✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(इच्छामटण)

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 09/08/2015 - 16:45  ·  लेख
लेख
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
66141 वाचन

💬 प्रतिसाद (264)

प्रतिक्रिया

बंगालमधील ब्राह्मण परंपरेने

चैदजा
Sat, 09/12/2015 - 13:33 नवीन
बंगालमधील ब्राह्मण परंपरेने गोड्या पाण्यातील मासे खातात, चिकन-मटन नाही. ते त्याला जलफळ असे म्हणतात. परंपरेने हा शब्द महत्वाचा, नाहीतऱ हल्ली कोणी काय खावे याला बंधन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

'जल फळ' फारच छान नाव आहे.

पद्मावति
Sat, 09/12/2015 - 13:53 नवीन
बंगालीत याला जल तोरिआ म्हणतात. पारंपरिक बंगाली खेडेगावांमधे घरोघरी अंगणात माश्यांसाठी छोटे जलाशय 'पुखारा' असायचे / असतात. घरची भाजी, घरचेच फ्रेश मासे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा

चैदजा ताई/ भाऊ,

बॅटमॅन
Mon, 09/14/2015 - 14:17 नवीन
चैदजा ताई/ भाऊ, परंपरेनेच चिकनमटन खाणारे बंगाली ब्राह्मण माहिती आहेत. सरसकट सगळेच खातात किंवा खात नाहीत असं आजिबात नाही. (बंगाली मुंजीच्या जेवणात माशाबरोबर मटन व चिकन खाल्लेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा

असं कोणी म्हटलं आहे?

बोका-ए-आझम
Wed, 09/09/2015 - 15:15 नवीन
कुठच्या ग्रंथात? केव्हा?कुठल्या सामाजिक परिस्थितीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मागच्याच आठ्वड्यात,

मुक्त विहारि
Wed, 09/09/2015 - 12:47 नवीन
आकुडेला, मटण खाल्ले. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा भरपूर देतात. मटण तसे बरे होते. आमच्या डोंबोलीत, सत्कार (टिळक टॉकीज, जवळ) मध्ये वडे-मटण उत्तम मिळते. असो, मुद्दाम मटण खायला म्हणून पुण्याला जाण्यात अर्थ नाही. आमच्या शोलेतील बलदेवसिंग ठाकूरच्या भाषेत सांगायचे तर, खाने के लिये तो सिर्फ हमारी डोंबोली ही का़फी हय. मांसाहारी साठी "सत्कार" आणि शाकाहारी साठी "बोडस." ये दोनो ही पुणे के लिये काफी़ हय.
  • Log in or register to post comments

सत्कारची

बोका-ए-आझम
Wed, 09/09/2015 - 18:32 नवीन
गोरेगाव पूर्व इथली शाखाही मस्त! मटण थाळी लाजवाब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

खाने के लिये तो सिर्फ हमारी

प्रसाद गोडबोले
Wed, 09/09/2015 - 20:22 नवीन
खाने के लिये तो सिर्फ हमारी डोंबोली ही का़फी हय.
मग तुम्ही एखादा कट्टाच प्लान कराना मुवी ! तुमचे कट्टे सुपरहिट होतात :) शिवाय अंबरनाथ च्या इथे कोठे तरी जुने मंदीरही आहे ना , ते पहायच्या निमित्ताने आमचे शाकाहारी मित्रही येवु शकतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

या कधी वर्हाडात !!! अस्सल

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 13:15 नवीन
या कधी वर्हाडात !!! अस्सल वर्हाड़ी रस्सा खाऊ पडले राहु वाळ्याचे ताटे लावुन!!!
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 13:30 नवीन
पण आजकाल वाळ्याचे ताटे कोठे चालते? डेझर्ट कूलर लावावं लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 13:45 नवीन
आम्ही शौक़ीन!!! आमच्याघरी डेजर्ट कूलर ला सुद्धा वाळ्याचे ताटे लावेल हाय वैद्य साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

घरी कधी येताय ?

कपिलमुनी
Wed, 09/09/2015 - 15:17 नवीन
घरी कधी येताय तेव्हढे सांगा . आम्ही हजर . मुर्गपंथीय सभा घेउ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अरे झकास मग तर! आमरस पोळी

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/10/2015 - 12:23 नवीन
अरे झकास मग तर! आमरस पोळी हाणून डेझर्ट कुलरमध्ये ताणून देण्यासारख सुख नाही! त्यात वाळ्याचा सुगंध … अहाहा … उन्हाळ्यात ट्रीप मारावी म्हणतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

जा आणि एक कूलर मध्ये घालायचं

असंका
Fri, 09/11/2015 - 12:43 नवीन
जा आणि एक कूलर मध्ये घालायचं खसचं सेंट घेऊन या... एक इकडे पाठवा जमलं तं...इकडे तर कुणी ऐकलेलं पण नाही असं काही असतं असं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

कोल्हापुरातला तांबडा पांढरा

संजय पाटिल
Wed, 09/09/2015 - 19:54 नवीन
कोल्हापुरातला तांबडा पांढरा रस्सा, मटण जगप्रसिद्ध असले तरी ईचल्करंजीतील गांधि कॅम्प एरिया मधे असणार्या घरगुती खानावळीतले मटण चापायला कोल्हापूर, पुणे मुंबई इथुन माझे मित्र आवर्जुन येतात. ईथे जवळ जवळ ६० ते ७० घरगुती खाणावळि आहेत मटणाच्या. सगळिकडे अर्धा अर्धा तास वेटिंग असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कोणी पाया सुप चा आस्वाद

खटपट्या
Wed, 09/09/2015 - 13:27 नवीन
कोणी पाया सुप चा आस्वाद घेतलाय का? ठाण्यात लुईसवाडीला बबन पायासूप खूप प्रसिध्द होते. आठवड्यातून एकदा पायासूपचा आस्वाद घेतल्यास प्रक्रुती ठणठणीत रहाते असा स्वाणुभव आहे.
  • Log in or register to post comments

पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 13:43 नवीन
पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त ओल्ड सिटी हैदराबाद!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पिस्ता हाउस

कपिलमुनी
Wed, 09/09/2015 - 16:35 नवीन
पायासुप अन हलीम फ़क्त अन फ़क्त >> पिस्ता हाउस इन ओल्ड सिटी हैदराबाद मधेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

भन्नाट चर्चा होऊ रायली …

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 14:22 नवीन
भन्नाट चर्चा होऊ रायली … येत्या रव्वारी तिरंगा व्हीझीट कराव लागते …
  • Log in or register to post comments

आमच्या सातार्‍यात अनेक ठिकाणी

प्रसाद गोडबोले
Wed, 09/09/2015 - 15:06 नवीन
आमच्या सातार्‍यात अनेक ठिकाणी अप्रतिम मटण मिळते ! पुर्वी कासच्या परीसरात लोकं मस्तं चुल वगैरे बनवुन मटन बनवायचे अन पार्टी करायचे . कासच्या पाण्यामुळे आणि कदाचित चुलीवर बनवल्यामुळे तिथे मटनाला अप्रतिम चव येते असे ऐकुन आहे ( आता बहुतेक अशा पार्ट्या अलाऊड नाहीत :( ) पण कासच्या परीसरात अनेक गावात प्रतिम मटन मिळते असे ऐकुन आहे !
  • Log in or register to post comments

पण कासच्या परीसरात अनेक गावात

प्रचेतस
Wed, 09/09/2015 - 15:13 नवीन
पण कासच्या परीसरात अनेक गावात प्रतिम मटन मिळते असे ऐकुन आहे !
हे प्रतिम मटन काय असतं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ते त्याची कास धरल्यावरच समजेल

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 15:16 नवीन
ते त्याची कास धरल्यावरच समजेल बहुधा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी =))

प्रचेतस
Wed, 09/09/2015 - 15:19 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हेमंत लाटकर काका

बोका-ए-आझम
Wed, 09/09/2015 - 15:24 नवीन
एक लक्षात घ्या - मांसाहार करणा-यांनीच या जगातला अन्नधान्याचा समतोल सांभाळला आहे. सगळेच शाकाहारी असते तर या जगातली सगळी जंगलं शेतजमिनीखाली आली असती. आणि शाकाहार हाही मांसाहाराचाच एक प्रकार आहे. वनस्पतींनाही जीव असतो. म्हणजे आपण वनस्पती खाताना जीवहत्याच करतो. मग कसला शाकाहार आणि कसला मांसाहार? उलट वेदकालीन ब्राम्हण सगळं खायचे. आणि नसतील खात तर गेले खड्ड्यात. आम्ही खाणार. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून, भुरका मारत घाम पुसत ओरपणार.
  • Log in or register to post comments

आणि नसतील खात तर गेले

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 15:29 नवीन
आणि नसतील खात तर गेले खड्ड्यात.
नसतील खात वगैरे कै नै, खायचेच ते सगळे. मांसाहार करून तुम्ही धर्माची परंपराच पुढे चालवताय. हे धर्माचेच काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अर्थातच वाल्गुदस्वामी!

बोका-ए-आझम
Wed, 09/09/2015 - 18:35 नवीन
ग्रीक स्टाईल चिकन इथे मुंबईत कार्टर रोडला चांगलं मिळतं. ग्रेकोमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बोकाजी धन्यवाद, मुंबैस कधी

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 20:04 नवीन
बोकाजी धन्यवाद, मुंबैस कधी जाणे होईल तेव्हा हे लक्षात ठेवेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पुण्यकर्मं

नाव आडनाव
Wed, 09/09/2015 - 15:42 नवीन
+१ कोंबड्या पोल्ट्रीत असतांना रोज मरणाची भिती असेल त्यांना - आज कापणार / उद्या कापणार. खाणारा त्या कोंबड्यांची रोजच्या भितीतून सुटकाच करत असतो. एका अर्थाने पुण्यकर्मंच हे - त्यांना भयमुक्त करणे. (मांसाहार न करणारा - नाव आडनाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कैच्या कै.

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 15:43 नवीन
कैच्या कै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पाया सूप

अभिरुप
Wed, 09/09/2015 - 15:37 नवीन
आताच पाया खाउन तृप्त झालो. अँटॉप हिलच्या पंजाबी पाया हाउस मध्ये मिळणारा मटण खीमा , पाया ,बटर राईस अन क्लियर सूप अगदी अप्रतिम...
  • Log in or register to post comments

हे कुठे exactly आहे

बोका-ए-आझम
Wed, 09/09/2015 - 18:00 नवीन
ते सांगा हो जरा. बरंच ऐकलंय. मला अगदी पतियाळामध्ये याच्या नावाने कान पकडणारे मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरुप

अश्याप्रकारे इच्छामटणाचा खीमा

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 16:14 नवीन
अश्याप्रकारे इच्छामटणाचा खीमा झाला !!
  • Log in or register to post comments

अरे काय चालवलंय हे ????? आँ ?

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/09/2015 - 18:50 नवीन
अरे काय चालवलंय हे ????? आँ ????? इथे मटण-चिकन-माश्यांची खर्रीखुर्री चायपे चर्चा सुरू करून (इच्छामटना)चा पार खिमा करून टाकलात की, राव !!!!!!!!!!!!!!! =))
  • Log in or register to post comments

काहि प्रतिसाद तर राजा

होबासराव
Wed, 09/09/2015 - 20:04 नवीन
काहि प्रतिसाद तर राजा एकदमच हेकोडे तिकोडे होउन राहिले ना..म्हंजे स्क्रिन च्या निरा उजविकडेच चाल्ले ना ते.वाच्याले लय तरास होउन राह्यला :)
  • Log in or register to post comments

o_o

पैसा
Wed, 09/09/2015 - 21:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

बामणानं मटण महाग केलं

फुलथ्रॉटल जिनियस
गुरुवार, 09/10/2015 - 00:09 नवीन
बामणानं मटण महाग केलं दलितांनं पुस्तक महाग केलं समाजवादाचं ओझं एकमेकांच्या दाराशी नेलं त्यात आपल्या बापाचं काय गेलं? ( रामदास फुटाणे यांची चारोळी)
  • Log in or register to post comments

हा असला मस्त विषय चर्चायला

शित्रेउमेश
गुरुवार, 09/10/2015 - 08:58 नवीन
हा असला मस्त विषय चर्चायला श्रावणच का निवडलात?? जखमेवर मीठ (मीट) लावायचा प्रकार झाला हा...
  • Log in or register to post comments

शाक्त आणि शैवपंथी मांसाहारी असतात.

याॅर्कर
गुरुवार, 09/10/2015 - 13:29 नवीन
वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे. आणि हिंदू धर्मात वैष्णव पंथ जास्ती प्रभावी असल्यामुळे हिंदूधर्मामध्ये मांसाहार निषिद्ध आहे असा त्यांनी प्रसार केला. आणि तोच समज आजही बहुतेकांचा आहे कि हिंदू धर्मात मांसाहार नको आहे. आपण जर अभ्यासपूर्ण निरिक्षण केल्यास असे लक्षात कि वैष्णव पंथीयच यथाशक्ती प्रयत्न करून असे सांगतात कि मांसाहार करू नये. उदा.- वारकरी संप्रदाय इस्काॅन आणि बरेच त्यामुळे मांसाहार केल्यामुळे पाप वगैरे लागते म्हणजे कहरच झाला. आणि गीतेमध्ये जे काही मांसाहाराबद्दल असेल तर ते वैष्णवपंथीयांनीच नंतर घुसडले असणार हे नक्की.तेव्हा मित्रांनो काही होत नाही हादडा तुम्ही पोट भरून,फक्त अतिरेक नको व्हायला एवढेच. स्वामी विवेकानंद मांसाहारी होते माहित आहे ना? कारण ते शाक्त पंथ मानणारे होते,आणि बंगालीही होते. आणि आत्मा मरत नाही त्यामुळे त्या प्राण्याला(पशू,पक्षी,श्वापदे,मानव नव्हे) मारणे म्हणजे त्याचे शरीर मारणे होय.फक्त हे सार्वजनिक असू नये इतकेच.
  • Log in or register to post comments

खिक्क्क्क!

प्यारे१
गुरुवार, 09/10/2015 - 13:42 नवीन
खिक्क्क्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

अगदी बरोबर यॉर्करराव!!!! एकदम

बॅटमॅन
गुरुवार, 09/10/2015 - 14:54 नवीन
अगदी बरोबर यॉर्करराव!!!! एकदम यॉर्कर अर्ग्युमेंट्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं

प्रसाद गोडबोले
Fri, 09/11/2015 - 12:03 नवीन
वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे.
ब्यॅटुअण्णा , हे विधान बरोबर आहे असे म्हणता ? आमच्या अब्यासानुसार तर जैनांनीच शाकाहार वगैरे सुरु केले , आणि जैन हा संप्रदाय बैश्णव संप्रदायाच्या किमान १००० वर्ष आधीचा आहे , आणि वैदिक लोकं सर्रास मांसभक्षण करत होते , थोडक्यात शाकाहारी दहशतवादाचे खापर हिंदु वैष्णवांच्या माथ्यावर कसे काय फोडता येईल ? सुरुवात जैनांनीच केली ना ? यज्ञातील हिंसेला विरोध आधी बौध्दांनी केला ना ? अहिंसेच्या अतिरेकाचे पाप वैष्णवांचे कसे ? नाही म्हणजे तो तसा प्रचार अजेंड्याचा भाग असेल तर राहु द्या .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सुरुवात जैन - बौद्धांनी केली

बॅटमॅन
Fri, 09/11/2015 - 12:15 नवीन
सुरुवात जैन - बौद्धांनी केली हे बरोबर. पण त्यांची तळी उचलून अन्य पंथीय लोकांना गिल्ट काँप्लेक्स देण्यात आघाडीवर कोण आहे हे पहा, म्हणजे कळेल. त्यांनी दिलेली उदा. बरोबरच आहेत. शैवपंथीय लिंगायतही कट्टर व्हेजी असतात, पण ते कै भारतव्यापी नव्हेत. भारतव्यापी लेव्हलला असा आग्रह कोण करते ते पहा. बाकी अजेंड्याबद्दल तुम्ही सांगणे म्हणजे...ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वैष्णव पंथीयांनीच हे सगळं

प्रसाद गोडबोले
Fri, 09/11/2015 - 12:18 नवीन
वैष्णव पंथीयांनीच हे सगळं सुरू केलं आहे, कि सात्विक गुणांसाठी शाकाहार करणे वगैरे.
हे विधान चुकीचे आहे हे मान्य केल्या बद्दल धन्यवाद :) बाकी ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हिंदू धर्मामध्ये या बाबतीत तरी एकमत आहे का?

याॅर्कर
Sat, 09/12/2015 - 12:08 नवीन
आणि आम्ही कशाला कोणता अजेंडा राबवू ? कारण जेव्हा धर्माला ग्लानि येईल तेव्हा भगवंत अवतीर्ण होतीलच. ! त्यामुळे तुम्ही उगीच आमच्या अजेंड्याची काळजी करू नका. आणि हो, रूढी,परंपरा,संस्कृती,म्हणजे धर्म नव्हे.धर्माची व्याख्या वेगळीच आहे ती जाणून घ्या. आणि जैन,बौद्ध म्हणजे हिंदूंमधील काही कर्मकांडाना वैतागून तयार झालेले संप्रदाय आहेत त्याला नंतर धर्मांचे स्वरूप आले हा वेगळा विषय. त्यामुळे या वर्गांना धर्मांमध्ये न बघता हिंदूमधीलच एक वेगळे पंथ म्हणून बघा, आणि जाता जाता....... गौतम बौद्ध सुद्धा मांस खात होते त्यांचे इतकेच म्हणणे होते कि खास खाण्याकरिता प्राणी हिंसा करू नका,एखादा प्राणी मृत झाला असेल तर त्याचे मांस खाल्ले तर काही हरकत नाही .(हे उदाहरण बुद्धांना विष्णूंचा अवतार मानणार्या वैष्णवपंथीयांसाठी) अमेरिका,चीन,जपान,इग्लंड,फ्रांस हे काय शुद्ध शाकाहारी देश आहेत काय? त्यांची प्रगती बघा जरा. आणि मानव शराराची रचना शाक आणि मांस दोन्ही पचवू शकेल अशी आहे, मग कशाला नसती उठाठेव सगळी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मानव शराराची रचना शाक आणि

प्रसाद गोडबोले
Mon, 09/14/2015 - 13:16 नवीन
मानव शराराची रचना शाक आणि मांस दोन्ही पचवू शकेल अशी आहे, मग कशाला नसती उठाठेव सगळी?
हेच तर ना ! वैदिक धर्मात असली कसलीही नसती उठाठेव नव्हती , लोकं सर्रास मांसभक्षण कराचे , वैदिक धर्मात जितक्या काही वाईट रुढी प्रथा घुसल्या आहेत त्या सार्‍या जैन , बौध्द , अवैदिक लोकल संप्रदायातुनच घुसल्या आहेत आणि त्यातुन जे काही निर्माण झाले त्याला आज हिंदु धर्म म्हणतात !! असो . मटनाच्या धाग्यावर कशाला अस्मिता उधळताय , रसा ओरपा की निवांत ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

+१

बोका-ए-आझम
Fri, 09/11/2015 - 00:27 नवीन
हा खरा इनस्विंगिंग याॅर्कर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

सावजी मट्ण

कपिलमुनी
गुरुवार, 09/10/2015 - 13:41 नवीन
पुण्यात चांगला सावजी मटण कुठे मिळते ?
  • Log in or register to post comments

मला पुण्यातले महित नाही पण

अभ्या..
Sat, 09/12/2015 - 13:58 नवीन
मला पुण्यातले महित नाही पण सोलापुरात श्रवण सावजी, वैशाली सावजी अन मंगेश सावजीचे खिमा ऊंडे भारी असत्तात. बिर्यानी पण टिपिकल भुश्शाच्या शेगडीवरच्या मटणाच्या टेस्टसहित. अजून बरेच घरगुती सावजी बनवून देणारे आहेत. एकसे एक टेस्ट वाले. वैशाली सावजीत आधी क्वेल (तित्तर) मिळायचा. सध्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

काय तर मग

राही
Wed, 10/28/2015 - 10:37 नवीन
काय तर मग? झाला की नाही 'लंगोटकट्टा'? निदान 'गोटकट्टा' तरी?
  • Log in or register to post comments

नेमकं काय अपेक्षित आहे? ;)

प्यारे१
Wed, 10/28/2015 - 11:33 नवीन
नेमकं काय अपेक्षित आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

अपेक्षित

राही
Wed, 10/28/2015 - 13:25 नवीन
प्रतिसादातील वरील दोन शब्दांच्या साहचर्यामुळे अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण होण्याची शक्यता असली तरी आमच्या कल्पनेची भरारी गोट्=बकरा/बकरी किंवा तत्सम प्राणी इतपतच असल्याने आपण निर्धास्त असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा