Skip to main content

दीप

लेखक समयांत यांनी शुक्रवार, 21/12/2012 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...
काव्यरस

वाचने 4110
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

पुस्तक लॉक्ड ओह्ह, तसं हे आवडलंय गिफ्ट. अनलॉक करायचा प्रयत्न करतो. :)

दैदिप्यमान सुर्याची दुसरी प्रतिमा पृथ्वीवर बनवणे सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचं, पण चिमुकल्या पणतीमधे त्याचा अंश सामावलेला असतो.. तशात तापलेल्या जमिनीत पण शिशीर उन्मळू पहातो.. त्याचं प्रतीक म्हणजे तो कोंब.. उसळी घेऊ पहाणारा.. वाह!! मानलं तुमच्या प्रतिभेला समयांत.. मस्तच लिहिलय..

पहिल्या दोन ओळी वाचून रवींद्रनाथांची कविता आठवली... आपली कविता तर त्याच्याही २ ओळी पुढे जाणारी... खूप सुंदर! मावळतीला जाताना सूर्याने प्रश्‍न केला, "माझ्‍यानंतर या जगाला प्रकाश देण्‍याचे काम कोण करील?".. चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्‍तब्‍ध उभे राहिले.. तेव्‍हां एक चिटुकली पणती चटकन्‌ पुढे होऊन म्‍हणाली, "प्रभो,माझ्‍याकडून जितके होईल, तितके मी करीन......." - रवींद्रनाथ टागोर

अनुप धन्यवाद. मला रविन्द्रनाथांचे साहित्य माहीत नाही आहे, तरी त्यांच्या प्रतिभेची आठवण माझ्या साध्याश्या ओळींमुळे करून दिलीत आभार. :)