✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रिय कॅटरीना,

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 07/21/2011 - 12:23  ·  लेख
लेख
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :) राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..! पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :) आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :) असो.. यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..! सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस... बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :) तुझा, तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
बातमी
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
57468 वाचन

💬 प्रतिसाद (173)

प्रतिक्रिया

षटकार .............

शाहिर
Fri, 07/22/2011 - 15:44 नवीन
प्रत्यक्ष भेटच घ्या आणि आपआपले कंड शमवा. Image removed. परा भौ ....खतरनाक टायमिंग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वेगळे वळण?

अजातशत्रु
Fri, 07/22/2011 - 13:01 नवीन
काय राव अवांतर वाचा कि { द्वेषकथेतील खाजकुमार }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

एकलव्या चा उल्लेख

शाहिर
Fri, 07/22/2011 - 15:15 नवीन
याला आमच्याकडे " सांगायला गेला कि टांगायला नेणे" अस वाक प्रचार आहे ... इथे धनुर्विद्ये मधे श्रेष्ठ कोण हा प्रश्न नाही .. पुराणा मधे पुर्ण पुरुष कोणास म्हणले आहे हा आहे .. (कैच्या काय चाल्लय राव )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

एकलव्या चा उल्लेख

अजातशत्रु
Sat, 07/23/2011 - 16:41 नवीन
याला आमच्याकडे " सांगायला गेला कि टांगायला नेणे" अस वाक प्रचार आहे ...
तुमच्या कडे म्हणजे नक्कि कुठे ?
इथे धनुर्विद्ये मधे श्रेष्ठ कोण हा प्रश्न नाही ..
हो नव्हताच,पुढे हे आल्यामुळे तो उल्लेख आला
अर्जुनाला असामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे होती असं सरळ सरळ म्हणा ना राव लोकं कन्फ्यूज होत्याल. त्याचे हात लांबीला गूड्घ्यापर्यंत पोचत असही ऐकलं होतं. बाकी व्हाय सामान्य पूरूषा निड टिट्स इज येट अन स्वाल्ड मिस्ट्री होय ना ?
अर्जुनाची वैयक्तिक माहिती, *त्या माहिती बद्दल धन्यवाद. जौ द्या स्तनाग्रा वरुन हे आठवले पहा आणि मजा घ्या, चील ;) http://www.youtube.com/watch?v=GKia0LdQx1w&feature=player_detailpage अवांतरः काहिंना म्हणे आता यावर स्वप्न पडू लागलीएत, काय पण असतात एक एक :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

पूर्ण पुरुष

शाहिर
Fri, 07/22/2011 - 09:05 नवीन
अहो ..वरती पुर्ण पुरु षाची चर्चा चालली होति ... गुगलून बघितले ..तर "अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती" असा सन्दर्भ सापडला ... मि कशाला जावु पुरावा शोधायला .. (आणि आपण नाही हां त्यातले ..दुसर्‍या पुरुषा कडे बघायला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

माफ करा, तात्यासाहेब, पण

विसोबा खेचर
गुरुवार, 07/21/2011 - 12:48 नवीन
माफ करा, तात्यासाहेब, पण त्याच न्यायाने आपणही जन्माने अर्धेच पुरुष आहात असे म्हणावे लागेल. पहा विचार करून.
विचार करून पाहिला. परंतु आपले म्हणणे पटत नाही. असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

:) :) :) :) ही ही

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 07/21/2011 - 12:40 नवीन
:) :) :) :) :) :) :) :) :) ही ही
  • Log in or register to post comments

वेळोवेळी कथा सजवण्यासाठी

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 07/21/2011 - 12:42 नवीन
वेळोवेळी कथा सजवण्यासाठी वैग्रे असला; तरी 'बेटा' या शब्दाचा अतिरेकी दुरुपयोग खटकला. बेटा/ताई हे शब्द योग्य ठिकाणी आणि मनापासुन वापरले तरच ते शोभुन दिसतात. अन्य्था त्या शब्दांमागील पवित्र नात्यांचा अपमान होतो असे माझे स्पष्ट मत आहे. बाकी लेख सर्वसाधारण ठीक आहे. तात्या या प्रतिसादामागील भावना समजुन घेउन स्पष्ट प्रतिसादाबद्दल रागवणार नाहीत अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

तात्या या प्रतिसादामागील

विसोबा खेचर
गुरुवार, 07/21/2011 - 12:46 नवीन
तात्या या प्रतिसादामागील भावना समजुन घेउन स्पष्ट प्रतिसादाबद्दल रागवणार नाहीत अशी आशा आहे.
त्यात रागवायचं काय साहेब? आपल्या मताचा निश्चितच आदर आहे.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

त्यात रागवायचं काय साहेब?

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 07/21/2011 - 21:15 नवीन
त्यात रागवायचं काय साहेब? आपल्या मताचा निश्चितच आदर आहे..
आम्ही आपले आभारी आहोत तात्या! :) - इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अह,,, सोनिया गांधी ह्या

ईश आपटे
गुरुवार, 07/21/2011 - 12:43 नवीन
अह,,, सोनिया गांधी ह्या देशाच्या अप्रत्य़क्ष महाराणी आहेत... व इटालिअन वंशाचे राउल हे युवराज, त्यांच्याबद्द्ल अशी टिप्पणी ???? माफी मागितलीच गेली पाहिजे................ आत्मशून्य इथे मिपावर खंडीभर निष्ठावान निघतील ज्यांना कॅट च्या टिपण्णी चा भयंकर राग आला असेल , व ह्या मागे भाजपच आहे असा त्यांचा दावा असेल....तत्काळ अशा राऊलप्रेमींनी इथे निषेध व्यक्त करावा...........
  • Log in or register to post comments

आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी

ईश आपटे
गुरुवार, 07/21/2011 - 12:51 नवीन
आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी येऊन इटलीप्रेम दाखवायला सुरुवातकेली सुध्दा ? ... वा वा काय स्पीड आहे...व काय देशनिष्ठा आहे ................आता काही मान्यवरांनी अडवाणी कसे फाळणीपूर्वी पाकिस्तानात जन्मलेले होते मग ते भारतीय कसे असा एक छान लेख टाकावा..... शिवाय भंकसछाप प्रतिसादांचा पाऊस पाडून मूळ मांडलेल्या विषयाची चेष्टा करावी व आपले इटलीप्रेम सिध्द करावे................
  • Log in or register to post comments

अरे हो हो!!

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 13:02 नवीन
राग आवरा आपटेसाहेब! शांत व्हा. हवे तर थंड (इटालियन) वाइन घ्या. (इनो बाळगत असालच!) तर तोही थंड पाण्यातून घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

अरेरे राहुल प्रेमिनि

धिन्गाना
Fri, 07/22/2011 - 12:48 नवीन
एकदम सहमत. मुळ विशय कतरिना चा चालला होता.जे खरे आहे ते म्हटल्याबद्दल कोन्ग्रेस च्या नाकाला मिरच्या झोम्बल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

आत्ताच हाती आलेल्या

प्यारे१
गुरुवार, 07/21/2011 - 12:57 नवीन
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, दिग्विजयसिंग यांनी कतरीना कैफ ही राष्ट्र सेविका समितीची सेविका असून, सलमान खान हा संघाचा कट्टर प्रचारक असल्याचे सुचित केले आहे. ;)
  • Log in or register to post comments

च्यायला. बेक्कार हसलो हे

मृत्युन्जय
गुरुवार, 07/21/2011 - 13:01 नवीन
च्यायला. बेक्कार हसलो हे वाचुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दिग्गीराजाला मात्र अलिकडे

विसोबा खेचर
गुरुवार, 07/21/2011 - 13:04 नवीन
दिग्गीराजाला मात्र अलिकडे अंमळ खूळच लागले आहे. परवा मुंबैत झालेल्या बाँबस्फोटात रा स्व संघाचा हात आहे असं तो म्हणाला. रा स्व संघाचं कार्य, त्याच्या देशनिष्ठा या सार्‍या काय गोष्टी आहेत, किती खोल आहेत हे समजण्याइतकी बुद्धी दुर्दैवाने दिग्गीराजाला नाही त्याला तो तरी बापडा काय करणार..?! असो.. (कट्टर संघप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तात्या, दिग्गीराजा बापडे की

प्यारे१
गुरुवार, 07/21/2011 - 13:16 नवीन
तात्या, दिग्गीराजा बापडे की खुळे की आणखी कसे आहेत याची नक्की काही कल्पना नाही. ते तसे असतील तर मीडियासमोर का बोलत असावेत? काँग्रेस कल्चर मध्ये मॅडमच्या आज्ञेशिवाय 'अमुक'देखील करता येत नाही असे ऐकिवात आहे. (अमुक करा पण नांदा या म्हणीतील शब्द असू शकतो, शकत नाही किंवा कसेही) असे असल्यास हायकमांडची दिग्गी जे म्हणतात त्याला मान्यता असते का ? मान्यता असली तर कशाच्या आधारावर असते? नसेल तर वारंवार 'तोंडघशी' पडणार्‍या या व्यक्तीचे तुटलेले नाक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने काँग्रेस हायकमांड यांना इस्पितळात का पाठवित नाही? असे अनेक प्रश्न उद्भवतात. कोण बरे उत्तरे देईल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

माफी कसलि त्यात ?

चिमी
गुरुवार, 07/21/2011 - 13:14 नवीन
काही एक गरज नाही कतरिनाला माफी मागायची. सत्य हे नेहमीच कटू असत न ते पचवण्याची ताकद ठेवलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments

खरं बोल्लीस बघ चिमे! पण ते

रेवती
गुरुवार, 07/21/2011 - 18:05 नवीन
खरं बोल्लीस बघ चिमे!;) पण ते कटू सत्य पचवणं ज्याच्यात्याच्या पचनशक्तीवर अवलंबून असतं त्या कॅटरिनाअक्काकडे बघ एकदा. अजून टकाटक दिसत्येय. चाराठ शिनेमे कुठे गेले नाहीत अजून. ती कश्याला पायावर धोंडा पाडून घील? म्हणेल,"मरेनात का बाकीचे......मी वादात अडकणार नाही........माफी मागून हे प्रकरण संपवूया (म्हणजे नवे चालू करता यील)."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमी

इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच...

योगप्रभू
गुरुवार, 07/21/2011 - 13:18 नवीन
प्रिय तात्या, माझ्या सौंदर्याबद्दलच्या कॉम्प्लिमेंट्सबद्दल मेनी मेनी थँक्स. मला 'बेटा' म्हणून तुम्ही अगदी लाजवलंत हं. अहो माझा जन्म १९८४ चा. सध्या मी २७ वर्षांची घोडी आहे. तुम्ही चाळीशी पार केलीत ठीक आहे. पण 'बेटा' म्हणू नका. तो 'सल्लू' ४६ वर्षांचा आहे. (त्याचा जन्म १९६५ चा). तरी इतके दिवस माझ्या मागे मागे फिरत होता. पण तुमच्यासारखं त्यानं नाही कधी मला 'बेटा' म्हणून हाक मारली. आता तुम्हीच मला 'बेटा' म्हणलंत तर त्याची अडचण नाही का होणार? बाकी माफी मागितलेल्या विषयावर पुन्हा काही बोलत नाही. उगीच 'दबंग' लोक त्रास देत सुटतात. आणखी एक विनंती. तुम्ही सारे भारतीय माझ्या पाठीमागे कशाला उभे राहाता? तिथून माझा डान्स नीट नाही बघता येणार. त्यापेक्षा स्टेजसमोर बसा. तुमची शीला (माय नेम इज शीला)
  • Log in or register to post comments

ख ल्ल्ला स ! प्रभू आपल्याकडून

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 13:23 नवीन
ख ल्ल्ला स ! प्रभू आपल्याकडून ह्या प्रतिसादाबद्दल एक 'स्ट्राँग' ची मानवंदना. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

प्रतिसाद एक नंबर्

शाहिर
गुरुवार, 07/21/2011 - 13:40 नवीन
प्रभू ची लीला (शीला ??) अगाध आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

व्वा प्रभू..!

विसोबा खेचर
गुरुवार, 07/21/2011 - 14:21 नवीन
व्वा प्रभू..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

_/\__/\__/\_

सोत्रि
गुरुवार, 07/21/2011 - 15:37 नवीन
प्रभु, मस्तच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

इश्य

धिन्गाना
Fri, 07/22/2011 - 12:51 नवीन
अफाट प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

छान दिसतेय कतरीना

गवि
गुरुवार, 07/21/2011 - 14:12 नवीन
छान दिसतेय कतरीना फोटोत. लेखही तसाच छान.
  • Log in or register to post comments

येथे पहा

रणजित चितळे
गुरुवार, 07/21/2011 - 14:16 नवीन
सुब्रमण्यम स्वामींनी त्यांच्या संकेत स्थळावर बरेच काही (दाखल्यांसकट) लिहून ठेवले आहे तिकडे नजर टाका. http://www.janataparty.org/sonia.html
  • Log in or register to post comments

जनता पार्टीची लिंक वरवर

पाषाणभेद
गुरुवार, 07/21/2011 - 14:45 नवीन
जनता पार्टीची लिंक वरवर वाचली. भयानक आहे ते. कुणीतरी अनुवादीत केले तर लवकर कळेल. (गुगल्या अनुवाद करतांना सरमिसळ करतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

छे बॉ ! ह्या मिपाकरांना

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 14:20 नवीन
छे बॉ ! ह्या मिपाकरांना कुणाचे भले म्हणून झालेले बघवत नाही. आता झाला तो राहूल गांधी पंतप्रधान तर असे काय मोठे आकाश कोसळणार आहे ? चांगला तरणाबांड, हाय फाय इंग्रजी बोलणारा, वेळेला झोपडीत राहणारा, लोकलमधून हिंडणारा माणूस आहे तो. मोष्ट इलिजेबल ब्याचलर का काय ते पण आहे म्हणे. जळतात मेले त्याच्यावर सगळे.
  • Log in or register to post comments

क्वालिफिकेशन

रणजित चितळे
गुरुवार, 07/21/2011 - 14:26 नवीन
चांगला तरणाबांड, हाय फाय इंग्रजी बोलणारा, वेळेला झोपडीत राहणारा, लोकलमधून हिंडणारा माणूस आहे तो. पंतप्रधान होण्यास एवढेच क्वालिफिकेशन चालते का साहेब. मुंबईतली बरीच पोरं मग पात्र ठरतील की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नसावे!

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 14:34 नवीन
नसावे. देवेगौडा ह्यापैकी एकाही निकषांवर उतरत नव्हते बहुधा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

मग

रणजित चितळे
गुरुवार, 07/21/2011 - 14:42 नवीन
काय क्वालिफीकेशन पाहिजे, कोणी सांगाल काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नागरीकशास्त्र

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 14:49 नवीन
सातवीचे (सहावी किंवा आठवीदेखिल असू शकेल, आता निश्चित आठवत नाही) नागरीकशास्त्राचे पुस्तक वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

पंतप्रधान होण्यास एवढेच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 14:55 नवीन
पंतप्रधान होण्यास एवढेच क्वालिफिकेशन चालते का साहेब. मुंबईतली बरीच पोरं मग पात्र ठरतील की.
वा वा वा ! अहो गांधी घराण्याचे सुपुत्र आहेत ते. विसरलात का काय ? ह्यापेक्षा अजुन काय क्वालिफिकेशन हवे हो तुम्हाला ? सामान्य मतदारानी आपली पायरी ओळखून रहावे. सांगून ठेवतोय ! पराविजयसिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!!

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 15:04 नवीन
काय म्हन्ता? शास्त्री, मोरारजी, चरण सिंग, वि पी सिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल आणि मनमोहन सिंग हे सगळे गांधी घराण्याचे होते? कमाल आहे बॉ ह्या घराण्याची!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अहो बरोबर आहे. घराणे

पाषाणभेद
गुरुवार, 07/21/2011 - 15:14 नवीन
बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर,

प्यारे१
गुरुवार, 07/21/2011 - 15:14 नवीन
शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे सगळे गांधी घराण्याच्या शब्दाबाहेर होते? आडनावं तीच हवीत असे कुणी सांगितले काका??? वि पी सिंग मुळात काँग्रेस विरोधी पक्षात होते. (पंतप्रधान होताना) शास्त्री, मोरारजी (नेहरु मृत्यू - इन्दिरा उदयापूर्वी) , देवेगौडा, गुजराल (राजीव मृत्यू- सोनिया उदयापूर्वी) यांच्या काळात काँग्रेसचे नेतृत्व कोणी गांधी करत नव्हते. चंद्रशेखर राजीव गांधींच्या पाठिंब्यावर झालेले होते. आज राहुल मी पंतप्रधान होणार म्हणताच एमेम सिंग बाजूला होतात की नाही पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

+१

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 15:23 नवीन
सबब, गांधी आडनाव हेच क्वालिफिकेशन नाही, हे तुम्ही मान्य करताहेत तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

झोपलेल्याला उठवता येते. सोंग

प्यारे१
गुरुवार, 07/21/2011 - 15:41 नवीन
झोपलेल्याला उठवता येते. सोंग घेतलेल्याला नाही. आपल्या भक्तीला सलाम....!!! तरीही १) जनतेचा कौल- चरण सिंग, व्हीपी सिंग, चंद्रशेखर, वाजपेयी २)तत्कालिन प्राप्त परिस्थिती (चंद्रशेखर यांना पाठिंबा) , ३)पदावर येण्याची पात्रता /शक्यता - मनमोहन सिंग ( अंतरात्मा की आवाज बद्दल अजूनही मतभेद आहेत). आणि ४) व्यक्तीची उपलब्धता -नरसिंहराव. (गांधी घराण्यातील कोणीही उपलब्ध नव्हते/ स्वतःला करुन देत नव्हते) (याबरोबरच बाकी गोष्टी असतीलच) यावर बर्‍याच गोष्टी लोकशाही मध्ये अवलंबून असतात असे नाही वाटत? का राजेशाही प्रमाणे प्रियांकाच्या ५ वर्षाच्या अपत्याला (नक्की वय आणि लिंग ठाऊक नाही, आपणच सांगा) आपण पंतप्रधान करु पाहताय....????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आँ?

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 15:49 नवीन
आपल्या भक्तीला सलाम अहो भक्ती कसली? मी तर हे म्हणतोय की, गांधी आडनाव हेच क्वालिफिकेशन नाही. नै का? (पण इतरच युवराज-युवराज म्हणून र्‍हायलेत!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 15:58 नवीन
गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय आणि काँग्रेस पक्षाशिवाय ह्या देशाचे राज्य कोणीही चालवु शकत नाही हे सत्य तुम्ही लोकं कधी स्विकारणार आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच

सोत्रि
गुरुवार, 07/21/2011 - 16:04 नवीन
'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच स्विकारले आहे, म्हनूनच तर तो त्यांना परत परत सत्तेवर निवडून देतो आहे. मिपावरील जनता बहुतांशी 'हुच्चभ्रु जमातीत' मोडत असल्यामुळॆ ते सत्य त्यांना स्विकारणे कदाचित जड जात असावे ;) - (आम आदमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/21/2011 - 16:05 नवीन
सहमत आहे मालक. अहो कोल्ह्याला द्राक्षे आंबट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ओ सोकाजी काय खुळ्यागत हतं

गणपा
गुरुवार, 07/21/2011 - 16:11 नवीन
ओ सोकाजी काय खुळ्यागत हतं गफ्फा हाणुन र्‍हायले तुम्ही. वाईच दोनं नवे गल्लास भरा बर. पर्‍या येणार असेल तर एक वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

:)

सोत्रि
गुरुवार, 07/21/2011 - 16:15 नवीन
गणपा, कसला योगायोग आहे, हाच प्रश्न मी पराला आत्ताच व्यनीत केला आणि तुमचा हा प्रतिसाद. परा, आता बसलेच पाहिजे रे :P - (योगा'योगी') सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आम आदमि सोकाजि

धिन्गाना
Fri, 07/22/2011 - 12:57 नवीन
हुच्च पणा करणारे ते हुच्चभ्रु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आम आदमि सोकाजि

धिन्गाना
Fri, 07/22/2011 - 12:57 नवीन
हुच्च पणा करणारे ते हुच्चभ्रु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आम आदमि सोकाजि

धिन्गाना
Fri, 07/22/2011 - 12:57 नवीन
हुच्च पणा करणारे ते हुच्चभ्रु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

पुन्हा आँ

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 16:04 नवीन
मी दिलेल्या यादीतील नावे पुन्हा वाचून पहा. सगळे काँग्रेसचे / गांधी घराण्यातील थोडेच आहेत? निवडून आलेले पक्ष ठरवतील कोण पंतप्रधान होणार ते! पुढच्या निवडणूकीत भाजपप्रणित NDA बहुमतात आली तर त्यांनी ठरवावे कुणी पंतप्रधान व्हायचे ते! जर UPA आली तर राहुल गांधी होण्याची शक्यता जरा जास्त आहे इतकेच (होईलच असे नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा