जिलबीचं प्रमाण किती असावं ?

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
2 Feb 2016 - 1:19 pm

पे र णा: http://www.misalpav.com/node/34693

नमस्कार मंडळी,

मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो.

पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो.

अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ.
आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय
इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे.

माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही.
माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे
अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते.

माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे?
आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना?
जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ?
व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी.

आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला
तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच.

ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.

jlb01

jlb02

पाकक्रियामुक्तकविडंबनशब्दक्रीडाशुद्धलेखनसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाआस्वादअनुभवमतमाहितीचौकशीप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 1:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चोप्य पस्ते आहे. हे हे ह

''मास्तर केव्हाच मेला आहे, आता तू येऊ नकोस. तुझा चाफा नको आणि मोगराही नको''े.

-दिलीप बिरुटे

नीलमोहर's picture

2 Feb 2016 - 2:33 pm | नीलमोहर

नवलेखकांचे पेपरही फार कठीण तपासता तुम्ही :(
चोप्य पस्ते असले तरी दोन्हीत फरक आहे,
१. मूळ लेखनातील शुध्दलेखन सुधारून इथे लिहीले आहे ;)
२. तेच शब्द, वेगळा अर्थ असे लिहीले आहे (असेच करतात न विडंबन ?)

अज्ञानी विद्यार्थ्यांना त्या स्वाक्षरीविषयी अजून ज्ञान देणे ही नम्र विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 2:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मार्कांचा विचार न करता नुसता पेपर भरायचा काम केलं की हे असं होतं. ;)

विडंबन कसं असावं यासाठी यासाठी 'गुलाबाची फुले' हे किसन शिंदे यांच्या पुस्तकात वाचावं ;)

-दिलीप बिरुटे

नीलमोहर's picture

2 Feb 2016 - 3:08 pm | नीलमोहर

मूळ लेखविषय एवढा जिव्हाळ्याचा असतांना त्यासमोर जिलबीचं काय कौतुक ...
असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवं विडंबन भारीचं झालं आहे. आम्ही उगं तुमच्या आनंदावर विरजन टाकत होतो. लिखते रहो. _/\_

-दिलीप बिरुटे

नीलमोहर's picture

2 Feb 2016 - 5:21 pm | नीलमोहर

धन्यवाद सरजी :)
प्रेरणाच भारी असल्यामुळे काम सोपं झालं.

विजय पुरोहित's picture

2 Feb 2016 - 1:32 pm | विजय पुरोहित

माझे वैयक्तिक मत असे आहे की
सदा काहितरीच - Sat, 30/01/2016 - 20:26

माझे वैयक्तिक मत असे आहे की जिलेबी ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या वेटोळ्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच.
- (आत्तापर्यंत तरी जिलेबी, इम्रती पासून कोसो दूर असलेला) सका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 1:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझंही असंच मत आहे की माझा धागा हायज्याक करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. पण निमोचा धागा म्हणून मी माझ्या धाग्याबरोबर या धाग्याला तळाला जाऊ देणार नाही. ;)

-दिलीप बिरुटे

''मास्तर केव्हाच टल्ली झाला आहे, आता तू येऊ नकोस. तुझा मट्ठा नको आणि जिलबीही नको''

-डिएसपी चढुदे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या स्वाक्षरीची टिंगल करतोस आई बाबाची अन साईबाबाची शप्पथ आपली दोस्ती खतम.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

2 Feb 2016 - 4:53 pm | अभ्या..

खत्म तर खत्म
हे लै भारी केले बघा प्राडॉ. एका बंधनातून मला मुक्त केलेत.
उगी काढू नये म्हणतेत पण आता संपलीच दोस्ती तर सांगतो. लै सोसले हो तुमच्या दोस्तीपायी. नाही नाही त्या लोकांचे ऐकून घेतले. नसलेला चांगुलपणा दाखवायचे नाटक आता बास्स. आता खुद गब्बर. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाटलच होतं हे सर्व तुम्ही तोंडावर काढणार म्हणून. मैत्रीसाठी सोसलं हे सांगावं लागलं अरे तुमचं प्रेम ढोंग होतं.अरे आमचं प्रेम टाइमपास नव्हतं. स्वत:ला सेफ करतांना दुसरा मेला तरी चालतो. ''अरे आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ....... पैशाने नाही पण मनाने खुप श्रिमंत आहोत...... आम्ही आमच्या मनाचे राजे.... चल ये हो बाजू हवा येऊ दे. :)

दगडू बिरुटे ;)

प्रसाद१९७१'s picture

2 Feb 2016 - 2:58 pm | प्रसाद१९७१

-डिएसपी चढुदे

ह्या २ शब्द्दानी २ क्षण स्थब्द झालो. मग लक्षात आले की ह्यांना व्हिस्कीवाली डीएसपी म्हणायचे आहे.

उगा काहितरीच's picture

2 Feb 2016 - 2:33 pm | उगा काहितरीच

चला कधी बसायचं जिलेबी खायला ? औंधमधे "कढाई" नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तिथली रबडी-जिलेबी मस्त असते!

सांजसंध्या's picture

2 Feb 2016 - 1:58 pm | सांजसंध्या

अहो, आता कविता लिहीत नाही तरी एव्हढं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 2:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

जिलबी लग्नामुंजीच्या जेवणातली असो वा एखाद्या भंडार्यातली असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे!!

खाणार फ़क्त मैद्याची किंवा माव्याचीच जिलबी त्यातही लालहिरव्या रंगाची कधीच नाही (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही गावच्या मशीदी बाहेर बचकाभर रंग घातलेली जिलबी खायच्या एक्सपेरिमेंट सुद्धा केल्या आहेत) तर खायची असली तर फ़क्त मावा किंवा मैदाच ती सुद्धा फ़क्त साजुक तुपातली असली तरच मस्त एक पावशेर घ्यावी अन कुस्करुन त्यात गरम दूध किंवा साईंचे दही २ चमचे सोडावे मग खरपुस कुरकुरीत तळलेली जिलबी अन दही/मठ्ठा/दूध घेऊन कोपर्यात बसावे तोच एक एक तुकडा चवीचवीने खावा हळूहळू आजुबाजूची मंडळी त्यांची जिलबी वचावचा खाऊस्तोवर चालवावा नंतर जडावलेले डोळे मिटुन पड़ी मारावी

दही /दूध नसलेस एक लार्ज (जिलबी) + एक प्लेट इंदोरी जिरावण मारलेले पोहे घ्यावे सोबत वाफाळता चहा किंवा कॉफ़ी घ्यावी पण जिलबी फ़क्त न फ़क्त शुद्ध मावा किंवा मैदाच! बाकी अगदीच मावा/मैदा जिलबी नसल्यास डॉलर जिलबी सुद्धा चालवुन घेतो पण ते मणभर पाकात घोळलेले वातड तुकडे अजिबात नाही!!हलके हलके हळू हळू भरपुर जिलबी खावी अन मग पड़ी मारावी

(विडंबन धागा विडंबन प्रतिसाद)

(पोस्ट करावे का नाही ह्या विडंबनेतला) बाप्या

उगा काहितरीच's picture

2 Feb 2016 - 2:22 pm | उगा काहितरीच

हाहाहाहा ! मस्तच...

जव्हेरगंज's picture

2 Feb 2016 - 2:27 pm | जव्हेरगंज

w

Pancake

नाखु's picture

2 Feb 2016 - 2:48 pm | नाखु

फक्त एकच बाकी सारे चिल्लर.

चिल्लर गणती:

नाखु,टक्या,वल्ली,अभ्या,पम्या,चिमण्,मोदक आणि असंख्य परात्पर "चाहता यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले अनिवाशी/देशी/विदेशी/परदेशी/स्वदेशी/विलायती//जिरायती/बागायती/बगावती " वाचकवृंद

जेपी's picture

2 Feb 2016 - 3:31 pm | जेपी

ऑं ...दू दू दू ...माजे नाव नाय...दू दू

विजय पुरोहित's picture

2 Feb 2016 - 3:29 pm | विजय पुरोहित

आजकी ताजा जलेबी आजकी ताजा जलेबी...
http://www.misalpav.com/node/34735 किलर खंड्या
जलेबी टाकून लेखकु गायब...

अन्नू's picture

2 Feb 2016 - 3:33 pm | अन्नू

प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे.
वय/लिंग/मानसिकता/जन्मजात असणारी जिलेबी टाकण्याची खोड आणि इतर आजार यावर हे अवलंबून आहे.
1. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी जीलेब्या टाकणे- लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत-कमी जिलेब्या टाका.
2. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा कमी जिलेब्या टाकणे- जिलेबीचे युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने ब‍र्‍याच कमी जिलेब्या टाकता येतात कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे.
3. मानसिकता- काही लोकांना एक जिलेबी टाकली तरी अजुन एक-अजुन एक अशी हौस असते. काहींना चौथी टाकली तरी अजुन टाकावीशी वाटते. काहींच्या मनात जिलेबी टाकल्याने (भलतेच)अ‍ॅंटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी जिलेबी टाकावी.
4. जन्मजात असणारी जिलेबीची खोड- काही लोकांच्या डोक्यात जिलेबीचे उत्पत्ती जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू उत्पत्तीवाले जिलेबीच्या दीर्घ (प्रतिसादांच्या भडीमाराच्या) परिणामांना बळी पडतात.
5. इतर आजार- नस्ती लहर, नर्वस सिस्टीम, मनोविकार, ब्लडपेटू आणि आपलाच घोडा दामटवणार्‍यांनी शक्यतो कमीच जिलेबी टाकावी. काही प्रकारच्या मनोविकारात जिलेबी टाकणे उपयुक्त असले तरी ती टाकावीच असे काही नाही किंवा न टाकल्याने मिपा ओसाड पडेल असेही नाही.

आता सर्वसाधारण आणि हौशी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस 4 युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी जिलेबी टाकावी.
एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारण: 10 पॅरा जिलेबी म्हणजे एक पानी लेख किंवा 100 ओळी स्वकथा किंवा 25-30 ओळी चर्चासत्र- अशा जिलेब्या!
बरं त्याही आठवड्याला 14 युनिटपेक्षा कमी टाकाव्या अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी (जिलेब्यात) मिपाला बिजी करणे हे तेवढीच अमाऊंट थोडी थोडी टाकण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे.

मिपाकडे येणार्‍या अर्थातच इतर अशा जिलेब्यांनी त्रस्त लोकांच्या मिपा संपादक मंडळ 'हेड फंक्शन टेस्ट्स करते. त्यात त्यांच्या हेडमध्ये काही एंझाईम्स विशेषत: 'गामा' ग्लुकोज ट्रान्सफरेज लेवल बघून त्या धागाकर्त्याच्या जिलेबीने इतरांचे मानसिक संतुलन ढळत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द थ्रेड टू हाफ किंवा सभासद कंप्लीटली बॅन्ड असं सांगते.
दिर्घकाळ आणि बेसुमार जिलेब्या टाकणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा (अ)क्षय(टीआरपी) न टाकणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो.
जिलेब्यां टंकल्याने हातांच्या स्नायूंचा होणारा क्षय(जिलेबो'होलिक पण अंगाची हाडेओमोडीपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे.
सतत जिलेबी टाकणे याबरोबरच इतर म्हणजे बाजुला येऊन बसलेल्या स्वत:च्याच बायकोकडेही व्यवस्थित लक्ष न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे.

आता ठरवा किती जिलेब्या टाकायच्या ते!

विजय पुरोहित's picture

2 Feb 2016 - 3:38 pm | विजय पुरोहित

भन्नाट प्रतिसाद

नीलमोहर's picture

2 Feb 2016 - 5:31 pm | नीलमोहर

बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का?

स्वगत : अति जिलबी खाऊन मेंदू खराब होण्यापेक्षा, तो जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. डोक्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. हा साला मेंदू पण एकच असतो. देवाने कमीतकमी ४-५ डोकी तरी द्यायला हवी होती.

नीमो तैं ना "जिलेबी ताई" असा पुरस्कार आणी पुस्पगुच्च देण्यात येत आहे..

नीलमोहर's picture

2 Feb 2016 - 4:15 pm | नीलमोहर

मिपावर वाढत चाललेल्या असहिष्णूते विरोधात हा पुरस्कार साभार परत ...
(जिलेबी इतकीच साधी सरळ..)

पैसा's picture

2 Feb 2016 - 5:11 pm | पैसा

एक प्रश्न

जिल्बी टाकल्यानंतर ती "पडली" की आपण धाग्यावर रहात नाही.. प्रतिक्रियांचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता..

ह्याची भीती वाटत नाही का?

-घोस्ट बस्टर-

अन्नू's picture

2 Feb 2016 - 5:21 pm | अन्नू

पै तै रागवल्या कि काय????..........

पैसा's picture

2 Feb 2016 - 5:22 pm | पैसा

पे र णा धाग्यातले प्रतिसाद बघा ना!

अन्नू's picture

2 Feb 2016 - 5:33 pm | अन्नू

म्हन्जे ही गोळी आंम्हालाच होती का! ;)
पण तिथं दिलेला प्रतिसाद मी गुर्जींच्या विडंबनाला दिलेला आहे. त्यात वाईट काय आहे?