मिपाच्या नव्या थीमची ओळख
नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया.
सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे.
१) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल.
२) मेन्यु - सध्या वरच्या मेन्युमध्ये साहित्य प्रकार नावाचा मेन्यु आहे. यावर क्लिक केल्यावर त्या त्या साहित्य प्रकारातील लेख आपल्याला दिसतील. ह्या लेखांची मांडणी थोडी बदललेली आहे. जून्या टेबल पध्दतीप्रमाणे न मांडता थोडा परिचय यावा असा विचार करून नवी मांडणी आहे.
३) नवे लेखन - पुर्वी प्रमाणे चर्चेत असलेले सर्व प्रकारचे लेखन एकाजागेवर येथे असेल. यापुर्वी मिपाचे पहिले पान जसे होते तसा टेबल येथे आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही चर्चा लेख किंवा अन्य साहित्य चुकवणार नाहीच.
४) मिपा विशेषांक - आता पर्यंत मिपाने सादर केलेले सर्व विशेषांक / लेखमाला या जागी एकत्रीत केलेल्या असतील. आज हा मेन्यु उपलब्ध नाही. लवकरच हा मेन्यु सक्रिय करतो.
५) घोषणा - मिपा व्यवस्थापनाबाबत काही अधिकृत घोषणा असतील तर त्या येथून केल्या जातील.
६) मदत पान - नवीन सदस्यांना मिपावर वावरताना काही अडचण आल्यास येथे मदत मिळेल.
या नंतर पहिलं पान सुरू होतं. - पहिल्या पानावर मिपाचा दिनविशेष अथवा अन्य फलक असेल.
त्या खाली शिफारस नावाचा टेबल असेल. या शिफारसमध्ये मिपावर उत्तम लेखन लोकांसमोर मांडून त्या लेख/कविता/चर्चा आदींची शिफारस केली जाईल.
या टेबल खाली जे चौकोण आहेत त्यामध्ये त्या त्या साहित्य प्रकारात नवीन प्रकाशित झालेले लेखन असेल. यामध्ये केवळ नवीन प्रकाशन एवढाच निकष आहे.
या बॉक्स मध्ये एक सुविचार असेल. हा सुविचार बदलता असेल. तुम्ही येथे जोडण्यासाठी सुविचार पाठवू शकता.
त्या खाली मिपाचे फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि युट्युब चॅनलचा दूवा दिला आहे.
सर्वात खाली काळ्या रंगाच्या पट्टीवर काही नियमीत ब्लॉक आहेत जे आधीही होतेच. आता रंगसंगती बदलली आहे एवढंच.
याशिवाय मिपाच्या मांडणीत काही महत्वाचे बदल करतोय ते पुढील प्रमाणे...
आता नवीन साहित्य बनवण्यासाठी तुम्हाला पुर्वीप्रमाणे दिलेल्या बॉक्स मधून लेखन विषय किंवा प्रकार निवडण्याची गरज नाही तर लेखाच्या शीर्षकाखाली दिलेल्या बॉक्समध्ये सरळ तुम्ही तसा प्रकार किंवा कॅटेगरी लिहून जोडू शकता. यात फायदा हा आहे की तुम्ही करताय त्या लेखनाच्या अनुरूप टॅग तुम्ही लेखाला जोडू शकाल. ही सुविधा ऑटोकम्प्लीट पध्दतीमधील आहे. म्हणजे जर तुम्ही इतिहास हा टॅग जोडू पाहत असाल आणि तो आधीच जोडलेला असेल तर तुम्ही केवळ 'इति' एवढं लिहून वाट पाहिलीत की आधी जोडलेला इतिहास नावाचा टॅग तेथे दिसेल तो तुम्ही सिलेक्ट करावा. शक्यतो एकाचा नावाचे अनेक टॅक लिहिण्याच्या पध्दतीप्रमाणे वेगळे करू नये. आधी जोडलेला टॅग असेल तर तोच निवडावा. ( काही साहित्यप्रकारात हा बदल अद्याप नाही. एक दोन दिवसांत येईल.)
प्रतिक्रिया आणि लेखामध्ये लेखकाचा फोटो दिसण्याची सोय आता देण्यात आली आहे. याचा वापर सर्वांनी करावा. आपला फोटो जोडण्यासाठी उजव्या समासाता आपल्या सदस्यंनावावार टिचकी मारून आलेल्या पानावर संपादन मध्ये जाऊन खाली आपले चित्र चढवण्याची सोय दिलेली आहे. काही अडचण आल्यास येथे प्रतिक्रिया देऊन विचारू शकता.
नवीन रचना नवीन मांडणी अद्याप पुर्ण झालेली नाही. याला थोडा वेळ लागेल. जस जसे नवीन काही जोडले जाईल त्याची घोषणा येथेच केली जाईल.
वर्गीकरण
गुड गोईन्ग!
नीलकांत,
In reply to नीलकांत, by संजय क्षीरसागर
+1
उत्तम!
थिम यकदम हटके ऐहे पन... सर्च
प्रत्येकाचा फोटो असा काही
काही अप, काही डाऊन
रुपडं छान आहे.
नवे लेखन मध्ये स्वतःचे लेखन
नवं मिपा आवडलं.
Ordering on first page
साइन, स्मायली पुन्हा जाग्रुत
मस्तय नवीन रूप
व्वा भारीये.. नवीन थीम खूप
मिपातील बदल आवडले. अजून
nice efforts
इंटरनेट एक्स्प्लोअररमध्ये फार
सोपी आणि सुटसुटीत... छान जमली
नवी रंगसंगती छान आहे.
In reply to नवी रंगसंगती छान आहे. by नितिन थत्ते
लाल रंगाचे प्रमाण कमी
मीपकारांना आणि मालकांना
भारी आहे
एक नम्र विनंती
जबरदस्त
छान,आता मोबल्याफ्रेंडली साईट
थीम आवडलीच. नवीन वर्षाचे
थिम
आवागमन
In reply to आवागमन by पंतश्री
सहमत
थीम आवडली
थीम आवडली.. इतकी मेहनत घेतलीत
लेख, प्रतिसाद, उप प्रतिसाद,