फ्री चा फुगा!

लेखनविषय:
लेखनप्रकार
तीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील? बहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोडून शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार? तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन! त्वचा से उम्र का पता नही चलता! काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला? मम्मी!! मम्मी?? मागे एकदा टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र क्लीन आणि क्लियर शाम्पू फ्री द्यायचे रविवारी! मुखपृष्ठाला चिकटवलेला असायचा!

ऑफिसात जाऊन आलो

ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे

वजनदार!

लेखनविषय:
(याच प्रेरणास्थानाला उद्देशून लिवलेली आधीची कविता "बिज्जी लेखिकेची आळवणी" ) हरपता ती लेखनस्फूर्ती हाटेले घालुनी पालथी ओरपी लेखिका मिसळ वर घेई मिठाई सुरती भिववितो तिला तनुभार स्वप्नि ते आकडे दिसती निर्धार प्रतिदिनी करिते 'करु उद्याच सुरु भटकंती' लेखिका म्हणे सुप्रहरी 'मैलाची मारू फेरी..' पण कुठुनी ते होण्याला कुणि दिसे तिज सखी प्यारी गप्पांना येता बहर गुपिते ती चावट कहर व्यायाम राही बाजूला वर वाया प्रातःप्रहर व्यायाम जरी तो इष्ट मैत्रीण तिची गप्पिष्ट करि कुलंगड्या गावाच्या 'हा लागट, तो तर शिष्ट' गप्पांतच घटिका सरती त्या माघारी मग फिरती घर

कुरबुर झाली

कुरबुर झाली (काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले.

दे दे दे दे दे दे

दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे किती वेळ झाला सारखा हातात घेते तु जशी मालकीण मी पण मालक आहे माझ्याच घरात मला चोरी झाली मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे दे दे दे दे दे दे दे सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते (चाल सोडून:- भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा) महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोड

ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र

लेखनविषय:
काव्यरस
ती म्हणाली " चिमणी " मी म्हणालो भुर्रर्रर्र ती म्हणाली " कावळा " पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र आलतूफालतू उत्तरं देऊन आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र लक्षात ठेवून होतो चांगलंच गुढघ्यात असते अक्कल डोकं बाजूला ठेऊन काम होतंय थोडीच पाहिजे शक्कल कशाला करावा अभ्यास ? कशाला हवी ती नोकरी ? कुणी सांगितलंय घासायला पटवावी श्रीमंत बापाची छोकरी सासरा बिचारा राबेल कन्या भोळीच असेल होऊन जायचं घरजावई आपोआप झोळी भरेल {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

वटवटसावित्री

लेखनविषय:
हे देवी वटसावित्री मी पण पूजेन तुला लपून छपून फेरे घेईन उद्या पौर्णिमेच्या रात्री माझे सर्व काळे धंदे अव्याहतपणे चालू देत सदैव कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या नाहीतर होतील माझे वांदे मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी फार कठीण गं , झेलणं तिला ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष पण दुर्दैवाने वटवटसावित्री वटवट करूनच मारते माझ्या नावाने फेरे नेहेमी मागते देवाकडे मिळू देत याचे सर्व धागेदोरे इतकी वर्षे लोटली कळला नाही तुझा महिमा आज तुला मी शरण जातो बघ थांबव माझी दैना सूत घेऊनि, दिवा लावेन रोवेन मी पण एक फांदी पानसुपारीची व्यवस्था व्हावी जेणे होईल माझी चांदी हे वर

(गफ)

पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

बिज्जी लेखिकेची आळवणी

(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!) बिज्जी लेखिकेला असे घाई भारी मिटिंगा लई सुप्रभाती, दुपारी बिज्जी लेखिका ती भुसनळी पेटलेली कुणी त्रास देता ठासते आग 'खाली' स्वयंपाकही तो पाचवीं पूजलेला शिव्या मोजिते पाहता ती घड्याळा तिची नाटिका जी प्रेक्षकां झालि प्यारी सदोदीत टाळ्या फुल्ल तिकिटांचि बारी प्रयोगास येती मोठमोठे असामी पाहता लेखिकेला 'मुग्ध' होती प्रणामी फोनावर फोन 'मागणी' घालणारे (टीप: प्रयोगाची मागणी.

घटना

लेखनविषय:
, पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ? नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता
Subscribe to विनोद