एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .
या विषयावर लिहिण्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे लोकांची range . एका बाजूला हे फारच सपक किंवा बेचव वाटू शकत तर दुसरीकडे अगदीच उथळ सवंग किंवा बिभत्स वाटू शकत . म्हणून एका मध्यम मार्गाने जाण्याचा हा प्रयत्न . तरीही काही ठिकाणी हे थोडे कमी-जास्त होते आहे . इतक variation वाचक सांभाळू शकतील .
माझ्यासाठी लेखकाने गोष्ट लिहिली कि ती तिथेच संपत नाही किंवा पूर्ण होत नाही . वाचक ती वाचतात आणि त्याचा अर्थ लावतात तिथे ती पूर्ण होते . काही ठिकाणी जिथे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास वाचकांनी स्वतःच्या सोईचा अर्थ घेतल्यास हि गोष्ट तुम्हाला जास्त जवळची वाटेल व तुम्हाला जास्त आनंद होईल .
तुम्ही कथा वाचता आहात आपले अभिप्राय देत आहात हे पाहून आनंद झाला . तुम्हाला असाच आनंद पुढेही देण्याचा प्रयत्न राहिल .
..............................................................................................................................................................
मेणाहून कोमल आणि वज्राहून कठोर अशा प्रकारचे वर्णन एकाच गोष्टीचे असेल तर ती गोष्ट कोणती ? असो ज्याचा त्याचा वेगळा विचार असू शकतो . पण हि फक्त उपमा असू शकते . ख-या जगात बराच फरक पडू शकतो . महाभारतात दुर्योधनाचा काही भाग कमजोर राहिला आणि तेथेच सातत्याने मार लागून तो गेला . बाकी धर्म अधर्म जरी बाजूला ठेवला तरी झाल ते बरच झाल . त्याने कंबरेला काही गुंडाळलच नसत तर त्याच सगळ शरीर वज्राच झाल असत . मग त्याची बायको काही वाचली नसती . थेट वज्रच घ्यायच म्हणजे काय ?
असो बाकी मंजूला वज्राघात तर नाही ना सहन करावा लागत . असा विचार करण्यामागे कारणही तसच होत तिचा चेहरा फार त्रासिक व्हायचा . आणि अशा अनुभवात चेहरा त्रासिक होणे चांगल नाही . म्हणजे अस व्हायलाच नको . आणि तिला याबद्दल विचारण्याच धाडसही नाही होत . कारण तिला अस काही विचारल तर ती विचारल आहे त्याच उत्तर तर देत नाही उलट दुसऱ्याच विषयावर वाद घालत बसते . त्यामुळे सर्व मुडची वाट लागते . पण एकदा इतर वेळी तिला हे विचारायलाच हव . असाच रेटण्याचा विषय नव्हे हा . ती काही दिवस जिमला आली असती तरी बर झाल असत . पण ती यायलाच तयार नव्हती .
या विषयावर बोलायचच अस ठरवून रात्री तिच्याकडे विषय काढला . परत तेच तिने दुसऱ्याच विषयावर वाद घालायला सुरूवात केली . पण मी ठरवल होत आज या विषयावर बोलायचच . मग आधी तिला बोलू दिल . तिच बोलून झाल्यावर परत तिला याबद्दल विचारल तरीही तिने बरेच आढेवेढे घेतले . पण शेवटी बोलली ती . बरच बोलली , पण त्याचा गोषवारा एवढाच होता कि तिला आता यात interest वाटत नाही . आयुष्यात याबद्दल interest न वाटण्याची वेळ येऊ शकते . पण या वयात अस होण नैसर्गिक नक्कीच नाही . नक्कीच तिला दुसरा काही मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल ज्यामुळे अस होऊ शकत पण यावर उपाय किंवा more specifically उपचार केले तर ती नक्कीच परत पहिल्यासारखी होईल . पण या उपचारांसाठी ती तयार होईल का हि शंकाच आहे . पण हे करायला तर हवेच ना . आधी आपणच भेटू डॉक्टरला मग बघू काय होत ते . आधी शारीरिक समस्या आहे का ते पाहू मग गरज पडली तर मानसिक समस्येचा विचार करु . ठिक आहे आधी जाऊ Gynaecologist कडे . पण स्त्रीरोग तज्ञाकडे कस जायच आणि तेही सोबत स्त्री नसताना . तिथ आत तरी सोडतील का ? त्याला काय सोडतील कि . पण जी गोष्ट आपल्यालाच awkward वाटते ती दुसऱ्याला कशी सांगावी हा प्रश्नच आहे ना . जाऊदे पाहू तेव्हाच तेव्हा .
दुसऱ्या दिवशी मी आजारी आहे अस फोन करून सांगितल आणि स्त्रीरोग तज्ञाकडे गेलो . सर्वात आधी पोहोचून तिथ नंबर लावला . लोकांच्या appointments होत्या तरीही सुरूवातीला पोहोचून जास्त वेळ नाही घेणार अशा सबबीवर सर्वांच्या आधी जाण्याची परवानगी मिळवली .
" ठिक आहे पेशंटच नाव "
बायकोच नाव सांगितल.
" कुठ आहेत त्या बोलवा त्यांना पटकन परत अपॉइंटमेंटवाले पेशंट कुरकुर करतात . "
" ती नाही आली मलाच बोलायच आहे डॉक्टरांशी . "
" अहो स्त्रीरोग तज्ञ आहेत मॅडम तुम्हाला कस तपासणार ? "
" अहो मी नाही माझी बायको आहे पेशंट . "
" अहो मग बोलवाना त्यांना . "
" म्हणजे पेशंट तिच आहे पण आता आली नाही ती . "
" अहो अस न तपासता गोळ्या नाही देत मॅडम . "
" मी बोलतो त्यांच्याशी . "
" तुम्हाला अस नाही सोडता येणार आत . "
" मी बोलतो तुम्ही इंटरकॉमवर फोन तरी लावा . "
फोन लावल्यावर विषयाची थोडी कल्पना दिली आणि मला आत बोलावल . हे receptionist लोक विनाकारण बडबड करत बसतात अगदी स्वतः डॉक्टर असल्याच्या थाटात .
डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली त्यावर त्यांच मत अस झाल कि एवढ्यातच अस घडन अवघड आहे . routine check up आणि काही test केल्या नंतर निदान होईल . पण फार काही serious वाटत नाही . आता यासाठी मंजूला घेऊन येण गरजेच होत . अवघड आहे पण फार जरुरी आहे .
घरी गेल्यानंतर मंजूसोबत याबद्दल बोललो . पण ती काही तयार झाली नाही . तिला एकदा विषय सांगून झाला होता आता तिला यावर विचार करायला वेळ द्यायला हवा होता .
आता काही दिवस प्रेम व्यक्त करत होतो पण तात्पुरत का होईना ब्रम्हचर्य पाळून . तिला वेळ देण गरजेच होत . पण या वेळामधे काही गोष्टी थांबल्यातरी काही गोष्टी नाही थांबवता येत . आपले विचार , आपल्या भावना या व्यतिरिक्त इतर शारीरिक घडामोडीही होत राहतात . दिवस उगवतानाच उभे राहणारे प्रश्न आणि बरच काही . अहोरात्र शारीरिक घडामोडी घडत असतात . एखाद्याला इच्छा होत नसल्यास दुसऱ्याला जास्त प्रमाणात इच्छा का होऊ लागते ? हाताला/हातांना श्रम द्यावे का ? नेहमी खळाळत वाहणाऱ्या प्रवाहाला किती दिवस बांध घालणार ? त्यातच आठवण झाली बांधांना कुठेतरी सांडवा असतो ज्याचा मुळात उद्देशच हा असतो की एका विशिष्ट मर्यादेच्या वर पातळी गेली की पाण्याचा आपोआप विसर्ग सुरू होतो . अस काही शारीरिक बाबतीतही असेलच . तोपर्यत थांबायच का ? कोणी किती वेळ उभ राहू शकत ? असे वेगवेगळ्या विषयावरचे एक ना अनेक प्रश्न पडत होते , आपल उभे राहत होते .
.... क्रमशः
भाग १ www.misalpav.com/node/34867
भाग २ www.misalpav.com/node/34922
भाग ३ www.misalpav.com/node/34975
भाग ४ www.misalpav.com/node/35040
प्रतिक्रिया
29 Feb 2016 - 11:28 am | राहूल.
समतोल लिहीत आहात
29 Feb 2016 - 11:30 am | अभ्या..
जपून लिहित आहात. भाषेवरची पकड जाणवतेय.
येऊ द्या साह्यबा.
29 Feb 2016 - 11:31 am | अभ्या..
मध्ये मध्ये येणारे विन्ग्लिश टाळले तर जास्त बरे.
29 Feb 2016 - 12:30 pm | बॅटमॅन
समतोल आणि समर्पक लेखन. असेच येऊद्यात लौकर पुढचे भाग.
29 Feb 2016 - 12:45 pm | नाखु
एकूण विनाकारण सवंग आत्षबाजी झाली होती त्या पेक्षा वेगळे असेल तर सोन्या हून पिवळे.(ना सी फडके-काकोडकर भागातून कथा वास्तवात आल्याब्द्दल विशेष अभिनंदन)
जे अनुभवातून जात असतील त्यांनाही आणि जाऊ शकतात त्यांनाही !
29 Feb 2016 - 6:40 pm | अनाहूत
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार . इंग्रजी तिथेच वापरल आहे जिथे गरज वाटते आहे . तरीही कमी वापरण्याचा प्रयत्न राहिल .
29 Feb 2016 - 6:43 pm | अनाहूत
मूळ उद्देश भडकपणा दाखवायचा नाही पण कथा विषयामुळे काही ठिकाणी तस होऊ शकत .
1 Mar 2016 - 8:41 am | शित्रेउमेश
खूपच मस्त... अगदी समतोल लिहिताय...
पुलेशु.
1 Mar 2016 - 7:01 pm | अनाहूत
आभारी आहे
2 Mar 2016 - 8:38 am | रमेश भिडे
2 Mar 2016 - 1:23 pm | अनाहूत
??
2 Mar 2016 - 5:04 pm | राहूल.
येऊद्या लवकर
3 Mar 2016 - 9:22 pm | अनाहूत
http://www.misalpav.com/node/35170