आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

टीम गोवा's picture
टीम गोवा in जनातलं, मनातलं
5 Apr 2011 - 4:54 pm

***

आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा

***

गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.

सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. पण गेली १८ वर्षं गोव्यात राहून मला एक गोष्ट कळलीय ती म्हणजे, खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्‍यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात. म्हणून चला तर, मी, पैसा, आणि प्रीतमोहर तुम्हाला या एका वेगळ्याच गोव्याच्या सफरीवर घेऊन जातोय.

काही दिवसांपूर्वी प्रीतमोहरने गोव्याच्या पोर्तुगीजकालीन इतिहासाबद्दल एक लेखमालिका लिहायला सुरुवात केली. अत्यंत मनोरंजक भाषेत तिने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना अपरिचित असलेला गोव्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली होती. पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर बिपिनला एक छान कल्पना सुचली.

ती म्हणजे गोव्याचा संपूर्ण इतिहास मिपाकरांच्या समोर आणण्याची. त्याच्या सूचनेवरून आम्ही हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करतोय. मी ६ डिसेंबर १९९२ पासून गोव्यात राहते आहे. माझी मुलं तर आता गोंयकारच झाली आहेत. प्रीतमोहर गोव्यातलीच "अस्सल गोंयकार". अशा आम्ही दोघीजणी वेगवेगळ्या तर्‍हांनी गोव्याशी संबंधित. आम्ही या संपूर्ण लेखमालिकेतले लेख लिहिणार आहोत.

आमच्यात कोणीच तसा इतिहासाचा शास्त्रशुद्ध, पद्धतशीर अभ्यास केलेला नाही, पण शक्य तेवढी अधिकृत माहिती जमा करून आणि शक्य तेवढ्या ठिकाणाना भेटी देऊन, लोकांशी बोलून, काही ऐकिवातल्या गोष्टींची मदत घेऊन लेखमाला आपल्यापुढे आणत आहोत. कोणाला आणखी काही माहिती असेल तर ती या निमित्ताने सगळ्यांपुढे आणावी ही विनंती. तसंच, लेखमालिकेत जर काही चुका झाल्या, काही उणीव राहिली तर जरूर दाखवून द्या. कारण गोव्याचा इतिहास अभ्यासायचा तर मोठी अडचण म्हणजे, पोर्तुगीजांच्या पूर्वीचा फारसा इतिहास स्थानिक लोकांच्या स्मरणात नाही. देवळांशी संबंधित कथा लोकमानसात आहेत खर्‍या, पण त्या ऐकिव अशाच आहेत, आणि त्यावरून अचूक काळनिश्चिती करणं खूपच कठीण आहे.

दुसरा एक अनुभव मी प्रीतमोहरच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिला होता, की छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांचा गोव्याशी खूप जवळून संबंध आला होता पण लोक त्याबद्दल फारसं बोलत नाहीत, किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. पोर्तुगीजानी त्याना सोयिस्कर तेवढाच इतिहास लोकांच्या कानी पडेल याची व्यवस्था केली होती. त्यामुळे, "शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्या मोहिमांमुळे अर्ध्याहून जास्त गोव्यातले लोक धर्मांतरे होण्यापासून बचावले होते." किंवा "मुघलांनी आणि आदिलशहाने शिवाजी आणि संभाजीच्या विरोधात ऐन वेळेला पोर्तुगीजाना मदत केली नसती तर गोवा आणखी साधारण ३०० वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता" यासारख्या गोष्टी शोधूनच कुठेतरी वाचायला मिळतात. पोर्तुगीजानी जुने किल्ले पूर्ण उध्वस्त करून टाकले आणि सगळीकडे फक्त आपलाच ठसा राहील याची पुरेपूर काळजी घेतली होती. किंबहुना, जुना वैभवशाली इतिहास लोकांनी विसरून जावा अशीच त्यांची इच्छा असावी. त्यामुळे गोव्यातले बहुतेक ख्रिश्चन लोक हे धर्मांतरित स्थानिकच असले, तरी पोर्तुगीज राजवटीचे गोडवे ते अजूनही गातात आणि त्यांच्या दृष्टीने शिवाजी आणि संभाजी हे "भायले" लोक होते हे क्लेशकारक आहेच, पण सत्य आहे.

गोव्यात एकूणच सुशेगाद वृत्तीमुळे असेल किंवा सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार असेल. पण इतिहासाबद्दल खूप अनास्था आहे. माहितीच्या शोधात भटकताना अगदी अर्ध्या कि.मी.च्या अंतरावर असलेल्या गोष्टींबद्दलही "माहिती नाही" हे उत्तर अनेकदा मिळालं. ऐतिहासिक स्थळांजवळ योग्य दिशादर्शक पाट्या नाहीत, माहिती विचारायला आसपास कोणी नाही असे अनुभव अनेकदा आले. पाषाणयुगीन गुहांना सरसकट "पांडवांच्या गुहा" म्हणलं जातं, असे कित्येक प्रकार अनुभवले!

या लेखमालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा धाकटा भाऊ असलेला जो गोवा, त्याच्या इतिहासाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गोव्याच्या भाषेबद्दल आणि एकूणच सामाजिक / सांस्कृतिक अंगांबद्दल, तुमच्या मनात काही कुतुहल जागं झालं तरी आमचे प्रयत्न सफल झाले असं मी म्हणेन.

- पैसा

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)

संस्कृतीइतिहाससमाजप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

5 Apr 2011 - 5:04 pm | गणेशा

तुमच्या लेखनास मनापासुन शुभेच्छा .
अजुन एकदाही गोवा न पाहिलेला मी अभागी आहे.. निदान तुमच्या या लेखनामुळे-इतिहासा मुळे जेंव्हा मी गोवा पाहिन तेंव्हाचा माझा दृष्टीकोण हा तुमच्या लिखानामुळे नक्कीच सम्रुद्ध असेल्च.

बाकी चुका होतील वगैरे याचे जास्त टेंशन घेवु नका.. काय माहित गोव्याचा सुंदर इतिहास ते ही ललित लिखान सदृष्य सांगणारे तुम्ही पहिलेच असताल ..
उपक्रम आवडला ..
फक्त ललित लेखन किंवा तत्सम माहिती लिहिताना .. राजे .. आदरणीय लोक यांचा उल्लेख एकेरी येवु देवु नका ..
मला जास्त प्रोब्लेम नाही.. परंतु चांगल्या गोष्टींना उगाच असले काही नको ..

शुभेच्छा ..

गणेशा

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 5:23 pm | llपुण्याचे पेशवेll

गोवा टीम आपल्याला शुभेच्छा आहेत.. संभाजी महाराजांनी गोवा मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे वाचलेले आहे. चांगला प्रकल्प आहे. असाच चालू ठेवावा. आपल्याला शुभेच्छा.

जमलंच तर गोव्यातली समृद्ध वैदिक पाठशाळांची परंपरा. गोव्यात राहण्यास असलेले व वयाने सर्वात लहान घनपाठी ही पदवी मिळवणारे वेदमूर्ती योगेश बोरकर यांच्याबद्दलही लिहा. गोव्यातल्या परंपरा, सारस्वती मंदीरं, त्यांचं सोवळं ओवळं, त्यांच्या पाठशाळा याबद्दलही लिहा. मला व्यक्तिशः या गोष्टी गोव्यात अस्तित्वात आहेत आणि मनापासून लोक त्या जपतात, पाळतात याचा आनंद वाटला होता.

कॅफे भोसले, तातोज वगैरे हॉटेले पाहून तिथले पदार्थ पाहून गंमत आणि आनंद वाटला होता. असो. तुम्ही लिहा आम्ही वाचतो आहोत.

सूड's picture

5 Apr 2011 - 7:00 pm | सूड

छान लिहीताय, वाचायला आवडेल आणखी. मध्यंतरी वाचनात एक लेख आला होता, गोव्यातल्या एका वृद्ध जोडप्याबद्दल (नाव आठवत नाहीये त्या दोघांचं )!! हे जोडपं गोव्यात होणार्‍या वाढत्या जमिन-विक्रयाविरुद्ध ( विशेषत: हॉटेल- रिसॉर्टबांधणीसाठी) लढा देत आहे. त्यांच्या लेखातून पूर्वी गोवा काय होतं आणि आता हॉटेल व्यावसायिकांनी त्याचं काय केलंय हे थोडंफार वाचण्यात आलं. तुमच्या लेखातनं गोव्याबद्दल सविस्तर वाचायला आवडेल.
अवांतरः अशा लेखांनी गोनीदांच्या पडघवलीची सहज आठवण येऊन जाते.

वाचतिये. अजून लेखनाची वाट बघते.
'भायले' चा अर्थ काय?

श्रावण मोडक's picture

5 Apr 2011 - 7:12 pm | श्रावण मोडक

बहुदा बाहेरचे. परके.

प्रीत-मोहर's picture

5 Apr 2011 - 7:17 pm | प्रीत-मोहर

हो ..भायले म्हंजे बाहेरचे ....

सूड's picture

5 Apr 2011 - 7:17 pm | सूड

येस्स !!

निवेदिता-ताई's picture

5 Apr 2011 - 8:47 pm | निवेदिता-ताई

छान वाटतेय वाचायला.......................

येउद्या अजुन..!!!!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Apr 2011 - 7:28 pm | निनाद मुक्काम प...

अभिनव उपक्रम
मागे एकदा गोव्यातील नट्यांवर एक पुस्तक वाचले होते . त्याची आठवण झाली .
गोव्याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. .( येथून खूप जण गोव्याला जातात .किंवा त्यांना जायचे असते .) त्याच्या समोर ह्या लेख मालेच्या निमित्ताने थोडी रीसबुडकरगिरी करता येईन .
येत्या भारत भेटीत गोवा भ्रमण करायचे होते . .व काय पहायचे हेही ठरले होते. .आता लेखमालिका संपली की नव्याने बेत आखावा लागणार .
एक किस्सा
लंडन मध्ये हॉटेलात एक खडूस ब्रिटीश म्हातारा मला उगाच पिडत होता ( नुकतीच भारत भेट करून आला होता )
मला म्हणाला '' अशी कोणती गोष्ट आम्ही करू शकत नाही जी तुम्ही करू शकता ?
( माझे त्या हॉटेलात त्यांच्या देशात काम करणे बहुदा त्याला खटकले असावे )
मी म्हटले '' आम्ही गोव्यात स्वतःचे घर बांधू शकतो जे तुम्ही नाही बांधू शकत.
जरी पौंड गाठीशी असले तरी .''

यशोधरा's picture

5 Apr 2011 - 7:30 pm | यशोधरा

गोव्यात रशियन माफिया घरं वगैरे व्यवस्थित विकत घेतात.
ब्रिटिश म्हातार्‍याचे ज्ञान अद्ययावत नसावे बहुधा.

ज्योतीताई, बरें बरयला गें तुवे. आणि बरय. :)

पंगा's picture

5 Apr 2011 - 7:33 pm | पंगा

लेखमालेची कल्पना चांगली आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

पांथस्थ's picture

5 Apr 2011 - 8:17 pm | पांथस्थ

नमस्कार टीम गोवा.

प्रथम, गोमंतकाची माहिती देणारी लेखमाला सुरु केल्या बद्दल धन्यवाद!

ह्या लेखाच्या प्रारंभी दिलेले छायाचित्र "तांबडी सुर्ला/सुरला" ह्या जागेचे दिसते आहे. ह्या स्थळाची (मला जाणवलेली) तीन वैशिष्ट्ये म्हणजे -

१. मुख्य रस्त्यापासुन बर्‍यापैकी आत संरक्षित जंगला मधे असल्यामुळे आसपास असलेली निरव शांतता (शब्दशः)
२. आसपासच्या जंगलामुळे आणि बाजुने वाहणार्‍या ओढ्यामुळे जाणवणारी नितांत सुंदरता.
३. काळ्या दगडात बांधलेल्या शिव मंदिराची जाणवणारी प्राचिनता

मंदिराचा साधेपणा, परीसरातील स्वच्छता लक्षवेधी आहे. शंकराचे दर्शन घेउन डोळे मिटले की आपोआप अंतर्मुख व्हायला होते. थोड्यावेळ मनःशांतीचा अनुभव घेतला की जरा खाली उतरुन बाजुच्या ओढ्यात पाय सोडुन बसावे, तिथल्या माश्यांना खायला मक्याचे दाणे नाहितर बिस्कीटाचे तुकडे टाकावे. वेळ कसा निघुन जातो कळतच नाहि.

परत निघत असतांना इथे पुरातत्व खात्याचा माणुस साफ सफाई करतांना दिसला. बघुन बरे वाटले. त्याला पैसे देऊ केले असता (अ‍ॅप्रिसिएशन म्हणुन) त्याने ते नाकारले.

एकंदरीत सगळा अनुभव खरंच मनाला भिडला आणि तांबडि सुर्ला/सुरला ने मनात कायमचे घर केले आहे!

असो आता आवरते घेतो.

टीम गोवाला - पु.ले.शु.

तांबडीसुर्लचे देऊळ छान झकपक केले आहे, हे छान झाले. मी येथे प्राथमिक शाळेत असताना - ३० वर्षांपूर्वी - गेलो होतो. दोन ओहोळांमधून काढून जीपगाडी न्यावी लागली होती. वरील चित्रात दिसते, तसे आजूबाजूला साफसूफ आंगण नव्हते, जंगलच होते.
वेळेच्या दृष्टीने (किलोमीटरच्या दृष्टीने नसेल) फार लांब असल्यामुळे, पुन्हा जाणे झाले नाही.

आता रस्ता केला असेल, साफसफाई होत असेल, तर चांगलेच झाले आहे.

तुम्ही वर दिलेले तीन-कलमी वर्णन - अगदी अगदी.

गेल्या वर्षी गोव्यात गेलो असताना मला सप्तकोटीश्वराचे मंदिर बघायची तीव्र इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणती मशीद पाडली नाही. अपवाद फक्त एकच म्हणजे हे सप्तकोटीश्वराचे स्थान. गोव्यावर पोर्तुगीजांआधी आदिलशाही अंमल असताना सप्तकोटीश्वराचे मंदिर पाडून शिवलिंग शेजारच्या खड्ड्यात फेकून दिले होते. नंतर मिशनर्‍यांनी तर हिंदू प्रजेचा छळ चालवला होता. त्यामुळे हे स्थान निर्जन बनले होते. पोर्तुगीज राजवटीत आपले महाल जप्त होणार, या भीतीने तेथील देसायांनी महाराजांना हाक मारली. शिवाजीराजांनाही पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम उघडण्यासाठी कारण हवेच होते. गोव्यावरील स्वारीत महाराजांना या ठिकाणाची माहिती मिळाली. खड्ड्यात फेकलेले शिवलिंग बघताच त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तेथे बांधलेली मशीद तोडून पुन्हा सप्तकोटीश्वराचा जीर्णाद्धार केला.

तर मला हे मंदिर बघायला जायचे होते, पण सगळ्या टुरिस्ट वाहने पुरवणार्‍यांनी वेगवेगळी कारणे सांगून नकार दिला. एकजण म्हणाला, की तिथपर्यंतचा रस्ता खूप खराब आहे. दुसरा म्हणाला, की फॅमिलीसकट जाणार असाल तर त्या भागात चांगले हॉटेल नाही. मुलांचे हाल होतील. अनेकजण म्हणाले, की पुरा एक दिवस लागतो तिथे जाऊन येऊन. शेवटी माझी इच्छा अपुरीच राहिली. खैर पुन्हा केव्हा तरी. आश्चर्य असे वाटले, की चर्च आणि बीच दाखवण्यात उत्साहाने पुढाकार घेणारे लोक आडवाटेवरचा गोवा दाखवायला खळखळ का करतात? मला हाच गोवा बघायचा आहे. तो तुमच्या लेखनातून उतरला तर मन भरुन येईल.

पैसा आणि प्रीतमोहर यांना आणखी एक विनंती. कळंगुटला लक्झरी हॉटेलातले जेवण काही मला आवडले नाही. म्हापश्यात घरगुती मस्त जेवण देणार्‍या खानावळी आहेत, असे ऐकले. तुम्हाला गोव्यातील अशा चविष्ट खादाडीस्थळांची माहिती असल्यास/मिळाल्यास जरुर सांगणे.

सुन्दर लेखमाला

आत्तापर्यंत एक पर्यंटनक्षेत्र आणि पोर्तुगीझांची राजधानी याउप्पर गोव्याची ओळख नव्हती ,या निमित्ताने गोव्याची संपूर्ण ओळख होईल,

म्हणून हि लेखमाला रंगणार हे नक्की
टीम गोवा ला माझ्या शुभेच्छा

sneharani's picture

6 Apr 2011 - 10:45 am | sneharani

वाचतेय! बरीच नवीन माहितीही मिळतेय.येऊ दे पुढचे भाग!

या लेखमालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा धाकटा भाऊ असलेला जो गोवा, त्याच्या इतिहासाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गोव्याच्या भाषेबद्दल आणि एकूणच सामाजिक / सांस्कृतिक अंगांबद्दल, तुमच्या मनात काही कुतुहल जागं झालं तरी आमचे प्रयत्न सफल झाले असं मी म्हणेन

अगदी अगदी पैसाताई!!

'टिम गोवाची' लिहिण्याची पद्धत खुप आवडली. अन ज्येष्ठ सदस्य बिकांचे आभार!!

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 12:17 pm | वपाडाव

मस्त मस्त मस्त....
आता ही लेखमाला झाल्यावर एकदा गोवा जाणे आहेच आहे...
येउ द्या...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Apr 2011 - 12:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

येणार येणार म्हणून मिपाबाहेरच्या संभाषणात गाजलेली मालिका आता वाचायला मिळणार. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.

सविता००१'s picture

6 Apr 2011 - 2:07 pm | सविता००१

नेहमीच गोवा म्ह्ट्ले की आमचे कुलदैवत म्हणून माशेल (मार्सेला) ला जाणे होते. पण बाकिचे फार काही माहित नाही. इथे कळेल असे वाटायला लागले आहे. पु.ले.शु.

पक्का इडियट's picture

18 Apr 2011 - 2:38 pm | पक्का इडियट

मस्त लेखन चालू आहे.