✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

च
चतुरंग यांनी
Tue, 11/11/2014 - 17:41  ·  लेख
लेख
वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!! आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद? कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा. आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय. घोडा बी५ असा मोक्याच्या स्थानावर आलाय.

Book traversal links for आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

  • ‹ आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २
  • Up
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
19552 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

चुकला पुन्हा आनंद.

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:46 नवीन
वजीर बी-७ हवा होता.
  • Log in or register to post comments

रक्तपात करून एंडगेमात

आदूबाळ
Tue, 11/11/2014 - 20:49 नवीन
रक्तपात करून एंडगेमात शिरण्याऐवजी आनंदने वजीर मागे का खेचला?
  • Log in or register to post comments

वजीर सी-४

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:49 नवीन
थोडेफार चांगले खेळला आनंद.
  • Log in or register to post comments

आज मॅग्नस जिंकला तर इथून पुढे

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 20:49 नवीन
आज मॅग्नस जिंकला तर इथून पुढे आपण त्याचे फॅन.
  • Log in or register to post comments

कॉमेंट्रीत तर Qc4 पेर्फेक्ट

अनुप ढेरे
Tue, 11/11/2014 - 20:50 नवीन
कॉमेंट्रीत तर Qc4 पेर्फेक्ट मूव म्हणतायत.
  • Log in or register to post comments

कमेंटरीवाला मंतोय क्वीन सी ६

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 20:50 नवीन
कमेंटरीवाला मंतोय क्वीन सी ६ बेस्ट मूव होती नि आनंद जिंकल्यात जमा आहे.
  • Log in or register to post comments

बी-इ-५ आनंद

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:50 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments

हत्ती घेतला ना बाबा

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:51 नवीन
आनंदने..
  • Log in or register to post comments

यीई

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:59 नवीन
युप्पिइ
  • Log in or register to post comments

जिंकला रे जिंकला आपला आनंद !

प्रसाद गोडबोले
Tue, 11/11/2014 - 21:00 नवीन
जिंकला रे जिंकला आपला आनंद !
  • Log in or register to post comments

इ-६ आणी आर-सी-१

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 21:00 नवीन
मस्त.. आनंद जिंकला आज.
  • Log in or register to post comments

जिकला गडी.

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 21:01 नवीन
जिकला गडी.
  • Log in or register to post comments

आज आनंद तुफान खेळलायं

संजय क्षीरसागर
Tue, 11/11/2014 - 21:02 नवीन
त्यानं इनिशिएटिव शेवटपर्यंत कायम ठेवलाय. आणि चेसमधे इनिशिएटिवच सर्व काही आहे. कार्लसन सहजी नमणारा नाही पण आनंद जोपर्यंत गेम लीड करतोयं तोपर्यंत त्याचं काही खरं नाही. सध्या आनंदला संधी आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

बेस्ट गेम!

संजय क्षीरसागर
Tue, 11/11/2014 - 21:06 नवीन
आनंद तरुणासारखं खेळला. त्याच्या सी-प्याद्यानं शवटपर्यंत कार्लसनला खेळूच दिलं नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हिपिप हुर्रे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 21:22 नवीन
हिपिप हुर्रे हिपिप हुर्रे !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

१०० X हिपिप हुर्रे हिपिप

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/11/2014 - 21:27 नवीन
१०० X हिपिप हुर्रे हिपिप हुर्रे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मजा आली आज.

आतिवास
Tue, 11/11/2014 - 21:40 नवीन
मजा आली आज. खेळात हार- जीत चालायचीच - हे खरं असलं तरी आपला आवडता खेळाडू जिंकण्याचा आनंद वेगळाच असतो :-) अवांतरः इतके लोक आपला विजय पाहायला इच्छुक आहेत, याची आनंदला कल्पना असेल का?
  • Log in or register to post comments

मला खुप 'आनंद' झाला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 21:45 नवीन
आज डावावर निर्विवाद वर्चस्व आनंदचच होतं. पण कार्लासनचा बचावही तितकाच भक्कम असतो तेव्हा त्याचा पराभव मला बघायला मिळाला मी खुश आहे ! :-) चिअर्स ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

हॅट्स ऑफ टु विशी!!

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 22:00 नवीन
तुफान खेळला आज. मी आधीच्या समालोचना मध्ये म्हंटले होते तसे, त्याचा नैसर्गिक खेळ खुला आणि झटपट आहे, त्याची अंतस्फूर्ती जबरद्स्त आहे, त्या गोष्टी डावलून अतिविचार करुन खेळणे त्याच्या स्वभावधर्मात नाही, त्याचा खेळ दडपणाखाली कृत्रिम होत जातो. आजच्या डावाने अजूनही त्याच्यात जिंकण्याची उर्मी किती जिवंत आहे याचा रोकडा प्रत्यय आला!! कार्लसनचा बचाव भेदण्यात आज आनंद यशस्वी झाला किबहुना त्याने मॅग्नुसला बचावाची संधीच दिली नाही म्हणणे जास्त योग्य राहील. हा डाव नक्कीच त्याच्या (आणि आपल्या) फेवरिट डावांमधला एक असणार आहे! त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की एक डाव आपण हरलो की पुढचा लगेच जिंकतो, गेल्यावेळचा अपवाद होता हे सिद्ध झले!! आता कर्लसनवरती दडपण वाढले आहे हे नक्की. पुढल्या डावात काय खेळायचे याचा प्लॅन आता वेगळा बनवावा लागणार त्याला! :)
  • Log in or register to post comments

अद्याप स्पर्धा बाकी आहे हे

आतिवास
Tue, 11/11/2014 - 22:04 नवीन
अद्याप स्पर्धा बाकी आहे हे लक्षात घेऊनही, तुमचे विशेष आभार मानते. :-) तुमच्या समालोचनामुळे सामना समजायला अधिक मदत होते. त्यात इतर मिपाकरही वेळोवेळी भर घालतात त्यामुळे अधिक मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हुर्रेर्रे

रमताराम
Tue, 11/11/2014 - 22:28 नवीन
मला दोन प्रसंग आठवतात. गेलफंडने प्रथम त्याला हरवले नि चवताळलेल्या आनंदने त्याला पुढच्या डावात अठरा खेळीत अस्मान दाखवले. पण दुसरा प्रसंग आठवतो तो प्रोफेशनल चेस टूर्नामेंट मधला. तिथे असा कमबॅक केला आनंदने. पण नंतर क्राम्निकने सलग दोन डाव जिंकले आणि शेवटचा डाव तर आनंद जणू पहिल्या खेळीपासून रिजाईन केल्यासारखा औपचारिकच खेळला. तसे होऊ नये अशी इच्छा व्यक्त करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंदचे अभिनंदन!!!

एस
Tue, 11/11/2014 - 22:40 नवीन
आनंदचे अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

आनंद जिकला आज कळाल.समालोचनचा

जेपी
Wed, 11/12/2014 - 09:10 नवीन
आनंद जिकला आज कळाल.समालोचनचा बद्दल सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

एरॉन लेवॉनिअन आणि मायकल अ‍ॅडम्स यांच्यात

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 09:21 नवीन
२०१३ बिल्बाओ मास्टर्स स्पर्धेत झालेला हा डाव बघा - http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1733069 आनंद-कार्लसनचा आजचा डाव १९ व्या चालीपर्यंत तंतोतंत सारखा आहे. किंबहुना याच डावावरुन सुधारणा करुन आनंद आणि त्याच्या टीमने नवीन वेरिएशन्स शोधली आणि आनंदने ती यशस्वीरीत्या डावात वापरली. विसाव्या चालीला घोड्यांची मारामारी आणि पुढच्या दोन चालीत वजीर सातव्या पट्टीत नेऊन ठेवणे हे भलतेच परिणामकारक झाले. आनंद आणि कार्लसन यांना हा डाव चाल अन चाल आठवत असला तरी नेमक्या कोणत्या खेळीत सुधारणा करुन कोणती लाईन निवडली जाणार आहे याचा पत्ता लागणे अवघड असते आणि तिथूनच पुढचे प्रश्न हे तिथल्यातिथे बोर्डावरच सोडवावे लागतात. सहाजिकच वेळाचे आणि क्लिष्ट विश्लेषणाचे गणित साधणे अवघड असते. आज मॅग्नुस असाच वेळेच्या आणि क्लिष्ट विश्लेषणाच्या कचाट्यात सापडला आणि हरला. आता उद्या तो कोणते नवीन वेरिएशन घेऊन खेळायला येतो ते बघूयात. उद्याचा सामनाही आजच्या एवढाच उत्कंठावर्धक होईल याची खात्रीच आहे!
  • Log in or register to post comments

तिसर्‍या डावात, आनंद कार्लसनसारखा खेळला आणि

संजय क्षीरसागर
Wed, 11/12/2014 - 09:59 नवीन
कार्लसन आनंदच्या स्टाईलनं खेळला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हम्म

रमताराम
Wed, 11/12/2014 - 10:22 नवीन
तिथे घोडा वाचवण्याच्या प्रयत्नात अरोनियनने अ‍ॅड्म्सच्या वजीराला बाहेर येण्याची संधी दिली. आणि त्या वजीराला जो घोडा वाचवण्याच्या प्रयत्न केला त्यावरच मोर्चे लावता आल्याने (आणि मागच्या प्याद्याला पाठिंबा द्यायला हत्ती चटकन मिळाल्याने) अरोनियनने इनिशिएटिव गमावला. आनंदने घोडा लगेचच मटकावल्याने पीस डाउन होण्याचा धोका निर्माण केला. त्यात घोडा ताबडतोब रिक्लेम करण्याच्या नादात कार्ल्याच्या हत्तीने ए पट्टी सोडली आणि तो हत्ती आपल्याच्या प्याद्यांच्या गराड्यात विचित्र परिस्थितीत अडकला. डी प्याद्याने वजीर जेरबंद केलेला असल्याने कार्ल्याची सारीच मोहरी ठाणबंद झाली. तिकडे अ‍ॅडम्सचा वजीर बाहेर आल्याने आणि राजाकडचा हत्तीही लगेचच अ‍ॅक्टिव झाल्याने त्याला गेम वाचवता आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त!!

अविनाश पांढरकर
Wed, 11/12/2014 - 10:53 नवीन
आनंद जिंकला!!! मज्जा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

डावात आपण गेस केलेल्या

arunjoshi123
Wed, 11/12/2014 - 10:57 नवीन
डावात आपण गेस केलेल्या (अर्थात या लोकांच्या एक सहस्रांश अनालिसिससहित) एक चालीच्या प्रत्यक्ष पटावर दिसण्याने होणारा "आनंद" फार मजा देऊन जातो.
  • Log in or register to post comments

"आनंद जिंकला" याचाच खूsssप

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/12/2014 - 10:59 नवीन
"आनंद जिंकला" याचाच खूsssप आनंद आहे. त्यामुळे आजचा खेळ बघायला अजून खास मजा येणार आहे. या डावात मिळालेल्या उभारीचा उपयोग करून आनंदने या स्पर्धेत मॅग्नूसला चारीमुड्या चित करावे ! ("कम्युनिटी चेस"चा जुना-जाणता खेळाडू) इए ;) :)
  • Log in or register to post comments

ज्यांच्या ऑफिसात व्हिडिओ दिसत

arunjoshi123
Wed, 11/12/2014 - 11:00 नवीन
ज्यांच्या ऑफिसात व्हिडिओ दिसत नाही (स्पोर्ट साईट बॅन आहेत) तिथे लाईवस्ट्रीम डॉट कॉम चालत असेल तर मॅच पाहता येईल.
  • Log in or register to post comments

बुद्धी बळातले काहीच समजत नाही

स्पा
Wed, 11/12/2014 - 11:00 नवीन
तरीही इथले समालोचन वाचायला मज्जा येते आनंदचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

तसा व्यक्तिशः मी कोणी हारल्या

arunjoshi123
Wed, 11/12/2014 - 11:05 नवीन
तसा व्यक्तिशः मी कोणी हारल्या जिंकल्याने इतका एक्साईट होत नाही. पण चेन्नईमधे आनंद = ब्लंडर असे समीकरण झालेले. बाकी सगळे उत्तम पण शेवटी ब्लंडर केली म्हणून गेम गेला असे समालोचक म्हणत. शिवाय मॅग्नसला आनंदकडून याची देही याची डोळा मी पाहिलेलेच नव्हते म्हणून ही मॅच विशेष वाटलेली.
  • Log in or register to post comments

प्यादी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/12/2014 - 12:03 नवीन
मी काय तज्ञ नाही पण सी पट्टीतल्या प्यादीने कार्लसनला परेशान करुन ठेवलेलं दिसलं. कार्लसनचा वजीर हललाच नाही त्याला प्यादी वजीर होईल आणि मग डावावर आनंदचं वर्चस्व राहील असे त्याला वाटत असावे का माहिती नाही. पण ती प्यादी माझ्यातरी नजरेसमोरुन जात नै ये. मजा आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

केवळ बेसिक बुद्धिबळ माहीत

पिशी अबोली
Wed, 11/12/2014 - 15:14 नवीन
केवळ बेसिक बुद्धिबळ माहीत असणार्‍या माझ्यासारख्यांना इथलं समालोचन वाचत पाहिल्याने खरा आनंद लुटता येतो.. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा