(याच प्रेरणास्थानाला उद्देशून लिवलेली आधीची कविता "बिज्जी लेखिकेची आळवणी" )
हरपता ती लेखनस्फूर्ती
हाटेले घालुनी पालथी
ओरपी लेखिका मिसळ
वर घेई मिठाई सुरती
भिववितो तिला तनुभार
स्वप्नि ते आकडे दिसती
निर्धार प्रतिदिनी करिते
'करु उद्याच सुरु भटकंती'
लेखिका म्हणे सुप्रहरी
'मैलाची मारू फेरी..'
पण कुठुनी ते होण्याला
कुणि दिसे तिज सखी प्यारी
गप्पांना येता बहर
गुपिते ती चावट कहर
व्यायाम राही बाजूला
वर वाया प्रातःप्रहर
व्यायाम जरी तो इष्ट
मैत्रीण तिची गप्पिष्ट
करि कुलंगड्या गावाच्या
'हा लागट, तो तर शिष्ट'
गप्पांतच घटिका सरती
त्या माघारी मग फिरती
घरि देती यजमानांना
त्या लोणकढ्यांच्या चळती
'किति खडतर होय भ्रमंती
पायाचे तुकडे पडती
करतो का कपभर मजला
तुज हस्तास असे चव ती'
पाघळतो नवरा अंमळ
शर्करा टाकितो सढळ
जे घटले होते ग्राम
ते परतुनी होती प्रबळ
काटा वजनाचा पाही
ती खट्टू होउन जाई
'हा बिघडुन गेला का रे?
आकडाच बदलत नाही!!'
नवरा छद्मीसा हसतो
'मज तसेच वाटे' म्हणतो
लेखिकेस येई भरुनी
वजनाचा विसरही पडतो
तिज सुहास्य उमले गाली
प्रतिभा की प्रभातलाली?
झणि लिहावया ती बसते
फतकल मारुनिया खाली
ये लेखनस्फूर्ती फिरुनी
चिंताढग जाती विरुनी
लेखणीस गमला रस्ता
लेखिका पुनः उडे गगनी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4460
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
रबर लागवड कुठवर पोचली? भाग ३
हाहाहा
In reply to रबर लागवड कुठवर पोचली? भाग ३ by यशोधरा
टोमणा नाही हो, खरेच विचारले.
In reply to हाहाहा by चलत मुसाफिर
हा हा!
In reply to हाहाहा by चलत मुसाफिर
मला वाटले 'कविता करण्यापेक्षा
In reply to हा हा! by चलत मुसाफिर
व्वा! छान कृती.
???
In reply to व्वा! छान कृती. by इरामयी
+११११११
In reply to व्वा! छान कृती. by इरामयी