शृँगार १६

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 8:47 pm

आजचा दिवस वाईट गेला , रात्री झालेल्या खराब झोपेमुळे मूडही खराब होता . दुपारी मंजूला फोन केला पण फारसं काही बोलली नाही ती . नेहमी इतकी बोलते , काही नाही तरी राग राग करते तस आज काहीच नाही . एकदम चुकल्या-चुकल्यासारखं वाटल . अशी का वागली असेल ती ? या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं . दिवसभर याच विचारामुळे कामातही लक्ष लागलं नाही . याच विचारात घरी पोहोचलो . मंजूला एक-दोनदा फोन केला तर तिने काही उचलला नाही . त्यामुळे मला आता जास्तच काळजी वाटू लागली . याच विचारात होतो तेव्हढ्यात मागे कोणाचीतरी चाहूल जाणवली म्हणून मागे वळून पाहीलं तर राधिका उभी होती .

" अग तू ? कशी आहेस ? "

" तुम्ही ठीक आहात ना ? बाहेरचा दरवाजा उघडाच आहे लॅच की तशीच अडकवली आहे . काळजी वाटली म्हणून पहायला आले . "

" अग थोडा विचारतच होतो त्यामुळे लक्षात नाही आलं . "
अस म्हणत मी चावी घेण्यासाठी बाहेर जाऊ लागलो . तेव्हढ्यात तिने माझ्यासमोर हात वर केला आणि हातातली चावी दाखवली .

" ही घ्या आणि आता विचार न करता स्वस्थ बसा . मी पाणी देऊ का तुम्हाला ? "

" नाही नको मी ठीक आहे आता . "

" तुम्ही आजकाल टेरेसवरपण येत नाही . "

" नाही गं , बस नाही येता आलं , थोडा बिझी होतो . "

" कशात विचारात ? "

" अगदी तस नाही पण नाही जमलं . "

" इट्स् ओके एवढे काय एक्सप्लनेशन द्यायची गरज नव्हती . आता विचार नका करू आणि जाऊन जेवा आता . "

" एवढ्यात ? "

" कोणत्या जगात आहात ? मी जेवूनही आले . अजून थोडा वेळ केला तर बाहेर जेवणही नाही मिळणार . आवरा आणि या जेवून . "

" हो . आवरतो माझं . पण वेळाच लक्षातच आल नाही माझ्या . "

" असू द्या , आवरा आता . मी येते . "

माझं काय चाललय ? किती वेळ झाला ते कळलही नाही असो आता येतो जाऊन .
रात्री झोपायच्या आधीही फोन करावा का नको असा विचार केला . पण आज तीचं मन थोडं अशांत असायचं आणि मी त्यात सारखा फोन करायचो . याने तिला त्रासच व्हायचा . नको , आज नको करायला फोन . उद्या करू फोन . आजही रात्री झोपेचे तिन तेरा वाजलेले . सलग दोन दिवस वाईट झोप झाल्यामुळे सकाळी फारच वाईट मूड होता . पण तरीही सगळं आवरून ऑफिसला जायला निघालो . आधीच वाईट मुड होता त्यात पूजा समोरून आली . मला तिच्याशी आता अजिबात बोलण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे तिला सरळ इग्नोर करत पुढे निघालो . तेव्हढ्यात तिने आवाज दिला

" मला इग्नोर करता आहात का ? "

" नाही , तस नाही जरा घाईत आहे . " पर्याय नसल्यामुळे फारसं थांबलो नाही तरी एवढ बोलावच लागलं . तीही सोबतच येत होती .

" कुठे निघाला आहात ? "

" ऑफिसला "

" मीही येते आहे बरोबर . "

" कुठे ऑफिसला ? "

" अगदी तिथपर्यंत नाही पण काही प्रवास आपण सोबत करू शकतो ना . "

मि तिच्याकडे वळून पाहील , ती माझ्याकडेच पहात होती . पण तरीही शक्य तितक्या कोरडेपणानेच तिला म्हटल

" मला लेडीज कंपार्टमेंटमधे प्रवेश नाही मिळणार . "

ज्याला फार कधी तोडून बोलण्याची सवय नाही त्याने तस बोलण्याचा प्रयत्न करणे किती हास्यास्पद होऊ शकतो हे आताच अनुभवत होतो . मला पटकन तस बोलायला काही सुचलं नसल्यामुळे काहीतरीच बोलून बसलो होतो .

" पण आपल्याकडे फक्त जेन्टस् साठी अस वेगळ कंपार्टमेंट नसत ना , मी येऊ शकते ना तुमच्यासोबत . "

" आता यावेळी ? खूप गर्दी असते . त्यात तू कशी येणार आहेस . "

" होते हो जागा . "

हे मात्र खर होत . अगदी कितीही गर्दी असलीतरी लेडीजला जागा होतेच . त्यामुळे माझ्याकडे आता कोणताही मुद्दा नव्हता . त्यामुळे आता तिचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता . स्टेशनवर पोहोचलो . लवकरच लोकल आली आणि फार प्रयास न पडता दोघांनाही आत जाता आलं . अपेक्षेपेक्षा हे फारच सोप झालं होतं . मी तिच्या शेजारीच पण सुरक्षित अंतर ठेऊन उभा होतो . तेव्हढ्यात तिने मला काहीतरी सांगण्यासाठी जवळ बोलावलं . आणि माझ्या कानात शेजारचा माणूस तिच्या फार जवळ येतो आहे अस सांगितलं . त्यामुळे मला आता तिला कव्हर करून उभ राहण आवश्यक होतं . त्या माणसाला थोडं बाजूला सरकायला सांगून मी तिच्या समोर उभा राहिलो आणि एक हात तिच्या बाजूने घेऊन तिच्या पाठीमागे असलेल्या बारला पकडला . आता ती ब-यापैकी प्रोटेक्टेड होती . येणा-या स्टेशनांवर गर्दीचा लोंढा आला की हातावर तो सगळा भार सहन करावा लागत होता . असं करत शेवटी उतरलो स्टेशनवर . ऑफिसला थोड्या वेळाने गेलो असतो तरी चालले असते पण मला थांबायच नव्हत म्हणून मी निघालो . तेव्हढ्यात ती बोलली

" मला थोडं बोलायचं आहे तुमच्याबरोबर ."

" अग आता उशीर होईल गं ऑफिसला . आपण नंतर बोलूया ना निवांत . "

" मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा . प्लीज . "

" ठीक आहे बोल . "

" इथे असच ? थोड बसूया ना कुठेतरी . "

" अगं आधीच उशीर होत आहे . बर चल . "

ऑफिसकडे जाताना एक बाग आहे तिथे गेलो आणि मग तिला विचारलं

" काय आहे एवढ महत्त्वाच जे तू इतक्या गडबडीच्या वेळी इतक्या गर्दीतून आणि इतक्या दूर आलीस ? "

" कुठून सुरूवात करू हे समजत नाहीए . पण तुम्हाला उशीर होईल म्हणून पटकन सांगते . पण हे अस सांगायचं म्हणजे ..."

माझ्या चेह-यावर अजूनही कोरडेपणाच आणि उशीर होत असल्याची सूचकता होती . त्यामुळं तिनं स्वतःला सावरल आणि बोलू लागली .

" मला तुम्ही आवडता . का , कस , कधी माहीत नाही पण आवडता . "

" माझ लग्न झाल आहे . "

" हो . तुमचा तुमच्या बायकोबरोबर काय इशू आहे ते मला माहिती नाही . ते सॉर्टआऊट झाल तर चांगलच आहे . किंवा नाही झाल आणि तुम्ही पुढील आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त इतर कुणाचा विचार करणार असाल तरीही माझ काही म्हणन नाही . मी फक्त मला काय वाटत ते तुमच्यापुढे व्यक्त केल इतकच . तुम्ही आणि तुमची वाईफ अजून एकत्र असताना मी पुढच इतक बोलण तुम्हाला ठीक नाही वाटणार पण मला हे सगळ अश्यक्य झाल होत म्हणून तुम्हाला सांगाव लागल . तस हे मी स्पष्ट-अस्पष्टपणे सांगितलं होत पण एकदा हे पूर्णपणे सांगण गरजेच वाटल म्हणून हे सगळ ."

ती घडाघडा बोलून मोकळी झाली .

" इतर सगळं जाऊदे पण हे तू किती स्पष्टपणे सांगितलंस अगदी सगळ्या पर्यायांसोबत , किती मॅच्युअर आहेस . मी आतापण इतका मॅच्युअर आहे की नाही हे सांगता यायच नाही . बाकी तू जे सांगितलं त्यात आम्ही दोघे सोबतच आहोत त्यामुळे असा विचार मी नाही करू शकत . पण तू हे जस बोललीस त्यामुळं तुझ्याबद्दल फार रिस्पेक्ट वाटतो आहे ; आधीही होताच पण आता त्यापेक्षा जास्त वाटतो आहे .
तू तुझा हा कॉन्फीडंस आणि स्पष्टपणा तुझ्या आयुष्यात , तुझ्या करीयरमध्ये आण तुला त्याचा फार फायदा होईल . "

त्यावर तिने एक स्माईल दिली आणि पुढे म्हणाली

" इट्स् ओके . पण आपण फ्रेंड्स म्हणून तर राहू शकतो ना ."

" हो नक्कीच . पण एक सांग तू कधी एकेरी बोलते कधी अहो-जाहो . "

" एकेरी अधिकाराने बोलते आणि ..." तिच्या पापण्या खाली झुकल्या , मानही किंचित खाली झाली . काही क्षणच तिची नजर खाली होती . मग ती तशीच वळली , अगदी मुद्दाम माझ्याकडे बघायच टाळल्यासारखी . आणि " येते मी " अस अस्पष्टस बोलत निघालीही .
क्रमशः
https://anahut10.blogspot.in

कथालेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

11 Jun 2016 - 9:28 pm | टवाळ कार्टा

फिल्मी

अनाहूत's picture

12 Jun 2016 - 7:44 pm | अनाहूत

फिल्मी ?

मराठी कथालेखक's picture

12 Jun 2016 - 9:28 pm | मराठी कथालेखक

छान...
पण राघिका कोण आली ही ? मागे कधी उल्लेख होता का ? भाग इतक्या अंतराने येतात की काही संदर्भ विसरले जात आहेत

भाग १० पासून सातत्याने आहे राधिका ....

मराठी कथालेखक's picture

14 Jun 2016 - 12:32 pm | मराठी कथालेखक

पूजा आहे सातत्याने.. पूजाचे दूसरे नाव राधिका आहे का ? :)

मंजू, पूजा आणि राधिका या तीन वेगळ्या व्यक्तीरेखा आहेत .

रातराणी's picture

13 Jun 2016 - 1:55 pm | रातराणी

पूजा = मंजू?

अनाहूत's picture

13 Jun 2016 - 9:21 pm | अनाहूत

अस नाही हो

रातराणी's picture

14 Jun 2016 - 12:15 am | रातराणी

बॉलीवूड चा परिणाम. :) संपवून टाका आता पटापट. फार झाला दुरावा. :)

अनाहूत's picture

14 Jun 2016 - 8:57 pm | अनाहूत

हो तोच प्रयत्न आहे

शि बि आय's picture

13 Jun 2016 - 3:20 pm | शि बि आय

दोघात तिसरा...??

काय सांगता येत नाही आत्ताच . पुढे होईल क्लीयर .

खटपट्या's picture

14 Jun 2016 - 12:10 am | खटपट्या

चांगली चालू आहे कथा..
लवकर येउदे पुढचा भाग

अनाहूत's picture

14 Jun 2016 - 8:59 pm | अनाहूत

धन्यवाद . पुढील भाग लवकरच घेऊन येतो आहे

जवळपास १.५ वर्ष झाल, पुढचा भाग अजुन नाही आला....

आनन्दा's picture

14 Jun 2016 - 9:41 pm | आनन्दा

कथा घसरत चालली..

नाही हो फक्त वेगळ्या वळणावर आहे

मराठी कथालेखक's picture

16 Jun 2016 - 8:00 pm | मराठी कथालेखक

गाडी खूप वळणे घेत आहे.. चांगलं आहे , पण प्रत्येक वळणावर अजूनच संथ होते आहे.
आता प्रवासी गाडीतून उतरून दुसर्‍या गाडीने चालू लागतील कदाचित ...

अनाहूत's picture

1 Jan 2020 - 4:17 pm | अनाहूत

नमस्कार वाचकहो, शृंगार कथा आता पुस्तक रूपात प्रकाशित झाली आहे

शित्रेउमेश's picture

3 Jan 2020 - 2:41 pm | शित्रेउमेश

पूर्ण केलीत की अर्धीच छापलीये पुस्तकात पण???

तिथ पुर्ण करायची होती यासाठी इथ पूर्ण कथा नाही लिहीली

अनाहूत's picture

3 Jan 2020 - 3:36 pm | अनाहूत

https://notionpress.com/read/shringar
इथ पुस्तक उपलब्ध आहे

अभिनंदन

अनाहूत's picture

3 Jan 2020 - 10:54 pm | अनाहूत

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

5 Jan 2020 - 11:58 pm | मराठी कथालेखक

मला तरी हे पटलं नाही.
"म्हणजे अर्धीमुर्धी कथा मिपावर प्रकाशित करुन उरलेल्या कथेकरिता पुस्तक घेवून वाचा" हे जाहिरात तंत्र वापरायला हरकत नाही. पण तसे तुम्ही ते पहिल्या भागात प्रस्तावना देवून स्पष्टपणे सांगायला हवे होते. म्हणजे मग अर्धवट प्रकाशित कथेकरिता मिपावर वेळ घालवायचा की नाही हे ज्याला त्याला ठरवता आले असते.
यापुर्वी या धाग्यावरही तुम्ही

पुढील भाग लवकरच घेऊन येतो आहे

असेच म्हंटले होते. मग आता अचानक भूमिका बदललीत. ह्याला मी तरी जाहिरात तंत्र म्हणणार नाही. एक रसिक म्हणून माझी झालेली फसवणूक वाटते मला ही.
यापुढे मी आपल्या धाग्यांवर येणार नाही. आपल्या पुस्तकाच्या यशाकरिता शुभेच्छा.

शित्रेउमेश's picture

6 Jan 2020 - 8:33 am | शित्रेउमेश

अगदी मनातलं बोललात...

अनाहूत's picture

6 Jan 2020 - 10:24 am | अनाहूत

पहिल्या काय तर सोळाव्या भागानंतरही मला स्वतःलाही पुसटशीही कल्पना नव्हती की कथा पुस्तक रूपात येईल. मी १६ नंतरचे भाग एकदा पूर्ण लिहून काही दुवे व्यवस्थित जोडले जातील याचा प्रयत्न करत होतो. पण अचानक कथा पुस्तक रूपात येण्यासाठी काही गोष्टी घडल्या मग मात्र ती पुस्तक रूपात आल्यानंतरच सांगता आल. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व. पण हे पुर्वनियोजित नक्कीच नव्हते.

प्रमोद देर्देकर's picture

5 Jan 2020 - 3:05 pm | प्रमोद देर्देकर

म्हणजे आता आम्ही उरलेली कथा पुस्तक घेवून वाचायची आहे का?

प्रसाद_१९८२'s picture

5 Jan 2020 - 4:07 pm | प्रसाद_१९८२

तो कथेचा ट्रेलर आहे. संपूर्ण कथा विकत घेऊन वाचायची.

पुस्तक प्रकाशित केल्यामुळे पुढील कथा इथे पोस्ट करू शकता येणार नाही. अपेक्षा करतो तुम्ही समजून घ्याल.

अनाहूत's picture

8 Jan 2020 - 4:43 pm | अनाहूत

विशेष सुट : SN2106 हा कुपन कोड वापरून शृंगारच्या खरेदीवर विशेष सुट उपलबध होईल

https://notionpress.com/read/shringar