ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
30 Jan 2016 - 8:02 pm
गाभा: 

नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही.

माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी.

आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच.

ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.

प्रतिक्रिया

मी पयला (तुम्ही बोलावलत तर)
बाकी आठवड्यातून एकदा निवांत बसावं. ९० मिली रेड रम घ्यावी. (ओल्डमंकास पर्याय नको) सगळ्या डोक्याला तरास करणार्‍यांच्या नावाने एकच होलसेल शिमगा करावा. रमची चव पुसट होताहोता कचकून जेवण हानावं.
सकाळी डोस्कं अन पोट सगळं साफ. :)
येतेय का कोण आज?
.
.
आमच्या अत्यंत प्रिय अन सदैव तत्वज्ञानाच्या नशेत टुल्ल असणार्‍या मित्राने दिलेले (वस्तुस्थितीदर्शक नसले तरी) बेवडा हे नामाभिधान आम्हास आवडले आहे.
.

विजय पुरोहित's picture

30 Jan 2016 - 8:56 pm | विजय पुरोहित

जबराच अन खतराच परतिसाद...
कंदी येतो बोल अभ्या...
तुमच्यासाटी काय पन...

बाकी ड्रायडेचा मुहूर्त साधून हां धागा टाकण्याच्या समयसूचकतेचे कौतुक. आज गांधीजी पुण्यतिथि.;-)

अद्द्या's picture

31 Jan 2016 - 2:03 am | अद्द्या

अभ्या साल्या . .

येतोय फेब्रुवारीत मी सोलापूरला . . तव बसू जरा म्हातारा सन्याशी घेऊन .

ऑफिसातले साले पुळचट आहेत एक एक . बियर पाइण्ट मध्ये औट होतात

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 8:55 am | सतिश गावडे

आमचा सोलापूरातील वार्ताहर कळवतो की मा. अभ्या डॉट डॉट यांनी यापुढे वृद्ध संन्याशाची भेट घेणार नाही असे जाहीर केले आहे.

कोण गावड़े? कोण वार्ताहर? कोण अभ्या डॉट डॉट?

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 12:58 pm | सतिश गावडे

कालच्या नाईंटीचा महिमा संपला नाही वाटतं अजून. ;)

अभ्या..'s picture

31 Jan 2016 - 1:01 pm | अभ्या..

अरे ड्राय डे होता बे काल. तुला कुठे मिळाली ते सांग आधी.

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 1:12 pm | सतिश गावडे

मी तीस डिसेंबरला एकदम आयुष्यभराचा स्टॉक आणून ठेवला आहे. ;)

अभ्या..'s picture

31 Jan 2016 - 1:14 pm | अभ्या..

अशा आशावाद्यामुळेच मल्ल्याच्या धंद्याला मरण नै.

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 1:23 pm | सतिश गावडे

asdf

आम्हाला ही जर्मन कन्या भेटल्यावर मल्ल्याच्या पोरीला आम्ही टाटा बाय बाय केला होता. आता विरक्तीमुळे हिलाही निरोप दिला. ;)

सर्वसामान्य's picture

31 Jan 2016 - 2:22 pm | सर्वसामान्य

डेन्मार्कची आहे

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 6:00 pm | सतिश गावडे

धन्यवाद.

आम्ही आजवर जर्मनच समजत होतो. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2016 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे आहेत जर्मन बियर ब्रँड्स...
Oettinger
Krombacher
Bitburger
Beck's 2.78
Warsteiner
Hasseröder
Veltins 2.72
Paulaner
Radeberger
Erdinger

आणि हे डच...

यातली दोघींच्या डोक्यावर बसलेली आमची लाडकी आहे ! :)

आदूबाळ's picture

1 Feb 2016 - 2:14 am | आदूबाळ

काका, ला त्राप (la trappe) वगैरे बेल्जीयन बियरही चाखून पहा. नंबर एक असतात.

मैत्र's picture

2 Feb 2016 - 9:16 pm | मैत्र

बेल्जियन बिअर सर्वात उत्तम असतात हा नेदरलँड्स मध्ये शोध लागला होता.
1. Leffe
2. Duvel
3. Trappist
4. La Trappe
5. hoegaarden

अभ्या..'s picture

2 Feb 2016 - 9:19 pm | अभ्या..

ऑनलाईन मागवता येतात का?
इमानातून किती घेऊन (बॅगेत) येता येते?

होगार्डन परळच्या फीनिक्स मिलमध्ये असलेल्या "स्पोर्ट्स बार" मध्ये मिळते हे नक्की.

ऑनलाईन मागवता येतात का ते माहीत नाही. इमानातून आणायला "माणशी दोन बाटल्या" हा नियम आहे वाटतं. मग तुम्ही हार्ड ड्रिंक आणा किंवा बियर.

बाकी मैत्रभाऊ आणि मी दोघेही नेदरलँड्सच्या माहेरवाशिणी असल्यामुळे बेल्जियन बियरची आवड जुळली यात नवल नाही ;)

बर्री सावकारु. मुत्त्यास्वामी इज वेटिंग.

सुबोध खरे's picture

30 Jan 2016 - 8:18 pm | सुबोध खरे

मागे यावर बराच काथ्याकुट झाला आहे. मी माझे मत दिले होते. लोकांनी बरीच टीका केली होती.
आता टंकाळा आहे तेंव्हा कोणी त्या धाग्याचा दुवा शोधला तर बरे होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2016 - 8:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काथ्या कूटतांना तुम्हीच उत्तर लिहावं अशाच अपेक्षेने हा प्रपंच केला आहे. कंटाळा करू नका. एकच प्रतिसाद लिहा पण भारी लिहा. प्रत्येकाला उत्तर लिहित बसू नका. सवडीने लिहा पण या धाग्यावर जरूर लिहा.

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

30 Jan 2016 - 10:23 pm | मन१

http://www.misalpav.com/node/24149 हा धागा म्हणताय का ?

उगा काहितरीच's picture

30 Jan 2016 - 8:26 pm | उगा काहितरीच

माझे वैयक्तिक मत असे आहे की दारू ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या पेल्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच.
- (आत्तापर्यंत तरी दारू, सिगारेट पासून कोसो दूर असलेला) उका.

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 11:53 am | अनिरुद्ध.वैद्य

.

मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे.

चार हात दुरुन ग्लास, बर्फ, खाद्य कसं मॅनेज करता याचं कौतुक आहे.

क्या तो केहते तो उनो गविमिया? साकीया क्या कुछ तो है ओ लफडा. वैसाच कुछ रह्येंगा.

जेव्हां ड्रिंक्सशिवाय हातपाय थरथरू लागतील तोपर्यंत घ्यायला हरकत नाही..

जेपी's picture

30 Jan 2016 - 8:33 pm | जेपी

शिव ...शिव..शिव..;)

शिवास असं पूर्ण म्हणण्याच्या प्रयत्नात अडकून बसले आहात का?

दारु आली की गवि हटकून येतात :D

आलास मेल्या.? बस आता. सरकून घेतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2016 - 7:26 pm | अत्रुप्त आत्मा

@दारु आली की गवि हटकून येतात :D >> आणि असा प्रतिसाद आला.., की पांडू! ;) http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-051.GIF

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 10:54 pm | सतिश गावडे

आणि पांडू आला की बुवा येतात. आम्हाला वाटले आता तरी थांबेल ते. तर कसलं काय. जुन्या सवयी अशा सहजासहजी सुटतात होय. ;)

प्रचेतस's picture

31 Jan 2016 - 10:58 pm | प्रचेतस

=)) =)) =))

नाखु's picture

1 Feb 2016 - 8:40 am | नाखु

ती ओवी सांगाना सटीप.

पडीले वळण .....................

रसाळ व्याखानाचा श्रोता नाखु

ह्या ह्या ह्या ह्या, ही ह्ही, ही ह्ही, ही ह्ही, ही ह्ही =)) =)) =)) =)) =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2016 - 8:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा एखाद्या मित्राची बॅचलर्स पार्टी असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे

पिणार फ़क्त स्कॉच किंवा डार्क रम त्यातही स्कॉच ब्लेंड वगैरे पिणार नाही कधीच (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही सगळ्या देशी विदेशी एक्सपेरिमेंट केल्या आहेत) तर प्यायची असली तर फ़क्त स्कॉच ती सुद्धा फ़क्त ग्लेनफिड्डीच असली तरच मस्त एक लार्ज घ्यावा त्यात गारेगार २ स्कॉच स्टोन्स सोडावे मग खरपुस भाजलेली कोंबड़ीची टंगड़ी घेऊन कोपर्यात बसावे तोच पेग माइक्रो सिप घेत आजुबाजूची मंडळी त्यांची ढोसे पर्यंत चालवावा नंतर हलके फुलके काही खाऊन पड़ी मारावी

रम असल्यास एक लार्ज + एक स्मॉल घ्यावा सोबत बॉयल्ड एग्स किंवा अंडा पकोड़ा असावा पण रम फ़क्त न फ़क्त ओल्ड मोंकच! बाकी अगदीच ओल्डमोंक नसल्यास कॉन्टेसा चालवुन घेतो पण ते मॅकडोवल वगैरे होमेओपेथिक औषधाच्या चवीचे लाल पाणी अजिबात नाही!!जेवण हलके घ्यावे अन मग पड़ी मारावी

जव्हेरगंज's picture

30 Jan 2016 - 9:28 pm | जव्हेरगंज

क्या बात है!!! :)

शैलेन्द्र's picture

31 Jan 2016 - 8:34 pm | शैलेन्द्र

Gotra same aahe aapale..

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 11:57 am | अनिरुद्ध.वैद्य

कॉन्टेसा मिळतच नाहीये हो हल्ली! हळहळ.

बाकी रमसोबत मुंग दाल + मिरची + टमाटे + चाट मसाला आदींचा मसाला अप्रतिम कोम्बो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 11:59 am | कैलासवासी सोन्याबापु

हाय कम्बख्त अनिरुद्ध भाऊ क्या याद निकाली है

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 1:01 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

यमगर्निकर's picture

2 Feb 2016 - 12:55 pm | यमगर्निकर

१ च नंबर :-)

अनंत छंदी's picture

30 Jan 2016 - 8:57 pm | अनंत छंदी

ते सोत्रि कुठे गेले? दारूच्या प्रकारांबरोबरच प्रमाणही माहीत असेल त्यांना. ;))

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2016 - 9:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

सोत्रि

आमचे मद्य गुरु!!

_____/\_____

अनुप ढेरे's picture

30 Jan 2016 - 9:30 pm | अनुप ढेरे

खुशवंत सिंग रोज ६० प्यायचे म्हणे. ९९ वर्ष जगले.
एका डायटिशनने दारू वाईट नाही पण चकल्या/शेव्/वेफर्स हा चकणा बराच घातक असं सांगितलं होतं. बिना (असला) चकणा थोडी दारू फार वाईट नसावी.

सायकलस्वार's picture

2 Feb 2016 - 1:04 am | सायकलस्वार

बरं मग?
मोरारजीसुद्धा ९९ वर्षं जगले होते. नशीब कोणी त्यांचा दाखला दिला नाही ;)

अनुप ढेरे's picture

2 Feb 2016 - 11:47 am | अनुप ढेरे

तुम्ही काढा शिवांबूवर धागा. त्यावर देईल कोणीतरी तुम्हाला पाहिजे ती प्रतिक्रिया. दारूच्या धाग्यावर दारूऐवजी शिवांबू प्या असा सल्ला कोण देईल? उगाच कायतरी...

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 11:50 am | कैलासवासी सोन्याबापु

चियर्स अनूप भाऊ!

आदूबाळ's picture

30 Jan 2016 - 9:32 pm | आदूबाळ

ओल्ड मंकास पर्याय नाही याबद्दल अभ्या आणि बापूसो यांजशी बालके आदूबाळ सहमत आहे.

दुसरा आवडता प्रकार म्हणजे जॅक डॅनियल्स. हेच मिपानाम घेतलेले आमचे परममित्र सध्या भेटत नसल्याने हा योग सहसा येत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2016 - 9:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

टेनेसी सावर मैश उर्फ़ जॅक डॅनियल्स एकदा प्यायलो होतो , ज़रा जास्त गोड वाटली मला ती! स्कॉच मधे एक क्रंच हवाहवा वाटतो, फ्यूमिंग स्लो असावेसे वाटते, I get it all only in १२ years matured Glenfiddich.

व्हाइट रम फ़क्त कॉकटेल्स मधे उत्तम वाटते, स्टैंड अलोन नाय आवडली अज्याबात

जॅक डनियल्स's picture

6 Feb 2016 - 6:07 am | जॅक डनियल्स

ओल्ड मंकास लावून ३० मिनिटात लावून, ११ वी मध्ये स्पिरीट आणि स्टआइल वर गुलाब च्या बहिणीला आणायला गेलो होतो त्याची आठवण झाली. असो.

कधी बसायचे ते सांग, टेनेसी मध्ये जेडी प्यायचीच मजा वेगळी आहे. अजून लक्कास व्हायचे असल्यास मूनशाइन पण मागवून ठेवतो.

आदूबाळ's picture

6 Feb 2016 - 7:05 pm | आदूबाळ

लोल. तीच आठवण आली होती.

टेनेसीमध्ये जेडी ब्यान आहे ना?

टेनेसीमध्ये जेडी ब्यान आहे ना?

आँ? नाशकात सुला ब्यान.. गोव्यात फेणी ब्यान.. अशातलं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Feb 2016 - 7:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

होय ज्या काउंटी मधे जेडी बनते ती ड्राय काउंटी आहे असे नॅशनल जियोग्राफिक वर पाहिल्याचे स्मरते आहे

मुक्त विहारि's picture

30 Jan 2016 - 10:10 pm | मुक्त विहारि

जोपर्यंत दारू तुम्हाला पित नाही तोपर्यंत, दारूवर प्रेम करा.

१. मित्रांबरोबर कट्टा करता करता जमेल तितके दारू वर प्रेम करा.

आणि.

२. परत नंबर १ कडे वळा.

खरेतर सुरापान हा एक सोहळा असतो.

कधीतरी एखादा वीकेंड ठरतो. भेटायचे बेत ठरले जातात.कुणी कुणाला निरोप द्यायचा ते ठरते.बायकोला मस्का मारून, तिची परवानगी काढायला लागते.मिपाकट्टा म्हटल्यावर, जास्त मस्का मारायला लागत नाही.टांगारूंना रीतसर टाळण्यात येते आणि तो दिवस ठरतो.

एखाद दुसरा राउंड होत नाही तोच, मिपाचे चविष्ट धागे परत एकदा उसवल्या जातात.

स्वगत : ह्या बिरुटे सरांना कसे काय समजले की, पुढच्या महिन्यात मिपाकट्टा आहे म्हणून?

हेमंत लाटकर's picture

30 Jan 2016 - 10:37 pm | हेमंत लाटकर

ड्रिंक घेणे खरेच गरजेचे आहे का?

संजय पाटिल's picture

30 Jan 2016 - 10:47 pm | संजय पाटिल

ड्रिंक म्हण्जे अपणास दारू अभिप्रेत आहे का?

सायकलस्वार's picture

30 Jan 2016 - 10:52 pm | सायकलस्वार

या प्रश्णामागे 'बायकांनी' असं लिहून मस्त नवी जिलबी पाडता येईल नै...

विजय पुरोहित's picture

30 Jan 2016 - 10:53 pm | विजय पुरोहित

सुरेख जिल्बी पडेल हो ;)

अजया's picture

30 Jan 2016 - 11:18 pm | अजया

=))
काढाच धागा लाटकर काका.
स्त्रीयांनी दारु पिणे गरजेचे आहे का किंवा दारु पिणाऱ्या स्त्रिया आणि बुडालेली संस्कृती.
२०० नक्की करुन देऊ.

हेमंत लाटकर's picture

30 Jan 2016 - 11:26 pm | हेमंत लाटकर

काढाच धागा लाटकर काका.

सध्या धागा सन्यास घेतला आहे.

नुसता धागा नसेल टाकायचा तर महावस्त्र (पक्षी लेखमाला) टाका.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2016 - 10:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

हो मी राहायचो तिथे तापमान उणे २℃ ते उणे २०℃ च्या मधे असे मुख्य म्हणजे करायला कायच नसे अन त्याहुन मुख्य म्हणजे मला ड्रिंक्स आवडतात म्हणे काका मी! :)

सतिश गावडे's picture

30 Jan 2016 - 10:45 pm | सतिश गावडे

आपल्या पिण्याची वारंवारता वाढली असून आता थांबायला हवे असे वाटण्याची वेळ येऊ नये इतपत कमी असायला हवे. :)

ड्रिंक्स घेणे अथवा न घेणे हे प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असू शकतं.
खासकरुन सहकार्‍यांनी भरीस पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही फर्म असल्यास ते काहीही करु शकत नाहीत!

माझ्या स्वतःच्या बाबतीत विचाराल तर ओल्ड माँकला पर्याय नाही! (निदान रमच्या बाबतीत तरी)
वाईन प्यायचीतर ती पण रेड वाईनच!

हेमंत लाटकर's picture

30 Jan 2016 - 11:19 pm | हेमंत लाटकर

पिणे वालेंको पिणे का बहाणा चाहिये.

दारू पिण्यापेक्षा फळांचा ज्युस बर्फ टाकूण पिणे चांगले.

विजय पुरोहित's picture

30 Jan 2016 - 11:21 pm | विजय पुरोहित

लट्टुकाका वन्स अगेन राॅक...

एरंडेलात बर्फ टाकून पण प्या!

माय लाईफ माय चॉईस!

आदूबाळ's picture

31 Jan 2016 - 1:39 am | आदूबाळ

फळं आणि बर्फ?

हेलाकाकांना बहुदा हे म्हणायचंय:

पिंम्स

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 2:45 am | संदीप डांगे

(नीट) दारू पिण्यापेक्षा फळांचा ज्युस बर्फ टाकूण पिणे चांगले.

बोका-ए-आझम's picture

30 Jan 2016 - 11:39 pm | बोका-ए-आझम

पिण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. माझ्या चखण्याचं बिल हे नेहमीच मित्रांच्या पिण्याच्या बिलापेक्षा जास्त येतं.

ड्रींक्स प्रमाणात पिणे?
मला वाटतं दारुच्या थेंबालाही हात लावता कामा नये. दारू एखाद्याला आणि त्याच्या कुटुंबाला कसे बरबाद करते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.

अभ्या..'s picture

30 Jan 2016 - 11:51 pm | अभ्या..

सहमत.
कळकळीचे बोल आहेत हे.

प्रचेतस's picture

30 Jan 2016 - 11:57 pm | प्रचेतस

उपयुक्त माहिती.
मद्य न पिणाऱ्या आमच्यासारख्यांना मद्य पिणाऱ्या माणसांचे निरिक्षण करायला आवडते. आमच्या एका मित्रांनी पूर्ण धुंदित असताना अगदी सुरेल आवाजात गाणे ऐकवून त्रुप्त केले होते.

पूर्ण शुध्दीत असताना पडले वगैरे नाहीत ना कुठे? ;)

नै नै. पण त्यांना तेव्हा गाणं सुरेल आवाजात म्हणता नै आलं.

अगम्य's picture

31 Jan 2016 - 1:32 am | अगम्य

आंतरजालावर वाचलेला किस्सा
"माझा एक मित्र त्याच्या होणाऱ्या बायकोला घेऊन पहिल्यांदाच डिनर साठी गेला. ऑर्डर करायच्या आधी, "मी ड्रिंक घेतलं तर चालेल ना" असं तिला विचारलं. ती हो म्हणाली. त्यानी वेटरला बियर सांगितली.
वेटरनी बियरची बाटली त्यांच्या टेबलवर आणून ठेवली. त्या बाटलीकडे बघून भावी-बायकोनी राग-युक्त आश्चर्यानी विचारलं, "ही एवढी दारू तू पिणार आहेस?"
मित्रानी विचारलं, "नको का एवढी? बरं..." वेटरला बोलावलं आणि म्हणाला, "हे घेऊन जा रे... आणि एक निप आण"...!
वेटरनी आणून ठेवलेली क्वार्टरची बाटली भावी बायकोला दाखवत विचारलं, "ही एवढी प्यायलेली चालेल का?"....
तो आपल्याला विचारतो आणि आपलं ऐकतो या आनंदात अत्यंत प्रेमानं ती म्हणाली, "हो... ही चालेल... आधीची फारच मोठी होती बाटली!!"
And they lived happily ever after!!"

उगा काहितरीच's picture

31 Jan 2016 - 2:11 am | उगा काहितरीच

लोल !बऱ्याच जणांना "झेपनार" नाही ना किस्सा , बहुतेक !

अद्द्या's picture

31 Jan 2016 - 2:17 am | अद्द्या

_/\_

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 2:44 am | संदीप डांगे

सुप्प्पर! __/\__ खरंच!

मी आणि माझे भाऊ सहकुटुंब नंदी पॅलेसला बसलो होतो.

आमच्या एका वहिनीला "दारू" नामक प्रकरणाबाबत तिटकारा.

मी आणि माझा एक भाऊ पेग रिचवत असतांना दुसर्‍या भावाने "बियर" मागवली.त्याची बायको लगेच करवादली.

"तुमचे इतर भाऊ थोड्या प्रमाणात दारू पित असतांना, तुम्ही जास्त दारू पिऊ नका."

भावाने पडत्या फळाची आज्ञा मानली आणि त्याने बियरची ऑर्डर कॅन्सल केली आणि तो पण आमच्यात सामील झाला.त्या दिवसापासून त्याचे बियर प्यायचे वांधे झालेले आहेत.

असो,

सुरापानाचा आनंद घेता येत नसेल, तर निदान त्या सुरेल सुरेला "दारू" तरी म्हणू नका.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 9:12 am | कैलासवासी सोन्याबापु

सुरापानाचा आनंद घेता येत नसेल, तर निदान त्या सुरेल सुरेला "दारू" तरी म्हणू नका.

मनःपूर्वक सहमत! दारू दारू ब्लंट वाटते फार! सुरा म्हणा मदिरा म्हणा वारुणी म्हणा! हाय काय एक सो एक रसिक नावे आहेत राव!!

कौटिल्याचे अर्थशास्त्र ह्या पुस्तकात (ह्याला पुस्तक तरी कसे म्हणावे?), कौटिल्याने सुरा कशी बनवावी? आणि राजासाठी योग्य सुरा कोणती? ह्याबद्दल उत्तम माहिती दिली आहे.

असो,

माणसाला सुरा कधीच वर्ज्य न्हवती.

आणि आमची बाबा महाराज म्हणतात ======"अति सर्वत्र वर्जयेत." मग ते पॉर्नच्या बाबतीत असो किंवा अहिंसेच्या बाबतीत किंवा देवाच्या नादी लागण्याच्या बाबतीत.

प्रमाणामध्ये सर्व काही असावे.

गामा पैलवान's picture

31 Jan 2016 - 2:09 pm | गामा पैलवान

बापूसाहेब,

तुम्ही म्हणता ती वारुणी, मदिरा, सुरा वगैरे नावं बायकी वाटतात हो. दारू, बेवडा, ठर्रा वगैरे कशी मर्दानी नावं आहेत ! ;-)

आ.न.,
-गा.पै.

विशेष अगत्याने सूचना : मी 'तसला' नाहीये बरंका !

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 2:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

हा स्त्रित्वाचा अपमान आहे स्त्रियांना समान हक्क आहेत चांगल्या वाईट दोहोत, "बायकी" साउंड्स हाइली सेक्सिस्ट :D :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2016 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

जी मुळातच अंगुरकी बेटी आहे तिला नावेही बायकीच असणार.

दारूला मर्दानी नावे ठेवण्या पेक्षा मर्दांनी तिचा आस्वाद घ्यावा.

मी तसलाच आहे बरका!

पैजारबुवा,

आणि डोक्यात जात असल्याने दारू ही बायकीच असणार. हे नि:संशय आहे.

अज्याबात दारू न पिणारा (पण दारू पिण्यारांचा राग रागही न करणारा)

पार्टी मित्र नाखु

स्वगतः डॉ. किमान २०० प्रतिसादांची सोय केली लक्ष्यात ठेवा.

चंबा मुतनाळ's picture

31 Jan 2016 - 10:03 am | चंबा मुतनाळ

शाॅल्लीड किस्सा आहे! हपपुवा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 12:00 pm | अनिरुद्ध.वैद्य

नशीबवान हो!

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2016 - 9:20 am | श्रीरंग_जोशी

माहितीपूर्ण चर्चा.

बस एका वैधानिक इशाऱ्याची कमी आहे.

संसारा उध्वस्त करी दारू
बाटलीस स्पर्श नका करू...

सौजन्य - आमची वाहिनी सह्याद्री वाहिनीवरील एक जुनी जाहिरात.

अवांतर - पांढऱ्या खोडीचे नाव कुणीच कसे घेतले नाही?

मुक्त विहारि's picture

31 Jan 2016 - 9:23 am | मुक्त विहारि

आम्ही तर बाटलीला अजिबात स्पर्श करत नाही.ते काम वेटरच करतो.

रंगा शेठ, थोडी मस्करी केली हो.

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2016 - 9:30 am | श्रीरंग_जोशी

मी काय वेगळं केलं होतं?

बाकी शेठ नाही फक्त रंगा...

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2016 - 11:35 am | ज्ञानोबाचे पैजार

आम्ही देखिल आज पर्यंत दारुच्या थेंबाला साधा स्पर्श सुध्दा केलेला नाही आणि या पुढे ही कधीच करणार नाही. दारुच्या थेंबाला कोणी स्पर्श करू नये असे आमचे पष्ट मत आहे.

प्यायला सुरवात करण्या आधी ग्लासात बोटं घालून चार दिशांना प्रोक्षण करणाऱ्याचा आणि शॅम्पेनची बाटली गदागदा हलवून हवेत फवारे उडवणाऱ्या जमातीचा मला भयंकर संताप येतो. इतकी मुल्यवान गोष्ट अशी हवेत उडवण्यासाठी असते कां?

बाटलीतून ग्लासात, ग्लासातून ओठात, ओठातून पोटात, पोटातून मेंदु आणि तिकडून ते हृदया पर्यंत हाच मदिरेचा राजमार्ग आहे आणि त्याच मार्गाने जाणारी मदिरा आम्हाला आवडते.

वरती बापू म्हणाले तसे ओल्ड माँकला पर्याय नाही. त्या बरोबर चीज चिली टोस्ट हे आमचे आवडते खाद्य आहे. शेंगदाणे, फरसाण इत्यादी फुकट येणारा चखणा आम्ही आमच्या बरोबर असणाऱ्या पण मद्यपान न करणाऱ्या सोवळ्यां दोस्तांना उदार पणे देऊ करतो.

हे असले सोवळेनेसून मद्यालयात येणारे लोक पाहिले की मला देवळात जाउन देवाला नमस्कार न करणारे नास्तिक आठवतात, दोघेही तेवढेच कट्टर असतात आणि समोरच्याला सुधारण्याचा विडा उचलूनच आलेले असतात. पण हे लोकं मनाने फार चांगली असतात. बिल आले की हेच लोक हिशोबाच्या आणि नंतर सगळ्यांना आपापल्या घरी सुरक्षीत पोचवण्याच्या कामाला येतात.

ओल्ड माँक सोडून बाकी वारुणीं बरोबर आमचे काही वैर नाही. पण म्हाताऱ्या साधूबरोबर "लव्ह अ‍ॅट् फर्स्ट साईट" झालं ते अजूनही टिकून आहे. का? ते पण सांगतो.......

प्यायला सुरुवात करण्या आधी ओल्ड माँकचे झाकण उघडून बाटली नाकाशी धरुन तिचा सुगंध छाती भरुन घेउन पहा. त्यानंतर मग हळूवार पणे ती ग्लासात ओतून घुटक्या घुटक्याने....... अतिशय सावकाश........ तिच्या प्रत्येक थेंबाचा आनंद घ्या. बघा तुम्ही देखिल प्रेमात पडाल म्हाताऱ्याच्या. स्वर्ग सुख, स्वर्ग सुख म्हणतात ते हेच तर असते. आहाहा त्या सुगंधाच्या नुसत्या आठवणीने देखील काळिज गलबलायला लागले.

वैधानिक इशारा:- दोन पेग पोटात गेल्यावर असा सुगंध छातीत भरुन घ्यायचा अचरटपणा करू नये. त्यात मना ऐवजी शर्ट सुगंधी होण्याचीच जास्त शक्यता आहे.

आद्य मदिराचार्य सोत्री यांनी कॉकटेलचे अनेक प्रकार मिपाकरांना शिकवले. आम्ही देखील त्यातले बरेच प्रयोग स्वत: करुन पाहिले. काही आवडले देखिल. पण मदिरेत काही मिसळून तिची वरिजनल ठेस्ट बदलून पिण्यात काही फारशी मजा येत नाही. ती आहे तशीच मस्त लागते. ज्यांना ऑन द रॉक्स जमत नाही त्यांनी फार तर पाणी घ्यावे . पण त्यात काहीबाही मिसळून पिऊ नये. अगदी सोडा सुध्दा.

खजुराहोच्या शिल्पांना जर पैठण्या नेसवल्या तर ती बघायला आपल्याला आवडतील का? पैठण्या ल्यालेली शिल्पे ही चालती बोलतीच हवीत आणि खजुराहोची शिल्पे जशी आहेत तशीच बघण्यात मजा आहे. मद्य पण जसे आहे तसे बिनशर्त स्वीकारावे असे आमचे मत आहे.

पैजारबुवा,

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 11:38 am | विजय पुरोहित

अगागागा...
१००% पैजारबुवा स्टाईल प्रतिसाद...
दंडवत घ्या माऊली...

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 11:59 am | संदीप डांगे

दारूत सोडा घालणे म्हणजे दारूचा सर्वोच्च अपमान.

पहिले, असा सोडा घालून पिणारे 'नक्की का जगतात' असा प्रश्न पडतो.

दुसरे, भसाभस ग्लास रिकामा करणारे, दहा दिवसापासून तहानलेले असल्यासारखे.

तिसरे, बसल्या टेबलवर दहा वर्षांआधीची (किंवा कधीचीही) पार्टी-मैफिल काय सुरेख होती वैगरे आठवणींचा पूर काढणारे. जी आता चालू आहे त्याचा आस्वाद न घेता भूतकाळात रमणारे.

चौथे, विनाकारण आग्रह करणारे.

पाचवे, आपला ब्रँड सोडून दुसरे कशी फालतू दारू पितात अशी टिका करणारे

हे पाच प्रकारची लोकं मैफिलीत असतील तर न बसणेच श्रेयस्कर.

(आमच्या दारूकामाबद्दल नंतर लिहितो)

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 12:02 pm | सतिश गावडे

लोकांनी कशा पद्धतीने (म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने पिता) दारू प्यायला हवी त्या आदर्श पद्धतीवर एक छान लेख लिहा. :)

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 12:06 pm | संदीप डांगे

लोकांनी कशी प्यावी हा लोकांचा प्रश्न हो गावडेसर. वरोल्लिखित लोकांसोबत बसायचे नाही हा माझी आदर्श पद्धत. बाकी आम्ही जगाला शहाणे करणार्‍या पंथातले नाही. जो जे वांच्छिल तो ते लाहो.

( आज तुम्हाला बराच वेळ दिसतोय... ;-) )

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 12:30 pm | सतिश गावडे

दारूत सोडा घालणे म्हणजे दारूचा सर्वोच्च अपमान.

पहिले, असा सोडा घालून पिणारे 'नक्की का जगतात' असा प्रश्न पडतो.

सोडा घालून दारू पिणार्‍या लोकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलंत म्हणून म्हटलं. :)

आज आमच्या लाडक्या सूर्यदेवांचा वार. आज निवांत. :)

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 12:42 pm | संदीप डांगे

तुम्ही 'दारूत सोडा' घालता काय? मुळात तुम्ही पिता काय? तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या काय?

वरील पैकी सर्व प्रश्नास उत्तर होय असेल तर ....

पोस्टीकडे दुर्लक्ष करणे. ते आमचे वैयक्तिक मत आहे. त्याचा दारुड्या पक्षाशी काहीही संबंध नाही.

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 12:46 pm | सतिश गावडे

उत्तर "नाही" असं आहे. जेव्हा त्या पंथाचा साधक होतो तेव्हा खनिजयुक्त पाणी वापरत असे. ;)

तरीही तुम्ही "ते आमचे वैयक्तिक मत आहे" असे म्हणून मुळ मुद्दयाला बगल दिली आहे असे नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू ईच्छितो. आणि आपली रजा घेतो.

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 1:17 pm | संदीप डांगे

=)) लिहू हो, तेही लिहू. दारू कशी प्यावी ह्यावर समाजप्रबोधन आवश्यकच आहे.

(काय दिवस आलेत बघा. दारू पिऊ नये यावर प्रबोधन व्हायचं, आता कशी प्यावी ह्यावर प्रबोधन होतंय.)

चला, ह्यावर एक किस्सा सांगतो.

दोनेक वर्षांआधीचा किस्सा. मी, वडील आणि मेहुणे घरच्या बायकांपासून लपून-छपून मदिरापानास बाहेर पडलो. ड्रायविंगसीटवर मीच होतो. कुठे जायचे म्हणुन त्यांनी अकोल्यातल्या योगी बारचे नाव सांगितले. मी गेले बारा-तेरा वर्ष अकोल्यापासून दूर असल्याने मला त्याचा पत्ता माहित नव्हता. मुळात योगी बारच माहित नव्हता. तेव्हा दोघांनीही महद-आश्चर्याने तुला योगी बार माहित नाही? असे 'पिएसपीओ नही जानता'च्या थाटात विचारले. मला ती माहिती नसल्याबद्द्ल ते दोघे माझी खेचत होते. तेव्हा मी त्यांना शांतपणे म्हटले, "कसं आहे, जेव्हा मी अकोला सोडले त्या काळात बीअरबारचे नावही माहीत असणे मोठा गुन्हा होता, बीअरबारसमोर/दारुच्या दुकानासमोर दुसर्‍याच कुठल्या कामानिमित्त उभे दिसले तरी पंचक्रोशीत बदनामी व्हायची. दारू पिणार्‍यास लोक नाही नाही ते अपमानास्पद बोलायचे. दहाच वर्षात दुनिया १८० डीग्रीत फिरली की बार माहित नाही म्हणून बाप मुलाची खिल्ली उडवतो. नेमकं काय झालं ह्या दहा-बारा वर्षात?" त्यावर दोघांकडे उत्तर नव्हते. =))

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 1:20 pm | सतिश गावडे

जबरा किस्सा. =))

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 1:35 pm | संदीप डांगे

:-)

आमच्या शाळेच्या रस्त्यावर ९३-९४ च्या सुमारास 'सुरभि' नावाचा आलिशान बार सुरू झालेला. बार आहे म्हणजे वाह्यात दारूडे असणारच ह्या भावनेतून त्यामुळे तिकडून होणारी शालेय वाहतूक कमी झाली होती. तिकडून रेंगाळत जाणेही संशयास्पदरित्या बघितल्या जायचे. सोन्याबापुंना माहित असेल हा बार. हा बार म्हणजे आर्थिक उदारिकरणानंतर भारतात घडणार्‍या आर्थिक, सामाजिक, मानसिक बदलांच्या टर्निंग पाइण्टचा इंडिकेटर होता. आता अकोल्यात असे बार-रेस्टॉरण्ट निघालेत की सुरभि बार देशी दारूचं दुकान वाटेल. सगळ्या महाराष्ट्रात हे बदल दिसत आहेत म्हणा.

चला, बस झालं बोअर करून, तुम्ही जर्मन पोरीसोबत जावा, मजा करा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 1:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

बापा सुरभी म्हणजे आइकॉन होता एकेकाळी !! बार मधे एकंदरित उत्तम जेवण मिळते अन सुरभीचे जेवण क्लास असे फार!! संदीप भाऊ आता अकोल्यात पेशानुसार बार वर्गीकरण झाले आहे वकील सगळे गीतानगर बायपास ला एमपी बार एंड रेस्टॉ ला बसतात, डॉक्टर सगळे सिटी स्पोर्ट्स क्लब ला वगैरे (सिटी स्पोर्ट्स ने आता नॉनवेज सुरु केले हो)

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 2:01 pm | संदीप डांगे

हौ ले.

ते जौ द्या. आपन आकोल्यात कुठीसा बश्याचं तेवळं सांगा?

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 2:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

खंबा बाहेरून घेऊन पातुर रोड वर बशीरभाई च्या अमनदीप ले बसु!!! आजही रस्सा खलास बनवते अन महान डॅम मधली फ्रेश मच्छी बी देते

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 2:28 pm | संदीप डांगे

ज्जे बात! अपन दोनोंकी पसंद एकीच. अमनदीप ले तोडच नाइ.

अपनी खूब जमेगी भाई!

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 12:05 pm | अनिरुद्ध.वैद्य

सासूरवाडीस जाचे हाये. त ट्राय करून पाहतो म्हणल!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 12:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्या अनिरुद्ध भाऊले अजुन एक दोन जागा सांगुन ठेवजा हो! *"रावसाहेब" हात ते आपले!!

*अकोल्यात जावयाला रावसाहेब म्हणतात!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 1:03 pm | अनिरुद्ध.वैद्य
अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 1:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

धन्यवाद बापूसाहेब, संदीप भो :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 12:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

शेंगदाणे, फरसाण इत्यादी फुकट येणारा चखणा आम्ही आमच्या बरोबर असणाऱ्या पण मद्यपान न करणाऱ्या सोवळ्यां दोस्तांना उदार पणे देऊ करतो.

ठ्ठो !!!!!! आम्ही पैजारबुवांचे पंखे झालो आहोत,

तसे पाहता इतर वारुणीशी आमचे शत्रुत्व नाही पण विद्यार्थी दशेत इतके मैत्रीपूर्ण संबंध होते की आम्ही "अतिपरिचयात अवज्ञा" टाइप झालतो असे नमूद करतो :D

उदा :- यूपीएससी सारखी अनिश्चित परीक्षा , त्याची तयारी पुण्यात राहून, ते ही प्रार्थमिक मास्तर बापाच्या पेंशन मधुन! मधेच इंसेक्यूरिटी ची झीट यायची आम्हाला मग आम्ही जूनियर पोरांचे तास घेऊन "खरी कमाई" करीत असू, बा च्या पेंशन ची एक थेंब नाही प्यायलो कधी :) पण खरी कमाई जपून ही ठेवली नाही ज्या दिवशी कमाई आली त्याच दिवशी ती लाल पाण्यात उडवणे हा शिरास्ता होता आमचा, तेव्हा कॉलेजवयीन मानसिकता होती, प्यायला हार्ड बॉटम टमलर नसला तरी स्टीलच्या ग्लासातही कधीच प्यायलो नाही, आमच्या एका मित्राला नेमका बार मधेच क्लेप्टोमानिया होई तोच आम्हा गरीबांची गल्लास सोय करी :D , रूम आमची समाजवादी होती तिथे सीए सीनियर सॉफ्ट शॉप फ्लोर इंजीनियर कोचिंग क्लास मास्तर अन लोकसेवा आयोग विद्यार्थी हे सगळे एकत्र बसत, दारू पिताना गोल करुन बसावे हे उत्क्रांती ने दिलेले बेसिक ज्ञान आहे हा आमचा ठाम समज आहे. आमच्या रूम वर प्यायला यूनिफार्म असे तो म्हणजे चड्डी बनियान , ते तूमचे ग्लॉसी फॉर्मल्स अन आरेफायडी कंपनी मधे घरी नाही हा दंडक होता , तर असे मस्त गोल करुन ४ रूममेट बसणार प्रत्येकाला भेंडी खंबा हवा असे मग करणार काय? तर वाइन शॉप मधे जायचे कर्वेरोड ला अन "भाऊ सगळ्यात स्वस्त व्हिस्की कुठली?" अशी पृच्छा करायची! (गरजवंताने लाज बाळगता कामा नये) अश्याच सिंदबादच्या सफरी करताना एकदा एक अमृत हाती आले होते ते म्हणजे बारामती का फलटण च्या कुठल्याश्या डिस्टिलरी न काढलेली "मास्टर ब्लेंड" ही व्हिस्की च्यायला ११० रु ला हाफ अन २०० ला खंबा होता त्या काळी (२००७-११) , बॉटल दिसायला एकदम साधी अन व्हिस्की किरमीजी रंगाची असे! शिवाय हैंगओवर अजिबात नाही म्हणजे वयानुरूप खंबा रिचवला तरी काही होत नसे सोबत उधारीत आणलेला ट्रिपल शेझवान फ्राइड राइस असे जेवायला अन चकन्यात ५ ५ रु ची चिली मिली ची पाकीट (पुण्यात कुठल्याही मारवाड्याच्या किराणा/जनरल स्टोर ला मिळतील) जास्त माज असल्यास हॉट चिप्स वाल्या कडील बटर चकली अन पावशेर प्लेन साल्टेड बटाटा वेफर्स!

आठवणी अश्या वाहु लागतात बघा!!! :D

अभ्या..'s picture

31 Jan 2016 - 1:10 pm | अभ्या..

अहाहाहाहाहाहाहा
बापूसाहेब बापूसाहेब. त्या मास्टरब्लेंड, चिली मिली अन हॉट चिप्साची साक्ष आहे. आम्ही तुमच्यातलेच.
(मास्टरब्लेंडाने एकेकाळी काय लॉन्चिंग केलेले. शेवटी शेवटी बारवाल्यानी ओसीबीपीत घालून खपवली. सध्या सुरुय परत ब्रॅन्डिंन्ग.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 1:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

भावा! ये तड़क! आजही जगु परत तो मास्टर ब्लेंड काल आयुष्यातला

मयुरMK's picture

1 Feb 2016 - 11:35 am | मयुरMK

देवादिकांची अन
असुरांची हि आवडती |
परी सतजनाशी
असे नावडती ||
केला कुणीही कांगावा
मदिरे तुझी ख्याती ऐशी
जितेपणी स्वर्गात (?) नेशी - ||

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 12:03 pm | अनिरुद्ध.वैद्य

काय प्रतिसाद! मस्तच हो पैजारबुवा!

स्वत:ला किंवा दुसर्याला त्रास होणार नाही ईतपत,
बीयर,व्हिस्की किंवा स्कॉच(JD) अथवा याच कॉकटेल..
सोबत जर गप्पा मारायला कोणी नसेल तर चांगले पुस्तक वाचत अथवा चित्रपट पहात ..
नंतर जेवण आणी मस्त झोप.

चाणक्य's picture

1 Feb 2016 - 2:48 pm | चाणक्य

'जेडी' स्काॅच नाय.

आपण काल काय आणि किती प्यायलो होतो हे आठवण्याइतपतच असावं.

हेमंत लाटकर's picture

31 Jan 2016 - 10:33 am | हेमंत लाटकर

दारू (बियर) पिण्याची गरज माणसाला का पडते. तेही मांसाहारी जेवणासोबतच.

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 11:20 am | संदीप डांगे

असं काय नाय. सुसाट दारू पिणारे शाकाहारी बघितलेत, दारूला स्पर्शही न करणारे मांसाहारी बघितले.

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 11:27 am | सतिश गावडे

शाकाहारी दारू पिणारे दारू प्यायल्यावर छान गाणे म्हणतात, त्यांची आपल्याला ज्ञात नसलेली बाजू दिसते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 12:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय आठवण काढली देवा! आमचा मित्र होता स्वतः पुजारी अन भिक्षुकी करणारा एक त्याला एमपी मधल्या उज्जैनच्या महाकाल बाबाच्या पुजेचा नाद लागला होता अन इंदौर जवळील भैरव मंदिरात सुद्धा चकरा असत (ह्या मंदिरात दारूचा नैवेद्य असतो) आमच्या सोबत टेबलावर बसे, भाऊ चा खंबा वेगळा, ग्लास वेगळा चकना वेगळा, स्पष्ट म्हणत असे

"भाऊ तुले लागन तर तू एक अलग दाल फ्राई बलावजो पर माझ्या निवदात तुये मटनाचे हात टाक्याचे काम नाही बस" दारू पिणार मजबूत पण कितीही कड़क कोरी पिला तरी जेवण व्हेज अन सोमवार असल्यास बिना कांदालसुन सांगत जाय कैप्टेन ला स्पेशल! त्याचं नावंच अघोरी बाबा ठेवलत पोट्याईनं

सर्वसाक्षी's picture

31 Jan 2016 - 10:43 am | सर्वसाक्षी

असं म्हटलं तरी न घेणारे घेणार्‍याना सोडण्याचा वा न घेण्याचा उपदेश करतात आणि घेणारे न घेणार्‍याना 'हे काय घेत नाहीस?' 'एकदा चाखुन बघ / आम्हाला साथ दे' असा आग्रह करतात

मी लौकिकार्थाने ज्याला दारु म्हणतात ती २५-३० वर्षांपूर्वी सोडली. मला फक्त ओल्ड मंक आवडायची आणि तीही जशीच्या तशी. सोडा फसफसत राहतो आणि पाण्याने उगाच वस्तुमान वाढते. अन्य मिश्रणाने मूळ चव ढळते. एक एक टोपण ओतुन घ्यायची आणि प्राशन करायची. माथेरान सहलीला जाताना ठाण्याहून रात्री १.४० ची (तेव्हाची) शेवटची कर्जत पकडायची आणि तीन च्या सुमारास नेरळ गाठायचं. साडेपाचच्या सुमारास रस्ता पकडायचा आणि गप्पा, विनोद, उखाळ्या पाखाळ्यां सोबत टोपणा टोपणाने चपटी संपवताना रस्ता कधी संपायचा ते समजायचं नाही.

त्यानंतर फक्त बिअर. जेव्हा मनापासून घ्यावीशी वाटेल, बरोबर हवे ते गडी असतील, खुली जागा असेल, निघायची घाई नसेल, गाडी चालवायची नसेल, शक्यतो रात्री बैठकीच्या स्थानापासून जायची गरज नसेल तेव्हा बिअर घेतो. बरोबर काकडी, गाजर , बीटाचे काप, शेव व मिरचीच्या तलम चकत्यांनी सजवलेली सॉस लावलेली जिरा मोनॅको बिस्किटे, हिरवी चटणी लावलेल्या व मिरपूड शिंपडलेल्या शेव बटाटा पुरीच्या पुर्‍या, चिजचे बारीक तुकडे आणि खमंग भाजलेले पंजाबी मसाला एडीद पापड असे असेल तर काय विचारता! कींगफिशर अल्ट्रा, हनिकन, कार्ल्सबर्ग या आवडत्या. ट्युबोर्गही चांगली आहे. फारा वर्षांपूर्वी प्रथमच चाखलेली कॅफ्रे विलक्षण आवडल्री होती. चीनी दौर्‍यंमध्ये शिंताव फार आवडायची.

असो. असे योग नेहेमी येत नाहीत.

हेमंत लाटकरांचा अत्यंत वाजवी प्रश्न ....कुणी तरी सांगा उत्तर...?

तुमच्या धाग्याला जे शीर्षक आहे त्यातल प्रश्नचिन्ह आणि '' किती'' हा शब्द काढून टाका = उत्तर

भाते's picture

31 Jan 2016 - 12:00 pm | भाते

माझी आणि बऱ्याच मिपाकरांची आवड एकच आहे हे वाचुन छान वाटले. व्होडका, व्हिस्की कधीच आवडले नाही. रममध्ये सुध्दा फक्त म्हातारा संन्याशी. नाहीतर कट्टयाला मिपाकरांबरोबर बिअर.
किमान तिन पेग आणि जास्तीत जास्त चार पेग, तेसुध्दा पाण्यातुन. कोल्ड ड्रिंक सोडा यामुळे दारूची सगळी मजा जाते. घसा ओला व्हायला एक लार्ज पेग लागतो. त्यामुळे ९० मिली / दोन पेग पिण्यापेक्षा न प्यायलेली बरी.

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 12:33 pm | सतिश गावडे

किमान तिन पेग आणि जास्तीत जास्त चार पेग, तेसुध्दा पाण्यातुन. कोल्ड ड्रिंक सोडा यामुळे दारूची सगळी मजा जाते.

"शाही हरीण निवडक पिंप" पाण्याबरोबर काय लागते. अहाहा.

प्रचेतस's picture

31 Jan 2016 - 12:37 pm | प्रचेतस

खी खी खी.

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2016 - 12:41 pm | टवाळ कार्टा

जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत :)

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 12:48 pm | सतिश गावडे

जाणकार म्हणोनी कोणी दुसर्‍यास हाक मारी..

जाणकार म्हणोनी कोणी दुसर्‍यास हाक मारी..
कोरी दारु पेटेना, म्हणोन हलकेच काड्या सारी

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 12:57 pm | सतिश गावडे

हिकडं यौन बुवांची कमी भरून काढलीत तुम्ही. भडकलेल्या जीभ काढणाय्रा स्मायल्या.

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2016 - 1:06 pm | टवाळ कार्टा

हेलाकाका...कधी फक्त चव घेण्यासाठी प्यायची असेल तर अ‍ॅबसिंथची चव घ्या

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2016 - 12:42 pm | टवाळ कार्टा

हि कोणालाच माहित नाही???

absinth

अभ्या..'s picture

1 Feb 2016 - 1:14 pm | अभ्या..

एका पुणेकराने पण असेच विचारलेले. तुला अ‍ॅबसिंथ माहीत नाही? जणू काय ही माहीत नाही तर सगळी जिंदगी वेस्ट. अर्थात पुणेकरच तो.
आवर्जून उल्लेख करण्याइतकी भारी वाटली नाही एवढेच. ;)

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2016 - 1:41 pm | टवाळ कार्टा

प्यायला आहेस का? असल्यास किती? ;)

आवर्जून उल्लेख करण्याइतकी भारी वाटली नाही एवढेच. ;)

माझ्या ह्या प्रतिसादातच तुझ्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे हायेत. ;)

आदूबाळ's picture

1 Feb 2016 - 3:06 pm | आदूबाळ

अ‍ॅबसिंथ काय आहे? प्रथमच ऐकतोय...

हाय्येस्ट अल्कोहोल पर्सेन्तेज असलेली म्हणून फेमस झाली, बरीच वर्शे बॅन होती. आता मिळते. प्यायच्या वेगवेगळ्या मेथड पण आहेत. त्याचा कलर मला व्यक्तिशः आवडत नाही. नेटवर बरीच माहीती आहे उपलब्ध.
डोस्के धरलेले जरासे :(

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2016 - 3:50 pm | टवाळ कार्टा

२-३ शॉट्स प्या...मग दुसर्या दिवशी समजेल ;)

जव्हेरगंज's picture

31 Jan 2016 - 1:24 pm | जव्हेरगंज

w

w

कोपच्यात उभारलेली जेडी तेवढी ओळखीची. बाकी सगळे अनोळखी. :(

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2016 - 2:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

दादा आपली बकार्डी पण दिसतीय ना वरुन दुसर्या लायनी मध्ये

old monk

बाकी हे घ्या

पैजारबुवा,

अभ्या..'s picture

31 Jan 2016 - 2:24 pm | अभ्या..

नमस्कार करतो माऊली.
आता सरांचे पण १०० झालेत. हिला उचलावी अन कल्टी मारावी ह्या धाग्यावरून. कसे???

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2016 - 2:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

अभ्या वाक्यं प्रमाणं....

जाता जाता :- सर १०० झाल्या बद्दल अभिनंदन.
रच्याकने हे प्रॉमिस विसरू नका. मिकाला मी आणतो.

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. के वादों और बातो पर संदेह नहीं करते. नक्की बसू. :)

मित्रहो, काल पासून नेट गंडलं आहे, उत्तम प्रतिसाद आले आहेत आणि आपल्या प्रतिसादाच्या आनंदात सालं मला सहभागी होता येत नै ये. नेट रेग्युलर सुरु झालं की हजर होईनच. :)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2016 - 2:19 pm | टवाळ कार्टा

दारुड्यांनी बेवड्यांबरोबर संस्क्रूतीला बूडवन्यासाथी काडलेला धागा

- ले"संत" बाटकर

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 2:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

कुठंशी बुडवणार? बियर मधे का रम मधे