या गोष्टी नक्कीच सांगू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

विषमता निर्मुलन, समान संधी आणि सकारात्मक कृती योगदान ?

माहितगार
Sat, 03/12/2016 - 20:33 नवीन
पटाईतजी चर्चा सहभागा बद्दल आणि रचनात्मक कार्य मांडण्याच्या प्रयत्ना बद्दल आभार, या धागा चर्चेतून मनमोकळे आत्मपरिक्षणपण अभिप्रेत असावे.
बाकी आज जे समाज सेवक आणि दलित उद्धारक म्हणून समाजात मिरवितात त्यांनी दलितांसाठी काही एक केलेले नाही.
इथे दुसर्‍यांनी काय केले नाही हे आपण मोजता आहात त्यांना हा प्रश्न जरुर विचारला जावयास हवा. पण आपण स्वतःच विषय काढला आहे तर विषमता निर्मुलन, समान संधी आणि सकारात्मक कृती (अफर्मेटीव्ह) अ‍ॅक्शनच्या बाबतीतील संघाचे रचनात्मक योगदान या विषयावर या निमीत्ताने आपण प्रकाश टाकल्यास आम्हा सर्वांच्याच माहितीत भर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ

श्रीगुरुजी
Sat, 03/12/2016 - 17:27 नवीन
संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ अर्धी खाकी विजार, पांढरा सदरा व काळी टोपी घालून शाखेत जाणारे स्वयंसेवक एवढेच गृहीत धरले असावे असे वाटते. वास्तविक संघाने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार करून संघटना काढलेल्या आहेत (राजकीय क्षेत्रात भाजप, विद्यार्थी क्षेत्रात अभाविप, धार्मिक क्षेत्रात विहिंप, कामगार क्षेत्रात भामसं, वनवासी क्षेत्रात वनवासी संघ इ.) मूळ संघ या पितृसंघटनेत नसलेले पण या इतर संघटनेत असलेले संघाच्या मूळ तत्वज्ञानाशी सहमत असतातच असे नाही व तसे असण्याची सक्ती देखील नाही. संघ हा वृक्ष समजला तर या इतर संघटना त्या वृक्षाच्या फांद्या आहेत. या संघटनांव्यतिरिक्त इतर संघटना (बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, श्रीराम सेने इ.) संघाच्या नियंत्रणाखाली नाहीत. परंतु जेव्हा जेव्हा या इतर संघटनांकडून काही टीकायोग्य कृत्य घडते, तेव्हा तेव्हा संघपरिवाराकडून ते कृत्य घडल्याच्या चुकीच्या बातम्या छापल्या जातात. संघ कार्यकर्ते हे प्रसिद्धिपराङमुख राहून काम करतात. त्यामुळे त्यांनी कार्याचा गाजावाजा होत नाही. त्यामुळे बाबा आमटे यांच्यासारखी थोर व्यक्तिमत्वे संघाने घडविल्याचे दिसत नाही. कै. नानाजी देशमुखांसारखा एखादाच अपवाद. संघाने भारताच्या सर्व क्षेत्रात शिरकाव करून आपले स्थान भक्कम केले आहे. संघाला भारताच्या अवकाशातून नष्ट करणे अत्यंत अवघड आहे. संघावर एकूण ३ वेळा बंदी आणली गेली. प्रत्येक बंदीनंतर संघ नेस्तनाबूत होण्याऐवजी अधिकाधिक मजबूत होत गेला. १९४८ मधील पहिल्या बंदीनंतर संघ अधिक फोफावला. १९७५ मधील बंदीनंतर संघ कार्यकर्त्यांना प्रथमच केंद्रात व काही राज्यात सत्तेत स्थान मिळाले. १९९२-९३ मधील बंदीनंतर संघ स्वयंसेवक पंतप्रधान झाला आणि आता संघाच्या राजकीय शाखेला स्वबळावर बहुमत मिळून केंद्रात सरकार आहे. डॉ. हेडगेवारांच्या काळात संघ जन्म घेऊन तग धरून राहिला. कै. गोळवलकर गुरूजींच्या काळात संघ जोमाने वाढला परंतु संघाची प्रतिमा साधुबैराग्यांची संघटना अशीच राहिली. नंतर कै. देवरसांच्या काळात संघ व्यावहारिक व्हायला सुरूवात होऊन राजकारणात जोमाने वाढू लागला. त्यानंतर आजतगायत संघ भक्कम उभा आहे. बदलत्या काळानुसार संघाने आधुनिकतेचा स्वीकार केला, परंतु गणवेष, शाखा इ. बाबतीत संघ अजूनही स्थापनेच्या काळातच वावरत आहे. संघ गणवेष बदलणार असल्याच्या बातम्या कायम येत असतात, परंतु अजून कार्यवाही झालेली दिसत नाही. बदलत्या गतिमान जीवनात संध्याकाळी १ तास शाखेवर जाणे बहुतेक विद्यार्थ्यांना शक्य नाही. त्यामुळे संघशाखेवर उपस्थिती कमी होत आहे हे निरीक्षण सत्य आहे. परंतु शाखेवर न जाता सुद्धा संघाचे विचार मनात ठेवता येतात. महाविद्यालयीन १-२ दिवसांची छोटी शिबिरे आयोजित करून संघ विद्यार्थ्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments

राजकीय क्षेत्रात भाजप,

अनुप ढेरे
Sat, 03/12/2016 - 21:55 नवीन
राजकीय क्षेत्रात भाजप, विद्यार्थी क्षेत्रात अभाविप, धार्मिक क्षेत्रात विहिंप, कामगार क्षेत्रात भामसं, वनवासी क्षेत्रात वनवासी संघ इ.
यातलं वनवासी कल्याण आश्रम सोडलं तर कंस्ट्रक्टिव काम कोण करतं? आणि काय करतं? सगळे गुंंडगिरीसाठी प्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

संघ परिवाराच्या मानल्या जातात

अभ्या..
Sun, 03/13/2016 - 13:17 नवीन
संघ परिवाराच्या मानल्या जातात अशा बँकांनी (पश्चिम महाराश्ट्रात सहकारी बँकांचा सावळा गोंधळ असताना देखील) चांगल्या पध्दतीने सहकाराचे जाळे विणलेले आहे. काही क्षुल्लक अपवाद वगळता अन इतर पक्षांनी खाजगी संस्थानासारख्या चालवलेल्या मध्यवर्ती बँकासमोर हे यश अत्यंत डोळ्यात भरणारे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

>>संघ हा वृक्ष समजला तर या

नितिन थत्ते
Sun, 03/13/2016 - 09:27 नवीन
>>संघ हा वृक्ष समजला तर या इतर संघटना त्या वृक्षाच्या फांद्या आहेत. या संघटनांव्यतिरिक्त इतर संघटना (बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, श्रीराम सेने इ.)परंतु जेव्हा जेव्हा या इतर संघटनांकडून काही टीकायोग्य कृत्य घडते, तेव्हा तेव्हा संघपरिवाराकडून ते कृत्य घडल्याच्या चुकीच्या बातम्या छापल्या जातात. हे विधान टिपिकल संघी आहे. बजरंग दलाची कृत्ये संघाला मान्य नसतात का? मान्य नसतील तर विनय कटियार यांना भाजपने आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देऊ नये असे संघाने कधी भाजपला सांगितले आहे काय? सांगितले असूनही भाजप ऐकत नसेल तर संघ स्वयंसेवक कटियार यांच्या प्रचाराला जाणार नाहीत अशी भूमिका संघाने घेतली आहे का? उगाच काय आपलं !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उगाच काय आपलं !!!>>> ताकाला

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 11:28 नवीन
उगाच काय आपलं !!!>>> ताकाला जाऊन भांडं लपवणं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बजरंग दलाची कृत्ये संघाला

श्रीगुरुजी
Sun, 03/13/2016 - 12:54 नवीन
बजरंग दलाची कृत्ये संघाला मान्य किंवा अमान्य असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी संघटना आहे. भाजपचे उमेदवार संघ ठरवीत नसतो. भाजप अनेकवेळा भाजपशी संबंधित नसलेल्यांना उमेदवारी देतो (उदा. सुरेश प्रभू). विनय कटीयार सुरवातीला अभाविपमध्ये होते. नंतर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारकही होते. त्यानंतर काही काळाने त्यांनी हिंदू जागरण मंच नावाची संघटना व नंतर बजरंग दलाची स्थापना केली. म्हणजे तसे ते संघाशी काही काळ संबंधित होते परंतु नंतर त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

भाजपचे उमेदवार संघ ठरवीत नसतो.

अर्धवटराव
Sun, 03/13/2016 - 12:58 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 13:30 नवीन
बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी संघटना आहे >> आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मान्य न करणार्‍या गुरुजींना बजरंग दल ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे कसे मान्य होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

*श्री गुर्जी मोड़ ऑन*

नाना स्कॉच
Sun, 03/13/2016 - 13:34 नवीन
*श्री गुर्जी मोड़ ऑन* कमाल आहे ! इथे कोणी केजरीवालचे नाव तरी घेतले आहे का उगीच आपले काहीही *श्री गुर्जी मोड़ ऑफ़* (फ्री) भुर्जी फॅन नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्वाभिमान संघटना ही

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 13:41 नवीन
स्वाभिमान संघटना ही काँग्रेसशी संबंधित नसूनही ती आहेच असा दावा केवळ नितिश राणे हे युवा काँग्रेस, मुंबैचे काही काळ पदाधिकारी होते ह्यावरुन करणारे श्रीगुरुजी संघप्रचारक (माजी?) विनय कटीयार यांनी बजरंग दलाची 'वेगळी चूल' मांडली हेही ठसक्यात सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्वाभिमान संघटना ही

श्रीगुरुजी
Sun, 03/13/2016 - 13:59 नवीन
स्वाभिमान संघटना ही काँग्रेसशी संबंधित नसूनही ती आहेच
हा दावा मी कोठे केला आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना

श्रीगुरुजी
Sun, 03/13/2016 - 14:00 नवीन
आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मान्य न करणार्‍या गुरुजींना
आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मी कोठे अमान्य केले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्हाला सोयिस्करपणे विसरायचे

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 14:11 नवीन
तुम्हाला सोयिस्करपणे विसरायचे असेल तर तुम्हाला घटनेने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी कोणतीच गोष्ट विसरलेलो नाही

श्रीगुरुजी
Sun, 03/13/2016 - 14:19 नवीन
मी कोणतीच गोष्ट विसरलेलो नाही. तुम्हाला दुसर्‍याच्या नावावर खोटे खपवायची सवय लागलेली आहे. म्हणूनच माझ्या नावावर तुम्ही जे दावे खपवित आहेत ते मी दावे नक्की कोठे केले आहेत याचा संदर्भ मागत आहे. ते संदर्भ द्या अथवा माझ्या नावावर जे खोटे दावे खपवित आहात ते मागे घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

स्वतःच्या प्रतिसादांची नोंद

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 14:40 नवीन
स्वतःच्या प्रतिसादांची नोंद घेऊन ठेवत जा. http://www.misalpav.com/comment/793343#comment-793343 ती मूळची आआपचीच कार्यकर्ती आहे. ती इतर कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तिचा एखाद्या पक्षाशी संबंध असेल तर तो फक्त आआपशीच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड किंवा इंदिरा काँग्रेस व सेवा दल हे जसे वरवर वेगळे वाटतात तसेच आआप पक्ष व आम आदमी सेना आहेत. http://www.misalpav.com/comment/793523#comment-793523 आआप पक्ष आणि आम आदमी सेना हे फक्त वरवर वेगळे आहेत (जसे इंदिरा काँग्रेस व सेवादल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेड). ही सर्व नौटंकी मागील नौटक्यांचीच पुनरावृत्ती आहे. त्यात तसूभरही फरक नाही. http://www.misalpav.com/comment/794554#comment-794554 अहो, ते दोन्ही एकच आहेत. जसा इंदिरा काँग्रेस व सेवा दल यांच्यात अजिबात फरक नाही, तसाच या दोघांमध्येही काहीही फरक नाही. http://www.misalpav.com/comment/805503#comment-805503 आम आदमी सेना व आआप हे एक नसून आम आदमी सेना ही आआपमधील लोकांनीच सुरु केलेली संघटना आहे हे मी सुरवातीपासूनच सांगत आहे. एक संघटना आहे व एक राजकीय पक्ष आहे. परंतु त्या राजकीय पक्षातीलच मंडळी या संघटनेत आहेत. भावना अरोरा ही एकाच वेळी आआपची सदस्य असून आम आदमी सेनेची सुद्धा सदस्य आहे. अशी 'दुहेरी निष्ठा' असलेले नेते सर्व पक्षात असतात. इथेही तसेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जरा नीट वाचा. मला जे सांगायचे

श्रीगुरुजी
Sun, 03/13/2016 - 15:09 नवीन
जरा नीट वाचा. मला जे सांगायचे होते तेच मी स्पष्ट लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काय सांगायचे आहे आणि काय

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 15:12 नवीन
काय सांगायचे आहे आणि काय स्पष्ट लिहिले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

RSS

Ranapratap
Sat, 03/12/2016 - 18:30 नवीन
Any way RSS is great
  • Log in or register to post comments

जे आपल्या कामामुळे प्रसिद्ध

तर्राट जोकर
Sat, 03/12/2016 - 21:36 नवीन
जे आपल्या कामामुळे प्रसिद्ध होतात ते प्रत्यक्षात प्रसिद्धीलोलुप असतात म्हणून प्रसिद्ध होतात. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

संघ सनातनी आहे हे खर आहे.

अनुप ढेरे
Sat, 03/12/2016 - 21:59 नवीन
संघ सनातनी आहे हे खर आहे. हिंदू धर्म हा इस्लाम/जुडाइझम च्या धरतीवर ऑर्गनाइज्ड करणं हे नक्की यांच उद्दिष्ट आहे. हिंदूंनी चार मुलं काढली पाहिजेत हे आणि यासारखे विचार संघ/त्याच्याशी अफिलिएटेड लोकांकडून कैक वेळेला ऐकलेले आहेत.
  • Log in or register to post comments

हिंदु धर्म कधीच ह्या सेमिटिक

नाना स्कॉच
Sat, 03/12/2016 - 22:35 नवीन
हिंदु धर्म कधीच ह्या सेमिटिक धर्मांसारखा मोनोलिथिक होऊ शकत नाही! इथे एकच धर्माच्या टाइटल खाली असंख्य कंट्राडिक्टरी विचार नांदतात, हजारो वर्षे नांदले आहेत नांदलेच पाहिजेत, तेच हिंदु धर्माचे सौंदर्य आहे अन तेच बलस्थान सुद्धा आहे, ह्याच एका कारणांमुळे जे कोणी व्यक्ति/संस्था मोनोलिथिक हिंदुत्व पुढे करतात त्याचा उदोउदो करतात तेच सगळ्यात मोठा धोका वाटतात मला धर्माला असलेला,.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

सहमत.

राही
Sun, 03/13/2016 - 11:01 नवीन
नाना स्कॉच आणि मूळ अनुप ढेरे यांचा प्रतिसाद, दोन्हींशी सहमत. संघाच्या दृष्टीने संगठन म्हणजे एकजिनसीपणा, तोही त्यांना अभिप्रेत असलेला. यात हिंदुधर्माचे जे खरे बलस्थान विविधता, ते नष्ट होते. अनेक छोट्याछोट्या अस्मिता ज्या या समाजगटांना जगण्याचे बळ देतात, त्या दडपल्या जातात. भाषा, खानपानसवयी, आचार यावर संघ आणि प्रणीत संस्थांकडून नक्कीच आक्रमण होत असते. संघ आणि प्रणीतांना अभिप्रेत पद्धतीचाच प्रसार होईल असे पाहिले जाते. भाषा हा यातला ठळक मार्ग आहे. अलीकडच्या सरकारी जाहिराती पाहिल्या तर त्यांची भाषा नको वाटावी इतकी संस्कृतनिष्ठ/मय होत चालली आहे. अशी कायशीशी एक जाहिरात पाहा : "अपने शौचके समापन के लिए शौचालय की उपलब्धि का प्रयोग करें". अनेक योजनांची नावे संस्कृतमय झाली आहेत. बहुविधता झटकण्याचाच हा एक भाग आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

संघावर माझा एक आक्षेप.

एस
Sat, 03/12/2016 - 22:47 नवीन
संघाने 'आदिवासी' हा शब्द बदलून त्याऐवजी 'वनवासी' हा शब्दप्रयोग वापरणे का सुरू केले? त्यामागे आदिवासींची या भूमीचे आदिम रहिवासी ही ओळख पुसण्याचा हेतू नव्हता? वनवासी हा शब्द मराठीत हेटाळणी, कुचेष्टेच्या रूपाने वापरला जातो. उदा. 'असा काय वनवाश्यासारखा फिरतोयस?'. त्यामुळे मला संघाचा हेतू हा आदिवाश्यांचे हिंदूकरण करणे आणि मिशनरींच्या धर्मप्रसाराला हिंदू पर्याय उभा करणे हा वाटतो.
  • Log in or register to post comments

माझं धर्मांतरावरचं वाचन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 03/13/2016 - 08:37 नवीन
माझं धर्मांतरावरचं वाचन अत्यंत कमी आहे. त्यामुळे ठामपणे ह्यावर मतं मांडु शकणार नाही. बहुतांश आदिवासी माझ्या माहितीप्रमाणे तरी हिंदु धर्मातचं मोडतात आणि ख्रिश्चन मिशनरी किरकोळ आमिषं दाखवुन आनंद चा अँटोनी करतात. स्वधर्माचं संरक्षण करणं ह्यामधे मलातरी काही चुक वाटत नाही. नमस्ते सदा वत्सले मातृभुमे, त्वया हिंदुभुमे सुखम वर्दितोहम महामंगले पुण्यभुमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तीमन हिंदुराष्ट्रांगभुता संघ प्रार्थनेचं पहिलं कडवं आणि दुसर्‍या कडव्याची पहिली ओळ पहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आदिवासी (ते वनवासी वगैरे मी

नाना स्कॉच
Sun, 03/13/2016 - 09:06 नवीन
आदिवासी (ते वनवासी वगैरे मी नाही म्हणत) किरिस्ताव होतात ते सुद्धा काही धर्मावर फार मोठा राग आहे म्हणून वगैरे नाही तर 2 वेळच्या भाकरीची सोय ह्या एकमेव एजेंडा वर होतात, आपण कधी मध्य भारतीय आदिवासी बेल्ट मधे फिरला आहात का ते माहीती नाही, पण हे फॅक्ट आहे, सीमांध्र प्रांतात तर सुनामी नंतर संघ तिथे पोचायच्या आत मास कन्वर्शन झाली होती, त्यातला एक अनुभव वाचला होता कुठेतरी एक माणुस मदत घ्यायला (धान्य प्लास्टिक शीट भांडीकुंडी इत्यादी) कधी क्रिस्चियन होत असे तर कधी हिंदु धर्मात टिकून राहत असे , त्यांच्या धर्मनिष्ठेवर शंका घ्यायचे कारण नसते तर सर्वाइवल हे प्रायोरिटी असते . वनवासी (संघाच्या भाषेत) हिंदु फोल्ड मधे ठेवायचे असले तर पहिले म्हणजे त्यांना त्यांचे महत्व सांगा, पोटाला भाकरी अन हाताला काम द्या! त्यांना धर्माची गोळी नुसतीच देऊन उपयोग नाही. बाकी हे माझा धर्म तुझा धर्म धर्मरक्षण वगैरे कन्वर्शन वगैरे आपल्या शहरी निमशहरी किंवा कनेक्टिविटी असलेल्या ग्रामीण भागात असलेली फैड आहेत. शिवाय अजुन एक मुद्दा म्हणजे , स्वधर्माचे रक्षण म्हणजे हिंदु धर्माच्या पर्सपेक्टिव मधे काय?? हा मुलभुत विचार प्रथम व्हावा, संघ जसा मोनोलिथिक हिंदु धर्म अपेक्षितो तसा तो होणे नाही कधीच, स्वधर्मरक्षण अन आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून वाचवणे म्हणजे प्रथम त्यांच्या चालीरीती अन मान्यता अन संस्कार वगैरेना मुख्यधारेचे अधिष्ठान देणे होय, अमुक एक पद्धत चुक अन तमुक बरोबर असे नसावे/नकोय. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या मताशी सहमत आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 03/13/2016 - 10:23 नवीन
तुमच्या मताशी सहमत आहे.
आदिवासी (ते वनवासी वगैरे मी नाही म्हणत) किरिस्ताव होतात ते सुद्धा काही धर्मावर फार मोठा राग आहे म्हणून वगैरे नाही तर 2 वेळच्या भाकरीची सोय ह्या एकमेव एजेंडा वर होतात,
हेच्चं किरकोळ आमिषं दाखवुन धर्मांतरण. पोटाला भाकरी आणि हाताला काम मिळालं तर ह्या धर्मांतरणाचं प्रमाण शुन्यवत होईल. स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो हिंदु धर्माचं रक्षण. सगळ्या जाती पोटजातींसकट. मात्रं ह्याचा अर्थ नित्यनेमाने चुकीचा लावला जातो असं आजवरचं निरिक्षण आहे. स्वधर्माचं रक्षण करणं हि भुमिका आक्रमक नाही (माझ्या मते आक्रमक असायला हवी) तर डिफेन्स स्टान्स आहे. दुसर्‍या धर्माचा आदर जरुर करावा ना नाही, पण त्यासाठी स्वधर्माचा बळी द्यायचा विचारही नको एवढी साधी स्पष्ट विचारसरणी हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

ह्याच पर्टिक्युलर केसेस मधे

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 11:31 नवीन
ह्याच पर्टिक्युलर केसेस मधे संघ स्वधर्माचं रक्षण कसं करतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो

अभ्या..
Sun, 03/13/2016 - 12:23 नवीन
स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो हिंदु धर्माचं रक्षण. सगळ्या जाती पोटजातींसकट.
हेहेहेहेहेहे आदीवासींना मुख्य प्रवाहात आणायचे, त्यांचा विकास करायचा सगळे ठिक आहे हो बोलायला. पण मुख्य प्रवाह काय? बहुजनांचा, अभिजनांचा? आपली जी धर्मरक्षणाची भुमिका तीच त्यांनी पण पाळावी? मग हिंदु धर्मातल्या वेगवेगळ्या पोटजातीचा त्यांच्या परंपरांचा आदर करायच्या भुमिकेचे कसे? त्यांची भुमिका त्यांना ठरवू द्या ना. आदिवासी सोडा, साधे पारधी वगैरे जमातीसाठी चालवल्या जाणार्‍या शाळांचे अनुभव बोलके आहेत. त्यांना मुक्त प्रवाहात आणताना त्यांची पिढ्यानपिढ्यांची जीवनवैशिश्ट्ये नष्ट नाही ना करत आपण? संस्कृत सरस्वती स्तोत्र शिकवून म्हणवून घेणे एकवेळ कौतुकास्पद पण तीच मुले मोर खाया लै चांगला लागतो असे म्हणले की पांढरपेशांना धक्का बसतो. शाळेतल्या खिचडीला कंटाळून ही मुले गलोलीने पाखरे टीपून काट्याकुटक्यावर भाजून खातात. हिंदू म्हणजे काय, पुराणे काय ह्याचे त्यांना देणेघेणे नाही. भाकरीसाठी किरीस्ताव झालेली आदिवासी मंडळी गळ्यात क्रॉसही घालतील पण निसर्ग पुजायची सोडणार नाहीत. धर्मांतर म्हणजे राश्ट्रांतर ही कल्पना आवेश आणायला जेवढी सोपी तेवढीच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी अवघड. पूर्वांचल, नागालँड सारखी उदाहरणे वारंवार दिली जातात. पण आदीवासींना काय हवे याचा विचार कसा करणार? भाकरी अन थोड्या पैशासाठी ते धर्म बदलतात. मग त्यांची बुध्दी कशी बदलते? काही ठिकाणी तथाकथित वर्गलढा ह्या संकल्पनेलाही आदीवासी आपलेसे करतात म्हणतात. तेथे धर्माचा काय रोल असतो? भारत देश अन देशप्रेम नामक संकल्पनेत हिंदू असणे अन एकच एक पध्दतीची धर्मपालनाची स्टाइल मस्टच आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

+111111 लैच वेळा

नाना स्कॉच
Sun, 03/13/2016 - 12:32 नवीन
मला नेमके असेच म्हणायचे होते पण कदाचित माझ्यात ती कला नाही (एग्रेसिवली मुद्दा मांडणे), हिंदु धर्म रक्षण म्हणले की त्यात पोथीनिष्ठा आली अन आपल्या पोथ्या तर एकलव्य सारख्या शोकांतिका सांगत असतात, त्यांचा (आदिवासी लोकांचा हिंदु ) धर्म कुठला? का आजपण त्यांनीही एकलव्याचा अंगठा घेणे कसे उत्तम होते हेच म्हणावे? "सकल हिंदु धर्म रक्षण" हे टिपिकल पुस्तकी वचन वाटते बऱ्याच वेळी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दोन्ही प्रतिसाद आवडले. अजून

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 12:39 नवीन
दोन्ही प्रतिसाद आवडले. अजून खुप लिहिण्यासारखे आहे. चर्चा पुढे जाऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

+१^न

राही
Sun, 03/13/2016 - 18:46 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

स्वधर्माचं रक्षण करणं हि

अभ्या..
Sun, 03/13/2016 - 13:01 नवीन
स्वधर्माचं रक्षण करणं हि भुमिका आक्रमक नाही (माझ्या मते आक्रमक असायला हवी) तर डिफेन्स स्टान्स आहे.
हिटलरी तत्वांचा अंगीकार नाही वाटत? स्वधर्म... हम्म. अशा कोणत्या सूत्रात बांधलेय/ बांधू शकू/ बांधणार आहोत? अगदी सिंपल, समजा आदिवासींनी म्हणले आमचा धर्म खरा हिंदू धर्म आहे आणि त्यानुसारच सर्वांनी वागावे. धर्माचरण करावे. असे म्हणत नाहीत ते सोडा पण शक्य आहे का ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हिटलरी तत्वज्ञान काय होतं/आहे ?

अर्धवटराव
Sun, 03/13/2016 - 13:16 नवीन
हिटलरी तत्वांचा अंगीकार नाही वाटत?
हे नेमकं काय तत्वज्ञान आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जस्ट परवा परवा आला होता हो

अभ्या..
Sun, 03/13/2016 - 13:20 नवीन
जस्ट परवा परवा आला होता हो धागा. ऊडवला :( तीच लिंक दिली असती नाहीतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून

माहितगार
Sun, 03/13/2016 - 15:19 नवीन
आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून वाचवणे म्हणजे प्रथम त्यांच्या चालीरीती अन मान्यता अन संस्कार वगैरेना मुख्यधारेचे अधिष्ठान देणे होय, अमुक एक पद्धत चुक अन तमुक बरोबर असे नसावे/नकोय. असो!
अगदी बरोबर, ३३ कोटी देवांमध्ये जगातल्या सर्व आदीवासींच्या देवतांना स्थान द्यावयास हवे. ज्याला त्याला त्याचा देव त्याच्या पद्धतीने पुजू द्यावा केवळ काही जमातीत विच हंटींग सारख्या अंधश्रद्धा आहेत तेवढ्या पुरती पुरोगामी प्रबोधन करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

तेहतीस कोटी देव ही वेगळी

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 15:33 नवीन
तेहतीस कोटी देव ही वेगळी संकल्पना आहे. ब्रह्मांडाचे तीन स्तर धरुन प्रत्येकी अकरा देवता अशा तेहेत्तीस प्रकारच्या देवता. कोटी म्हणजे प्रकार की आणखी काही असेल पण ती संख्यामात्र निश्चित नाही. आदिवासींच्या देवतांना इतर कोणाच्या देवतांमधे स्थान देणे हे आपसूक घडत आलेले सांस्कृतिक अभिसरण आहे. ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे उदाहरण आहे. शिवलिंगाचा मूळ अर्थ आणि त्याच्या पुजनाच्या मागची कारणे आजच्या सुशिक्षित मुख्यप्रवाहातल्या अभिजात सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या वर्गाला गळी उतरवणे शक्य नाही. भारत देशात अशा अनेक मान्यता आणि रुढी आहेत ज्या इतर लोकांन पचनी पडणार नाहीत. घटनेने दिलेल्या हक्कांच्या अंमलबजावणीस आडकाठी ठरणार्‍या सर्व प्रथा, रुढी बंद कराव्यात. त्यासाठी पुढाकार घ्यावा. भाजपसरकारने जातीने वाळीत टाकण्याच्या कृतीला दंडनीय अपराध ठरवून ह्या बद्दल एक चांगले पाऊल टाकले आहे. पण जाती जातीच्या वोटब्यांका परत जात पंचायतींच्याच हातात असल्याने ह्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रभावाबद्दल साशंकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे

सतिश गावडे
Sun, 03/13/2016 - 15:56 नवीन
ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे उदाहरण आहे. शिवलिंगाचा मूळ अर्थ आणि त्याच्या पुजनाच्या मागची कारणे आजच्या सुशिक्षित मुख्यप्रवाहातल्या अभिजात सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या वर्गाला गळी उतरवणे शक्य नाही. भारत देशात अशा अनेक मान्यता आणि रुढी आहेत ज्या इतर लोकांन पचनी पडणार नाहीत.
यावर लिहा हो. वेदांमधला रुद्र पुढे "शिव" झाला असे एखादे वाक्य वाचायला मिळते. मात्र त्यावर सविस्तर कुठेच लिहिलेलं नाही. अमिश त्रिपाठीच्या शिवा ट्रायॉलॉजीमधून थोडीफार कल्पना येईल असे वाटते. मात्र ते "फिक्शन" असेल बरंचसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ह्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त

तर्राट जोकर
Sun, 03/13/2016 - 16:12 नवीन
ह्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त चांगले प्रचेतस सर सांगू शकतील. मला आता जास्त काही आठवत नाही. लिंगपुजा प्राचीन भारतीय परंपरा आहे, कदाचित आर्यांच्याही आधीची, द्रविडी असावी. ह्यात लिंग व योनी ह्यादोघांचे एकत्र अवस्थेतले पूजन आहे. निसर्गाच्या निर्मितीचे प्रतिक म्हणून आदीम भारतीय ह्याची पुजा करत असावेत. आताच्या शिवलिंगांमधे जी योनी ही रचना लिंगावर केलेला अभिषेकाचे पाणी, दूध इत्यादी वाहून जाण्याची सोय आहे असं मला लहानपणी शिकवल्या जायचे (ती योनी आहे हे पुढे वाचल्यावर कळलं).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आपले प्रचेतस आहेत की माहिती

माहितगार
Sun, 03/13/2016 - 16:15 नवीन
आपले प्रचेतस आहेत की माहिती देण्यासाठी. एका मराठी संधोधिकेचा भरातातील लिंगपुजेच्या विकासाच्या टप्प्यांच्या संदर्भाने रिलायेबली माहिती देणारा लेख बर्‍याच वर्षांपुर्वी लोकप्रभा साप्ताहीकात वाचण्यात आला होता, मी त्या बंतर वाचलेल्या सर्व लेखना पेक्षा तो उजवा होता असे अंधूकसे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आता प्रचेतस सरांना भेटणे आले.

सतिश गावडे
Sun, 03/13/2016 - 16:19 नवीन
आता प्रचेतस सरांना भेटणे आले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

पाकीस्तानातील आदीवासीतील

माहितगार
Sun, 03/13/2016 - 16:25 नवीन
पाकीस्तानातील आदीवासीतील लिंगपूजा धर्मांतर फाळणी यातून अलिकडे पर्यंत कशी टिकुन राहीली होती, याची एका पाकिस्तानी अँथ्रॉपॉलॉजीस्टने अलिकडे दखल घेतली आहे. आंजावर शोधल्यास मिळेल. भूतान मधील पवित्रा देवक-टोटेम लिंग प्रतिक प्रथा या बद्दलही आंजावर शोधल्यास काही माहिती मिळू शकेल असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बहुतांश आदिवासी माझ्या

बोका-ए-आझम
Sun, 03/13/2016 - 13:38 नवीन
बहुतांश आदिवासी माझ्या माहितीप्रमाणे तरी हिंदु धर्मातचं मोडतात
काही आदिवासी जमाती या स्वतःचा वेगळा धर्म पाळतात. इंग्रजीत त्याला Pagan हा शब्द आहे. हा धर्म फक्त त्या जमातीपुरता मर्यादित असतो. मला स्वतःला मध्य प्रदेशात होशंगाबादमध्ये एका project वर काम करत असताना भेटलेल्या आदिवासींनी - राम आणि कृष्ण म्हणजे काय? आमच्यासाठी झाडे, विंध्य पर्वत, नर्मदा नदी हे देव आहेत असं सांगितलं होतं. त्यांना हनुमान, रावण हे कोण आहेत हेही माहित नव्हतं. ईशान्य भारतातही असे अनेक आदिवासी आहेत. मी पुण्याला शिकत असताना दोन्ही - हिंदू आणि pagan आदिवासी मुलांशी (मणिपूर, आसाम, मिझोराम येथून आलेल्या) ओळख झाली होती. त्यावरून हे सांगू शकतो. पण या pagan लोकांचा पूर्ण आदिवासी लोकसंख्येतला हिस्सा माहित नसल्यामुळे ठाम सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा