Skip to main content

प्रतिसाद, वाद वगैरे....

लेखक दमामि यांनी मंगळवार, 06/10/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
साद आहे घातली, प्रतिसाद द्यावा नेमका नाही तर जा उडत तुम्ही , मीही आहे खम्मका… अतृप्त नाही , चिमण नाही, ना जयंत, अनाहिता मोजक्याच प्रतिक्रियांना मग करू मी ब्लेम का ? कट्ट्यास जाऊ, ग्रुप करू मार्ग साधा सरळसा ही रीत पाळायास आहे बोल तुजला टैम का ? नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का? सोड वाद विवाद तू अन शांत चित्ते ऱ्हा इथे सेम या मिपावरी तुझे नि माझे प्रेम का? डिस्क्लेमर - या कवितेचा आणि मात्रा व्रुत्ताचा वगैरे काहीही संबंध नाही . खम्मका या शब्दात कसा ठसका ठासून भरला आहे. तसेच कवितेत वापरलेल्या आयडी फक्त शब्दास शब्द म्हणून घेतल्या आहेत . निव्वळ गम्मत म्हणून त्याकडे पाहावे .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6455
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

:)
नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का?
पण माझ्याच धाग्याचा गेम झालाय खरा!!! इतकं अवांतर कुठलाच धागा भरकटला नसेल. एकाही प्रतिसादातून कौतुक तर सोडाच पण काही उपयुक्त चर्चाही नाही.

In reply to by मांत्रिक

Crying Laughter

In reply to by मांत्रिक

एकाही प्रतिसादातून कौतुक तर सोडाच पण काही उपयुक्त चर्चाही नाही.
या आधीही मी हे वाचले. तुम्हांला अध्यात्म, देवीमहात्म्य मिपाकरांना समजावून द्यायचे होते की तुमची स्तुती, वा, वा चान चान हे ऐकायचे होते? अध्यात्मामध्ये रंगून जायचे असले तर आधी 'मी' पणा सोडावा असे म्हणतात ना? त्याचे काय झाले?

In reply to by यशोधरा

अहो ताई गंमतीत बोलतोय. समजून घ्या की जरा. स्माईली टाकलेली दिसत्ये नं. थोडासा स्वतःच्याच थट्टेचा प्रकार आहे. आणि कौतुकचा अर्थ केवळ, मी लिहिलंय तो अनुवाद बरोबर की चूक याच अर्थाने वापरलाय. त्या धाग्यावर माझ्या सर्व प्रतिसादात तोच सूर आहे.

In reply to by मांत्रिक

इतकं अवांतर कुठलाच धागा भरकटला नसेल.
नया है यह. यांना कोणीतरी काश्मीरमधली इंचाइंचाने घेतलेली माघार आणि वधुवर या धाग्यांची लिंक द्या जरा.

In reply to by जव्हेरगंज

भरकटणे या विषयावर व्याख्यान देण्यात येणार आहे येत्या कट्ट्यात .वक्त्यांची नावे बॅटमण घोषीत करतील. भर (धाग्यावरून) कटलेला नाखु.

In reply to by टवाळ कार्टा

वो मुंगी है करके तेर्कु मालूम मेर्कु मालूम, उस्कु मालूम क्या? उस्कु मालूम नै बोल्केइच बोलरा मै के लिंक दे देव उस्कू.

In reply to by बॅटमॅन

'काश्मीरमधली इंचाइंचाने घेतलेली माघार आणि वधुवर या धाग्यांची लिंक' - कोणीतरी लिंक द्या प्लीज.

In reply to by नीलमोहर

मिपावरच्या ऐतिहासिक काश्मीरच्या धाग्याची लिंक द्यावी लागते. मला त्याचा नोड क्र. बेशुद्धावस्थेतही विचारला तरीही अचुकपणे सांगीन - १३५००. वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

वैचारिक प्रबोधनपर. माउलींच्या हरिपाठ आणि समर्थांच्या मनाच्या श्लोकानंतर इतकी सुंदर रचना पाहिली नव्हती.

पांडु मोड़ ऑन असं झालं तर ते सगळं! पांडु मोड़ ऑफ

In reply to by अत्रुप्त आत्मा

उचक्या लागत असतील स्पावड्याला रोज. . बुवा एवढी आठवण दुसर्‍या कोणाची काढली असती तर....................................... जौ दे. उगी आगोबा पिडायचा. ;)