Skip to main content

प्रिय कॅटरीना,

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 21/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :) राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..! पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :) आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :) असो.. यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..! सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस... बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :) तुझा, तात्या.

वाचने 57691
प्रतिक्रिया 173

प्रतिक्रिया

In reply to by वपाडाव

त्यांचं एंटरचं बटन / कळ दुरुस्त करुन घ्यावे लागेल..... नाहीतर गुडघेदुखीचा ससेमिरा पाठी लागायचा...
एंटरचं बटन आणि गुडघेदुखी याचा सबंध काय ते कळले नाही? जरा विस्कटून सागां की.. गुडघेदुखी चा सबंध अती सेक्सशी आहे हे एका धाग्यातील प्रतिसादा वरुन समजले आहे, त्यामुळे जरा भीती वाटतेय ;) ते खरे आहे काय?

In reply to by अजातशत्रु

त्यांची एंटर की एकदा दाबली की सतत आत जात असेल त्यामुळे असे होत असेल!
आता कळालं का? का पराने वर म्हटल्याप्रमाणे आपण आहात का दाखवता ?

In reply to by वपाडाव

कळालं आत्ता कळालं मालक :) आता मनावर घेतलंच पाहिजे ;)
का पराने वर म्हटल्याप्रमाणे आपण आहात का दाखवता ?
सोडा हो त्याना बडबड करायची सवय आहे ते मात्र मी मनावर घेत नाही कध्धीच.. . . {भजीपाव } :p

In reply to by गणपा

फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) ओळींचा तो प्रतिसाद, पांढर्‍या रंगातली विरामचिन्हे टाकुन टाकुन इतका का फुगवलाय? का मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय मित्रा
मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय ;) संपादन करता आले तर करतो, थांबा . . . . . {नादखुळा}

In reply to by अजातशत्रु

गणप्याने बूच मारले आहे. सबब, संपादन आता अशक्य!

In reply to by अजातशत्रु

लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, फाळणी पुर्व का फाळणी नंतरच्या कराचीत साहेब ते जरा स्पष्ट करा.

In reply to by रणजित चितळे

कधीच्याही कराचीतले असुद्याकी रणजीतसाहेब, सद्य स्थितीत 'मूळ' हे परदेशी होत नाही का? ;) - (पुर्ण स्वदेशी) सोकाजी

In reply to by रणजित चितळे

फाळणी पुर्व... अधुन मधुन आजोळाची आठवण येते त्यांना ;) मग त्या बद्दल काहि बोलले तरि (काहि) लोकं नावं ठेवतात.. अवांतर: गणपासेठ कधी कधी मित्रांचे ऐकावे म्हणून आपलं ;)

In reply to by अजातशत्रु

>> लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, मला आपल्या प्रतिसादातील रोख कळला नाही, तसंच मी लालकृष्ण अडवानींचा समर्थकही नाही. फक्त एकच सांगावेसे वाटते, की त्यांचा जन्म कराचीत झाला तेव्हा कराची शहर भारतातच होते. पुढे गांधे-नेहरूंच्या आणि कोंग्रेसच्या कर्तबगारीमुळे ते 'परदेशात' गेले. चाचा कितीही प्रतिवाद करोत, पण हे सत्य आहे. सत्ता सोडावी लागणार हे दिसू लागताच असाच फाळणीचा प्रयोग द. आफ्रिकेच्या बोथा राजवटीने करून पाहिला, तेव्हा झुलू नेते मंगोसुथू बुथ्लेझी ह्यांना भडकावून दिले, पण डॉ. नेल्सन मंडेला ह्यांनी ही धूर्त चाल वेळीच ओळ्खून मंगोसुथूशी बातचीत करून द. आफ्रीकेची संभाव्य फाळणी टाळली. आता थत्ते चाचा म्हणतील की डॉ. मंडेला हे गांधींना मानत असत. तर ते पूर्ण खरं आहे पण त्याच बरोबर हेही तितकंच खरं आहे की फालतू आदर्शवादाचा अतिरेक करून त्यांनी व्यावहारीकतेकडे दुर्लक्ष मुळीच केले नाही.

http://www.janataparty.org/sonia.html हेच ते संकेत स्थळ In 1992, Sonia had revived her citizenship of Italy under Article 17 of the Italian Citizenship Law [Act 91 of 1992]. Rahul and Priyanka were born Italian citizens because Sonia was Italian when she gave birth to them[Italian law based on jure sanguinis]. (see Annexure-19) Hence, they continue be Italians since they have never renounced their citizenship upon becoming 21 years old. Both, Rahul and Priyanaka have been traveling abroad on Italian passports. They may now acquire Venezuela passports too, since Rahul Gandhi’s wife, Veronica, is a Venezuelan. (See annexure- 20) That means one more foreign bahu for us tolerant Indians. The Maino-Gandhis are certainly getting Indian society globalised in their own selfish way.

In reply to by सुनील

न्यायालय (न्यायालयात प्रविष्ट आहे पिआयएल सध्या) व आयोग दोन्ही गोष्टी आहेत.

समाजाच्या जीवनमानावर काडीचाही फरक न पाडणार्‍या, तरीही राजकीय मौजमजेची बहार उडवून देणार्‍या विचाराच्या बातमीसकट त्यावरील प्रतिक्रियांनीही मनाचा विरंगुळा केला. अवांतर: बाकी लालकृष्ण आडवाणींसारखे पोलादी व मुत्सद्दी (संदर्भ: कंदाहार) तसेच धर्मनिरपेक्ष (संदर्भ: जिना स्तुती) व्यक्तिमत्व देशाला एक नवीच दिशा प्राप्त करून देतील याबद्दल कोणतेच दुमत नाही. त्यांच्या जन्मस्थानाचा मुद्दा येथे लागू होतो काय? अतिअवांतर: निष्क्रियतेवरून आबांचा राजीनामा मागणारे कमळवाले गुजरातमध्ये दांडीच्या मिठाच्या गुळण्या करून घसा साफ करत असल्याच्या बातम्या हल्लीच कानावर आल्यात. (अवांतर आणि अतिअवांतरसाठी) आमचे सुकोबाराय म्हणतात: दुसर्‍याच्या डोळ्यातले। खुपे मज कुसळ। माझ्या डोळ्यातले मुसळ। गेले मसणात*॥ *याच्याऐवजी जो सुचेल तो पर्यायी शब्द घालावा. भारी समर्थ

परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास. तात्या नकळत तुम्हीही कोणाच्यातरी पंच्याला पक्षी लेंग्याला किंवा साडीला (खालचा प्रतिसाद वाचून ) हात घातलात त्याचे काय ?

एक कत्रिना आणि बाकी सर्व षंढांची चर्चा-प्रतिसाद बघून ड्वाळे पाणावले. ;)

In reply to by प्रियाली

हां... या खऱ्या प्रियाली. नाही तर आयडी हॅक झाला की काय अशी शंका येत होती... ;)

In reply to by प्रियाली

खालीलपैकी नेमका कोणत्या अर्थाने षंढ शब्द वापरला आहेस तायडे? षंढ... Adjective(2) (R)(H )(E) हिजडा, षंढ - पुरूषवेषधारी नपुंसक "हिजड्यांच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहे" (R)(H )(E) नपुंसक, षंढ, बुळा, नामर्द - संभोगविषयक दुबळेपणा असलेला "नपुंसक माणूस संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असतो" स्त्रोत: http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्यास आमच्या बालबुद्धीलाही समजेल. -- भारी समर्थ

In reply to by प्रियाली

मायभूमीला सर्व लेकरे समान असतात. तिथे भेद नाही. प्रतिसादाद्वारे चर्चेत सहभागी होणार्‍या प्रत्येकाचे स्वागतच आहे :)

In reply to by योगप्रभू

मायभूमीला सर्व लेकरे समान असतात. तिथे भेद नाही.
मुळात '(मायभूमीची) सर्व लेकरे षंढ आहेत' हेच जर गृहीतक घेतले, तर (मायभूमीला) सर्व लेकरे व्याख्येनेच समान झाली. भेदाचा प्रश्न येतोच कुठे? Quod Erat Demonstrandum!

In reply to by प्रियाली

प्रतिसाद ज्यांनी दिला आहे ते 'सगळे षंढ' आहेत याबाबत आपला काही 'वैयक्तिक अनुभव' वगैरे ......... नाही. सहज विचारलं. चर्चा -प्रतिसादात माझे नाव आहे आणि माझी तुमची ओळख(देखील) नाही म्हणून आपलं विचारलं. (ह.घ्या./ घे. न./ कसेही.)

In reply to by प्यारे१

प्राजू ताईंनी आपल्या कवितेत वापरला म्हणून ह्यांनीपण हा शब्द कुठेतरी वापरायचाच असा निर्धार केला असावा ... :) पण प्राजूताईंनी तो शब्द योग्य तिथेच वापरलाय हे त्या सोयीस्कररीत्या विसरताहेत ... भयालीदेवींच्या पुढील भयकथेत आता 'षंढ' नायक असणार की काय?

In reply to by sagarparadkar

('षंढ'चे जाऊ द्या, पण) मुळात प्राजूताईंच्या कवितेतदेखील 'भाडखाऊ' हा शब्द कोठेतरी वापरायचाच, अशा निर्धाराने वापरल्यासारखा वाटतो. नव्हे, तो तसाच वापरला गेला असावा, अशी आमची अटकळ - जवळपास खात्री - आहे. (अन्यथा त्या शब्दाचे त्या संदर्भातील औचित्य - अर्थाच्या दृष्टीने - समजत नाही.) (अर्थात, हे कशाचेही - किंवा कोणाचेही - समर्थन नाही. केवळ तुलनात्मक उदाहरण दिले, इतकेच.)

छान माहिती. अर्धी एशियन असली तरी कात्रिना खरी राष्ट्रीय बाण्याची आहे. 'षंढ' भारतिय नागरिक आपल्याला पाठींबा देणार नाहीत हे ओळखूनच तिने वक्तव्य मागे घेतले असावे, कात्रिनाच्या स्पष्टोक्तिला लाख लाख सलाम. चिरोटा राउत्.-कार्यकारी संपादक- कामना

माफी मागताना कतरिना ने एका जुन्या जोकप्रमाणे "मी शब्द मागे घेते, राहुल गांधी अर्धे भारतीय नाहीत" असे म्हणून बघायचे होते. बर्‍याच राजकीय प्रतिक्रियाबहाद्दरांना कळायला बराच वेळ लागला असता :)

In reply to by फारएन्ड

हा हा हा.... त्यांना उशिरा समजल्यानंतर पुम्हा माफी मागताना खूपच गोंधळ झाला असता आणि राहूल गांधी हे अर्धे.... एवढ्यानंतर थांबावं लागलं असतं आणि नंतर तिला अगदी सल्लूनंही आपलं म्हटलं नसतं. देश सोडून जाण्यापेक्षा यापुढं गप्प बसलेलं बरं.;)

आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..!
रामदेव बाबांच्या पाठीशी होतो अगदी तसेच...