✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आरक्षणाची गरज

अ
अन्नू यांनी
Sat, 01/16/2016 - 22:36  ·  लेख
लेख
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने? मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी? फक्त आर्थिक दुर्बलांना किंवा मागासलेल्या जातींना सधन करण्यासाठी? आत्ता मिपावर कित्येक कायदेतज्ञ असतील. काहींना याबाबतीतली राज्यघटनेतील काही कलमेही माहीत असतील. त्यांनाही या युक्तीमागचा अर्थ समजु नये? आश्चर्य वाटतं- पण तितक्याच वेदना होतात! जर हे आरक्षण आर्थिक दुर्बलांना सधन करण्यासाठी असतं तर मग सरकार गरीबांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी किंवा दारिद्ररेषेखालील लोकांसाठी जे विविध उपाय-योजना आखत असतं ते कुठल्या नियमानं करत असतं? आणि मुळात आरक्षण हे जातीवरच भर देणारं का आहे? कोण विचार करतं याचा? कोणीच नाही! फक्त प्रश्न आला कि एकच उत्तर- आरक्षण बंद करा! बस्स. संपलं? आपण फँड्री सिनेमा बघतो, चार दिवस चुचकारतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो आणि नंतर?... सगळं शांत! का बरं असं? का तो सिनेमा फक्त आपल्या मनोरंजनासाठीइतकाच मर्यादित असतो का? एक किस्सा सांगतो- काल्पनिक नाही कालचाच घडलेला आहे. कोणाचं नाव इथं सांगत नाही मी, फक्त चौघा मित्रांत झालेली चर्चा मी इथे देतो. कदाचित मी हा मुद्दा का सांगतोय हे अधिक स्पष्ट होईल. "अरे उसमें तो ९५ मे आडमिशन हो जाता है|" "ह्यॅ! किसने कहाँ?" "सच में, अगर तू कास्टवाला रहेगा ना तो तेरा अ‍ॅडमिश आराम से हो जाएगा.." "अच्छा- उसके लिए ना? मुझे लगा अपनी बात कर रहा है तू|" "अरे SC के लिए तो ८५% है! पता है?" "कौन वो भंगी?" "नही SC वाला" "वही- भंगी! साला यहाँ पे हमें अ‍ॅडमिशन मिलता नहीं और इन भिखारी को मुफ्त का मिल जाता है!" "कुछ भी बोल- लेकीन जो है- वो है|" "क्या फालतू में, इनको सर चढाती है गवर्नमेंट? हर जगह इनको रिझर्वेशन चाहीए होता है|" (तिसरा) "हर जगह नही होता- XXXXX कॉलेज में तो SC हो, तो भी ९० का कट ऑफ है|" "वो एक जगह हुई, लेकिन बाकीके जगह पे तो ये भिखमंगे आते ही है ना?" "देख तू कास्ट के बारें में ऐसा नही बोल सकता" "क्यु- मुझे क्या किसी का डर है क्या? मै तो कॉलेजमें और बाहर भी उनको भंगी ही बुलाता हूँ" "देख ***** तू यहीं बात किसी कास्टवाले के सामने कहेगा ना, तो वो सीधे तुम्हारे उपर केस कर देगा|" "तू क्यु इतना डर रहा है?" "डरने का सवाल नहीं- मेरे साथ ऐसा हुआ है, इसलिए मै बोल रहा हूँ|" "मुझे तो इतना गुस्सा आता है ना इनके उपर" "गुस्सा तो मुझे भी आता है- लेकीन हम कुछ नही कर सकते, लॉ ही ऐसा है| तू बाकी जगह पें उनकों कितनी भी गालियाँ दे, तुझे कोई नही रोकेगा, पर पब्लिक प्लेस में तू ऐसा नही बोल सकता|" "लेकीन इनको रिझर्वेशन देते क्यु है?" "देख- असली रिझन तो मुझे भी नही पता, लेकीन इसी वजह से वो आगे निकल जाते है|" "साला, इनका रिझर्वेशनही पुरा बंद करना चाहीए| जरुरत ही क्या है इनकों रिझर्वेशन देने कि?" "जाने दे नं, वैसे भी करेंगे क्या वो रिझर्वेशन लेके? गाँव जाके हल ही चलाऐंगे!" या वाक्यावर सगळेजळ हसायला लागले. थोड्या वेळानंतर पहिला मुलगा निघून गेला. जाताना पुन्हा त्याने तसं ओपनली बोलू नको म्हणून त्या मुलाला बजावलं. पण त्या मुलाला मात्र त्याचं बोलणं पटलं नाही. तो त्याच मुद्द्यावर आपल्या दुसर्‍या मित्राबरोबर बोलायला लागला.. "क्या डरता है रे ये? भंगी को भंगी नही बोलेंगे तो क्या बोलेंगे?" "वो बहोत डरपोक है|" "नहीं तो क्या? हमारे गाँव में तो ये लोग पहले कचरा उठाते थे, पता है? कोई भाव नहीं देता इन्हें" त्याचा मित्र नुसताच कुचेष्टेने हसला- "कभी आओगे तो देखना हमारे गाँव- वहाँ बहोत चलता है ऐसा. मै तो मुँह पर बोलता हूँ उनके! आज भी इनको हमारे सामने बैठने कि परमिशन नहीं है- हिम्मतही नहीं होती इनको सामने बैठने कि... अरे बैठना तो दूर ये लोक- यही एस सी वाले- हमारे सामने से जाते वक्त चप्पल भी पहनके नही जा सकते!" ही संपुर्ण चर्चा ऐकल्यावरही समाजातून जात हा प्रकार कायमचा नष्ट झाला आहे असं वाटतं का? आंम्हाला कॉलेजच्या फर्स्ट इअरला अभ्यासाला एक नाटक होतं त्यात एक डायलॉग होता-"जात नाही ती जात!" जात दोनच शब्द पण त्याची झळ खुद्द आंबेडकरांनी अनुभवल्याने त्यांनी घटनेत तरतुद करुन या घटकाला प्रत्येक क्षेत्रात मुद्दाम राखीव जागा करुन दिल्या- आणि त्याच आरक्षणाच्या आज आपण इतक्या प्रचंड विरोधात बोलत असतो! पण आर्थिक घटकच आंबेडकरांना आरक्षणासाठी गृहीत धरायचा असता तर त्यांना जात हा मुद्दा घटनेत नमुद करण्याची गरजच काय होती? याचा विचार कोणीही करताना दिसत नाही. एक वेळ तुंम्ही कष्ट करुन पैसा मिळवून शकता- श्रीमंत होऊ शकता, स्वतःची गरीबी दुर करु शकता- पण जात? अहं- कितीही प्रयत्न करा, ती तुंम्हाला कधीच बदलता येत नाही! आणि हीच गोष्ट आंबेडकरांना कळून चुकली होती, त्याबाबत त्यांनी एक प्रसंगही सांगितला आहे, ऑफिसात काम करत असताना ते एका चपराश्याला पाणी द्यायला सांगतात तर तो ते देण्यास नाकारतो. का? तर तो एका उच्च जातीचा असतो! यावेळी आंबेडकरांचं पद- त्यांचं शिक्षण त्याच्या दृष्टीने काहीच किंमतीचं नसतं! तो तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवतो. असा एकच नाही- अनेक प्रसंग आंबेडरांच्या बाबतीत घडत गेले आणि त्यातूनच आरक्षणाची कल्पना मुळ धरत गेली. पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहिल्यास आंबेडकरांनी आरक्षणातून काय साध्य केलं असा प्रश्न पडतो. कारण- त्या विशिष्ट घटकाविषयी समाजाची मानसिकता आजही तिच आहे- पुर्वी होती तशीच! बदल झाला तो ती उत्कट करण्याच्या पद्धतीत! त्यांचा धर्म बदल झाला. जात मात्र प्रत्येक ठिकाणी जिवंतच राहीली....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
72298 वाचन

💬 प्रतिसाद (374)

प्रतिक्रिया

+१

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/20/2016 - 14:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संधी कमी होणे

चैतन्य ईन्या
Wed, 01/20/2016 - 16:06 नवीन
संधी कमी होणे ह्याला कारणीभूत लोक्संख्याच्या प्रमाणत नसणाऱ्या चांगल्या शाळा आणि कॉलेजेस. हि गोष्ट लोकांना का पटत नाही हेच कळत नाहीये. झालय काय कि आहेत लाखो मुले आणि फारतर हजारभर चांगल्या जागा उपलब्ध. १-२ चांगली कॉलेजेस सोडली तर बाकीची म्हणजे नाव घेण्याच्या लायकीची नाहीत. मग सगळ्यांची खाली बसा असला सगळा कारभार चालू आहे. ह्याचे परिणाम पुढील काही वर्षात दिसू लागतील. राखीव जागा आवश्यकच होत्या पण कुठपर्यंत ह्याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. पार वरपर्यंत जेंव्हा राखीव जागा होतात तेंव्हा कुठेतरी चुकते आहे हे कळले पाहिजेल. जेंव्हा सहज जागा उपलब्ध होतील तेंव्हा हा प्रश्न आपसूक सुटेल पण आता त्याची जागा खाजगी संस्थांनी घेतली आहे आणि त्याच्या फिया आणि मिळणारे शिक्षण ह्याचे व्यस्त प्रमाण आहे. सगळे प्रश्न फक्त राखीव जागांनी सुटतील असे काहीसे चित्र तयार झाले आहे. ह्यातून फक्त जाती घट्ट होता आहेत आणि बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लोकसंख्येच्या प्रमाणात चांगली

संदीप डांगे
Wed, 01/20/2016 - 20:22 नवीन
लोकसंख्येच्या प्रमाणात चांगली कॉलेजेस नाहीत यात राखीव जागावाल्यांचा नक्की कसा दोष? राखीव जागांचा उपयुक्तपणा समजलेला नसल्याने असे लॉजिक फार पुढे केले जाते आहे. तरी जास्त चांगली कॉलेजेस काढण्याची मागणी करणारी चळवळ संधी डावलल्या गेलेल्यांनी आतापावेतो काही सुरु केलेली दिसत नाही. म्हणजेच खरे कारण ते आहे असे वाटत तर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

ह्म्म

चैतन्य ईन्या
Wed, 01/20/2016 - 20:34 नवीन
हे थोडं पेडगाव ट्रीप झाली. सरळ सरळ जागा कमीच होतात ना? मुले वाढणार पण जागा न वाढणे ह्याला कुठल्या अर्थाने तुम्ही कारण नाही म्हणत आहात? सुरवातीला विरोध हा जातीवरून होताच ते कोणीही नाकारत नाहीये. पण मला असलेले मार्क आणि मिळू शकणारे कॉलेज ह्याचे प्रमाण व्यस्त आहे. आता हेच मान्य नसेल तर मग बोलणेच खुंटले. जिथे जागा सहज उपलब्ध होतात तिकडे हा प्रश्न येणार नाही. पण मुदलात ते न करता फक्त एकाच गोष्ट करतोय हे सरकारी कारभार्यांच्या लक्षात येत नाही आणि तुमच्या सारख्या विचारी लोकांच्या पण लक्षात येवू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

चैतन्य साहेब,

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/20/2016 - 20:57 नवीन
चैतन्य साहेब, नेमक्या कुठल्या सीट्स कमी पडल्या म्हणे? कारण महाराष्ट्रभरात मागच्यावर्षीच्या एडमिशन मधे ६०,००० सीट्स फ़क्त इंजीनियरिंगच्या रिकाम्या राहिल्या होत्या, त्याचा हा दुवा आहे, माझ्या माहीती प्रमाणे मेडिकल सीईटी मधे कटऑफ़ अजुन एज वर असतो हे झाले महाराष्ट्राची अन इथल्या मेधावी मुलांच्या इतिकर्तव्यतेबद्दल कारण आयुष्य म्हणजे इंजीनियरिंग अन मेडिकल हे महाराष्ट्रातले फिक्स equation आहे, ते एक असो बाकी, बीए बीकॉम बीएशश्शी वगैरे शिकवणारी अन आम्हाला "सुशिक्षित" असा शिक्का देणारी कॉलेज तर पैश्याला पासरी आहेत त्यांच्यात सीट्स कमी पडतील का हा प्रश्न अप्रस्तुत आहे कारण आजकाल तालुक्याला टिनशेड मधे का होइना आमचे एखाद बापुड़वाणे "कला वाणिज्य विज्ञान,महाविद्यालय" सापड़तेच सापड़ते!! कट थ्रोट कम्पटीशन असलेल्या कॉलेज मधे ओपनची पोरे अजिबात नसतात असे काही नाही न?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

नेमक्या कुठल्या सीट्स कमी

श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 23:17 नवीन
नेमक्या कुठल्या सीट्स कमी पडल्या म्हणे? कारण महाराष्ट्रभरात मागच्यावर्षीच्या एडमिशन मधे ६०,००० सीट्स फ़क्त इंजीनियरिंगच्या रिकाम्या राहिल्या होत्या, त्याचा हा दुवा आहे,
या ६०,००० रिकाम्या जागातील किती जागा चांगल्या समजल्या जाणार्‍या महाविद्यालयातील होत्या याचा विदा आहे का? पुण्याचाच विचार केला तर सीओईपी, एमआयटी, पीआयसीटी यासारख्या महाविद्यालयातील किती जागा रिकाम्या होत्या व ससेवाडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, ग्यानबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय अशासारख्या महाविद्यालयातील किती जागा रिकाम्या होत्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

नुसते महाविद्यालय उत्तम असुन

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/21/2016 - 12:11 नवीन
नुसते महाविद्यालय उत्तम असुन भागते का गुरूजी? आमच्या मित्रमंडळात ओपन केटेगरीचा असुन सीओईपी मधे शिकुन (मैकेनिकल इंजीनियरिंग विथ डिस्टिंक्शन) सुद्धा स्टेट बँक ऑफ़ इंडिया मधे क्लेरिकल कैडर मधे काम करणारा मित्र सुद्धा आहे अन कोपरगावच्या इंजीनियरिंग कॉलेज मधुन जेमतेम फर्स्टक्लास घेऊन नंतर नेटाने जीआरई देऊन अमेरिकेत आज स्वतःची स्टार्टअप असणारा एक दलित मित्र सुद्धा आहे, त्या दलित मित्राने हल्लीच आमच्या गावातल्या बीएससी कॉलेज सोबत टाईअप करून ५० पोरांना कस्टमर सपोर्ट प्रोसेस मधे खुद्द नागपुरात नोकरी दिली आहे अन आता स्टार्टअप इंडिया चा सुद्धा लाभ घ्यायचा म्हणतो आहे इकडे expansion करायला, मग त्या सिओईपी वाल्या मित्राने सुद्धा एक मैकेनिकल ची सीट बर्बाद केली असे आता तुम्ही म्हणाल की तो फ़क्त ओपन होता म्हणून बिचार्याला क्लर्कची नोकरी करावी लागते आहे असे म्हणाल? शिवाय आहे ती सिस्टम अशी आहे त्यातही टफ फाइट देऊन सीईटी किंवा जेईई अन एआयईईई टॉप करून तुम्ही म्हणता तश्या टॉप कॉलेज ला जाणारी ओपन मुले सुद्धा आहेत, माझ्यामते संधी म्हणजे प्रवेश मिळणे होय इंजीनियरिंगला मग ते चांगले प्रोफेसर असणारे एखादे तालुक्याचे इंजीनियरिंग कॉलेज का असना, त्या संधीचे सोने करणे हे विद्यार्थ्याच्या हातात आहे असे प्रमाणिकपणे वाटते, ती संधी नाकारायचा किंवा कमी व्हायचा प्रश्नच नाही कारण ६०,००० सीट्स बद्दल मी आधीच स्पष्ट बोललोय , पुढे तुमची मर्जी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बाप्पु - तुमची उदाहरणे ही

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/21/2016 - 12:33 नवीन
बाप्पु - तुमची उदाहरणे ही अपवाद आहेत. त्यातुन काही सिद्ध होत नाही. ओपन मधला सीओइपीत ले बरेच लोक नंतर बँकात कारकुनी करतात आणि कोपरगावातुन पास होऊन बरेच लोक स्वताची कंपनी काढतात असा काही डाटा असला तर ठीक आहे. ह्या अश्या आउटलायर डाटा-पॉइंट वरुन काहीच सिद्ध होत नाही. अशी उदाहरणे प्रत्येक क्शेत्रात असतात. आत्त्ता निवृत्त झालेले सरन्यायाधिश कापडीया म्हणे थोडे दिवस शिपायाचे ( कदाचित न्यायालयातच ) काम करत होते म्हणुन सर्व च शिपायांची बुद्धी, क्षमता , लायकी सरन्यायाधीश होण्याची असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अपवाद उदाहरण होऊ शकत नाही हे

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/21/2016 - 13:30 नवीन
अपवाद उदाहरण होऊ शकत नाही हे मान्य पण अपवाद उदाहरण सिद्ध करायला वापरले जाऊ शकते न? शिवाय,
संधीचे सोने करणे हे विद्यार्थ्याच्या हातात आहे असे प्रमाणिकपणे वाटते,
हा सुद्धा आपणाला अपवाद वाटतोय का? असल्यास माझे स्वतःचे अन माझ्या बॅचमेट्सचे उदाहरण मी देऊ शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पेडगाव ट्रीप चालू देत

चैतन्य ईन्या
गुरुवार, 01/21/2016 - 15:49 नवीन
बापु आणि डांगे, तुम्ही मुद्दाम साहेब म्हणालात तेंव्हा त्यात असलेला हेटाळणीचा सूर मी बाजूला सारतो. तुम्हाला पेडगाव पसंत आहे. असू द्यात. तुम्ही दिलेली उदाहरणे हे म्हणजे लोक बफे आणि बिल गेट्सची उदाहरणे देतात तसे आहेत. मुळातच एक उपजत बुद्धी असते आणि त्याच्या जोरावर लोक काय वाटेल ते करतात. तो खूप वेगळा भाग आहे. तेंव्हा त्याचा वापर करून मूळ मुद्दा बाजूला सरू नका. खरा प्रश्न चांगले शिक्षण देण्याचा आहे. आधीच हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या क्वालिटी शाळा कोलेजस आहेत. तिथे जागा मिळवण्यासाठी सगळ्यांच समान संधी असली पाहिजेल. पण जेंव्हा तारतम्य सोडून होतंय तेंव्हा समोरचा बोलातोय त्याचा गाभा समजून घ्या. माझे म्हणणे आहे कि सगळ्यांचा चांगले शिक्षण मिळेल ह्याची सोय काय? तुम्ही दोघे जण उगाचच ब्राह्मणांवर घसरतंय. तुमचा राग असेल ठीक आहे पण निदान विचार करून बोलावे. पण तुम्हाला हवे असेल तर घ्या जागा वाढवून करा आंदोलने वगैर हे काही चांगले लक्षण नाही. सध्याच्या विचित्र धोरणाने दरी अजून वाढत चालली आहे. उलट अजून अजून फुट पडते आहे. प्रत्येक जण आता माझी जात तुझी जाता करतो आहे. असो तुमचा सगळा रोख आमच्या वर अन्याय झाला आता आह्मी तुम्हाला सोडत नाही. जास्त बोलायचे नाही असाच आहे. भारती आणि डी वाय ह्यांची लायकी काय आहे हे एकदा बघाच. शासकीय कोलेजस मध्ये पूर्वी मिळणारे आणि आत्ता मिळणारे शिक्षण ह्याच्यात फरक आहे. जागा ६०,००० काय १ लाख असून देत पण जर का फार तर १०,००० जागाच ठीक असतील तर कोणत्या अर्थाने तुम्ही म्हणताय आणि मी कोणत्या अर्थाने म्हणतोय ह्याचा विचार करा. झोपलेल्या जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या नाही. जाता जाता ते इंजिनियरिंग आणि मेडिकल सोडून ह्या. बाकीच्याची काय अवस्था आहे? ते काय उत्तम शिक्षण देतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बापु आणि डांगे, तुम्ही

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/21/2016 - 16:11 नवीन
बापु आणि डांगे, तुम्ही मुद्दाम साहेब म्हणालात तेंव्हा त्यात असलेला हेटाळणीचा सूर मी बाजूला सारतो. मी माझ्यापुरते बोलतो चैतन्य साहेब, कदाचित तुम्हाला माझ्या प्रतिसादांची सवय किंवा माहीती नसावी, मी नेहमीच प्रत्येकाला आदरार्थी संबोधन वापरतो, त्यात हेटाळणी नाही, कोणाचीही हेटाळणी करणे हे माझ्या शिस्तीत अन स्वभावात बसत नाही अन रुचतही नाही, तेव्हा कृपया वाकडे अर्थ काढू नये ही विनंती, आता तुमचा स्वभावच तिरसट असल्यास तो तुमचा प्रश्न असेल माझा नाही, दूसरे म्हणजे माझा ब्राह्मण समाजावर राग असायचे काही एक कारण नाही कारण की मी स्वतः एक ब्राह्मण आहे,ज्याची मला लाजही नाही अन माजही नाही. उलटपक्षी दरवेळी पेड़गाव पेड़गाव म्हणत आपण चक्क एडहोमिनिस्टिक प्रतिसाद देत आहात! मी काय बोलतो करतो हे आपण मिपावर कोणालाही विचारून घ्या फक्त एकच विनंती करतो एडहोमिनिस्टिक होऊ नका! हे संवाद इतके मनावर घ्यायचे नसतात त्या ऊपर जर तुमचा स्वभावच तिरसट असेल तर हा आमचा तुम्हांस शेवटचा प्रतिसाद समजा! जयहिंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

एक ता.क.

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/21/2016 - 16:18 नवीन
एक ता.क. तुम्ही दोघे जण उगाचच ब्राह्मणांवर घसरतंय. परत एकदा, डांगे साहेब त्यांचे सांगतील (त्यांना गरज वाटल्यास) पण मी ब्राह्मण समाजावर घसरलोय हा शुद्ध आरोप आहे ज्याच्यात तथ्य नाही, तुम्ही कुठलाही प्रतिसाद वाचुन घ्या त्यात मी "ओपन" असा उल्लेख केलाय ओपन मधे ब्राह्मण सोडुन इतरही जाती असतात हे कदाचित आपणांस नीट ठाऊक असेलच. तरीही कृपया बेसलेस आरोप करू नये हे बरे पडेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बापू जावू द्यात

चैतन्य ईन्या
गुरुवार, 01/21/2016 - 20:52 नवीन
तुम्ही तुमचा किल्ला सोडणार नाही आणि मी म्हणतोये ते मला सोडता येणार नाही. बाकी प्रतिसादात तुम्ही साहेब म्हणाला नहीत आणि इथे म्हणताय. हे तुम्हालाच जाणवत असेल तर बघा. सभ्य भाषा आहे तुमची आणि मी हि तुम्हाला कुठेही वाकडे बोललो नाहीये. पण हा साहेब असा शब्द आहे ते मान्य करणे थोडे अवघड जात असेल तर ठीक आहे. मी मुद्दामच पेडगाव म्हणतोये कारण तुम्ही चांगल्या शाळा/कोलेजसचा विषय सोडून बाकीचे म्हणताय. त्यावर एकमत होताना दिसत नाहीये. मी असे म्हणालो नाहीये कि राखीव जागा बंद करा. तुम्ही म्हणताय तेच मी वेगळ्या भाषेत/शब्दात म्हणतोये कि इम्पलीमेंट करताना चुकतय. ते काय करताना राहतंय ते संगतोये तर बाकीचे विषय येत आहेत. ब्राह्मण सोडुन इतरही जाती असतात हे कदाचित आपणांस नीट ठाऊक असेलच.>> त्या जातींनी आता स्वतःसाठी राखीव जागा मागितल्या आहेत. भारतात त्याच जाती सत्तेवर आहेत आणि त्या पूर्वीपासूनच सत्तेवर होत्या. त्यांना पण झळ पोहोचते आहे. म्हणूनच म्हटले तारतम्य सुटले आहे आणि सगळे आता रेस टू बोट्म ह्याकडे धावताना दिसत आहेत. लेट्स आग्री टू दीसआग्री. कारण आपण काय भांडून मिळवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मुद्दा मांडलाच आहे तर सांगतो.

मृत्युन्जय
Mon, 02/01/2016 - 15:24 नवीन
मुद्दा मांडलाच आहे तर सांगतो. १९९८ साली बी एम सी सी, पुणे मध्ये ओपन कॅटेगरी मध्ये ८०% + मिळुनही मला अ‍ॅडमिशन मिळु शकत नव्हती. त्याचवेळेस ओबीसी कोट्यात ६०% ला आणि एससी / एसटी ला ४०% ला अ‍ॅडमिशन मिळत होती. ऐनवेळेस काही अ‍ॅडमिशन्स कॅन्सल झाल्यामुळे शेवटची अ‍ॅडमिशन मला मिळाली होती. प्रश्न या तफावतीचा आहे. अ‍ॅडमिशन काय कुठेतरी मिळालीच असती पण करीयर घडण्यासाठी जे पोषक वातावरण बी एम मध्ये होते ते इतरत्र असलेच असते असे नाही. असो. जातिनिहाय आरक्षणाचा मुद्दा तरीही मान्य करता येइल पण जातिनिहाय आरक्षण देताना एका ठराविक रेषेपेक्षा ज्यांची आर्थिक स्थिती वर आहे त्यांना यापुढे कायमचे वगळावे असे वाटते. यापुढच्या त्या लोकांच्या पिढ्या जर स्वतःची उन्नती करुन घेउ शकत नसतील तर त्याची शिक्षा ओपन कॅटेगरीला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मला असलेले मार्क आणि मिळू

संदीप डांगे
Wed, 01/20/2016 - 22:22 नवीन
मला असलेले मार्क आणि मिळू शकणारे कॉलेज ह्याचे प्रमाण व्यस्त आहे. एवढाच प्रश्न असेल तर त्याचा राखिव जागेशी काहीही संबंध नाही. कारण हेच प्रश्न राखिव जागेवाल्या मुलांनाही भेडसावतात. बाकी बापुसाहेबांनी उत्तर दिलंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

डांगे साहेब - ब्राम्हणांनी (

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/21/2016 - 11:00 नवीन
डांगे साहेब - ब्राम्हणांनी ( किंवा कोणीही )जरी सरकारची काडीची मदत किंवा अनुदान वगैरे न घेऊन कॉलेज काढायचे ठरवले आणि त्यात फक्त मेरीट वर प्रवेश द्यायचा असे ठरवले तर हे सरकार परवानगी देत नाही, बेकायदेशीर ठरवते असले कॉलेज. मग दर्जेदार शिक्षण देणार्‍या जागा कश्या वाढणार? एकुणच ह्या देशातल धोरण मुबलक पण टाकाऊ अशी निर्मीती करण्याचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

उलट आहे

चैतन्य ईन्या
गुरुवार, 01/21/2016 - 15:55 नवीन
उलट आहे. आता ब्राम्हणांनी कुठेही येवू नये अशी सुप्त इच्छा आहे. इन फ्यकट बाहेर घालवले तर उत्तम असाच रोख आहे. जरा शहरात असलेले नवीन लागलेले शिक्षक ह्यांची भाषा आणि विचार तपासावेत. हा माझा हक्क आहे. इथे मी पैसे घ्यायला येतो असा नूर आहे. अजूनही गावात शिक्षण प्रामाणिक पणे शिकवत आहेत कारण मुळातच असलेली पुढे जायची इच्छा. पण हेच शहरात आले कि चित्र बदलतंय. पण प्रामाणिकपणे मान्य करण्याची इच्छा नाहीये. माझे असे स्पष्ट मत आहे कि काही क्षेत्रातून आता राखीव जागा कमीच कराव्यात. शिक्षक किंवा मुख्याध्यापक वगैरे पदांसाठी हे कमीच करावे. ह्याच मुळे मराठी शाळांचे नुकसान झालेले आहे आणि इंग्रजीचे स्तोम जास्त माजले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

+1

sagarpdy
Wed, 01/20/2016 - 17:15 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

४०-४५ टक्के आरक्षणामुळे तीन

श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 23:12 नवीन
४०-४५ टक्के आरक्षणामुळे तीन-साडेतीन टक्के ब्राह्मणांची संधी कमी झाली, हे कसे? म्हणजे उरलेले ५० टक्केही ब्राह्मणांना अपुरे पडते असे समजावे काय?
हे लॉजिक चुकीचे आहे. ब्राह्मणांची संख्या तीन-साडेतीन टक्के आहे म्हणजे त्याच प्रमाणात त्यांनी प्रत्येक क्षेत्रात येणे अपेक्षित आहे का? उदाहरणार्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात १००० जागा असतील तर संख्येच्या प्रमाणात फक्त ३०-३५ ब्राह्मण विद्यार्थ्यांनीच तिथे प्रवेश घ्यावा व इतरांनी दुसरीकडे जावे अशी अपेक्षा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अशी अपेक्षा कशाला हवी? संधी

संदीप डांगे
Wed, 01/20/2016 - 23:33 नवीन
अशी अपेक्षा कशाला हवी? संधी कमी झालेल्यांची तक्रार आहे म्हणून तो दाखला दिला. मुद्दा जागांचा आहे की संधींचा तेवढं आधी क्लियर करा मग पुढे बोलू. उदा: महाराष्ट्रात १ लाख कॉलेजं आहेत. प्रवेशोत्सुक १० लाख विद्यार्थी आहेत. या १ लाख कॉलेजपैकी फक्त पन्नास कॉलेज उत्तम आहेत. आता ही दहा लाख मुले ह्या पन्नास कॉलेजातल्याच जागांसाठी झुंजणार. साहजिक आहे त्यातली जी टॉप रँकिगची मुले आहेत तीच प्रवेश मिळवू शकणार. यात राखीव-खुले दोन्ही आलेत. टॉपच्या कॉलेजमधे राखीवमध्ये अगदी कुणी पस्तीस टक्क्यावाला घेतला जात नसेल. मग रडारड कशासाठी? इथे सरळ मेरीटची झुंज आहे. चांगली कॉलेजेस कमी असणे हे संधीच्या आड येणारे सत्य आहे. राखीव जागा नव्हे. त्यामुळे साप सोडून भुइला धोपाटणे गैर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या १ लाख कॉलेजपैकी फक्त

श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 23:38 नवीन
या १ लाख कॉलेजपैकी फक्त पन्नास कॉलेज उत्तम आहेत. आता ही दहा लाख मुले ह्या पन्नास कॉलेजातल्याच जागांसाठी झुंजणार. साहजिक आहे त्यातली जी टॉप रँकिगची मुले आहेत तीच प्रवेश मिळवू शकणार. यात राखीव-खुले दोन्ही आलेत. टॉपच्या कॉलेजमधे राखीवमध्ये अगदी कुणी पस्तीस टक्क्यावाला घेतला जात नसेल. मग रडारड कशासाठी?
याच टॉप ५० महाविद्यालयात खुल्या वर्गातून येणार्‍या विद्यार्थ्यांच्या जागा कमी केल्या या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची त्यांची संधी आपोआपच कमी होणार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जागांचाच प्रश्न आहे ना? मग

संदीप डांगे
गुरुवार, 01/21/2016 - 00:30 नवीन
जागांचाच प्रश्न आहे ना? मग वाढवून घ्या. हाय काय नाय काय. आता १०० जागा आहेत. ५० राखीव आहेत. ५० खुल्या. तुम्ही आंदोलन करून ह्या २०० करून घ्या, १०० राखीव १०० खुल्या. मग तर कुणाच्या संधी कमी होणार नाहीत ना? तुम्हाला सुरुवातपासून सांगतोय मुद्दा चांगली कॉलेजे कमी असण्याचा आहे त्याचे खापर उगाच आरक्षणावर फोडू नका. ते आरक्षण काही कारणाने दिले आहे. कुणा शेड्युल्ड ट्राइबला दोन जागा दिल्याने दोन ब्राहमणांच्या संधींवर गदा येत असेल तर असु देत. शेकडो वर्षे वारसा हक्काने मोक्याच्या जागा पकडून बसतांना गुणवत्तेचे निकष लावायला जमले नसेल त्याचे पांग आता फेडायची संधी आहे. हे सर्व नको असेल तर तुमच्या लाडक्या संघाला जरा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून जाती मोडायचा धंदा हाती घ्या म्हणावं. लोकांची घरवापसी करण्याआधी आपल्यातले जातीभेद मिटवण्याचा काही ठोस कार्यक्रम राबवा. तेवढं केलं तर सगळंच नीट होऊन जाईल, ते हिंदुत्वाचंही. बघा जमतंय का? रडारडसे कुच्च नै होनेवाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

घसरलात संघावर ?

विटेकर
गुरुवार, 01/21/2016 - 12:32 नवीन
हे सर्व नको असेल तर तुमच्या लाडक्या संघाला जरा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून जाती मोडायचा धंदा हाती घ्या म्हणावं. लोकांची घरवापसी करण्याआधी आपल्यातले जातीभेद मिटवण्याचा काही ठोस कार्यक्रम राबवा. तेवढं केलं तर सगळंच नीट होऊन जाईल, ते हिंदुत्वाचंही. बघा जमतंय का? रडारडसे कुच्च नै होनेवाला..
संदिपसाहेब , काय कारण आहे का संघाला मध्ये घ्यायची ? का उगाच खोडी काढायची ? उचलली जीभ लावली टाळयाला ! तुम्ही कधी गेलाय का संघात ? कधी बघितले आहे का तिथे जातीयवाद आहे की नाही ? कशाच्या आधारावर हे तुम्ही विधान केले ?आणि जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम संघात आहे की नाही याची तुम्ही काय खात्री केली आहे ? मा. संपादक महाशय, काही सदस्याना खोडसाळपणे संघाला मध्ये घेण्याची वाईट सवय आहे, याचा मी एक सामान्य सदस्य म्हणून तीव्र निषेध करतो. कृपया अशा खोडसाळ सदस्यांना मिपापासून दूर करावे तेच आपल्या सार्‍यांच्या हिताचे आहे! आपण योग्य ती कारवाई करावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मा. संपादक महाशय,

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/21/2016 - 12:44 नवीन
मा. संपादक महाशय, काही सदस्याना खोडसाळपणे संघाला मध्ये घेण्याची वाईट सवय आहे, याचा मी एक सामान्य सदस्य म्हणून तीव्र निषेध करतो. कृपया अशा खोडसाळ सदस्यांना मिपापासून दूर करावे तेच आपल्या सार्‍यांच्या हिताचे आहे! आपण योग्य ती कारवाई करावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. अशीच काही लोकांना उठसुठ काँग्रेस मधे आणायची (साधक बाधक दोन्ही) सवय आहे! त्यांना पण काढायला सांगायचे काय?? :P अन म्हणे देशात असहिष्णुता नाही अजिबात! मताचे मटाने खंडन करा की राव, इतके बोलूनही तुम्ही संघ जात्युच्छेदन करायला नेमके काय करतोय ही माहीती तुम्ही शेवटी नाहीच दिली विटेकर साहेब, संघाच्या साधक कार्याबद्दल मला नितांत आदर आहे, पण जर एखाद्याला काही शंका असली तर ती दूर करायचा प्रयत्न न करता फ़क्त एक तुच्छ कटाक्ष टाकून "असं नसतं ते तुला नाही कळणार" म्हणायची रीत फार आधीपासुन संघाच्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या कार्यकर्त्यांस आहे जे माझ्यामते खुद्द गुरूजी किंवा डॉक्टरांना सुद्धा पटले नसते! एकेकाळी मी बालशाखेत स्वतः गेलो होतो महिनाभर फ़क्त वयानुसार असावे त्यापेक्षा जास्त वाचन असल्यामुळे उद्भवलेले प्रश्न विचारल्यावर "सांगितले तितके कर प्रश्न विचारू नको" असे उत्तर मिळणे हा माझा स्वानुभव आहे. अर्थात संघाने काही माझी एस्टेट लुटलेली नाही का माझा संघाशी उभा दावा ही नाही फ़क्त "आम्हीच काय ते देशभक्त उरलेले कचरापट्टी" ही वृत्ती डोक्यात जाते, नथिंग पर्सनल, जे जाणवले अन अनुभवले ते मांडले ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

सोन्याबापु

विटेकर
गुरुवार, 01/21/2016 - 12:55 नवीन
अशीच काही लोकांना उठसुठ काँग्रेस मधे आणायची (साधक बाधक दोन्ही) सवय आहे! त्यांना पण काढायला सांगायचे काय?? :P
त्यांनाही बाहेर जायला जरुर सांगावे.
जर एखाद्याला काही शंका असली तर ती दूर करायचा प्रयत्न न करता फ़क्त एक तुच्छ कटाक्ष टाकून "असं नसतं ते तुला नाही कळणार" म्हणायची रीत फार आधीपासुन संघाच्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या कार्यकर्त्यांस आहे
गुळाची गोडी सांगून कळत नाही , त्यासाठी कितीही शब्दवर्णन केले तरी ते अपुरे आहे , त्याची गोडी चाखल्याशिवाय कळ्त नाही! तुमची खर् चं वेळ द्यायची तयारी असेल आणि पूर्वानुभव टाळून नव्याने जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपण जरुर भेटु या . तुम्हालाच काय सर्वांना ओपन इन्विटेशन आहे! उद्यापासून शाखेत या आणि जाति विच्छेदाचा अनुभव घ्या ! संघाचे काम सर्वेषां अविरोधेषु आहे ! माझा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला व्य नि करत आहे , नककी भेटु या आणि बोलु या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ही बघा एक न्यूज़

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 21:46 नवीन
ही बघा एक न्यूज़ ते गुळ गोडी गोडवा वगैरे ऱ्हेटॉरीक वगैरे ठीक आहे सगळे, अन मी आधीच मेंशन केल्या प्रमाणे चांगले ते चांगले असेलच, पण एक सच्चे कार्यकर्ते गुळाचे पारखी म्हणुन वगैरे आपले काय मत असेल म्हणे ह्या प्रकारवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

ही बघा एक न्यूज़

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 21:46 नवीन
ही बघा एक न्यूज़ ते गुळ गोडी गोडवा वगैरे ऱ्हेटॉरीक वगैरे ठीक आहे सगळे, अन मी आधीच मेंशन केल्या प्रमाणे चांगले ते चांगले असेलच, पण एक सच्चे कार्यकर्ते गुळाचे पारखी म्हणुन वगैरे आपले काय मत असेल म्हणे ह्या प्रकारवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

जे झाले ते वाईट झाले पण …

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 02/05/2016 - 10:54 नवीन
ह्या बातमीत निव्वळ कपड्यांहून कसेकाय ओळखले ते संघवाले आहेत, हे नाही कळल. बाकी संघाच्या कार्यालयासमोर प्रकार झाला असे असेल तर आपला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम

संदीप डांगे
Fri, 01/22/2016 - 15:10 नवीन
जातीभेद मिटवण्याचा कार्यक्रम संघात आहे की नाही याची तुम्ही काय खात्री केली आहे ? नक्क्की काय कार्यक्रम आहे ते सांगाल काय? म्हणजे इतक्या छुप्या पद्धतीने चालणारा आहे की मला माहित नाही. त्याचे अस्तित्व दर्शवणार्‍या काही घटना-विदा आहेत काय? बरे मी संघात जातीयवाद आहे असे म्हटलेच नसतांना आपणास हा शोध कुठून लागला. त्यातूनही संघाचा हिंदुत्वाचा मुद्दा ज्याचा मी उल्लेख केला तो आपण सोयिस्कर डावलला. आपल्या आवडत्या व्यक्ति-संस्थांच्या विरोधात एखादे जरी वाक्य आढळले तरी प्रस्तुत व्यक्ति-संस्थेच्या विरोधात उपलब्ध असलेल्या सर्वच्या सर्व नकारात्मक भावना प्रतिसादकर्त्याच्या ठायी आहेतच असा समज करून हल्ला का होतो? माझे एखाद्याच बाबतीत विरोधी मत नसू शकते का/नसावे का? स्पष्टीकरण देत नाही सहसा पण इथे द्यावे वाटत आहे. संघ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतो. (कि हेही खोटे आहे?) संघाने जर जातीभेद-उच्चाटनावर काम केले तर 'हिंदुसंघटन' जे अपेक्षित आहे ते आपोआप अ‍ॅज ए साइड-इफेक्ट होऊन जाईल. आणि ज्या पद्धतीने संघवाले आपल्या संघटनेच्या प्रेझेंसबद्दल बोलत असतात त्यायोगे ही एक मोठी व समाजात प्रतिष्ठा राखून असलेली संस्था आहे. ह्या संस्थेचे असे कार्य झटपट व विनातक्रार होईल असे वाटते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदुसाठी काम करणारी दुसरी संस्था दिसत नाही. मी संघविरोधी आहे हेही तितके खरे नाही. देशकल्याणासाठी उपयोगात येऊ शकणार्‍या कुठल्याच गोष्टीच्या मी सरसकट विरोधात नसतो. बाकी राहिले खोडसाळ सदस्यांना मिपापासून दूर करण्याच्या तुमच्या विनंतीबद्दल. तर मला ही विनंतीच खोडसाळ वाटते. संघाविरूद्ध चकार काढू नये अशी व्यवस्था आपणास मिपावर राबवायची आहे का? मिपा म्हणजे संघप्रिय लोकांचे नंदनवन असावे असे काही आपल्या मनात आहे काय? किंवा मिपा ही संघाची ऑनलाईन शाखा आहे असे काही घोषित करायचे मनसुबे आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

...पास

विटेकर
Mon, 01/25/2016 - 11:48 नवीन
त्याचे अस्तित्व दर्शवणार्‍या काही घटना-विदा आहेत काय?
चष्मा काढून डोळे उघडून नीट पाहील्यास वेगळा विदा देण्याची आवश्यकता नाही.
संघाने जर जातीभेद-उच्चाटनावर काम केले तर 'हिंदुसंघटन' जे अपेक्षित आहे ते आपोआप अ‍ॅज ए साइड-इफेक्ट होऊन जाईल.
कित्ती कित्ती सोप्प आहे ना ? या संघवाल्याना कसं काय कळत नाही बुवा ? गेल्या ९० वर्षात संघ नेमके हेच करतो आहे, त्यासाठी स्वानुभाव घ्यायला हवा.
माझे एखाद्याच बाबतीत विरोधी मत नसू शकते का/नसावे का?
जरूर असावे पण आपले मत हेटाळणीयुक्त स्वरात मांडणे याला खोड्साळपणा म्हणतात! आपला अनुभव शून्य पण उगाच लांबून दगड मारायचे याची मनस्वी चीड आहे ! रचनात्मक विरोध असेल तर मोस्ट वेलकम! हेटाळणी आणि पूर्वग्रहदूषित मत मांडून उगाच उचकावचे असेल आणि शब्द्च्छल करून शब्दाचे बुडबुडे फोडायचे असेल तर कृपया आपण आपल्या नंदनवनात सुखनैव रहावे, शुभेच्छा !
संघाविरूद्ध चकार काढू नये अशी व्यवस्था आपणास मिपावर राबवायची आहे का? मिपा म्हणजे संघप्रिय लोकांचे नंदनवन असावे असे काही आपल्या मनात आहे काय? किंवा मिपा ही संघाची ऑनलाईन शाखा आहे असे काही घोषित करायचे मनसुबे आहेत काय?
संघाला विरोधाची इतकी सवय आहे की असली एखादी व्यवस्था राबवून काही करावे याची अजिबात आवश्यकता नाही. आणि असे करता येईल असे आपल्याला वाटत असेल तर आपला मिपा व्यवस्थापन आणि संपादक मंडळ यांच्यावर आपला विश्वास नाही असे स्पष्ट होते ,नाही का ? याउप्पर , तुमची खरोखरच जाणून घ्यायची इच्छा असेल तर जे वरती सोन्याबापूना सांगितले तेच तुम्हाला आणि इतर सर्व विरोधकांना आवाहन आहे , शाखेत या आणि अनुभव घ्या. यू आर मोस्ट वेलकम. साप - साप म्हणून भुई धोपटणे आता ९० वर्षानंतर थांबवा ! माझ्याकडून ह विषय आता थांबवण्यात आला आहे,या वादापेक्षा माझा वेळ अधिक सत्कारणी लागू शकेल असे मला प्रामाणिकपणाने वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण

संदीप डांगे
Mon, 01/25/2016 - 12:22 नवीन
माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा होती. आमची तेवढी पात्रता नसेल म्हणून तुम्ही उत्तर दिले नसेल बहुतेक. काही संघवाले मित्र आहेत. त्यांचे विचार बघता संघ म्हणजे काय हे समजण्यासाठी शाखेत गेलेच पाहिजे ह्याची आवश्यकता नाही. नेमका प्रश्न विचारल्यावर मूळ मुद्द्याला सोयिस्कर बगल देणे व 'संघविरोध होतो' ह्याबद्दलच रडारड करणे संघवाल्यांनी आता थांबवायला पाहिजे. आणि तुमच्यातर्फे विषय थांबवण्याबद्दल असे की आपण तिरीमिरीत प्रतिसाद दिला नसता तर पुढे काही घडले नसते. दोघांचाही वेळ आधीच वाचला असता. आता मुद्देसूद बोलायची वेळ आली तर आपण पळ काढताय असे वाटत आहे. फक्त संघा'विरूद्ध' कुणी टिप्पणी करु नये अशा अर्थाचे विचार मांडून पण संघाची बाजू न मांडता विषय थांबवतो असे जाहिर करणे पटत नाही. बाकी तुमची मर्जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

डांगे ब्वा ले +१

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 01/25/2016 - 13:44 नवीन
डांगे ब्वा ले +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बाकी चालु द्यात पण उद्या

मृत्युन्जय
Tue, 02/02/2016 - 22:20 नवीन
बाकी चालु द्यात पण उद्या अमेरिकेत भूकंप झाला तर त्यातही तुम्ही संघाला मध्ये आणाला. विषय काय बोलताय काय? आणि इतरांना मुद्देसूद बोलायला सांगताय म्हणजे धन्य आहे.बा की चालू द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आयला हो की. संघाचा आणि

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 23:18 नवीन
आयला हो की. संघाचा आणि आरक्षणाचा खरंच काही संबंध नै, सॉरी काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

इत्स ओके कोम्रेद

मृत्युन्जय
Wed, 02/03/2016 - 12:01 नवीन
इत्स ओके कोम्रेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

याउप्पर , तुमची खरोखरच जाणून

श्रीगुरुजी
Tue, 01/26/2016 - 13:16 नवीन
याउप्पर , तुमची खरोखरच जाणून घ्यायची इच्छा असेल तर जे वरती सोन्याबापूना सांगितले तेच तुम्हाला आणि इतर सर्व विरोधकांना आवाहन आहे , शाखेत या आणि अनुभव घ्या. यू आर मोस्ट वेलकम. साप - साप म्हणून भुई धोपटणे आता ९० वर्षानंतर थांबवा !
विटेकर साहेब, उत्तम प्रतिसाद! संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. संघाचा वैयक्तिक अनुभव असल्याने वर लिहिलेले अनुभवलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

उगाच आपला एक हायपोथेटिकल प्रश्न!

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 02/05/2016 - 10:56 नवीन
उद्या संघाने जाती निर्मूलनाचा कार्यक्रम अग्रभागी ठेवला तर मदत करायला आपण संघात जाणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कार्यक्रम काय आहे हेच कळले

संदीप डांगे
Fri, 02/05/2016 - 11:43 नवीन
कार्यक्रम काय आहे हेच कळले नाही अजून. तो कळवण्याची तसदी न घेता लोक इतर अनेक गोष्टी बोलत आहेत. तुमच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

आता १०० जागा आहेत. ५० राखीव

श्रीगुरुजी
Fri, 01/22/2016 - 14:14 नवीन
आता १०० जागा आहेत. ५० राखीव आहेत. ५० खुल्या. तुम्ही आंदोलन करून ह्या २०० करून घ्या, १०० राखीव १०० खुल्या. मग तर कुणाच्या संधी कमी होणार नाहीत ना?
हे म्हणजे आजारापेक्षा उपचार हानिकारक असा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नक्की आजार काय आहे हो? खरंच

संदीप डांगे
Fri, 01/22/2016 - 15:09 नवीन
नक्की आजार काय आहे हो? खरंच नाही समजले. आज हजारो कॉलेजेसपैकी ५० चांगली आहेत तर त्यांची संख्या २००-३०० पर्यंत न्यावी हा प्रकार आपणास हानीकारक वाटतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

थोडक्यात हुक्लात

वॉल्टर व्हाईट
Tue, 02/02/2016 - 15:53 नवीन
शेकडो वर्षे वारसा हक्काने मोक्याच्या जागा पकडून बसतांना गुणवत्तेचे निकष लावायला जमले नसेल त्याचे पांग आता फेडायची संधी आहे.
अगदी फक्त हे वाक्य नसते टाकले तर जमून आले होते सगळे, पण बोललात ना शेवटी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्या वाक्याचा उगम

संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 16:24 नवीन
त्या वाक्याचा उगम प्रतिपक्षाच्या भूमिकेत आहे. माझे वैयक्तिक मत नव्हे. अधिक माहिती हवी असेल तर कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट

टॉपच्या कॉलेजमधे राखीवमध्ये

श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 23:41 नवीन
टॉपच्या कॉलेजमधे राखीवमध्ये अगदी कुणी पस्तीस टक्क्यावाला घेतला जात नसेल.
काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्यांचे सीईटीचे गुण पाहण्याचा योग आला होता. खुल्या वर्गासाठी २०० पैकी १६० च्या पेक्षा कमी गुण मिळालेल्यांना प्रवेश नव्हता. परंतु आरक्षणातून आलेल्या अनेकांना २ आकडी गुण होते. अगदी ६८ गुण मिळालेल्यांना सुद्धा प्रवेश मिळालेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यामुळे खुल्या वर्गातील १५९

श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 23:43 नवीन
त्यामुळे खुल्या वर्गातील १५९ पर्यंत गुण मिळविलेल्या अनेकांची संधी हुकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खुल्या वर्गासाठी २०० पैकी १६०

अन्नू
गुरुवार, 01/21/2016 - 12:36 नवीन
खुल्या वर्गासाठी २०० पैकी १६० च्या पेक्षा कमी गुण मिळालेल्यांना प्रवेश नव्हता. परंतु आरक्षणातून आलेल्या अनेकांना २ आकडी गुण होते. अगदी ६८ गुण मिळालेल्यांना सुद्धा प्रवेश मिळालेला होता.
मी तरी आत्तापर्यंत इतकी तफावत बघितली नाही, नक्की ते आडमिशनच्या (प्रामाणिक) प्रोसेसमधूनच आले होते का? नाही म्हणजे- काही कॉलेजांचा राखीव कोटाही असतो, ज्यात ते फक्त ओळखीनेच सीट्स घेतात. हा! ओळखीवरुन आठवलं, आत्ताच मागल्या वर्षी पार्ल्याच्या कॉलेजमध्ये एक कास्टवाली मुलगी मार्कस कमी असल्यामुळे एका राजकीय अधिकार्‍याचे शिफारसपत्र घेऊन आली होती अ‍ॅडमिशनसाठी, ते न बघताच गेटवरच्या माणसाने आमच्यादेखत ते पत्र टराटर फाडून तिच्याच हातात दिलं होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/21/2016 - 13:17 नवीन
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका चांगल्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ३० जागा होत्या. त्यातील १० राखीव होत्या (मंडल आयोगापूर्वीची गोष्ट आहे). १२ वी ला ६०० पैकी जे गुण मिळतात यावर आधारीत प्रवेश होता. खुल्या वर्गातून प्रवेश मिळालेल्या शेवटच्या २० व्या मुलाचे गुण होते ४५४/६०० (७५.६६%). उर्वरीत १० राखीव जागातून प्रवेश मिळालेल्या सर्वांना ४०० पेक्षा कमी गुण होते व यादीतील शेवटच्या मुलाला ३२८/६०० (५४.६६%) इतके गुण होते. ही तफावत २१% इतकी मोठी आहे. ६०० पैकी ४३४, ४२९ इ. गुण मिळालेल्या सवर्ण मुलांना जातीमुळे तिथे प्रवेश मिळाला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

या टक्केवारीवरुन शाळेतला एक

अन्नू
Fri, 01/22/2016 - 10:32 नवीन
या टक्केवारीवरुन शाळेतला एक किस्सा आठवला. मी ९वीला असताना- दहाविला अनिता नावाची मुलगी होती. ती पहिल्यापासूनच फटकळ स्वभावाची होती. तिच्या श्रीमंत (आणि सवर्ण) घराण्यामुळे ती तशी वागत होती कि काय हे आंम्हाला त्यावेळी कळत नव्हते. पण शिक्षकांबद्दलही ती अशाच उर्मट स्वभावाने वागत होती. बीजगणितच्या शिक्षकाला तर तिने गणित चुकल्यामुळे सरळ- "सर- शिकवायला येत नसलं तर घरी बसा!" असं स्पष्टपणे तोंडावर सुनावलं होतं! हळूहळू तिच्या स्वभावाचं कारण आंम्हाला समजलं ते असं- कि ती सगळ्या वर्गात नव्हे दहावीच्या पुर्ण बॅचमध्ये हुशार मुलगी होती, त्यामुळे साहजिकच तिच्या स्वभावात तो तिरसटपणा आला होता. आश्चर्य हे कि आमच्या पुर्ण शाळेमध्ये एकानेही तिला शाळेत अभ्यास करताना बघितलेलं नव्हतं, घरात अभ्यास करत असेल तर घरातही ती कधी पुस्तकाला हात लावत नव्हती. तिचा जास्तीत जात वेळ हा खेळण्यात आणि इकडे तिकडे मैत्रिणीबरोबर भटकण्यातच जात होता. बाहेर लावलेल्या ट्युशनलाही ती रमत-गमत अर्धा तास लेट जात होती! याच्याच उलट अनिल होता. तिच्याच क्लासमध्ये तो शिकत होता. दिवसरात्र एक करुन तो दहावीच्या परिक्षेची तयारी करत होता. सगळ्या शाळेत त्याची चर्चा आंम्ही ऐकली होती. फक्त चार तास झोप आणि बाकिचा वेळ अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. त्याचे घर म्हणजे खुराड्याची जागा शोभेल असे होते, त्यातच पाच-सात शेळ्या-मेंढ्या आणि कोंबड्या कोंबून ठेवल्या होत्या. घरात लाईट नाही कि अभ्यासाला नीट जागा नाही अशी त्याची अवस्था होती. तरीही तो जिद्दीनं घरातली कामं करुन अभ्यास करत होता. या दोघांमध्ये एकच कॉमन गोष्ट होती. दोघांच्या वडीलांचे नाव आणि आडनाव सेम होते. हा योगायोग होता कि काय माहीत नाही, पण ते एक आश्चर्यच होते. बाकी दोघांच्या स्वभावात आणि वर्णात काडीचीही समानता नव्हती. शिक्षकांसह आंम्हालाही वाटत होते कि दहावीच्या परिक्षेत सुनिलच बाजी मारणार, पण निकाल लागला आणि अगदी आंम्हा सगळ्यांनाच धक्का बसला- सुनिल ९०% मार्क्स मिळवून पास झाला होता; तर कधीही अभ्यास न करणारी अनिता ९८% पाडून शाळेतच नव्हे तर पुर्ण बोर्डात पहिली आली होती! याचा अर्थ सुनिलने त्यावेळी कमी अभ्यास केला होता- असा होतो का? खरं म्हणजे परिस्थितीचा विचार करता ९०% हे अनिलच्या हिशेबाने हायेस्ट मार्क्स होते. तर अनिताचे मार्क्स तिच्या परिस्थितीचा विचार करता अगदी नॉर्मल होते. यावरुन आपण फक्त पेपरावरची मार्क्स कम्पेर करुन किती एकांगी विचार करतो ते दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कधीही अभ्यास न करणारी अनिता

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 02/05/2016 - 11:01 नवीन
कधीही अभ्यास न करणारी अनिता ९८% पाडून शाळेतच नव्हे तर पुर्ण बोर्डात पहिली आली होती! याचा अर्थ सुनिलने त्यावेळी कमी अभ्यास केला होता- असा होतो का? खरं म्हणजे परिस्थितीचा विचार करता ९०% हे अनिलच्या हिशेबाने हायेस्ट मार्क्स होते. तर अनिताचे मार्क्स तिच्या परिस्थितीचा विचार करता अगदी नॉर्मल होते. >> निव्वळ श्रीमंत (आणि सवर्ण) असल्याने ९८% मार्क्स केवळ परिस्थितीमुळे मिळतात हे, नवीनच उमगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

..

मोगा
Mon, 01/25/2016 - 13:32 नवीन
धनदांडग्यांसाठी असलेल्या पेमेंट सीटबाबतही हेच होते ना ? ते चालते , आरक्षण का चालत नाही? शिवाय ओपन काय आणि आरक्षण काय , डिग्रे पास होण्याची परिक्षा सारखीच असते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्यांचे पोटात दुखते त्यांना

संदीप डांगे
Mon, 01/25/2016 - 13:50 नवीन
ज्यांचे पोटात दुखते त्यांना हा मुद्दा कद्दीच दिसत नसतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा