औद्योगीक इसापनीती भाग दोन - फिताधारी कुत्री

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
1 Jul 2008 - 4:37 am

भाग एक- http://www.misalpav.com/node/2330

फिताधारी कुत्री

एका शेतकर्‍याकडे बरीच कुत्री होती. ती घर, शेती, बैल वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच तेच काम करून कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात मग स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले हे मामुली काम रोज पाट्या टाकायचे! अशा वातावरणात मग ती कुत्री नीट काम करीत नसत. त्यांचा कामातील जोश वाढवायला शेतकर्‍याने एक युक्ती केली. काही चांगली कामसू कुत्री निवडून त्यांना चांगल्या कामाचे कौतूक म्हणून गळ्यात घालायला सभारंभपूर्वक रंगीत फिता दिल्या. ती कुत्री मोठ्या दिमाखाने गळ्यात रंगीत फिता घालून मिरवायची. त्या फितांचे महत्व इतके वाढले की सुट्टीच्या वेळात देखील इकडे तिकडे फिरतांना ती कुत्री फिता गर्वाने धारण करून फिरायची. ज्यांना रंगीत फिता मिळाल्या नव्हत्या, ती कुत्री फिताधारी कुत्र्यांचा हेवा करायची. त्यातली काही जोमाने काम करून फिता मिळवायचा प्रयत्न करायची. गळ्यात फिता असणे हे कर्तुत्वाचे लक्षण आणि फॅशन झाले. असे एकूण ठीक सुरू होते. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.

एकदा माळरानावर बरीच कुत्री एकत्र जमून मौजमजा करत होती. त्यात एक फिताधारी पण होता. तो अर्थातच गर्वाने आपल्या फितेचे प्रदर्शन करीत होता. सर्वांच्या गप्पा, कोरस भुंकणी ह्यांना रंग चढला होता. इतक्यात शेतकर्‍याचा नोकर आपल्या कामसू कुत्र्याला शोधत तिथे आला. गळ्यातील रंगीत फित पाहून त्याने कामसू कुत्रा बरोबर ओळखला. त्याच्या फितेला पकडून नोकर त्याला कामासाठी घेऊन गेला. सगळी मजा सोडून जातांना कामसू कुत्र्याला वाईट वाटले. पण तरी सुद्धा, आपण खूप महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकीच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणत तो फिताधारी मोठ्या दिमाखाने पार्टीतून बाहेर पडला. तेव्हा काही बिनफिताधारी कुत्री त्याच्याकडे हेव्याने पाहू लागली. आजुबाजुच्या पार्टीचा नंतर त्यांना आनंद देखील उरला नाही.

बोध-
१) कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते.
२) फॅशनचे, पदकांचे वेड पसरवून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
३) निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात.

कलाकथासमाजजीवनमानप्रकटनविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

1 Jul 2008 - 7:21 am | सहज

औद्योगीक इसापनीती वाचायला मजेशीर आहे.

पुढची कथा वाचायला उत्सुक.

:-)

यशोधरा's picture

1 Jul 2008 - 7:27 am | यशोधरा

कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते.

अगदी, अगदी :(
पारतंत्र्यच अगदी.... #o

अमोल केळकर's picture

1 Jul 2008 - 9:13 am | अमोल केळकर

१) कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते.

अगदी खरे . ' भिक नको पण कुत्रे आवर ' अशी अवस्था होते

वेताळ's picture

1 Jul 2008 - 9:29 am | वेताळ

आधुनिक इसापनीतिच्या पुढिल गोष्टीची वाट पहात आहे.
वेताळ

प्रणित's picture

1 Jul 2008 - 10:10 am | प्रणित

सध्या तेच अनुभवतोय !!!!!










१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४ तास........

जरा सुखाने झोपाव तर वाजला ह्याचा फोन.......

आनंदयात्री's picture

1 Jul 2008 - 10:19 am | आनंदयात्री

इसापनीती मस्तच!!
पण कथा जुन्या इसापनीतीतील पात्रं घेउन आल्या तर अजुन मजा येईल असे वाटले.

विसोबा खेचर's picture

1 Jul 2008 - 10:38 am | विसोबा खेचर

मोबाईलच्या फितीची बोधकथा मस्तच! :)

आपला,
(मोबाईलफीतधारी कुत्रा) तात्या.

सुचेल तसं's picture

1 Jul 2008 - 10:39 am | सुचेल तसं

ह्या गळ्यात घालायच्या फितीवरुन आठवलं, काही लोक ऑफिस व्यतिरिक्त सुद्धा कंपनीचं आय-कार्ड गळ्यात घालुन हिंडत असतात.

http://sucheltas.blogspot.com

अरुण मनोहर's picture

1 Jul 2008 - 11:06 am | अरुण मनोहर

आय कार्डच्या फितेवरूनच ही कथा सुचली होती. गळ्यात आय कार्ड हा साखळीवाला टॅग आहे. मोबाईल हा बिनतारी साखळी असलेला स्लेव्ह टॅग आहे!

कुंदन's picture

1 Jul 2008 - 11:58 am | कुंदन

>>मोबाईल हा बिनतारी साखळी असलेला स्लेव्ह टॅग आहे
मुंबईला लोकलच्या गर्दीत मोबाईल चोरला जाउ नये म्हणुन आम्हाला मोबाईल ला देखील टॅग लावुन गळ्यात लटकवावा लागतो.

मराठी_माणूस's picture

1 Jul 2008 - 11:38 am | मराठी_माणूस

आणि ती कंपनी जर नामांकित असेल तर त्याना तसे करण्याचा अभिमान वाटतो असे दिसते

कुंदन's picture

1 Jul 2008 - 11:17 am | कुंदन

>>कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते.

मी तर प्रत्यक्ष मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीत काम करत होतो. कं स्वतःच सेवा पुरवठादार , त्यामुळे बिलाची काळजी नाही.
त्यातुन जवळ जवळ १४ महिने बिलिंग विभागात मी एकटाच होतो, कोणी बॅक अप ही नव्हता. त्यामुळे २४*७ प्रकारातील काम.
अक्षरशः छळवाद होता तो.

>> निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात.
पण त्या जबाबदारीच्या कामामुळेच ज्ञानात बरीच भर पडत राहीली.

मराठी_माणूस's picture

1 Jul 2008 - 11:29 am | मराठी_माणूस

निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात

कटु सत्य

वरदा's picture

1 Jul 2008 - 8:07 pm | वरदा

ही औद्योगिक इसापनितीची आयडिया मस्तच आहे....

(नुकताच 'वर्क वर्थ डुइंग'चं ऍवॉर्ड मिळवून त्याचा टॅग गळ्यात घातलेली)
वरदा

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अरुण मनोहर's picture

2 Jul 2008 - 3:58 am | अरुण मनोहर

धन्यवाद.
वरदा तुला कदाचित माहित असेल, टॅग न मिळालेले काही श्वान तुझ्याकडे असुयेने पहात असतील!

हेरंब's picture

1 Jul 2008 - 10:18 pm | हेरंब

दोन्ही भाग वाचायला मजा आली. अशाच आणखी येऊ द्यात्.

(कोणाचीही फीत गळ्यात न बांधण्याचे स्वातंत्र्य असलेला) हेरंब

सुद्धा अशीच एक फित आहे..

त्यातून तुमचा मोबाईल नं तुमच्या मॅनेजर कडे असेल तर संपलच

अरुण मनोहर's picture

2 Jul 2008 - 4:01 am | अरुण मनोहर

घरून कामे करणार्‍यांना दोन बॉसेसचे ओरडणे ऐकावे लागते. एक ऑफीसचा मॅनेजर, दुसरा घरातला (घरात असेल तर)

शितल's picture

1 Jul 2008 - 11:39 pm | शितल

आधुनिक इसापनिती ची गोष्ट मस्त.