Skip to main content

विनोद

"शिळा"लेख....

लेखक ss_sameer यांनी शुक्रवार, 20/04/2018 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही. कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही. आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो. अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे. आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल.

वास बापूंचा

लेखक रानरेडा यांनी रविवार, 08/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही ....

श्रीदेवी जाते जिवानिशी

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 05/03/2018 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीदेवीच्या आणि आमच्या वयात तसं बर्‍यापैकी अंतर होतं. आम्ही महाविद्यालयात प्रवेश करेपर्यंत श्रीदेवीचा 'मिस्टर इंडिया' आणि (आपल्या) माधुरीचा 'तेज़ाब' येऊन गेले होते. त्यामुळे तिच्या घडलेल्या 'जुदाई'मुळे आम्हीं जरी हळहळलो असलो, तरी त्याचा फारसा 'सदमा' आम्हांला पोहोचला नाही आणि जखम भळभळली नाही. नव्वदीत श्रीदेवीला सोडून (किंवा धरून) अनिल कपूरनं (आपल्या) माधुरीला हिरॉईन केलं याचा मात्र राग आम्हीं मित्रा-मित्रांमधे चांगलाच आळवला / चघळला होता. एकीकडे श्रीदेवीचे 'लम्हें', 'खुदागवाह',लाडला' वगैरे बघणं न थांबवता...

मराठी दिन २०१८: सरप धसला कुपात (वर्‍हाडी)

लेखक मित्रहो यांनी रविवार, 04/03/2018 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे. आता धावता ढोरामांग, समोर ढोर पिक खात हाय अस दिसत असूनबी रामाले घराकड पळा लागे. रामान लय उपाव करुन पायले पण काही उपेग झाला नाही.

नाईस टू मीट यू

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 24/02/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता.

मराठी मालिकांची लेखनकृती

लेखक वनफॉरटॅन यांनी मंगळवार, 20/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.

बाप रे बाप..

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 12/02/2018 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!" विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले. हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील. पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे.

माझा जॉली होतो तेंव्हा

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 09/02/2018 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा." रविवारी सकाळी मी अंथरुणात लोळत पडलो असताना आमच्या हीने बॉम्ब टाकला. उंच धिप्पाड जोएल गॉर्नरने पहीलाच चेंडू शिवसुंदर दासला बाउंसर टाकल्यावर त्याची जी अवस्था होइल तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. शाळा कॉलेजातले सारे खडूस मास्तर बायकोचे रुप घेउन माझी सरप्राइज टेस्ट घ्यायला उभे आहे असे वाटत होते. हा सारा त्या जॉली एलएलबी सिनेमाचा परिणाम होता. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि तो सिनेमा बघायला गेलो असे झाले होते.

तुम्हाला कोण व्हायचंय.... बारामतीकर?

लेखक राखीव खेळाडू यांनी मंगळवार, 30/01/2018 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी पु. ल. देशपांडेंचे 'तुम्हाला कोण व्हायचंय - मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' पाहिलं.. सहज त्यावरून सुचलं.. कर जोडावे असे अजून एक शहर काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे.. ते म्हणजे बारामती.. आता तुम्हाला बारामतीकर व्हायचंय का? तर.. अगदी नावाची फोड केल्यासारखेच आहे पण.. निदान दहा - 'बारा' वेळा विचार करा आणि तरी 'मती' ठिकाणावर असली तर तयारी सुरु करा कारण जितके बाकी ३ शहरे आणि तिथले कर होणे अवघड आहे, तसेच इथे सुद्धा आहे.. मुंबईकरांचं घड्याळ त्याचा हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं..

लव्हगुरू

लेखक बोबो यांनी सोमवार, 29/01/2018 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनीच्या बसमध्ये फोनवर हळू आवाजात बोलत असताना आपल्या शेजारी बसलेल्या ऑफिसच्या सहकारी पूजा आणि रिया दोघी आपल्याकडे पाहात हसताहेत, हे अमितला जाणवलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याने फोन ठेवला, तसं त्यांनी लगेच विचारलं,"काय मग काय म्हणत होती गर्लफ्रेंड?" "क...क...क...कोण...गर्लफ्रेंड? नुसती मैत्रीण होती एक." "अरे लाजू नकोस आम्हाला सांगायला?आम्ही तुला मदतच करू?" क्षणभर अमित विचारात पडला. "तुम्ही मदत करणार?" त्याने विचारलं. "अर्थात,"रिया हसून म्हणाली,"अरे ही पूजा तर तुला एकसे बढकर एक टिप्स देईल. लव्हगुरू आहे ती. तिच्या टिप्स पाळल्यास तर गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे." "असं असेल तर पूजा, प्लिज.