✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रिय कॅटरीना,

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 07/21/2011 - 12:23  ·  लेख
लेख
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :) राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..! पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :) आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :) असो.. यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..! सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस... बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :) तुझा, तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
बातमी
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
57468 वाचन

💬 प्रतिसाद (173)

प्रतिक्रिया

पराच्या प्रतिक्रियेवर आपण

प्यारे१
गुरुवार, 07/21/2011 - 16:20 नवीन
पराच्या प्रतिक्रियेवर आपण 'तिरके तिरके' चालतोय. गांधी घराण्याचं असणं हे क्वालिफिकेशन पुरेसं आहे असं तो म्हणाला. त्यावर तुमची गांधी घराणे सोडूनच्या नावांची यादी आली. मी ही यादी 'का' आणि 'कशी' आली ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपला मुद्दा 'गांधी घराण्यात जन्म घेणं हे क्वालिफिकेशन पंतप्रधान होण्यासाठी पुरेसं आहे का' हा आहे. याचं उत्तर हो असंच आहे. इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी या दोघांकडे देखील पहिल्यांदा पंतप्रधान बनताना या पात्रतेचंच भक्कम पाठबळ मुख्यत्वे होतं किंवा ते गांधी होते (पक्षी: इंदिराबाई नेहरुंच्या आणि राजीव इंदिराबाईंचा वारसदार) म्हणूनच पंतप्रधान बनू शकले असे आणि असेच उत्तर आहे. अवांतर :आपण दिवसात किती वेळा आँ करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

दुरुस्ती

नितिन थत्ते
गुरुवार, 07/21/2011 - 15:37 नवीन
१. मोरारजी देसाई हे आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाल्यावर पंतप्रधान झाले. २. शास्त्री आणि मोरारजी यांना गांधी घराण्याचा शब्द झेलणार्‍यांच्या यादीत टाकल्यामुळे अतीव दु:ख झाले. ३. चरणसिंग आनि गुलझारीलाल नंदा ही नावे राहिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सहमत

रणजित चितळे
गुरुवार, 07/21/2011 - 15:41 नवीन
आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चुकीबद्दल दिलगीर आणि

प्यारे१
गुरुवार, 07/21/2011 - 15:56 नवीन
चुकीबद्दल दिलगीर आणि दुरुस्तीबद्दल आभारी आहे. बाकी आम्ही तपशीलापेक्षा तत्वावर भर देण्याचा प्रयत्न करणे इष्ट समजतो. कोण कधी पंतप्रधान झाले आणि त्यावेळची परिस्थिती काय होती या मुद्द्याकडे जास्त लक्ष देऊ या. मोरारजी हे जनता पार्टीचे नेते म्हणून पंतप्रधान झाले असतील तर साहजिकच जनतेचा कौल काँग्रेसविरोधी असा होता हे स्पष्ट होते. तीच बाब चरणसिंग यांची. शास्त्रीजी नेहरुंच्या शब्दाबाहेर असतील (इथे गांधी घराणे नेहरुंपासून सुरु झाले असे म्हटले तर आपला काही आक्षेप असेल असे वाटत नाही) असे वाटणारे काही प्रसंग आपल्याला ठाऊक आहेत काय? गुलझारीलाल नंदा हे देखील त्याकाळचे. इंदिरा बाईंनी तेव्हा धुरा हाती घेतली नव्हती म्हणून हे शक्य झाले असेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

:)

नितिन थत्ते
गुरुवार, 07/21/2011 - 16:33 नवीन
मी फक्त चुकीची माहिती सुधारली. बाकी चालू द्या. हा धागा नेहरू गांधी घराणे या रुळावर गेला असला तरी मला धागा काढण्याचा उद्देश "वेगळाच" वाटला होता. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कमाल आहे बॉ सुनील तुमची.

चिंतामणी
Fri, 07/22/2011 - 11:12 नवीन
Jawaharlal Nehru - 15 August 1947 – 27 May 1964 Indira Gandhi - 24 January 1966 - 24 March 1977 14 January 1980 - 31 October 1984 Rajiv Gandhi - 31 October 1984 - 2 December 1989 Lal Bahadur Shastri- 9 June 1964 - 11 January 1966 Morarji Desai- 24 March- 28 July 1979 Charan Singh - 28 July 1979 - 14 January 1980 V. P. Singh - 2 December 1989- 10 November 1990 Chandra Shekhar - 10 November 1990 - 21 June 1991 Narasimha Rao- 21 June 1996 - 16 May 1996 Atal Bihari Vajpayee- 16 May 1996 - 1 June 1996 19 March 1998- 22 May 2004 H. D. Deve Gowda - 1 June 1996 - 21 April 1997 Inder Kumar Gujral 21 April 1997- 19 March 1998 पहील्या तिघांचा एकुण कालावधी आणि इतर सर्वांचा एकुण कालावधी एकदा तुलना करून बघा बॉ. शास्त्रीजी आणि नरसींह राव जरी गांधी घराण्याचे नसले तरी ते कॉग्रेसचेच आहेत हे सुद्धा लक्षात घ्यावे. मा. मनमोहन सिंगबद्द्ल न बोललेले बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

उत्तर

सुनील
Fri, 07/22/2011 - 11:31 नवीन
शास्त्रीजी आणि नरसींह राव जरी गांधी घराण्याचे नसले तरी ते कॉग्रेसचेच आहेत हे सुद्धा लक्षात घ्यावे. चर्चा "गांधी" आडनावाबद्दलच सुरू आहे. सबब, मुद्दा अमान्य. मा. मनमोहन सिंगबद्द्ल न बोललेले बरे. स्पष्टीकरण वरीलप्रमाणेच. थोडक्यात, १९८९ नंतर जवळपास २२ वर्षे "गांधी" आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर नसूनदेखिल, काँग्रेसविरोधकांना "गांधी" आडनावाची एवढी दहशत आहे, हे बघून गंमत वाटली, एवढेच निरीक्षण नोंदवू इच्छितो! चालू द्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

+१

सहज
Fri, 07/22/2011 - 11:56 नवीन
थोडक्यात, १९८९ नंतर जवळपास २२ वर्षे "गांधी" आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर नसूनदेखिल, काँग्रेसविरोधकांना "गांधी" आडनावाची एवढी दहशत आहे, हे बघून गंमत वाटली, एवढेच निरीक्षण नोंदवू इच्छितो! मुख्य म्हणजे जर असे आक्षेप नोंदवणार्‍यांचे वय जर का (२२+१६ =) ३८ वर्षापेक्षा कमी असेल तर हे नक्कीच म्हणजे जाणुन बुजून कोणीतरी घेतलेल्या बौद्धिकांचे फलीत वाटते. ---------------------------------------- आणि म्हणे फक्त अतिरेक्यांचेच ब्रेनवॉश झाले असते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नुसते गांधी नाही हो.

चिंतामणी
Fri, 07/22/2011 - 11:58 नवीन
नेहरू गांघी असे एकत्रीतच. आणि हो. १९८९ नंतर खुर्चीत नसले म्हणून काय झाले. हाय कमांड म्हणजे सर्वेसर्वा कोण आहे? U.P.A. CHAIR PERSON म्ह्णून काय भाव कमी आहे का??? परदेशी पाहुणे आले की राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे बरोबर त्यांचीसुद्धा भेट घेतात. सरचिटणीसांचा भाव अनेक मंत्र्यांपेक्षा जास्तच आहे. (किंबहुना पंतप्रधानसुद्धा झाकोळले जातात.) बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मा. मनमोहन सिंगबद्द्ल न

मृत्युन्जय
Fri, 07/22/2011 - 12:02 नवीन
मा. मनमोहन सिंगबद्द्ल न बोललेले बरे. मनमोहन सिंग सोनियाच्या इशार्‍यावर चालत आहेत म्हणुन त्यांच्याबद्दल न बोललले बरे असे तुमच्या म्हणण्याचा सूर दिसतोय. मी म्हणतो असेना का तसे. पण तरीही ते गांधी नसताना त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली हे तुम्ही कसे काय अमान्य करु शकता? गांधी घराण्याच्या असामान्य त्यागात या पंतप्रधानपदाच्या त्यागामुळे अजुन एका गोष्टीची भर पडली आहे हे कळाल्यामुळे तुम्हा कोंग्रेसविरोधकांची जळते आहे हे कळते आहे बरका आम्हाला. आणि गांधी घराण्याचा शिक्का पंतप्रधानपदासाठी पुरेसा आहे म्हणता. तर मग तुमचे वरुण गांधी आणि मनेका गांधी का अजुन पंतप्रधान झाले नाहीत ते सांगा की जरा? शिवाय इथल्या सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी के जेव्हा जेव्हा गांधी - नेहरुंचे सरकार सत्तेवर होते तेव्हा तेव्हा भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावता होता. बाकीच्यांनी भारताला पार गाळात घातले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मनमोहन सिन्ग

धिन्गाना
Fri, 07/22/2011 - 13:03 नवीन
काय बोलता राव्, सुशमा स्वराजनि गोटा करायचि धमकि दिलि नसति तर बाइच गादिवर बसलि असति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वाचून हसून हसून

नितिन थत्ते
Fri, 07/22/2011 - 13:15 नवीन
वाचून हसून हसून लोळलो..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धिन्गाना

का व कसे बनले मनमोहन पंतप्रधान

रणजित चितळे
Fri, 07/22/2011 - 13:55 नवीन
सुब्रमण्यम स्वामींच्या संकेत स्थळावरुन The President reportedly had communicated to Ms. Gandhi on the afternoon of May 17, 2004, that if she insisted on being invited to form the government, he would want first to clarify, on a reference to the Supreme Court, whether in view of this proviso her appointment as PM could be successfully challenged in the court. It is fair to assume that this report of the President’s decision is correct, since the President had before him my petition dated May 15, 2004 [see Annexure-3] making just that point--- that Ms. Gandhi’s citizenship is conditional, and in particular she cannot be the PM legally. The President had also given me an appointment at 12.45 PM on May 17, 2004 to explain my submissions in person, which I did. I also told him that I would challenge such a unconstitutional appointment in the Supreme Court just as I had in 2001 when Ms Jayalalitha was illegally sworn in as Chief Minister by the Tamil Nadu Governor. पुढे वाचा, असे मनमोहन सिंह पंतप्रधान बनले. नाहीतर बाई गेल्याच होत्या बनायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

इनो

सुनील
Fri, 07/22/2011 - 14:00 नवीन
Submitted by रणजित चितळे on Fri, 22/07/2011 - 13:55. साहेब, जेवल्यावर इनो घेतलात की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

सहज लिहिले साहेब

रणजित चितळे
Fri, 07/22/2011 - 18:37 नवीन
बर आता गप्प बसतो आपल्या साठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

>>The President reportedly

नितिन थत्ते
Fri, 07/22/2011 - 14:24 नवीन
>>The President reportedly had communicated to Ms. Gandhi on the afternoon of May 17, 2004, that if she insisted on being invited to form the government, he would want first to clarify, on a reference to the Supreme Court, whether in view of this proviso her appointment as PM could be successfully challenged in the court. सुब्रम्हण्यम स्वामींचे म्हणणे काही असो. कलाम यांचे सचीव पी एम नायर यांनी आपल्या पुस्तकात कलाम यांनी सोनिया गांधींची पंतप्रधान म्हणून नेमणुक करणारे पत्र तयार ठेवले होते असे म्हटले आहे. तरी असल्या कंड्या पुनःपुन्हा पिकवल्या जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

P M Nair यांनी जर त्या पत्राची फोटोकॉपी दिली असेल तर.....

सुधीर काळे
Mon, 07/25/2011 - 09:33 नवीन
ज्या बाईच्या पक्षाने निवडणूक लढवायच्या निर्णयापासून स्वतःला 'भावी पंतप्रधानपदाची उमेदवार' असे घोषित केले होते, 'UPA' तर्फे स्वतःच्या उमेदवारीवर तसा शिक्काही मारून घेतला होता, तिने अचानक घूमजाव का करावे? मग अचानक त्यांचा 'आतला आवाज' कां बोलका झाला? याचे समाधानकारक उत्तरही त्यांनी दिलेले नाहीं. द्यायला हवे. "माझ्या स्वप्नात देव आला आणि त्याने मला असे सांगितले" असे जर कुणी म्हणू लागला/लागली तर कसा विश्वास ठेवायचा? P M Nair यांनी जर त्या पत्राची फोटोकॉपी दिली असेल तर त्यावर विश्वास ठेवता येईल. अशी प्रत त्यांच्या पुस्तकात आहे काय याचा खुलासा केल्यास बरे होईल. कलाम यांनीही याबद्दल कांहीं टिप्पणी केल्याचे वाचनात नाहीं. केली असल्यास ती लिंक द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कयास

नितिन थत्ते
Mon, 07/25/2011 - 13:34 नवीन
त्यांनी १९९८/९९ मध्ये वाजपेयींवरील अविस्वास ठराव मंजूर झाल्यावर पंतप्रधानपदासाठी दावा सांगितला होता. तेव्हा २७२ खासदारांच्या पाठिंब्याची पत्रे त्या सादर करू शकल्या नाहीत. त्याचे कारण त्या परदेशी असल्याने खासदारांना त्या पंतप्रधान म्हणुन नको असल्याची चर्चा तेव्हा झाली होती. त्यामुळे २७२ खासदारांचा पाठीबा त्यांच्या नावाला मिळू शकतो हे सिद्ध करणे त्यांच्यासाठी आवश्यक बनले होते. "त्यांना पंतप्रधान होण्यापासून कुठल्याही कारणाने कोणीही (राष्ट्रपती कलाम सुद्धा) रोखू शकत नाही" एवढे सिद्ध करेपर्यंत त्यांनी आपला दावा चालू ठेवला. तेवढे सिद्ध झाल्यावर त्यांनी माघार घेतली असावी. अर्थात हे सर्व जर तर आहे. पण नायर यांनी आपल्या पुस्तकात असे म्हटले असेल तर मानायला काय हरकत आहे. पत्राची फोटोकॉपी पुस्तकात लावणे हा नायर यांच्या सेवाशर्तींचा भंग होणार नाही? की एखादी गोष्ट मानायची नाही असे मनाने ठरवल्यावर कैच्याकै मागणी/अपेक्षा करायची? http://articles.timesofindia.indiatimes.com/2004-05-17/india/28332151_1_president-apj-abdul-kalam-congress-president-sonia-gandhi-largest-party http://www.indiatraveltimes.com/news/news2004/may04/may1704_news2.html http://www.asiantribune.com/news/2004/05/18/sonia-gandhi-meets-indian-president-did-not-stake-claim-immediately-form-government कलाम यांनी यावर कोणतीही टिपण्णी केलेली नाही. ते त्यांच्या राष्ट्रपतीपदाला शोभेसेच आहे. परंतु कलाम यांनी नकार दिला वगैरे गोष्टींच्या फोटोकॉपीज/रेकॉर्डिंग कुठे मिळाल्या तर द्याव्यात. अन्यथा त्या अफवा आहेत असेच म्हणावे लागेल. [सोनिया गांधींनी "त्याग" वगैरे केल्याचा माझा दावा नाही त्यामुळे त्याविषयाची चर्चा माझ्याशी करू नये]. (अवांतर : न्यूक्लिअर डिसेप्शन या पुस्तकात दिलेल्या माहितीपैकी किती माहितीसाठी फोटोकॉप्या लावलेल्या आहेत?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

P M Nair यांच्या प्रमाणिकपणाबद्दल मी साशंक आहे इतकेच.

सुधीर काळे
Tue, 07/26/2011 - 17:12 नवीन
P M Nair यांच्या प्रमाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास नाहीं इतकेच. व कलाम यांनी सोनियाताईना नकार दिल्याचे स्वामीनी आरोप करण्या आधीपासून वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कारण?

नितिन थत्ते
Tue, 07/26/2011 - 17:25 नवीन
>>P M Nair यांच्या प्रमाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास नाहीं इतकेच का बुवा? काही आधार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

'कुणीतरी' नायरना खरीदले असावे!

सुधीर काळे
गुरुवार, 07/28/2011 - 15:52 नवीन
कारण जिथे डॉ कलाम औचित्य दाखवून शांत राहिले तिथे त्यांच्या स्वीय सचीवाने असे लिहावे तेही "चार चंद टुकडोंके लिये" हेच चूक आहे. म्हणूनच माझा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास नाहीं. त्याशियाव्य जो उतारा तू इथे उधृत केलेला आहेस तो वाचल्यावर डॉ. कलाम हे एक "कठपुतळी बाहुली" आहेत अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि ते नक्कीच एक कठपुतळी बाहुली नाहींत. तसे असते तर त्यांना दुसर्‍यांदा नक्कीच संधी दिली गेली असती! एक वेळ ते कायदेपंडितांकडून कायदेशीर सल्ला विचारतील पण आपल्या स्वीय सचिवाच्या शब्दानुसार नाचणारे नक्कीच नाहींत. "सोनियाजी आल्यावर त्यांच्या हातात हे पत्र द्या आणि त्यांचे अभिनंदन करा" अशा अर्थहीन सल्ल्याची तर त्यांना नक्कीच गरज नाहीं. इथे उधृत केलेला उतारा वाचल्यावर नायरना "मोजून माराव्या पैजारा" असेच मनात आले. जास्त काय लिहू? बहुदा 'कुणीतरी' नायरना खरीदले असावे! डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच कीं इतके चिथावणारे वर्णन वाचूनही डॉ. कलाम शांत राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच

नितिन थत्ते
गुरुवार, 07/28/2011 - 16:16 नवीन
>>डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच कीं इतके चिथावणारे वर्णन वाचूनही डॉ. कलाम शांत राहिले. १. ते वर्णन खरे आहे म्हणूनही कलाम शांत राहिले असू शकतील. [कलाम यांनी ते वर्णन लिहिण्यास परवानगीही दिली असू शकेल]. २. सुब्रम्हण्यम स्वामींच्या दाव्यापेक्षा हे अधिक विश्वासार्ह कारण नायर हे त्या घडामोडींच्या सर्वात जवळचे (कलाम, सोनिया, ममोसिंग यांच्यानंतर) आहेत. ३. कलामांनी कोणालाच न सांगितलेली गोष्ट सुब्रम्हण्यम स्वामी म्हणतात म्हणून खरी मानावी का? अवांतर: आपल्याला न पटणारे लिहिणारा 'खरीदलेला' असे असेल तर सुधीर काळे यांना कोणी 'खरीदले' याचा विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

सुब्रमण्यम स्वामींनी लिहिल्या आधीपासून हे मी ऐकलेले आहे.

सुधीर काळे
गुरुवार, 07/28/2011 - 21:58 नवीन
(१) सुब्रमण्यम स्वामींनी लिहिल्या आधीपासून हे मी ऐकलेले आहे. (२) या विषयावर माझे एक पत्रही या घटनेनंतर प्रसिद्ध झालेले होते (मला वाटते गोव्याच्या Navhind Times मध्ये). सापडले तर ते मी इथे डकवेन. (Sonia is a proverbial 'tease' असे शीर्षक होते.) बरीच वर्षे झाली, म्हणून आश्वासन देत नाहीं, पण ९९ टक्के माझ्या scrap book मध्ये सापडेल आणि सापडले तर मी नक्की इथे डकवेन. त्या पत्राला वाचकांचाही प्रतिसाद आला होता. (३) नायर यांच्याबद्दल माझे अद्यापही हेच मत आहे. त्यांनी लिहिलेला मजकूर कलामना अगदीच फिट बसणारा नाहीं म्हणून त्यांचे लिखाण विश्वसनीय वाटत नाहीं. म्हणून स्वामींचे बरोबर आहे असेही नाहीं (स्वामीही तसे ’वाह्यात’च आहेत). पण मी या घटनेबद्दल इतरत्रही कुठे तरी वाचले होते. कुठे ते आता आठवत नाहीं. खूप वर्षे झाली. (४) जसे तुला अद्याप जसे कुणी खरीदलेले नाहीं (असे मला वाटते) तसेच मलाही (अद्याप तरी) कुणी खरीदलेले नाहीं (असे तुला वाटो)! (५) दुर्दैवाने तू दिलेल्या लिंक्सपैकी एकही उघडली नाहीं. [अवांतर: प्रत्येक वेळी तू व्यक्तिश: हल्ला का करतोस? आधी 'न्यूक्लियर डिसेप्शन'वर आणि आता माझ्या विकाऊपणावर! 'नायर विकाऊ असतील' असे मी म्हटल्यावर तू 'स्वामी विकाऊ आहेत' असे न म्हणता 'सुधीर काळ्यां'वर का घसरलास? तशी हरकत नाहीं पण करमणूक होते खरी]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कारण

नितिन थत्ते
गुरुवार, 07/28/2011 - 22:22 नवीन
१. प्रथम नायर यांच्या पुस्तकासंबंधी बातमीचा दुवा दिल्यावर आपण पुस्तकात "कलाम यांनी तयार ठेवलेल्या पत्राची" फोटो कॉपी लावली आहे का असे विचारलेत. त्यावर अश्या फोटोकॉप्या लावल्या जात नसतात असे दाखवण्यासाठी म्हणून न्यूक्लिअर डिसेप्शनमध्ये किती फोटो कॉप्या लावल्या आहेत असे मी विचारले. हा प्रश्न सुधीर काळ्यांसाठी नव्हता तर मूळ ज्याने पुस्तक लिहिले आहे त्याने लावल्या आहेत का हे जाणण्यासाठी होता. २. इतर संबंधित व्यक्ती (स्वतः कलाम) खुलासा करत नसतील तर घटनेच्या सर्वात जवळ असलेल्याचे म्हणणे (घटनेपासून दूर असलेल्यापेक्षा) अधिक विश्वासार्ह असे मी म्हटल्यावर आपण (नायर यांचे म्हणणे मान्य करायचे नाही असे ठरवले असल्यामुळे) नायर विकले गेले असतील असा काहीही आगापीछा/आधार नसलेले विधान केले. आता तुम्ही स्वामींनी म्हणायच्या आधी "ऐकले होते" असे म्हणत आहात. याचा काही संदर्भ देता आल्यास पहावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

!!!

पंगा
गुरुवार, 07/28/2011 - 22:29 नवीन
आता बास!!! (दोघांनाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चक्क

श्रावण मोडक
गुरुवार, 07/28/2011 - 22:43 नवीन
आता बास!!!
चक्क पंगाशेठ तुम्ही? हे पाणी ओतण्याचे काम कधीपासून सुरू केलेत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

कारण

पंगा
Fri, 07/29/2011 - 00:05 नवीन
काय आहे, की प्रतिसादाचे चौकोन लहानलहान होत चालले होते. म्हटले हे असेच चालू राहिले, तर एकच उभी लांबच लांब रेघ होईल. म्हणून म्हटले आवरते घ्या. (नाहीतर आम्ही कुठले सार्वजनिक टिकाणी तेही दुसर्‍यांच्या कृत्यावर पाणी टाकायला? ;)) (खवत किंवा दुसरा धागा काढून चालू ठेवायला आपली काहीच हरकत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काय दिवस आलेत!

श्रावण मोडक
Fri, 07/29/2011 - 11:08 नवीन
काय दिवस आलेत! च्यायला, पंगाशेठशी पूर्ण सहमत असं म्हणावं लागतंय आता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हवा असल्यास पाठवू 'व्यनि'द्वारा शकतो

सुधीर काळे
Fri, 07/29/2011 - 11:28 नवीन
पंगा वगैरेंच्या मताला मान देऊन हा माझा शेवटचा प्रतिसाद. मूळ 'न्यूक्लियर डिसेप्शन' हे पुस्तक ४६० पानावर संपते. त्यानंतरच्या ४०-५० पानांवर पुस्तकातील प्रत्येक विधानाचा source दिलेला आहे-कांही प्रत्यक्ष Interviews, कांहीं ठिकाणी प्रसिद्ध लि़खाण वगैरे. मी भाषांतर करताना त्यांचा उल्लेख केला नाहीं कारण मी त्यात involved नव्हतो. पण लेखकांनी त्यांचा संदर्भ दिलेला आहे. हवा असल्यास 'व्यनि'द्वारा पाठवू शकतो. ते असो पण हा माझा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद. माझे प्रसिद्ध झालेले पत्र सापडल्यासही तुला व्यनि द्वाराच पाठवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जिवाची भिती ही मनुष्य जातीतील

वपाडाव
Fri, 07/22/2011 - 13:59 नवीन
जिवाची भिती ही मनुष्य जातीतील प्रत्येक जीवाला असतेच ना..... त्यात गांधी पन आलेच की.... "सिर सलामत तो पगडी पचास" ही उक्ती ऐकली नाय का तुम्ही..... फक्त यावेळी "सिर सलामत तो पगडी है पास" म्हणुन एम. एम. सिंग पंतप्रधान झाल्येत. - मरणाला घाबरणारा वपाडाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नशिब

रणजित चितळे
गुरुवार, 07/21/2011 - 15:07 नवीन
वेळेच्या आधी व नशिबा पेक्षा जास्त काही मिळत नाही. राहूल बाशिंग बांधून बसलाय खरा पण का कोण जाणे मला वाटते तो कधी बनणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अहो गांधी घराण्याचे सुपुत्र

मितभाषी
गुरुवार, 07/21/2011 - 21:22 नवीन
अहो गांधी घराण्याचे सुपुत्र आहेत ते. विसरलात का काय ? ह्यापेक्षा अजुन काय क्वालिफिकेशन हवे हो तुम्हाला ?
आयला हे मिपाचे युवराज 'चिच्चांच्या' युवराजवर लैच पेटलेत. काय खरं नाही आता. भावश्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओ विसोबा काका.......

मनराव
गुरुवार, 07/21/2011 - 14:53 नवीन
लेख आवडला......... पन एकच खटकल.........निदान त्या कॅट चा मोतीबिन्दू झालेला फोटू सोडून दुसरा कोणता तरी चांगला लावायचा........
  • Log in or register to post comments

मोतीबिन्दू झालेला फोटू =))

गणपा
गुरुवार, 07/21/2011 - 15:19 नवीन
मोतीबिन्दू झालेला फोटू
=)) =)) फुटलो ना. सालं पब्लीकची नजर काय तेज अस्तेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

खुळं तिच्यायला!

धमाल मुलगा
Fri, 07/22/2011 - 14:43 नवीन
तो काचबिंदू आहे रे. अवांतरः ह्या वयात जे पहायचं ते पहात नाही, आणि पोरींच्या डोळ्यातले मोतीबिंदू कसले पाहता रे? -आफ्रिकेतला काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

अवांतरः ह्या वयात जे पहायचं

वपाडाव
Fri, 07/22/2011 - 15:46 नवीन
अवांतरः ह्या वयात जे पहायचं ते पहात नाही, आणि पोरींच्या डोळ्यातले मोतीबिंदू कसले पाहता रे?
म्हणजे धम्या, तुला असं म्हणायचं आहे का ? की जे बिंदु पाहायचे ते सोडुन भलतेच काय पाहता..... अरे पोरांनो डोळं नका पाहु, डोळं फाडुन पहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

दुटप्पी पणा..उत्तम उदा.

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 15:20 नवीन
स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन कॅटरिना चालते, पण अर्धा? भारतिय राहुल चालत नाहि, कॅटरिना प्रिय, राहुल अप्रिय वा वा वा.... . . . . . . . . . . . . .
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!
लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, ; ; ; ; ; ; ; ;; ; ; ; ;; बाकि चालु द्या.. {भारतिय नागरिक}
  • Log in or register to post comments

फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या)

गणपा
गुरुवार, 07/21/2011 - 15:29 नवीन
फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) ओळींचा तो प्रतिसाद, पांढर्‍या रंगातली विरामचिन्हे टाकुन टाकुन इतका का फुगवलाय? का मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय मित्रा ? ;) बाकी कंटेटं बद्दल आपल काय म्हणणं नाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

त्यांची एंटर की एकदा दाबली की

पाषाणभेद
गुरुवार, 07/21/2011 - 15:50 नवीन
त्यांची एंटर की एकदा दाबली की सतत आत जात असेल त्यामुळे असे होत असेल! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

त्यांचं एंटरचं बटन / कळ

वपाडाव
गुरुवार, 07/21/2011 - 17:35 नवीन
त्यांचं एंटरचं बटन / कळ दुरुस्त करुन घ्यावे लागेल......... नाहीतर गुडघेदुखीचा ससेमिरा पाठी लागायचा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

गुडघेदुखी ?

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 17:44 नवीन
त्यांचं एंटरचं बटन / कळ दुरुस्त करुन घ्यावे लागेल..... नाहीतर गुडघेदुखीचा ससेमिरा पाठी लागायचा...
एंटरचं बटन आणि गुडघेदुखी याचा सबंध काय ते कळले नाही? जरा विस्कटून सागां की.. गुडघेदुखी चा सबंध अती सेक्सशी आहे हे एका धाग्यातील प्रतिसादा वरुन समजले आहे, त्यामुळे जरा भीती वाटतेय ;) ते खरे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

त्यांची एंटर की एकदा दाबली की

वपाडाव
गुरुवार, 07/21/2011 - 18:29 नवीन
त्यांची एंटर की एकदा दाबली की सतत आत जात असेल त्यामुळे असे होत असेल!
आता कळालं का? का पराने वर म्हटल्याप्रमाणे आपण आहात का दाखवता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

त्यांची एंटर की एकदा दाबली की सतत आत जात असेल..

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 19:31 नवीन
कळालं आत्ता कळालं मालक :) आता मनावर घेतलंच पाहिजे ;)
का पराने वर म्हटल्याप्रमाणे आपण आहात का दाखवता ?
सोडा हो त्याना बडबड करायची सवय आहे ते मात्र मी मनावर घेत नाही कध्धीच.. . . {भजीपाव } :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आयला खरच कि

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 15:51 नवीन
फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) ओळींचा तो प्रतिसाद, पांढर्‍या रंगातली विरामचिन्हे टाकुन टाकुन इतका का फुगवलाय? का मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय मित्रा
मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय ;) संपादन करता आले तर करतो, थांबा . . . . . {नादखुळा}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अशक्य

सुनील
गुरुवार, 07/21/2011 - 15:54 नवीन
गणप्याने बूच मारले आहे. सबब, संपादन आता अशक्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत,

रणजित चितळे
गुरुवार, 07/21/2011 - 15:29 नवीन
लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, फाळणी पुर्व का फाळणी नंतरच्या कराचीत साहेब ते जरा स्पष्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

आपला तो बाब्या......

सोत्रि
गुरुवार, 07/21/2011 - 15:54 नवीन
कधीच्याही कराचीतले असुद्याकी रणजीतसाहेब, सद्य स्थितीत 'मूळ' हे परदेशी होत नाही का? ;) - (पुर्ण स्वदेशी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

दुसर्‍याच कारटं.....

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 16:03 नवीन
तेच ते ;) अवांतर: प्रतिसाद बारीक केले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

छ्या राव. लगेच 'खुळानाद'

गणपा
गुरुवार, 07/21/2011 - 16:08 नवीन
छ्या राव. लगेच 'खुळानाद' सोडुन दिलात. ;) पण तरी हबिणंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत,

अजातशत्रु
गुरुवार, 07/21/2011 - 16:12 नवीन
फाळणी पुर्व... अधुन मधुन आजोळाची आठवण येते त्यांना ;) मग त्या बद्दल काहि बोलले तरि (काहि) लोकं नावं ठेवतात.. अवांतर: गणपासेठ कधी कधी मित्रांचे ऐकावे म्हणून आपलं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा