Skip to main content

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

लेखक चतुरंग यांनी रविवार, 09/11/2014 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25797
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

आता आनंदला हत्ती डी७ असा घेता येत नाही कारण मगहहत्तीने ई८ असा चेक आणि मग आनंदच्या हत्तीने मारामारी केळी की वजिराने ई ८ वरचा हत्ती मारुन मेट!!

दबा धरुन बसलाय मॅग्नुस बोर्डावरती!! आज आनंदच्या बचावाचा कस लागणार!!

एच प्याद्याला पट्टी मोकळी करुन देणार की काय मॅग्नुस? त्याला बर्‍याच मुव्ज आहेत त्यामुळे आनंदचे काम कठिण होते आहे!!

हत्ती ई६ मधे आला. आता वजीर एफ ६ आणून आनंद वजिरावजिरीला आमंत्रण देणार का? एफ ४ वरचे प्यादे बिनजोरी आहे त्यामुळे त्याचा विचारही करावा लागेलच..परिस्थिती कालच्यापेक्षा कठिण आहे :(

एच ६ असे प्यादे सरकवून आनंदला वेंट ओपनिंग करुन ठेवावे लागणार अन्यथा दोन्ही हत्ती मागच्या पट्टीत अडकून पडतील आणि वजीर अतिताणाचा बळी ठरेल!!

आधी प्यादे घेणार! म्हणजे मग एक पॉन डाउन असल्याचा मानसिक तणाव बचावाच्या कठिणपणात भर घालेल..

In reply to by चतुरंग

माझ्या मते त्याचं सगळं लक्ष फक्त एका घरावर केंद्रित आहे : E-7! आनंदची एक चूक आणि डाव जाईल.

वजीर डी७ खेळला. आता हत्ती ई४ येणार. त्याला आनंदचे उत्तर एच ६ असे असेल आणि मग राजा एफ ८!

मॅग्नुस प्रॉफिलॅकमुव्ह्,ऊव्ज करतो हे जे काल म्हंट्ले होते त्याचा पुरावा. सद्यस्थितीत काळा जेरबंद आहे तोवरच बचावाची तयारी करुन घेणे म्हणजे बॅकरँक चेक्स बसणार नाहीत! क्या बात है!! मॅग्नुस इज ऑस्सम!!

माताय, असली जबरा कंमट्री फक्त जेष्ठ मिपाकरच करु शकतात. कंमेट्री चालु राहु द्या.

कार्लसनचा राजा अभेद्य स्थितीत गेलायं! आता तो हल्ला करायला मोकळा आणि आनंदला फक्त बचावाशिवाय पर्याय नाही!

एका रस्त्यावर तीन अवजड वहाने आणली आहेत मॅग्नुसने!! काम चालू रस्ता बंद!!! :)

आनंद Rb7 आणि b5 कसं काय खेळला? त्याच्याकडे काही तरी अत्यंत भेदी प्लान असणारे!

In reply to by संजय क्षीरसागर

आपण मारामारी इनीशिएट करायची नाही. बालेकिल्ल्यावर मोर्चे धरुन बसायचं. तसंही तो या स्थितीत काही करु शकत नाही. जो काय हल्ला करायचा आहे तो मॅग्नुसच करणार आहे. त्यामुळे कवचात जाऊन बसणे सगळ्यात श्रेयस्कर!!

In reply to by चतुरंग

फक्त पाठीवरती उताणे पडणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागणार अन्यथा पोट उघडे पडेल!!

पाणी डुचमळवून मॅग्नुसला विचलित करणे हा बचावाचा एक भाग असू शकतो. अ‍ॅटॅक इज बेस्ट डिफेन्स या तत्त्वावरती!!

अंतिम ट्प्प्यात येतोय आणि आनंदला फारशी हालचाल करायला संधी नाही. -दिलीप बिरुटे

मोहर्‍यांची अदलाबदली करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू झाला आनंदचा. हत्तींची मारामारी करण्याचा प्रस्ताव दिलाय.

In reply to by संजय क्षीरसागर

हत्ती ई८ मधे आला तरी आनंद मारामारी करणार नाहीये!! हत्ती तिथे बसून राहील मॅग्नुस हत्ती मारु शकत नाही कारण एफ ८ घरावर दुसरा जोर नाहीये. आता हत्तींची मारामारी झाली तर आनंदला फेवरेबल आहे. ती क्शी टाळायची हा प्रश्न मॅग्नुसला सोडवावा लागेल!

१-० मॅग्नुस! आज मॅग्नुस तुफान खेळला. आनंद डिड्न्ट हॅव अ चान्स!! हॅट्स ऑफ!!

हात पुन्हा पोळून घेतले. मॅग्नुस निर्विवाद वरचढ ठरला. आनंदला एका विश्रांतीच्या दिवसानंतर काही करता येते काबहे तातडीने बघावे लागेल. अन्यथा मॅग्नुस असा खेळायला लागला तर सामना ८ डावात संपायचा!!

पेपरातच वाचीन काय ते. काय झालं तर बायको पण नाहीय्ये घरी सध्या . ! (कुकरचं झाकण पडलं आहे .सांडगी मिरची शोधणे. वरच्या कप्प्यात एफ ४ वगिरे कुठेतरी असेल.)

न खेळणे आनंदला महागात पडले अन्यथा डाव वाचवण्याची जरा तरी शक्यता होती..

आज खूप वर्षांनी बसून बुद्धीबळाचा डाव फॉलो केला. समालोचनामुळे मजा आली. चतुरंग, प्रा डॉ, रमताराम, रामदास, संक्षी: तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! धावत्या समालोचनाबद्दल धन्यवाद!

तिकडे तिसर्या खेळात राडा होतोय. आनंद चे प्यादे ठेट सी-७ मधे आलेय. चतुरंग कुठे आहात?

In reply to by केदार-मिसळपाव

धागा काढलाय नवा. तिकडेच लिहा.