दीप

समयांत's picture
समयांत in जे न देखे रवी...
21 Dec 2012 - 11:30 am

तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे
गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले
शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने
अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...

शांतरसचारोळ्याप्रेमकाव्यप्रतिशब्दव्युत्पत्तीशब्दक्रीडादेशांतर

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

21 Dec 2012 - 11:55 am | स्पंदना

देवजाणे काय लिहिलय.

मग समजत नसल की लय भारी म्हणायच असत. तस लय भारी!!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2012 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्याकडून एक छोटी भेट :-
.

समयांत's picture

21 Dec 2012 - 3:06 pm | समयांत

पुस्तक लॉक्ड ओह्ह, तसं हे आवडलंय गिफ्ट.
अनलॉक करायचा प्रयत्न करतो. :)

ह भ प's picture

21 Dec 2012 - 3:32 pm | ह भ प

दैदिप्यमान सुर्याची दुसरी प्रतिमा पृथ्वीवर बनवणे सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचं, पण चिमुकल्या पणतीमधे त्याचा अंश सामावलेला असतो.. तशात तापलेल्या जमिनीत पण शिशीर उन्मळू पहातो.. त्याचं प्रतीक म्हणजे तो कोंब.. उसळी घेऊ पहाणारा..
वाह!! मानलं तुमच्या प्रतिभेला समयांत.. मस्तच लिहिलय..

समयांत's picture

21 Dec 2012 - 4:30 pm | समयांत

धन्यवाद ;)

सस्नेह's picture

21 Dec 2012 - 10:17 pm | सस्नेह

अवांतर : शिशिरात कोंब येतात का ? (झाडांना/प्रतिभेला)

समयांत's picture

21 Dec 2012 - 11:23 pm | समयांत

कोंब कुणी उगवला आहे बघा जरा, मी शिशिरातला अंकुर उगवला आहे. ;)

५० फक्त's picture

21 Dec 2012 - 11:24 pm | ५० फक्त

नशीब त्या कंसात अजुन काही लिहिलं नाहित ते.

समयांत's picture

21 Dec 2012 - 11:30 pm | समयांत

लोकं कोंब उगवण्याची भारी वाट बघतात.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2012 - 10:27 am | परिकथेतील राजकुमार

कुठे ?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2012 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा

=))

समयांत's picture

23 Dec 2012 - 9:09 pm | समयांत

अर्थात मिपावर परा आणि अआ ;)

निवेदिता-ताई's picture

21 Dec 2012 - 4:57 pm | निवेदिता-ताई

:)

समयांत's picture

22 Dec 2012 - 7:40 pm | समयांत

आवडलं असं समजून आभार मानतो.

अनुप कुलकर्णी's picture

23 Dec 2012 - 9:52 pm | अनुप कुलकर्णी

पहिल्या दोन ओळी वाचून रवींद्रनाथांची कविता आठवली... आपली कविता तर त्याच्याही २ ओळी पुढे जाणारी... खूप सुंदर!

मावळतीला जाताना सूर्याने प्रश्‍न केला,
"माझ्‍यानंतर या जगाला प्रकाश देण्‍याचे काम कोण करील?"..
चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्‍तब्‍ध उभे राहिले..
तेव्‍हां एक चिटुकली पणती चटकन्‌ पुढे होऊन म्‍हणाली,
"प्रभो,माझ्‍याकडून जितके होईल, तितके मी करीन......."

- रवींद्रनाथ टागोर

समयांत's picture

23 Dec 2012 - 10:47 pm | समयांत

अनुप
धन्यवाद. मला रविन्द्रनाथांचे साहित्य माहीत नाही आहे, तरी त्यांच्या प्रतिभेची आठवण माझ्या साध्याश्या ओळींमुळे करून दिलीत आभार.
:)