(इच्छामटण)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
8 Sep 2015 - 4:45 pm

इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.

चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.

हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.

विडंबनविनोदमाहिती

प्रतिक्रिया

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Sep 2015 - 1:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

तसे भरपूर रेफ़रन्स काढता येईल … कोणास कोणते मास द्यावे … बैल कधी कापावा गाय कोणती अन कधी कापावी … बकरी कोणती खावी
वगैरे वगैरे …

भीष्मांनी ८४ प्रकारचे प्राणी खाण्यायोग्य सांगितले आहेत! सो बिनधास्त खावा.

बॅटमॅन's picture

9 Sep 2015 - 1:43 pm | बॅटमॅन

येस सरजी, याज्ञवल्क्यांचा आहे बहुधा, नीट आठवत नाही. जरा बघून सांगतो.

नक्की आठवणारे रेफरन्सेस म्ह.

१. वसिष्ठ ऋषी जनक राजाकडे आले असता त्यांच्यासाठी गोमांस शिजवण्यात आले. संदर्भ: उत्तररामचरित.

२. कुठल्या प्रकारचा नैवेद्य पितरांना दिला तर ते किती दिवस संतुष्ट राहतात याचे एक कोष्टक महाभारतात दिलेले आहे, त्यातच बीफचाही उल्लेख आहे. नक्की पर्व आणि अध्याय क्रमांकासाठी प्रचेतस ऊर्फ वल्ली यांना संपर्क करावा लागेल.

हे झाले बीफबद्दल. त्याबद्दल अजूनही बरेच उल्लेख आहेत. नुस्त्या मांसाहाराबद्दल बघायचे तर ढिगाने उल्लेख आहेत. श्राद्धानिमित्त शिजवलेल्या मांसाला नाकारणारा ब्राह्मण हा खरा ब्राह्मणच नव्हे असेही उल्लेख आहेत, बहुधा गृह्यसूत्रांमध्ये.

इतके असून सध्या ब्राह्मण हा वारसा नाकारतात आणि नाके मुरडतात हे अतिरोचक आहे. मांस खाऊन आपल्या धर्माची परंपराच आपण पुढे चालवतो आहोत हे त्या मूर्खांच्या गावीच नसते. अगदी कलियुगातले उदाहरण बघायचे झाले तर बंगालमधील ब्राह्मण परंपरेने चिकन-मटन-मासे सगळेच खातात. ते या अडाण्यांना माहिती तरी असते की नाही कुणास ठाऊक?

(शाकाहारी दहशतवादाचा कट्टर मांसाहारी शत्रू) बॅटमॅन.

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 2:06 pm | प्यारे१

(किमान महाराष्ट्रात) ब्राह्मणांनी मांस खाऊ नये असं बंधन कधीपासून सुरु झालं?
बहुतेक संपूर्ण भारतात काही विशिष्ट जातींनी मांसाहार करु नये असं कधीपासून सुरु झालं?

बाकी लोकांना मूर्ख म्हणण्यापेक्षा अडाणी म्हणणं काही अंशी योग्य. माहिती नसते. घरात परंपरागत हे खायचं नाही ते खायचं नाही असंच सांगितलं जात असतं. कारण? आपल्यात खात नाहीत. यापलिकडं उत्तर नसतं. आजूबाजूचा गोतावळा अशाच मानसिकतेमधला, मित्रांची आडनावं विचारुन मैत्री करायला परवानगी या सगळ्यात एका मर्यादित वर्तुळापलिकडं जाणं होत नाही, वाचायला मिळत नाही, मिळालं तरी स्वीकारण्याची मानसिकता आणि त्याहून जास्त गरज वाटत नाही.

महाराष्ट्राचं माहिती नाही. बघावं लागेल. बाकी महाराष्ट्रातही सारस्वत ब्राह्मण हे पारंपरिकरीत्या मांसाहार करतात. बाकीचे त्यांना 'आपल्यातले' मानत नसले म्हणून काय झाले.

पूर्ण भारताचं बघायचं तर जैन-बौद्ध धर्मप्रसारानंतर हे जरा जास्त सुरू झाले असे दिसते. त्याआधी तितके दिसत नाही. त्यानंतरही हा प्रकार हळू हळूच वाढत गेला. इ.स. १ ते १००० पर्यंतचे उल्लेख चाळून पाहिले पाहिजेत नेमकेपणासाठी. तरी मजा म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज वगैरे काही मांसाहारी ब्राह्मण पोटजाती अजूनही टिकून राहिल्या हे विशेष.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 2:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन भाऊ!!!

कान्यकुब्ज अन शरयुपारीन ब्राह्मण म्हणजे यूपी मधले ब्राह्मण कट्टर शाकाहारी असतात, माझ्या माहिती प्रमाणे मांसाहार करणारे ब्राह्मण म्हणजे शाक्त परंपरेतले कश्मीरी, मैथिल अन बंगाली ब्राह्मण हे होत

कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले होते खरे. सोर्स चेक करावा लागेल.

बाकी मैथिली अन बंगाली तर आहेतच, काश्मिरीही त्यांतच आले. मैथिली ब्राह्मण पारंपरिकरीत्या कासव खातात हेही एका मैथिली गृहस्थाकडूनच ऐकले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 2:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

"जो दिन मछली मिले खा लो एकादशी बारबार आती रहेगी"

ही म्हण आहे मैथिल समाजात! घ्या समजून काय ते!!

कान्यकुब्ज कन्फर्म नाहीत खात, महा कट्टर ब्राह्मण असतात इतकेच काय तर ते शरयुपारीन ब्राह्मणवृंदास हलके समजतात त्याचे एक्सप्लेनेशन असे की "रामजी जब अयोध्या वापस आये तो उन्होंने एक भोज रखा था जिसमे शरयुपारीन गधे चले गये जबकी रामजी ने एक ब्राह्मण (रावण) का वध किया था, और कान्यकुब्ज कभी भी ब्रह्महत्यारे का भोज नहीं खाते है" इतके कट्टर मिळाले होते.

आमच्या इथे एक झा म्हणून आहेत. मैथिली ब्राह्मण.
नुकतंच बोलणं झालं. म्हणे आमच्यात बघत पण नाहीत मांसाहाराकडं.

काही लोक मासे खातात बंगाल कडचे, चिकन नाही.

बॅटमॅन's picture

9 Sep 2015 - 2:54 pm | बॅटमॅन

चिकनही खातात. प्युअर व्हेजिटेर्यन जेवणाला काहीजण तुच्छतेने "ब्राह्मनेर बिधोबा" अर्थात ब्राह्मण विधवेचे जेवण असेही म्हणत असल्याचे ऐकले आहे.

बंगाली ब्राह्मणांमध्ये खातात पण अल्लोवेद ;) नाही.
मासे अल्लोवेद आहेत.

काय सांगता राव, अल्लोवेद आहे. माझाच अनुभव सांगतो, एका 'बॅनर्जी' कडून मला मुंज अटेंड करायचे आमंत्रण होते. जेवणाचा मेनू काय होता माहितेय? जिलेबी, रसगुल्ला हे स्वीट, एखाहदुसरी भाजी, डाळ, भात, मासे आणि मटण. =)) बर ते लोक कै एकदम हायफाय अन प्रोग्रेसिव्ह वगैरे आजिबात नव्हते. साधे सरळ मध्यमवर्गीय होते. ही गोष्ट आहे २०१० ची.

आपल्याकडे काय रिअ‍ॅक्शन असेल मुंजीत मटन होते म्हटल्यावर? =)) =)) =))

आता म्हणाल मटण अल्लोवेद आहे पण चिकन नाही, तर २०१४ साली एका लग्नानिमित्त परत कोलकात्यास जाणे झाले तेव्हा लग्नात चिकनही होते. अर्थात ते लग्न ब्राह्मणी नव्हते हा भाग अलाहिदा. पण अल्लोवेद आहे यात सौंशयच नाय.

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 3:09 pm | प्यारे१

>>> मुंजीत मटन
खिक्क.
मुंजी चं निमंत्रण ३/४ घालून दिल्यावरचा एक धागा नि गदारोळ आठवला. मटन असल्यावर काय होईल कुणाला माहिति.
(सूड असाच ३/४ घालून शिवथर घळीत आल्यावर तिथले सेवेकरी चिडले होते.)

कुणी बैरागी लंगोट घालून आलेला चालेल का हो त्यांना? नै म्हणजे विचारलं आपलं.

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2015 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले

कुणी बैरागी लंगोट घालून आलेला चालेल का हो त्यांना?

मलाही ह्या प्रश्नाच्या उत्तराची फार प्रतिक्षा आहे ....
मला एकदा खरेच लंगोट घालुन जायचे आहे हो तिथे !

आय विल गिव्ह यु कंपनी!! सपाट झालेलं पोट दाखवायला तसाही एक स्विमिंग पूल वगळता कुठे चान्स मिळत नाही. ;)

बॅटमॅन's picture

9 Sep 2015 - 3:23 pm | बॅटमॅन

मीही येतो. सुटलेलं पोट पाहून ऑथेंटिक बैरागी असल्याची खात्री वाटेल.

चालेल चालेल, आणखी कोणी येतंय का विचारू म्हणतो. होऊन जाऊ देत एक लंगोट कट्टा शिवथरघळीत!! =))

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 3:26 pm | प्यारे१

अरे नका रे!

बॅटमॅन's picture

9 Sep 2015 - 3:27 pm | बॅटमॅन

जयजय रघुवीर समर्थ!!!!

फक्त लंगोटवाल्यांचे फोटो तेवढे नका टाकू म्हणजे झाले =))

टाकू द्या की!! धार्मिक उद्देश आहे की नै आपला? ;)

बॅटमॅन's picture

9 Sep 2015 - 3:34 pm | बॅटमॅन

हा हा हा, मग ठीके ;)

ह्मग काय तर !! होऊ द्या खर्च, लंगोट आहे घरचं!! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Sep 2015 - 7:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शिवथरघळ लंगोट कट्ट्यास शुभेच्छा. फोटो टाकु नये हि संपादकिय विनंती =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 7:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही उगाच घाबरता बोवा संपादक साहेब!! अहो सरळ आहे समस्त मिपारत्न गुणी बाळे तिथे लंगोटावर जाता क्यामेरा अन फोन ठेवतील कुठे गुलाम!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Sep 2015 - 7:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काय भरवसा नाही. लंगोटावर जातील आणि जाताना व्यावसायिक फोटोग्राफर नेतील. ;)

अगदी, मिपावरचे कोणी फोटोकार आले तरी चालू शकेल...म्हणजे शोधाशोध करायला नको.

त्यात काय बापूसाहेब, कुबडी नेऊ की, कुबडी कम सेल्फिस्टिक कम पडशी अडकवणे या सगळ्याच कामी येईल. =))

ही विनंती साहित्य संपादकीय की असाहित्य संपादकीय!! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Sep 2015 - 8:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

संपादकियचं आहे रे. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

बस आता. नाहीतर घळ घळ करता करता कडेलोट होईल पानावरून =))

अद्द्या's picture

11 Sep 2015 - 12:51 pm | अद्द्या

एक वाक्य लक्षात ठेवा

सूड राव . आहे न लक्ष ?

फोटू नाय तर कट्टा नाय .

मग तो लंगोट कट्टा असला तरीही

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2015 - 4:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

चिकन कोरिबाऊची का कायस नाव ऐकले होते मी बंगाली लग्नात असते ते फेमस

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2015 - 3:03 pm | प्रसाद गोडबोले

पण मटणाच्या चर्चेवर मासे खाण्याची चर्चा हा मटणाचा अपमान आहे !

आणि माश्यांचाही !!

बॅटमॅन's picture

9 Sep 2015 - 3:05 pm | बॅटमॅन

सहमत!!!!

(हिलसापेक्षाही भेटकीप्रेमी) बॅटमॅन.

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2015 - 3:07 pm | प्रसाद गोडबोले

मासे खाण्यासाठी आता एकदा कर्देबीच- हर्णेबंदर ची ट्रीप करु ~ खुप लोकांकडुन ह्या ठिकाणांचे नाव ऐकुन आहे !

येस्स्सार!!!! लैच नाव ऐकलेय.

खाद्यभक्तीसकट दशविधा भक्ती झालीच पाहिजे!

कपिलमुनी's picture

9 Sep 2015 - 3:15 pm | कपिलमुनी

तिकडेच चांगल्या प्रतीचे आणि चवीचे मासे मिळतात .
अलिबाग - मुंबै म्हणजे अगदी ह्ये !

एस's picture

9 Sep 2015 - 3:19 pm | एस

अरारारा! दीडशे रुपयांत सहा मोठाले पापलेट असलेली टोपली आठवली. तिथला माशांचा लिलावही बघाच. हर्ण्याला मासे असे बंदरावर वाट्याने घ्यायचे आणि कर्ड्याला येऊन बनवून घ्यायचे. स्वर्ग!

उगा काहितरीच's picture

10 Sep 2015 - 1:19 am | उगा काहितरीच

येस्स सर लै स्वस्त अन चांगले मासे मिळतात .
-तिथे जाऊन पण मासे नाय खाल्लेला अभागी :'(

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 3:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

भैयाजी हमर एक colleague बा मिथिला के गढ़ दरभंगा से ओकरे बिटिया का सादी मा मटन चिकन औरो मछली सबही कुछ था! हम खुदै खाये है बरात मा खाना. हमको कहा गया था बिना रसगुल्ला और मीट के मैथिल सादी ना होवे है!!

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 3:03 pm | प्यारे१

सादी ब्राह्मण का घर मे था? सबही अपना अपना झंडा उंचा करत रहील. का बताई तुमका. हम तो बडा कन्फूज हो गया हू.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 3:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्यारे भैया,

जेकर बिटिया का सादी रहैस ओकरा टाइटल भी झा ही था हो!!औरो असली मधुबनी का मैथिल था आपके झा बाबु से पुछो "सौराठ मेला" जानत हो का नाही !! और सिर्फ उहे एक सादी नहीं बल्की हम ता और ३ मैथिल सादी मा खाना खाया मटन चिकन मछली वाला

बिहार मा सिर्फ भुमिहार का सादी में भोज वेजिटेरिअन रहत बा ओकर सादी मा रसमलाई का खपत होवत बा आधा आधा टन !!

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 3:36 pm | प्यारे१

हम ओ हि तो कह रहा हू| हमार यहा झा भी है और ओझा भी|
दोनो कहे की घर मा मास मच्छी नही चलता और इधर झा रोजही चिकन मच्छी खात रहा और ओझा दारु भी पि रहा|

हम कन्फूज हो गया हू|

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Sep 2015 - 12:21 pm | अनिरुद्ध.वैद्य

ओ मिसळपाव मराठी संस्थळ आहे … (कृपया)परत मराठी सुरु करा.

सादीमां तो रहताइच बा सरजी!!!!

पद्मावति's picture

9 Sep 2015 - 3:59 pm | पद्मावति

बरोबर आहे. माझी एक मैत्रीण मैथीली ब्राम्हण आहे झा आडनावाची. बहुतेक ती पण दरभंगाचीच आहे. तिच्या कडे व्यवस्थीत मासाहार करतात. ती म्हणते, झा हे देवीचे उपासक असतात आणि तिच्या म्हणाण्याप्रमाणे देवीचे उपासक मटण, मास खातात ( महाराष्ट्रात सारस्वत म्हणजे सरस्वतिचे उपासक मासहार करतात तसंच). इनफॅक्ट ती सांगते, की त्यांच्याकडे देवीच्या पुजेला मटनाचा नैव्यद्य असतो.

प्रभाकर पेठकर's picture

10 Sep 2015 - 9:22 am | प्रभाकर पेठकर

फार फार पूर्वी निबिड अरण्यात कांही ब्राह्मण पुत्र ऋषीमुनींच्या आश्रमात अध्ययन करीत होते. तेंव्हा दुष्काळ पडला. अन्न धान्य मिळेना. रोजचे जगणे मुश्कील झाल्याने अनेक ब्राह्मण मुले अध्ययन सोडून आपापल्या गावी गेले. तेंव्हा आकाशवाणी झाली आणि त्या ईश्वरवाणीने संदेश दिला नदीतील मासे खाऊन जगा पण सरस्वतीची आराधना सोडू नका. अशा प्रकारे, उरलेले ब्राह्मण नदीतील मासे खाऊन जगले आणि अध्ययन चालू ठेवून सरस्वतीची आराधना त्यांनी चालू ठेवली. ते 'सारस्वत' म्हणजेच मासेखाऊ ब्राह्मण.

असे ऐकले आहे.

वपाडाव's picture

7 Jan 2019 - 4:16 pm | वपाडाव

इथे देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर पाय लाल केल्या/झाल्याशिवाय गाभार्‍यात/मंडपात जाता येत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Sep 2015 - 12:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमचा स्टाफ पण दरभंगा चा होता त्यांच्यात पाच प्रकार चे मांस अन मासळी चा नैवेद्य असतो देवी ला शाक्त परंपरेत ले कालीभक्त लोक असतात ते

अगा बाबौ =)) हाईट आहे ही तर. _/\_

बोका-ए-आझम's picture

10 Sep 2015 - 12:14 am | बोका-ए-आझम

म्हणजे आताचे कनौज, बरोबर? अत्तरांसाठी जे प्रसिद्ध आहे ते? म्हणजे हे कान्यकुब्ज ब्राम्हण हे कनौजी ब्राम्हण असतील. संभाजीमहाराजांच्या दरबारातले कविकलश हेही कनौजी ब्राम्हण होते असं वाचल्याचं आठवतंय.

मालोजीराव's picture

11 Sep 2015 - 12:39 am | मालोजीराव

इतिहासप्रसिद्ध कवी कलश म्हणजे संभाजीराजेंचा मित्र हा कान्यकुब्ज च होता,तो मांस भक्षण करायचा त्यामुळे हे लोक मांसाहार करत असावेत सर्रास पूर्वी तरी असे म्हणायला वाव आहे

चिगो's picture

9 Sep 2015 - 3:29 pm | चिगो

हेच म्हणतो. बंगालमधील ब्राम्हण परंपरेने चिकन-मटण-मासे खातात. दुर्गापुजेत देवीच्या प्रसादात मांस आणि मुख्यत्वे मासे असतात. केरळातील हिंदु बीफ खातात. मला वेदांची आणि संस्कृतची माहिती शुन्य आहे, पण एका पुस्तकात वाचल्याप्रमाणे वैदिककाळात अतिथीला 'गोघ्न' हे संबोधन होतं (गो=गाय, घ्न = शत्रू) कारण कि अतिथीला जेवायला बीफ दिल्या जाई..

बाकी जाणकार सांगतीलंच..

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 12:19 am | प्यारे१

घ्न म्हणजे शत्रु असेल तर शत्रुघ्न म्हणजे शत्रूचा शत्रू असं काही आहे का?

-घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न, कृतघ्न, इ.इ. एके ठिकाणी गाईंना अघ्न्य म्हटले आहे, अर्थात "नॉट टु बी किल्ड".

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 12:46 pm | प्यारे१

आभारी आहोत.

चिगो's picture

10 Sep 2015 - 2:13 pm | चिगो

करेक्ट.. 'घ्न' म्हणजे मारणारा.. धन्यवाद, फळीमाणूसराव.. ;-) गलतीसे मिस्टूक हो गया..

शत्रुं घ्नन्ति इति शत्रुघ्न

लालू म्हणलेला शत्रुघ्न सिन्हाबद्दल- 'जिसके मा बापनेही इसका नाम शत्रु रखा हो...'
कपाळाला हात मारून घेतो कधीही आठवलं ते की...

बॅटमॅन's picture

11 Sep 2015 - 12:53 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 12:19 am | प्यारे१

घ्न म्हणजे शत्रु असेल तर शत्रुघ्न म्हणजे शत्रूचा शत्रू असं काही आहे का?

बंगालमधील ब्राह्मण परंपरेने गोड्या पाण्यातील मासे खातात, चिकन-मटन नाही. ते त्याला जलफळ असे म्हणतात. परंपरेने हा शब्द महत्वाचा, नाहीतऱ हल्ली कोणी काय खावे याला बंधन नाही.

पद्मावति's picture

12 Sep 2015 - 1:53 pm | पद्मावति

बंगालीत याला जल तोरिआ म्हणतात. पारंपरिक बंगाली खेडेगावांमधे घरोघरी अंगणात माश्यांसाठी छोटे जलाशय 'पुखारा' असायचे / असतात. घरची भाजी, घरचेच फ्रेश मासे.

बॅटमॅन's picture

14 Sep 2015 - 2:17 pm | बॅटमॅन

चैदजा ताई/ भाऊ,

परंपरेनेच चिकनमटन खाणारे बंगाली ब्राह्मण माहिती आहेत. सरसकट सगळेच खातात किंवा खात नाहीत असं आजिबात नाही.

(बंगाली मुंजीच्या जेवणात माशाबरोबर मटन व चिकन खाल्लेला) बॅटमॅन.

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 3:15 pm | बोका-ए-आझम

कुठच्या ग्रंथात? केव्हा?कुठल्या सामाजिक परिस्थितीत?

मुक्त विहारि's picture

9 Sep 2015 - 12:47 pm | मुक्त विहारि

आकुडेला, मटण खाल्ले.

तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा भरपूर देतात.

मटण तसे बरे होते.

आमच्या डोंबोलीत, सत्कार (टिळक टॉकीज, जवळ) मध्ये वडे-मटण उत्तम मिळते.

असो,

मुद्दाम मटण खायला म्हणून पुण्याला जाण्यात अर्थ नाही.

आमच्या शोलेतील बलदेवसिंग ठाकूरच्या भाषेत सांगायचे तर,

खाने के लिये तो सिर्फ हमारी डोंबोली ही का़फी हय.

मांसाहारी साठी "सत्कार" आणि शाकाहारी साठी "बोडस."

ये दोनो ही पुणे के लिये काफी़ हय.

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 6:32 pm | बोका-ए-आझम

गोरेगाव पूर्व इथली शाखाही मस्त! मटण थाळी लाजवाब!

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2015 - 8:22 pm | प्रसाद गोडबोले

खाने के लिये तो सिर्फ हमारी डोंबोली ही का़फी हय.

मग तुम्ही एखादा कट्टाच प्लान कराना मुवी ! तुमचे कट्टे सुपरहिट होतात :)

शिवाय अंबरनाथ च्या इथे कोठे तरी जुने मंदीरही आहे ना , ते पहायच्या निमित्ताने आमचे शाकाहारी मित्रही येवु शकतील =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 1:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

या कधी वर्हाडात !!! अस्सल वर्हाड़ी रस्सा खाऊ पडले राहु वाळ्याचे ताटे लावुन!!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Sep 2015 - 1:30 pm | अनिरुद्ध.वैद्य

पण आजकाल वाळ्याचे ताटे कोठे चालते? डेझर्ट कूलर लावावं लागते

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 1:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी डेजर्ट कूलर ला सुद्धा वाळ्याचे ताटे लावेल हाय वैद्य साहेब

कपिलमुनी's picture

9 Sep 2015 - 3:17 pm | कपिलमुनी

घरी कधी येताय तेव्हढे सांगा . आम्ही हजर .
मुर्गपंथीय सभा घेउ :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Sep 2015 - 12:23 pm | अनिरुद्ध.वैद्य

अरे झकास मग तर! आमरस पोळी हाणून डेझर्ट कुलरमध्ये ताणून देण्यासारख सुख नाही! त्यात वाळ्याचा सुगंध … अहाहा … उन्हाळ्यात ट्रीप मारावी म्हणतो :D

जा आणि एक कूलर मध्ये घालायचं खसचं सेंट घेऊन या... एक इकडे पाठवा जमलं तं...इकडे तर कुणी ऐकलेलं पण नाही असं काही असतं असं...

संजय पाटिल's picture

9 Sep 2015 - 7:54 pm | संजय पाटिल

कोल्हापुरातला तांबडा पांढरा रस्सा, मटण जगप्रसिद्ध असले तरी ईचल्करंजीतील गांधि कॅम्प एरिया मधे असणार्या घरगुती खानावळीतले मटण चापायला कोल्हापूर, पुणे मुंबई इथुन माझे मित्र आवर्जुन येतात. ईथे जवळ जवळ ६० ते ७० घरगुती खाणावळि आहेत मटणाच्या. सगळिकडे अर्धा अर्धा तास वेटिंग असते.

खटपट्या's picture

9 Sep 2015 - 1:27 pm | खटपट्या

कोणी पाया सुप चा आस्वाद घेतलाय का?
ठाण्यात लुईसवाडीला बबन पायासूप खूप प्रसिध्द होते. आठवड्यातून एकदा पायासूपचा आस्वाद घेतल्यास प्रक्रुती ठणठणीत रहाते असा स्वाणुभव आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2015 - 1:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त ओल्ड सिटी हैदराबाद!!!!

कपिलमुनी's picture

9 Sep 2015 - 4:35 pm | कपिलमुनी

पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त >> पिस्ता हाउस इन ओल्ड सिटी हैदराबाद मधेच

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Sep 2015 - 2:22 pm | अनिरुद्ध.वैद्य

भन्नाट चर्चा होऊ रायली …

येत्या रव्वारी तिरंगा व्हीझीट कराव लागते …

प्रसाद गोडबोले's picture

9 Sep 2015 - 3:06 pm | प्रसाद गोडबोले

आमच्या सातार्‍यात अनेक ठिकाणी अप्रतिम मटण मिळते !

पुर्वी कासच्या परीसरात लोकं मस्तं चुल वगैरे बनवुन मटन बनवायचे अन पार्टी करायचे . कासच्या पाण्यामुळे आणि कदाचित चुलीवर बनवल्यामुळे तिथे मटनाला अप्रतिम चव येते असे ऐकुन आहे ( आता बहुतेक अशा पार्ट्या अलाऊड नाहीत :( )
पण कासच्या परीसरात अनेक गावात प्रतिम मटन मिळते असे ऐकुन आहे !

पण कासच्या परीसरात अनेक गावात प्रतिम मटन मिळते असे ऐकुन आहे !

हे प्रतिम मटन काय असतं =))

ते त्याची कास धरल्यावरच समजेल बहुधा. =))

प्रचेतस's picture

9 Sep 2015 - 3:19 pm | प्रचेतस

खी खी खी =))

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 3:24 pm | बोका-ए-आझम

एक लक्षात घ्या - मांसाहार करणा-यांनीच या जगातला अन्नधान्याचा समतोल सांभाळला आहे. सगळेच शाकाहारी असते तर या जगातली सगळी जंगलं शेतजमिनीखाली आली असती. आणि शाकाहार हाही मांसाहाराचाच एक प्रकार आहे. वनस्पतींनाही जीव असतो. म्हणजे आपण वनस्पती खाताना जीवहत्याच करतो. मग कसला शाकाहार आणि कसला मांसाहार? उलट वेदकालीन ब्राम्हण सगळं खायचे. आणि नसतील खात तर गेले खड्ड्यात. आम्ही खाणार. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून, भुरका मारत घाम पुसत ओरपणार.

बॅटमॅन's picture

9 Sep 2015 - 3:29 pm | बॅटमॅन

आणि नसतील खात तर गेले खड्ड्यात.

नसतील खात वगैरे कै नै, खायचेच ते सगळे. मांसाहार करून तुम्ही धर्माची परंपराच पुढे चालवताय. हे धर्माचेच काम आहे.

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 6:35 pm | बोका-ए-आझम

ग्रीक स्टाईल चिकन इथे मुंबईत कार्टर रोडला चांगलं मिळतं. ग्रेकोमध्ये.

बोकाजी धन्यवाद, मुंबैस कधी जाणे होईल तेव्हा हे लक्षात ठेवेन!

नाव आडनाव's picture

9 Sep 2015 - 3:42 pm | नाव आडनाव

+१
कोंबड्या पोल्ट्रीत असतांना रोज मरणाची भिती असेल त्यांना - आज कापणार / उद्या कापणार. खाणारा त्या कोंबड्यांची रोजच्या भितीतून सुटकाच करत असतो. एका अर्थाने पुण्यकर्मंच हे - त्यांना भयमुक्त करणे.
(मांसाहार न करणारा - नाव आडनाव)

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 3:43 pm | प्यारे१

कैच्या कै.

अभिरुप's picture

9 Sep 2015 - 3:37 pm | अभिरुप

आताच पाया खाउन तृप्त झालो.
अँटॉप हिलच्या पंजाबी पाया हाउस मध्ये मिळणारा मटण खीमा , पाया ,बटर राईस अन क्लियर सूप अगदी अप्रतिम...

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 6:00 pm | बोका-ए-आझम

ते सांगा हो जरा. बरंच ऐकलंय. मला अगदी पतियाळामध्ये याच्या नावाने कान पकडणारे मिळाले.