Skip to main content

(इच्छामटण)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 08/09/2015 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 66617
प्रतिक्रिया 264

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

म्हणजे आताचे कनौज, बरोबर? अत्तरांसाठी जे प्रसिद्ध आहे ते? म्हणजे हे कान्यकुब्ज ब्राम्हण हे कनौजी ब्राम्हण असतील. संभाजीमहाराजांच्या दरबारातले कविकलश हेही कनौजी ब्राम्हण होते असं वाचल्याचं आठवतंय.

In reply to by बॅटमॅन

इतिहासप्रसिद्ध कवी कलश म्हणजे संभाजीराजेंचा मित्र हा कान्यकुब्ज च होता,तो मांस भक्षण करायचा त्यामुळे हे लोक मांसाहार करत असावेत सर्रास पूर्वी तरी असे म्हणायला वाव आहे

In reply to by बॅटमॅन

हेच म्हणतो. बंगालमधील ब्राम्हण परंपरेने चिकन-मटण-मासे खातात. दुर्गापुजेत देवीच्या प्रसादात मांस आणि मुख्यत्वे मासे असतात. केरळातील हिंदु बीफ खातात. मला वेदांची आणि संस्कृतची माहिती शुन्य आहे, पण एका पुस्तकात वाचल्याप्रमाणे वैदिककाळात अतिथीला 'गोघ्न' हे संबोधन होतं (गो=गाय, घ्न = शत्रू) कारण कि अतिथीला जेवायला बीफ दिल्या जाई.. बाकी जाणकार सांगतीलंच..

In reply to by प्यारे१

-घ्न म्हणजे मारणारा. शत्रुघ्न, कृतघ्न, इ.इ. एके ठिकाणी गाईंना अघ्न्य म्हटले आहे, अर्थात "नॉट टु बी किल्ड".

In reply to by बॅटमॅन

शत्रुं घ्नन्ति इति शत्रुघ्न लालू म्हणलेला शत्रुघ्न सिन्हाबद्दल- 'जिसके मा बापनेही इसका नाम शत्रु रखा हो...' कपाळाला हात मारून घेतो कधीही आठवलं ते की...

In reply to by बॅटमॅन

बंगालमधील ब्राह्मण परंपरेने गोड्या पाण्यातील मासे खातात, चिकन-मटन नाही. ते त्याला जलफळ असे म्हणतात. परंपरेने हा शब्द महत्वाचा, नाहीतऱ हल्ली कोणी काय खावे याला बंधन नाही.

In reply to by चैदजा

बंगालीत याला जल तोरिआ म्हणतात. पारंपरिक बंगाली खेडेगावांमधे घरोघरी अंगणात माश्यांसाठी छोटे जलाशय 'पुखारा' असायचे / असतात. घरची भाजी, घरचेच फ्रेश मासे.

In reply to by चैदजा

चैदजा ताई/ भाऊ, परंपरेनेच चिकनमटन खाणारे बंगाली ब्राह्मण माहिती आहेत. सरसकट सगळेच खातात किंवा खात नाहीत असं आजिबात नाही. (बंगाली मुंजीच्या जेवणात माशाबरोबर मटन व चिकन खाल्लेला) बॅटमॅन.

आकुडेला, मटण खाल्ले. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा भरपूर देतात. मटण तसे बरे होते. आमच्या डोंबोलीत, सत्कार (टिळक टॉकीज, जवळ) मध्ये वडे-मटण उत्तम मिळते. असो, मुद्दाम मटण खायला म्हणून पुण्याला जाण्यात अर्थ नाही. आमच्या शोलेतील बलदेवसिंग ठाकूरच्या भाषेत सांगायचे तर, खाने के लिये तो सिर्फ हमारी डोंबोली ही का़फी हय. मांसाहारी साठी "सत्कार" आणि शाकाहारी साठी "बोडस." ये दोनो ही पुणे के लिये काफी़ हय.

In reply to by मुक्त विहारि

खाने के लिये तो सिर्फ हमारी डोंबोली ही का़फी हय.
मग तुम्ही एखादा कट्टाच प्लान कराना मुवी ! तुमचे कट्टे सुपरहिट होतात :) शिवाय अंबरनाथ च्या इथे कोठे तरी जुने मंदीरही आहे ना , ते पहायच्या निमित्ताने आमचे शाकाहारी मित्रही येवु शकतील =))

या कधी वर्हाडात !!! अस्सल वर्हाड़ी रस्सा खाऊ पडले राहु वाळ्याचे ताटे लावुन!!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पण आजकाल वाळ्याचे ताटे कोठे चालते? डेझर्ट कूलर लावावं लागते

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी डेजर्ट कूलर ला सुद्धा वाळ्याचे ताटे लावेल हाय वैद्य साहेब

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे झकास मग तर! आमरस पोळी हाणून डेझर्ट कुलरमध्ये ताणून देण्यासारख सुख नाही! त्यात वाळ्याचा सुगंध … अहाहा … उन्हाळ्यात ट्रीप मारावी म्हणतो :D

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

जा आणि एक कूलर मध्ये घालायचं खसचं सेंट घेऊन या... एक इकडे पाठवा जमलं तं...इकडे तर कुणी ऐकलेलं पण नाही असं काही असतं असं...

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कोल्हापुरातला तांबडा पांढरा रस्सा, मटण जगप्रसिद्ध असले तरी ईचल्करंजीतील गांधि कॅम्प एरिया मधे असणार्या घरगुती खानावळीतले मटण चापायला कोल्हापूर, पुणे मुंबई इथुन माझे मित्र आवर्जुन येतात. ईथे जवळ जवळ ६० ते ७० घरगुती खाणावळि आहेत मटणाच्या. सगळिकडे अर्धा अर्धा तास वेटिंग असते.

कोणी पाया सुप चा आस्वाद घेतलाय का? ठाण्यात लुईसवाडीला बबन पायासूप खूप प्रसिध्द होते. आठवड्यातून एकदा पायासूपचा आस्वाद घेतल्यास प्रक्रुती ठणठणीत रहाते असा स्वाणुभव आहे.

आमच्या सातार्‍यात अनेक ठिकाणी अप्रतिम मटण मिळते ! पुर्वी कासच्या परीसरात लोकं मस्तं चुल वगैरे बनवुन मटन बनवायचे अन पार्टी करायचे . कासच्या पाण्यामुळे आणि कदाचित चुलीवर बनवल्यामुळे तिथे मटनाला अप्रतिम चव येते असे ऐकुन आहे ( आता बहुतेक अशा पार्ट्या अलाऊड नाहीत :( ) पण कासच्या परीसरात अनेक गावात प्रतिम मटन मिळते असे ऐकुन आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

पण कासच्या परीसरात अनेक गावात प्रतिम मटन मिळते असे ऐकुन आहे !
हे प्रतिम मटन काय असतं =))

एक लक्षात घ्या - मांसाहार करणा-यांनीच या जगातला अन्नधान्याचा समतोल सांभाळला आहे. सगळेच शाकाहारी असते तर या जगातली सगळी जंगलं शेतजमिनीखाली आली असती. आणि शाकाहार हाही मांसाहाराचाच एक प्रकार आहे. वनस्पतींनाही जीव असतो. म्हणजे आपण वनस्पती खाताना जीवहत्याच करतो. मग कसला शाकाहार आणि कसला मांसाहार? उलट वेदकालीन ब्राम्हण सगळं खायचे. आणि नसतील खात तर गेले खड्ड्यात. आम्ही खाणार. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून, भुरका मारत घाम पुसत ओरपणार.

In reply to by बोका-ए-आझम

आणि नसतील खात तर गेले खड्ड्यात.
नसतील खात वगैरे कै नै, खायचेच ते सगळे. मांसाहार करून तुम्ही धर्माची परंपराच पुढे चालवताय. हे धर्माचेच काम आहे.

In reply to by बोका-ए-आझम

+१ कोंबड्या पोल्ट्रीत असतांना रोज मरणाची भिती असेल त्यांना - आज कापणार / उद्या कापणार. खाणारा त्या कोंबड्यांची रोजच्या भितीतून सुटकाच करत असतो. एका अर्थाने पुण्यकर्मंच हे - त्यांना भयमुक्त करणे. (मांसाहार न करणारा - नाव आडनाव)

आताच पाया खाउन तृप्त झालो. अँटॉप हिलच्या पंजाबी पाया हाउस मध्ये मिळणारा मटण खीमा , पाया ,बटर राईस अन क्लियर सूप अगदी अप्रतिम...

In reply to by अभिरुप

ते सांगा हो जरा. बरंच ऐकलंय. मला अगदी पतियाळामध्ये याच्या नावाने कान पकडणारे मिळाले.

अरे काय चालवलंय हे ????? आँ ????? इथे मटण-चिकन-माश्यांची खर्रीखुर्री चायपे चर्चा सुरू करून (इच्छामटना)चा पार खिमा करून टाकलात की, राव !!!!!!!!!!!!!!! =))

काहि प्रतिसाद तर राजा एकदमच हेकोडे तिकोडे होउन राहिले ना..म्हंजे स्क्रिन च्या निरा उजविकडेच चाल्ले ना ते.वाच्याले लय तरास होउन राह्यला :)

1

बामणानं मटण महाग केलं दलितांनं पुस्तक महाग केलं समाजवादाचं ओझं एकमेकांच्या दाराशी नेलं त्यात आपल्या बापाचं काय गेलं? ( रामदास फुटाणे यांची चारोळी)

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे. आणि हिंदू धर्मात वैष्णव पंथ जास्ती प्रभावी असल्यामुळे हिंदूधर्मामध्ये मांसाहार निषिद्ध आहे असा त्यांनी प्रसार केला. आणि तोच समज आजही बहुतेकांचा आहे कि हिंदू धर्मात मांसाहार नको आहे. आपण जर अभ्यासपूर्ण निरिक्षण केल्यास असे लक्षात कि वैष्णव पंथीयच यथाशक्ती प्रयत्न करून असे सांगतात कि मांसाहार करू नये. उदा.- वारकरी संप्रदाय इस्काॅन आणि बरेच त्यामुळे मांसाहार केल्यामुळे पाप वगैरे लागते म्हणजे कहरच झाला. आणि गीतेमध्ये जे काही मांसाहाराबद्दल असेल तर ते वैष्णवपंथीयांनीच नंतर घुसडले असणार हे नक्की.तेव्हा मित्रांनो काही होत नाही हादडा तुम्ही पोट भरून,फक्त अतिरेक नको व्हायला एवढेच. स्वामी विवेकानंद मांसाहारी होते माहित आहे ना? कारण ते शाक्त पंथ मानणारे होते,आणि बंगालीही होते. आणि आत्मा मरत नाही त्यामुळे त्या प्राण्याला(पशू,पक्षी,श्वापदे,मानव नव्हे) मारणे म्हणजे त्याचे शरीर मारणे होय.फक्त हे सार्वजनिक असू नये इतकेच.

In reply to by बॅटमॅन

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे.
ब्यॅटुअण्णा , हे विधान बरोबर आहे असे म्हणता ? आमच्या अब्यासानुसार तर जैनांनीच शाकाहार वगैरे सुरु केले , आणि जैन हा संप्रदाय बैश्णव संप्रदायाच्या किमान १००० वर्ष आधीचा आहे , आणि वैदिक लोकं सर्रास मांसभक्षण करत होते , थोडक्यात शाकाहारी दहशतवादाचे खापर हिंदु वैष्णवांच्या माथ्यावर कसे काय फोडता येईल ? सुरुवात जैनांनीच केली ना ? यज्ञातील हिंसेला विरोध आधी बौध्दांनी केला ना ? अहिंसेच्या अतिरेकाचे पाप वैष्णवांचे कसे ? नाही म्हणजे तो तसा प्रचार अजेंड्याचा भाग असेल तर राहु द्या .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

In reply to by प्रसाद गोडबोले

सुरुवात जैन - बौद्धांनी केली हे बरोबर. पण त्यांची तळी उचलून अन्य पंथीय लोकांना गिल्ट काँप्लेक्स देण्यात आघाडीवर कोण आहे हे पहा, म्हणजे कळेल. त्यांनी दिलेली उदा. बरोबरच आहेत. शैवपंथीय लिंगायतही कट्टर व्हेजी असतात, पण ते कै भारतव्यापी नव्हेत. भारतव्यापी लेव्हलला असा आग्रह कोण करते ते पहा. बाकी अजेंड्याबद्दल तुम्ही सांगणे म्हणजे...ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

In reply to by बॅटमॅन

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे.
हे विधान चुकीचे आहे हे मान्य केल्या बद्दल धन्यवाद :) बाकी ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि आम्ही कशाला कोणता अजेंडा राबवू ? कारण जेव्हा धर्माला ग्लानि येईल तेव्हा भगवंत अवतीर्ण होतीलच. ! त्यामुळे तुम्ही उगीच आमच्या अजेंड्याची काळजी करू नका. आणि हो, रूढी,परंपरा,संस्कृती,म्हणजे धर्म नव्हे.धर्माची व्याख्या वेगळीच आहे ती जाणून घ्या. आणि जैन,बौद्ध म्हणजे हिंदूंमधील काही कर्मकांडाना वैतागून तयार झालेले संप्रदाय आहेत त्याला नंतर धर्मांचे स्वरूप आले हा वेगळा विषय. त्यामुळे या वर्गांना धर्मांमध्ये न बघता हिंदूमधीलच एक वेगळे पंथ म्हणून बघा, आणि जाता जाता....... गौतम बौद्ध सुद्धा मांस खात होते त्यांचे इतकेच म्हणणे होते कि खास खाण्याकरिता प्राणी हिंसा करू नका,एखादा प्राणी मृत झाला असेल तर त्याचे मांस खाल्ले तर काही हरकत नाही .(हे उदाहरण बुद्धांना विष्णूंचा अवतार मानणार्या वैष्णवपंथीयांसाठी) अमेरिका,चीन,जपान,इग्लंड,फ्रांस हे काय शुद्ध शाकाहारी देश आहेत काय? त्यांची प्रगती बघा जरा. आणि मानव शराराची रचना शाक आणि मांस दोन्ही पचवू शकेल अशी आहे, मग कशाला नसती उठाठेव सगळी?

In reply to by याॅर्कर

मानव शराराची रचना शाक आणि मांस दोन्ही पचवू शकेल अशी आहे, मग कशाला नसती उठाठेव सगळी?
हेच तर ना ! वैदिक धर्मात असली कसलीही नसती उठाठेव नव्हती , लोकं सर्रास मांसभक्षण कराचे , वैदिक धर्मात जितक्या काही वाईट रुढी प्रथा घुसल्या आहेत त्या सार्‍या जैन , बौध्द , अवैदिक लोकल संप्रदायातुनच घुसल्या आहेत आणि त्यातुन जे काही निर्माण झाले त्याला आज हिंदु धर्म म्हणतात !! असो . मटनाच्या धाग्यावर कशाला अस्मिता उधळताय , रसा ओरपा की निवांत ....

पुण्यात चांगला सावजी मटण कुठे मिळते ?

In reply to by कपिलमुनी

मला पुण्यातले महित नाही पण सोलापुरात श्रवण सावजी, वैशाली सावजी अन मंगेश सावजीचे खिमा ऊंडे भारी असत्तात. बिर्यानी पण टिपिकल भुश्शाच्या शेगडीवरच्या मटणाच्या टेस्टसहित. अजून बरेच घरगुती सावजी बनवून देणारे आहेत. एकसे एक टेस्ट वाले. वैशाली सावजीत आधी क्वेल (तित्तर) मिळायचा. सध्या नाही.

काय तर मग? झाला की नाही 'लंगोटकट्टा'? निदान 'गोटकट्टा' तरी?

In reply to by प्यारे१

प्रतिसादातील वरील दोन शब्दांच्या साहचर्यामुळे अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण होण्याची शक्यता असली तरी आमच्या कल्पनेची भरारी गोट्=बकरा/बकरी किंवा तत्सम प्राणी इतपतच असल्याने आपण निर्धास्त असावे.

नगर रोडला खराडीपासून जवळच असलेले कावेरी!!!! काय मटन आहे तेच्यायला, लयच मज्या आली राव खाऊन. रस्सापण असला चविष्ट, आहाहाहा....ह्याऽऽ मोठाल्या भाकर्‍या आणि हे चविष्ट मटन....तोंडाला चव आली हे लिहूनसुद्धा.

In reply to by बॅटमॅन

हडपसर ते हांडेवाडी जाताना उजव्या बाजूलाच हांडेवाडी चौकात...बाकी आर्थर्स थिम कस आहे, डक / टर्की मीट साथी भेट द्यायची इछा आहे

In reply to by मालोजीराव

आर्थर्स थीम उत्तम आहे, भाव रीझनेबल आहेत. टेस्ट इंडियन स्टाईल आजिबात नाही. फिशच्या काही डिशेस छान बनवतात, चिकनही उत्तमच असते. पण सोबत नुस्ती रोटी वा नुस्ता राईस नाय मिळत. ब्रेड देतात छोटेसे आणि बटर प्याक्स. कोरेगाव पार्कात किंवा आसपास आवडलेली अजून काही ठिकाणे : फ्रेंच विंडो नामक पॅटिसेरी / बेकरी. अस्सल फ्रेंच पद्धतीच्या पेस्ट्रीज अतिशय उत्तम मिळतात. तिथली "शू पेस्ट्री" अवश्य विचारा अन खा. कमी गोड असते पण जाम चविष्ट लागते. इतर ऑप्शन्सही अवश्य ट्राय करावेत. मलाक्का स्पाईसः इंडोनेशियन पद्धतीचे जेवण. फिश, सूप्स आणि चिकन डिशेस एक नंबर. मात्र महाग. हॉटेल वेस्टिनला लागून एबीसी फार्म्स आहे, तिथे चारपाच हाटेले एकमेकांना लागून आहेत. पैकी शिशा जॅझ कॅफे इथे मिडल ईस्टर्न पद्धतीचे जेवण उत्तम मिळते. विशेषतः डोनर कबाब खावा तर तिथेच. त्याच लायनीत अजून एकदोन हाटेले सोडून जे हाटेल येते (विदिन एबीसी फार्म ओनली) त्यात थिन क्रस्ट चिकन पिझ्झा लय भारी मिळतो. तिथे ओपन एअर शिटाच आहेत मोस्टली.

In reply to by बॅटमॅन

मलाक्का स्पाईस, शिशा ला गेलोय...मलाक्का चा चोप्स फ्राय जबरी टर्कि,डक इतर कुठे मिळतात याबद्दल कल्पना नाही म्हणून आर्थर्स. प्रभात रोड च ले प्लेसैर पण झकास फ्रेन्च Cafe आहे. कोथरूड शिवाजी पुतळा जवळचे मालवणी नाका चे मासे आवड्ले इतर ठिकाणापेक्शा