अंतरंग
मी न माझे राहिले
शब्द कंठी दाटले,
सुक्या पापण्यांचे पाते
ओले भासले.
काय सांगु मनाला या
बुद्धीची अगतिकता.
स्वच्छंदी अंतरंग रंगले
नकळत हसु उमटले ,
जुन्या आठवणींचे मनी
गीत गुंजले .
अंतरंगाची वेडी माया
स्वप्नांची पाठ सोडेना,
बिलगुनी तू मज येता
अंगी रोमांच उठले.
बेधुंद मुक्त मनाने
वेध घेत करी आसमंती विहार.
आसवांना चुकवत करी
धाव जीवलागाचा.
ऊन सावलीचा खेळ आयुष्याचा,
गोडासाठी साथ खार्याची …
काव्यरस
मिसळपाव
२.