Skip to main content

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

लेखक चतुरंग यांनी रविवार, 09/11/2014 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25901
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

आपण मारामारी इनीशिएट करायची नाही. बालेकिल्ल्यावर मोर्चे धरुन बसायचं. तसंही तो या स्थितीत काही करु शकत नाही. जो काय हल्ला करायचा आहे तो मॅग्नुसच करणार आहे. त्यामुळे कवचात जाऊन बसणे सगळ्यात श्रेयस्कर!!

In reply to by चतुरंग

फक्त पाठीवरती उताणे पडणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागणार अन्यथा पोट उघडे पडेल!!

पाणी डुचमळवून मॅग्नुसला विचलित करणे हा बचावाचा एक भाग असू शकतो. अ‍ॅटॅक इज बेस्ट डिफेन्स या तत्त्वावरती!!

अंतिम ट्प्प्यात येतोय आणि आनंदला फारशी हालचाल करायला संधी नाही. -दिलीप बिरुटे

मोहर्‍यांची अदलाबदली करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू झाला आनंदचा. हत्तींची मारामारी करण्याचा प्रस्ताव दिलाय.

In reply to by संजय क्षीरसागर

हत्ती ई८ मधे आला तरी आनंद मारामारी करणार नाहीये!! हत्ती तिथे बसून राहील मॅग्नुस हत्ती मारु शकत नाही कारण एफ ८ घरावर दुसरा जोर नाहीये. आता हत्तींची मारामारी झाली तर आनंदला फेवरेबल आहे. ती क्शी टाळायची हा प्रश्न मॅग्नुसला सोडवावा लागेल!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो मॉडेल सुद्धा आहेच ना! त्यामुळे तो आता मॉडेल मोडमधे आहे.

हात पुन्हा पोळून घेतले. मॅग्नुस निर्विवाद वरचढ ठरला. आनंदला एका विश्रांतीच्या दिवसानंतर काही करता येते काबहे तातडीने बघावे लागेल. अन्यथा मॅग्नुस असा खेळायला लागला तर सामना ८ डावात संपायचा!!

पेपरातच वाचीन काय ते. काय झालं तर बायको पण नाहीय्ये घरी सध्या . ! (कुकरचं झाकण पडलं आहे .सांडगी मिरची शोधणे. वरच्या कप्प्यात एफ ४ वगिरे कुठेतरी असेल.)

In reply to by रामदास

खिडकी नीट लावून घ्या. आणि दूध फ्रीजमधे टाका, शेजारच्यांचा बोका येतो हे आठवून गेले!! :)

आज खूप वर्षांनी बसून बुद्धीबळाचा डाव फॉलो केला. समालोचनामुळे मजा आली. चतुरंग, प्रा डॉ, रमताराम, रामदास, संक्षी: तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! धावत्या समालोचनाबद्दल धन्यवाद!

तिकडे तिसर्या खेळात राडा होतोय. आनंद चे प्यादे ठेट सी-७ मधे आलेय. चतुरंग कुठे आहात?