Skip to main content

(इच्छामटण)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 08/09/2015 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 66617
प्रतिक्रिया 264

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

पुरेपूर कोल्हापूर नाही आवडल. तसं तर कोल्हापूरातलं ओपलचपण नाही आवडल. मटणाच्या नावाखाली काहीही उकडलेलं खपवलं तिथे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक. त्यापेक्शा रुइकर कॉलनीतलं परख मस्त आहे. एकट्याला संपनार नाही एवढ जेवन असते ताटात.

In reply to by संजय पाटिल

कोल्हापुरातनं गगनबावड्याला जायच्या रस्त्यावर चिकन / मटण खायला चांगले हॉटेल कोणते? अधुन मधुन तिकडन जाणे होते पण चांगले हॉटेल अजुन मिळाले नाही.

In reply to by संजय पाटिल

धन्यवाद :) नेक्स्ट मंथ वारी आहेच! तेव्हा ट्राय करून बघतो. बाकी NH4 वरच देहाती आणि २ ४ अजून हॉटेले दिसली. ती कशी काय? आणि पद्माबद्दल काय अभिप्राय?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

परख ची वाढती गर्दी बघता परख खरंच चांगलं असावं. सामिष वर्ज्य आहे त्यामुले फर्श्ट हँड सांगू शकत नाही.....

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

dehati ठीक ठाक आहे . bhavani मंडपात "गावरान" किंवा त्या ओळीत असलेले फक्त संध्याकाळी चालू असणारी थाळी सिस्टीम असलेली हॉटेल लई भारी मटण करून देतात . पद्मा पण तेवढं आवडलं नाही .

भीष्म शरपंजरी पडलेले असताना त्यांना मटणाची चोपायची इच्छा झाली होती, ती युथिष्ठिराने पुरवली असे काही वाचल्याचे आठवते. याला इच्छामटण म्हणायचे की की दयामटण ?? .

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त काकांनी मला विवश केले. ;=) फक्त, युधिष्ठिर काय मीटरात बसेना म्हणून अर्जुनाला घेतले.
इच्छामटण बोले भीष्म अर्जुनासी शरपंजरी निजल्या निजल्या पार्था, आण सत्वरें मटण वाटीभर, शिजल्या शिजल्या गरमागरम अळणी सूप पितोच कसे फुर्र करून तर्रीदार मस्त रश्श्यात भाकर खातो कुस्करून ना कुठली आस ना ध्यास तरी शरांचा टोच साही मटण खाल्ल्याशिवाय मात्र इच्छामरण मी घेणार नाही कावराबावरा अर्जुन दावी खिसा रिकामा प्यान्टीचा वदे, भक्षितो भाजीपाला कठीण काळ मासांताचा कृष्ण धावला शिष्टाईस करून तिरका डोळा सांगे पाच पांडवांसी करा लेको कॉन्ट्री गोळा!
Sandy

खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर हॉटेल" भिंतीकड़े तोंड करून बसायला लागते पण रस्सा असला का दिल खुश हो जायेगा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हा हा ! भिंतीकडे तोंड करून जेवणारे लोक दिसायचे आणि फार मज्जा वाटायची. मी खात नसल्याने कधी आत गेलो नाही पण दाराला लावलेल्या हिरव्या पडद्यातून हे विहंगम दृश्य दिसत असे, जे जगात कुठेही परत पहायला मिळाले नाही ! बाकी जगातल्या एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या. (जाऊ दे- नकोच त्या आठवणी !)

In reply to by खेडूत

एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या. >> आख्या त्रिलोकात एकमेव सदाशिव पेठ असल्याने तिथे अद्वितीय गोष्टी घडणारच!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नागपूर हॉटेल ला दुपारी १२.४५ नंतर आणि संध्याकाळी ८-८.३० नंतरच जेवण संपलेलं असतं राव, २ वेळा अनुभव आलाय. बाकी नुसत्या वासावरून तरी जेवण फक्कड असावं

In reply to by हेमंत लाटकर

हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये तरी उगा कशाला हसे कसून घेतोयस स्वतःचे?

In reply to by बॅटमॅन

हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये. येथे ज्ञानाची काय गरज आहे. पुरातन काऴी भाज्याचे, अन्नधान्यांचे जास्त प्रकार नव्हते. म्हणून भात आणि मांसाहार चालायचा. आता शाकाहारी अन्नधान्ये मुबलक प्रमाणात मिळते. तसेही माणसाचे दात व अातडे मांसाहार करण्यास अनुकूल नसतात.

In reply to by हेमंत लाटकर

जुन्या काळी सगळे असूनही लोक सर्रास मांसाहार करायचे. ब्राह्मण काय आभाळातून पडलेत काय? (ब्राह्मण) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक रेफेरेंस आहे न हो गोथम सिटी नरेश? की बा "कोवळे लुसलुशीत गोमांस खाणे मी अजिबात सोडणार नाही" वगैरे??

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तसे भरपूर रेफ़रन्स काढता येईल … कोणास कोणते मास द्यावे … बैल कधी कापावा गाय कोणती अन कधी कापावी … बकरी कोणती खावी वगैरे वगैरे … भीष्मांनी ८४ प्रकारचे प्राणी खाण्यायोग्य सांगितले आहेत! सो बिनधास्त खावा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

येस सरजी, याज्ञवल्क्यांचा आहे बहुधा, नीट आठवत नाही. जरा बघून सांगतो. नक्की आठवणारे रेफरन्सेस म्ह. १. वसिष्ठ ऋषी जनक राजाकडे आले असता त्यांच्यासाठी गोमांस शिजवण्यात आले. संदर्भ: उत्तररामचरित. २. कुठल्या प्रकारचा नैवेद्य पितरांना दिला तर ते किती दिवस संतुष्ट राहतात याचे एक कोष्टक महाभारतात दिलेले आहे, त्यातच बीफचाही उल्लेख आहे. नक्की पर्व आणि अध्याय क्रमांकासाठी प्रचेतस ऊर्फ वल्ली यांना संपर्क करावा लागेल. हे झाले बीफबद्दल. त्याबद्दल अजूनही बरेच उल्लेख आहेत. नुस्त्या मांसाहाराबद्दल बघायचे तर ढिगाने उल्लेख आहेत. श्राद्धानिमित्त शिजवलेल्या मांसाला नाकारणारा ब्राह्मण हा खरा ब्राह्मणच नव्हे असेही उल्लेख आहेत, बहुधा गृह्यसूत्रांमध्ये. इतके असून सध्या ब्राह्मण हा वारसा नाकारतात आणि नाके मुरडतात हे अतिरोचक आहे. मांस खाऊन आपल्या धर्माची परंपराच आपण पुढे चालवतो आहोत हे त्या मूर्खांच्या गावीच नसते. अगदी कलियुगातले उदाहरण बघायचे झाले तर बंगालमधील ब्राह्मण परंपरेने चिकन-मटन-मासे सगळेच खातात. ते या अडाण्यांना माहिती तरी असते की नाही कुणास ठाऊक? (शाकाहारी दहशतवादाचा कट्टर मांसाहारी शत्रू) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

(किमान महाराष्ट्रात) ब्राह्मणांनी मांस खाऊ नये असं बंधन कधीपासून सुरु झालं? बहुतेक संपूर्ण भारतात काही विशिष्ट जातींनी मांसाहार करु नये असं कधीपासून सुरु झालं? बाकी लोकांना मूर्ख म्हणण्यापेक्षा अडाणी म्हणणं काही अंशी योग्य. माहिती नसते. घरात परंपरागत हे खायचं नाही ते खायचं नाही असंच सांगितलं जात असतं. कारण? आपल्यात खात नाहीत. यापलिकडं उत्तर नसतं. आजूबाजूचा गोतावळा अशाच मानसिकतेमधला, मित्रांची आडनावं विचारुन मैत्री करायला परवानगी या सगळ्यात एका मर्यादित वर्तुळापलिकडं जाणं होत नाही, वाचायला मिळत नाही, मिळालं तरी स्वीकारण्याची मानसिकता आणि त्याहून जास्त गरज वाटत नाही.

In reply to by प्यारे१

महाराष्ट्राचं माहिती नाही. बघावं लागेल. बाकी महाराष्ट्रातही सारस्वत ब्राह्मण हे पारंपरिकरीत्या मांसाहार करतात. बाकीचे त्यांना 'आपल्यातले' मानत नसले म्हणून काय झाले. पूर्ण भारताचं बघायचं तर जैन-बौद्ध धर्मप्रसारानंतर हे जरा जास्त सुरू झाले असे दिसते. त्याआधी तितके दिसत नाही. त्यानंतरही हा प्रकार हळू हळूच वाढत गेला. इ.स. १ ते १००० पर्यंतचे उल्लेख चाळून पाहिले पाहिजेत नेमकेपणासाठी. तरी मजा म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज वगैरे काही मांसाहारी ब्राह्मण पोटजाती अजूनही टिकून राहिल्या हे विशेष.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन भाऊ!!! कान्यकुब्ज अन शरयुपारीन ब्राह्मण म्हणजे यूपी मधले ब्राह्मण कट्टर शाकाहारी असतात, माझ्या माहिती प्रमाणे मांसाहार करणारे ब्राह्मण म्हणजे शाक्त परंपरेतले कश्मीरी, मैथिल अन बंगाली ब्राह्मण हे होत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले होते खरे. सोर्स चेक करावा लागेल. बाकी मैथिली अन बंगाली तर आहेतच, काश्मिरीही त्यांतच आले. मैथिली ब्राह्मण पारंपरिकरीत्या कासव खातात हेही एका मैथिली गृहस्थाकडूनच ऐकले आहे.

In reply to by बॅटमॅन

"जो दिन मछली मिले खा लो एकादशी बारबार आती रहेगी" ही म्हण आहे मैथिल समाजात! घ्या समजून काय ते!! कान्यकुब्ज कन्फर्म नाहीत खात, महा कट्टर ब्राह्मण असतात इतकेच काय तर ते शरयुपारीन ब्राह्मणवृंदास हलके समजतात त्याचे एक्सप्लेनेशन असे की "रामजी जब अयोध्या वापस आये तो उन्होंने एक भोज रखा था जिसमे शरयुपारीन गधे चले गये जबकी रामजी ने एक ब्राह्मण (रावण) का वध किया था, और कान्यकुब्ज कभी भी ब्रह्महत्यारे का भोज नहीं खाते है" इतके कट्टर मिळाले होते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आमच्या इथे एक झा म्हणून आहेत. मैथिली ब्राह्मण. नुकतंच बोलणं झालं. म्हणे आमच्यात बघत पण नाहीत मांसाहाराकडं. काही लोक मासे खातात बंगाल कडचे, चिकन नाही.

In reply to by प्यारे१

चिकनही खातात. प्युअर व्हेजिटेर्यन जेवणाला काहीजण तुच्छतेने "ब्राह्मनेर बिधोबा" अर्थात ब्राह्मण विधवेचे जेवण असेही म्हणत असल्याचे ऐकले आहे.

In reply to by प्यारे१

काय सांगता राव, अल्लोवेद आहे. माझाच अनुभव सांगतो, एका 'बॅनर्जी' कडून मला मुंज अटेंड करायचे आमंत्रण होते. जेवणाचा मेनू काय होता माहितेय? जिलेबी, रसगुल्ला हे स्वीट, एखाहदुसरी भाजी, डाळ, भात, मासे आणि मटण. =)) बर ते लोक कै एकदम हायफाय अन प्रोग्रेसिव्ह वगैरे आजिबात नव्हते. साधे सरळ मध्यमवर्गीय होते. ही गोष्ट आहे २०१० ची. आपल्याकडे काय रिअ‍ॅक्शन असेल मुंजीत मटन होते म्हटल्यावर? =)) =)) =)) आता म्हणाल मटण अल्लोवेद आहे पण चिकन नाही, तर २०१४ साली एका लग्नानिमित्त परत कोलकात्यास जाणे झाले तेव्हा लग्नात चिकनही होते. अर्थात ते लग्न ब्राह्मणी नव्हते हा भाग अलाहिदा. पण अल्लोवेद आहे यात सौंशयच नाय.

In reply to by बॅटमॅन

>>> मुंजीत मटन खिक्क. मुंजी चं निमंत्रण ३/४ घालून दिल्यावरचा एक धागा नि गदारोळ आठवला. मटन असल्यावर काय होईल कुणाला माहिति. (सूड असाच ३/४ घालून शिवथर घळीत आल्यावर तिथले सेवेकरी चिडले होते.)

In reply to by बॅटमॅन

कुणी बैरागी लंगोट घालून आलेला चालेल का हो त्यांना?
मलाही ह्या प्रश्नाच्या उत्तराची फार प्रतिक्षा आहे .... मला एकदा खरेच लंगोट घालुन जायचे आहे हो तिथे !

In reply to by प्रसाद गोडबोले

आय विल गिव्ह यु कंपनी!! सपाट झालेलं पोट दाखवायला तसाही एक स्विमिंग पूल वगळता कुठे चान्स मिळत नाही. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही उगाच घाबरता बोवा संपादक साहेब!! अहो सरळ आहे समस्त मिपारत्न गुणी बाळे तिथे लंगोटावर जाता क्यामेरा अन फोन ठेवतील कुठे गुलाम!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काय भरवसा नाही. लंगोटावर जातील आणि जाताना व्यावसायिक फोटोग्राफर नेतील. ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्यात काय बापूसाहेब, कुबडी नेऊ की, कुबडी कम सेल्फिस्टिक कम पडशी अडकवणे या सगळ्याच कामी येईल. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एक वाक्य लक्षात ठेवा सूड राव . आहे न लक्ष ? फोटू नाय तर कट्टा नाय . मग तो लंगोट कट्टा असला तरीही

In reply to by प्यारे१

पण मटणाच्या चर्चेवर मासे खाण्याची चर्चा हा मटणाचा अपमान आहे ! आणि माश्यांचाही !!

In reply to by बॅटमॅन

मासे खाण्यासाठी आता एकदा कर्देबीच- हर्णेबंदर ची ट्रीप करु ~ खुप लोकांकडुन ह्या ठिकाणांचे नाव ऐकुन आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

तिकडेच चांगल्या प्रतीचे आणि चवीचे मासे मिळतात . अलिबाग - मुंबै म्हणजे अगदी ह्ये !

In reply to by प्रसाद गोडबोले

अरारारा! दीडशे रुपयांत सहा मोठाले पापलेट असलेली टोपली आठवली. तिथला माशांचा लिलावही बघाच. हर्ण्याला मासे असे बंदरावर वाट्याने घ्यायचे आणि कर्ड्याला येऊन बनवून घ्यायचे. स्वर्ग!

In reply to by प्रसाद गोडबोले

येस्स सर लै स्वस्त अन चांगले मासे मिळतात . -तिथे जाऊन पण मासे नाय खाल्लेला अभागी :'(

In reply to by प्यारे१

भैयाजी हमर एक colleague बा मिथिला के गढ़ दरभंगा से ओकरे बिटिया का सादी मा मटन चिकन औरो मछली सबही कुछ था! हम खुदै खाये है बरात मा खाना. हमको कहा गया था बिना रसगुल्ला और मीट के मैथिल सादी ना होवे है!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सादी ब्राह्मण का घर मे था? सबही अपना अपना झंडा उंचा करत रहील. का बताई तुमका. हम तो बडा कन्फूज हो गया हू.

In reply to by प्यारे१

प्यारे भैया, जेकर बिटिया का सादी रहैस ओकरा टाइटल भी झा ही था हो!!औरो असली मधुबनी का मैथिल था आपके झा बाबु से पुछो "सौराठ मेला" जानत हो का नाही !! और सिर्फ उहे एक सादी नहीं बल्की हम ता और ३ मैथिल सादी मा खाना खाया मटन चिकन मछली वाला बिहार मा सिर्फ भुमिहार का सादी में भोज वेजिटेरिअन रहत बा ओकर सादी मा रसमलाई का खपत होवत बा आधा आधा टन !!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हम ओ हि तो कह रहा हू| हमार यहा झा भी है और ओझा भी| दोनो कहे की घर मा मास मच्छी नही चलता और इधर झा रोजही चिकन मच्छी खात रहा और ओझा दारु भी पि रहा| हम कन्फूज हो गया हू|

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबर आहे. माझी एक मैत्रीण मैथीली ब्राम्हण आहे झा आडनावाची. बहुतेक ती पण दरभंगाचीच आहे. तिच्या कडे व्यवस्थीत मासाहार करतात. ती म्हणते, झा हे देवीचे उपासक असतात आणि तिच्या म्हणाण्याप्रमाणे देवीचे उपासक मटण, मास खातात ( महाराष्ट्रात सारस्वत म्हणजे सरस्वतिचे उपासक मासहार करतात तसंच). इनफॅक्ट ती सांगते, की त्यांच्याकडे देवीच्या पुजेला मटनाचा नैव्यद्य असतो.

In reply to by पद्मावति

फार फार पूर्वी निबिड अरण्यात कांही ब्राह्मण पुत्र ऋषीमुनींच्या आश्रमात अध्ययन करीत होते. तेंव्हा दुष्काळ पडला. अन्न धान्य मिळेना. रोजचे जगणे मुश्कील झाल्याने अनेक ब्राह्मण मुले अध्ययन सोडून आपापल्या गावी गेले. तेंव्हा आकाशवाणी झाली आणि त्या ईश्वरवाणीने संदेश दिला नदीतील मासे खाऊन जगा पण सरस्वतीची आराधना सोडू नका. अशा प्रकारे, उरलेले ब्राह्मण नदीतील मासे खाऊन जगले आणि अध्ययन चालू ठेवून सरस्वतीची आराधना त्यांनी चालू ठेवली. ते 'सारस्वत' म्हणजेच मासेखाऊ ब्राह्मण. असे ऐकले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

इथे देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर पाय लाल केल्या/झाल्याशिवाय गाभार्‍यात/मंडपात जाता येत नाही.

In reply to by पद्मावति

आमचा स्टाफ पण दरभंगा चा होता त्यांच्यात पाच प्रकार चे मांस अन मासळी चा नैवेद्य असतो देवी ला शाक्त परंपरेत ले कालीभक्त लोक असतात ते