मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ती म्हणाली " चिमणी " मी म्हणालो भुर्रर्रर्र ती म्हणाली " कावळा " पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र आलतूफालतू उत्तरं देऊन आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र लक्षात ठेवून होतो चांगलंच गुढघ्यात असते अक्कल डोकं बाजूला ठेऊन काम होतंय थोडीच पाहिजे शक्कल कशाला करावा अभ्यास ? कशाला हवी ती नोकरी ? कुणी सांगितलंय घासायला पटवावी श्रीमंत बापाची छोकरी सासरा बिचारा राबेल कन्या भोळीच असेल होऊन जायचं घरजावई आपोआप झोळी भरेल {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

वाचने 3658 वाचनखूण प्रतिक्रिया 5

खिलजि Tue, 06/18/2019 - 13:34
होय बरोब्बर ओळखलंत दुविसाहेब . मुली फारच हळव्या असतात . त्यांना खरे प्रेम काळतच नाही बहुतेकवेळा . काही उनाड पोरे , या गोष्टीचा व्यवस्थितपणे फायदा उचलतात आणि आयुष्यात सेटल होतात , तेही काही न करता . बिच्चारा बाप , हतबल होतो , त्यांच्या लाडावलेल्या मुलींसमोर आणि देतो त्यांना त्यांच्या गळ्यात बांधून .. लहानपणीचा खेळ आठवतोय का तुम्हाला .. एकाने " चिमणी " बोलायचं आणि इतरांनी आपापली बोटे वर करून " भुर्रर्रर्र " बोलायचं . पक्ष्यांची नाव बोलता बोलता , मध्येच काहीतरी अचल वस्तूचं नाव घ्यायचं , उदा . डोंगर ,चमेली . आणि जो बोट वर करतो तो आऊट . हे असे खेळ मोठे झाल्यावर आचरट वाटतात पण लहानपणी एकदम निरागस . तसेच काहीसे मुलींचे आहे . मुली मोठ्या झाल्या तरीही निरागस असतात . त्यांना खरे खोटे प्रेमातले काहीच कळत नाही आणि मग पुढे जाऊन फसवणूक होते ...