प्रतिसाद, वाद वगैरे....

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
6 Oct 2015 - 6:11 pm

साद आहे घातली, प्रतिसाद द्यावा नेमका
नाही तर जा उडत तुम्ही , मीही आहे खम्मका…

अतृप्त नाही , चिमण नाही, ना जयंत, अनाहिता
मोजक्याच प्रतिक्रियांना मग करू मी ब्लेम का ?

कट्ट्यास जाऊ, ग्रुप करू मार्ग साधा सरळसा
ही रीत पाळायास आहे बोल तुजला टैम का ?

नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी
बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का?

सोड वाद विवाद तू अन शांत चित्ते ऱ्हा इथे
सेम या मिपावरी तुझे नि माझे प्रेम का?

डिस्क्लेमर - या कवितेचा आणि मात्रा व्रुत्ताचा वगैरे काहीही संबंध नाही . खम्मका या शब्दात कसा ठसका ठासून भरला आहे.
तसेच कवितेत वापरलेल्या आयडी फक्त शब्दास शब्द म्हणून घेतल्या आहेत . निव्वळ गम्मत म्हणून त्याकडे पाहावे .

gajhalकविता

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 6:16 pm | मांत्रिक

:)

नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी
बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का?

पण माझ्याच धाग्याचा गेम झालाय खरा!!! इतकं अवांतर कुठलाच धागा भरकटला नसेल. एकाही प्रतिसादातून कौतुक तर सोडाच पण काही उपयुक्त चर्चाही नाही.

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 6:34 pm | जव्हेरगंज

Crying Laughter

एकाही प्रतिसादातून कौतुक तर सोडाच पण काही उपयुक्त चर्चाही नाही.

या आधीही मी हे वाचले. तुम्हांला अध्यात्म, देवीमहात्म्य मिपाकरांना समजावून द्यायचे होते की तुमची स्तुती, वा, वा चान चान हे ऐकायचे होते? अध्यात्मामध्ये रंगून जायचे असले तर आधी 'मी' पणा सोडावा असे म्हणतात ना? त्याचे काय झाले?

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 7:14 pm | मांत्रिक

अहो ताई गंमतीत बोलतोय. समजून घ्या की जरा.
स्माईली टाकलेली दिसत्ये नं. थोडासा स्वतःच्याच थट्टेचा प्रकार आहे.
आणि कौतुकचा अर्थ केवळ, मी लिहिलंय तो अनुवाद बरोबर की चूक याच अर्थाने वापरलाय. त्या धाग्यावर माझ्या सर्व प्रतिसादात तोच सूर आहे.

यशोधरा's picture

6 Oct 2015 - 7:20 pm | यशोधरा

ताणली जातेय गंम्मत. :)

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 7:24 pm | मांत्रिक

आता एवढा खुलासा करुन परत तेच! जाऊ देत.
__/\__

बॅटमॅन's picture

6 Oct 2015 - 7:05 pm | बॅटमॅन

इतकं अवांतर कुठलाच धागा भरकटला नसेल.

नया है यह. यांना कोणीतरी काश्मीरमधली इंचाइंचाने घेतलेली माघार आणि वधुवर या धाग्यांची लिंक द्या जरा.

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2015 - 9:35 pm | टवाळ कार्टा

मुंगी मारायला डायनोसॉर????

जव्हेरगंज's picture

6 Oct 2015 - 9:38 pm | जव्हेरगंज

हाण्ण्ण्ण त्येज्यायला

नाखु's picture

7 Oct 2015 - 11:14 am | नाखु

भरकटणे या विषयावर व्याख्यान देण्यात येणार आहे येत्या कट्ट्यात .वक्त्यांची नावे बॅटमण घोषीत करतील.

भर (धाग्यावरून) कटलेला नाखु.

बॅटमॅन's picture

7 Oct 2015 - 8:15 pm | बॅटमॅन

वो मुंगी है करके तेर्कु मालूम मेर्कु मालूम, उस्कु मालूम क्या? उस्कु मालूम नै बोल्केइच बोलरा मै के लिंक दे देव उस्कू.

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा

हाव रें....सई बोल्तां मियां

नीलमोहर's picture

7 Oct 2015 - 10:22 am | नीलमोहर

'काश्मीरमधली इंचाइंचाने घेतलेली माघार आणि वधुवर या धाग्यांची लिंक'

- कोणीतरी लिंक द्या प्लीज.

श्रीरंग_जोशी's picture

8 Oct 2015 - 7:28 am | श्रीरंग_जोशी

मिपावरच्या ऐतिहासिक काश्मीरच्या धाग्याची लिंक द्यावी लागते. मला त्याचा नोड क्र. बेशुद्धावस्थेतही विचारला तरीही अचुकपणे सांगीन - १३५००.

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

दमामि's picture

7 Oct 2015 - 10:32 am | दमामि

मास्तरांचा लेख का?

अभ्या..'s picture

6 Oct 2015 - 6:36 pm | अभ्या..

हाण्ण्ण्ण त्येज्यायला

असंका's picture

6 Oct 2015 - 7:05 pm | असंका

अरे वा! सुंदर!

धन्यवाद!

दमामि's picture

7 Oct 2015 - 9:52 am | दमामि

:)

समीर_happy go lucky's picture

6 Oct 2015 - 11:04 pm | समीर_happy go lucky

बाकी काहीही असो पण कविता अप्रतिम!!!!

ते "बाकी काहिही" च महत्वाचे.;) असो, धन्यवाद!

असंका's picture

7 Oct 2015 - 11:04 am | असंका

सोडू नका मुद्दा!
:-))

दत्ता जोशी's picture

7 Oct 2015 - 10:11 am | दत्ता जोशी

वैचारिक प्रबोधनपर. माउलींच्या हरिपाठ आणि समर्थांच्या मनाच्या श्लोकानंतर इतकी सुंदर रचना पाहिली नव्हती.

दमामि's picture

7 Oct 2015 - 10:33 am | दमामि

धन्यवाद!:):):)

खटपट्या's picture

7 Oct 2015 - 10:56 am | खटपट्या

चांगलंय

मित्रहो's picture

7 Oct 2015 - 8:08 pm | मित्रहो

कविता

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2015 - 8:54 pm | अत्रुप्त आत्मा

पांडु मोड़ ऑन

असं झालं तर ते सगळं!

पांडु मोड़ ऑफ

उचक्या लागत असतील स्पावड्याला रोज.
.
बुवा एवढी आठवण दुसर्‍या कोणाची काढली असती तर.......................................
जौ दे. उगी आगोबा पिडायचा. ;)

टवाळ कार्टा's picture

8 Oct 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा

असे नक्को बोलू रे....बुवांना पण प्रश्न यायचा "तुम्ही जोडी का?" =))