हंगामी भाज्या आणि फळे यांनी बाजार नुसता फुलला आहे.
द्राक्षांचे घडच्या घड टोपल्या भरून दिसत आहेत. हिरवी आणि काळी ... आता द्राक्षे स्वस्त ही झाली आहेत. कलिंगडं, टरबूज, खरबूज यांचे ठिकठिकाणी स्टॉल लागले आहेत. हातगाड्यांवर केरळी लोक हे एवढे मोठाले फणस घेऊन बसले आहेत. कैऱ्या , करवंदे बघून तोंडाला पाणी सुटत आहे. ताडगोळे खरेदी करायला लोकांची गर्दी उसळत आहे. चिक्कूच्या टोपल्या भरल्या आहेत.
काजूची पिवळी केशरी बोन्डे किंवा काजूची फळे कलात्मक रित्या टोपल्यात बायांनी लावून ठेवली आहेत. त्यांचे रंग लोकांना आकर्षित करून घेत आहेत. जवळच काजूबियांच्या टोपल्याही भरल्या आहेत.