आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
9 Nov 2014 - 5:30 pm

आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

आनंद मारामारी इनीशिएट करणार नाही.

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 8:46 pm | संजय क्षीरसागर

आनंद Rb7 आणि b5 कसं काय खेळला? त्याच्याकडे काही तरी अत्यंत भेदी प्लान असणारे!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:49 pm | चतुरंग

आपण मारामारी इनीशिएट करायची नाही. बालेकिल्ल्यावर मोर्चे धरुन बसायचं. तसंही तो या स्थितीत काही करु शकत नाही. जो काय हल्ला करायचा आहे तो मॅग्नुसच करणार आहे. त्यामुळे कवचात जाऊन बसणे सगळ्यात श्रेयस्कर!!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:51 pm | चतुरंग

फक्त पाठीवरती उताणे पडणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागणार अन्यथा पोट उघडे पडेल!!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:47 pm | चतुरंग

पाणी डुचमळवून मॅग्नुसला विचलित करणे हा बचावाचा एक भाग असू शकतो. अ‍ॅटॅक इज बेस्ट डिफेन्स या तत्त्वावरती!!

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 8:52 pm | संजय क्षीरसागर

सगळा खेळ फक्त एका घरावर आहे E-8! आणि आनंदचं काही तरी अगम्य चाललंय!

रामदास's picture

9 Nov 2014 - 8:56 pm | रामदास

फीबल -अशक्त अपुरा बचाव झाला आता हे प्यादं आलं फुडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2014 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंतिम ट्प्प्यात येतोय आणि आनंदला फारशी हालचाल करायला संधी नाही.

-दिलीप बिरुटे

मोहर्‍यांची अदलाबदली करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू झाला आनंदचा. हत्तींची मारामारी करण्याचा प्रस्ताव दिलाय.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 9:08 pm | चतुरंग

हत्ती ई८ मधे आला तरी आनंद मारामारी करणार नाहीये!!
हत्ती तिथे बसून राहील मॅग्नुस हत्ती मारु शकत नाही कारण एफ ८ घरावर दुसरा जोर नाहीये. आता हत्तींची मारामारी झाली तर आनंदला फेवरेबल आहे. ती क्शी टाळायची हा प्रश्न मॅग्नुसला सोडवावा लागेल!

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 9:12 pm | संजय क्षीरसागर

Now after Re7 Qxf5?? can you spot the winning idea?

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 9:25 pm | चतुरंग

तो मॉडेल सुद्धा आहेच ना! त्यामुळे तो आता मॉडेल मोडमधे आहे.

वाचते आहे. प्रतिसादांतून खेळी समजून घेते आहे.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 9:21 pm | चतुरंग

१-० मॅग्नुस! आज मॅग्नुस तुफान खेळला. आनंद डिड्न्ट हॅव अ चान्स!! हॅट्स ऑफ!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2014 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भेटू यानंतरच्या सामन्याला. :(

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 9:24 pm | चतुरंग

हात पुन्हा पोळून घेतले. मॅग्नुस निर्विवाद वरचढ ठरला. आनंदला एका विश्रांतीच्या दिवसानंतर काही करता येते काबहे तातडीने बघावे लागेल. अन्यथा मॅग्नुस असा खेळायला लागला तर सामना ८ डावात संपायचा!!

पेपरातच वाचीन काय ते. काय झालं तर बायको पण नाहीय्ये घरी सध्या . !
(कुकरचं झाकण पडलं आहे .सांडगी मिरची शोधणे. वरच्या कप्प्यात एफ ४ वगिरे कुठेतरी असेल.)

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 9:33 pm | चतुरंग

खिडकी नीट लावून घ्या. आणि दूध फ्रीजमधे टाका, शेजारच्यांचा बोका येतो हे आठवून गेले!! :)

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 9:32 pm | चतुरंग

न खेळणे आनंदला महागात पडले अन्यथा डाव वाचवण्याची जरा तरी शक्यता होती..

आज खूप वर्षांनी बसून बुद्धीबळाचा डाव फॉलो केला. समालोचनामुळे मजा आली.

चतुरंग, प्रा डॉ, रमताराम, रामदास, संक्षी: तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! धावत्या समालोचनाबद्दल धन्यवाद!

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 5:42 pm | केदार-मिसळपाव

तिकडे तिसर्या खेळात राडा होतोय. आनंद चे प्यादे ठेट सी-७ मधे आलेय. चतुरंग कुठे आहात?

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 5:43 pm | चतुरंग

धागा काढलाय नवा. तिकडेच लिहा.