कोण होतास तू... कोण होतीस तू
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about कोण होतास तू... कोण होतीस तू
- 29 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सकाळी साडेपाच वाजता कोणाचातरी गजर मोठ्ठ्यानं किंचाळत असतो. अपार्टमेंटमधे रहायचं म्हणजे हा एक त्रासच. भिंती फार मजबूत नसल्या की आजूबाजूचे सगळे आवाज कसे अंगावर धावून येतात. गजराचा मालक आता बंद करेल, मग बंद करेल म्हणून मी पांघरूण कानापर्यंत ओढून घेते. पण गजर अविरत ओरडतच राहतो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात येतं की हा गजराचा आवाज माझ्याच उशाजवळून येतोय...
चरफडतच मी उबदार पांघरुणातून बाहेर येते. बाहेरच्या खोलीतून रोजच्यासारखे चित्रविचित्र आवाज येतच असतात. कुणीतरी भारतातून रामदेवबाबांची सी. डी. (हो, तेच ते योगा गुरू वगैरे वगैरे...) पाठवल्यापासून नवरा रोज नेमानं कपालभाती वगैरे क्रिया जोमानं करतो.