रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला
बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात.
माणूस पळू लागला कि,
त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात.
त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात.
मासे मिळताच बोकेमांजरे
माणसाला तिथेच सोडून देतात.
हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे!
मासे मिळाल्यावर,
मासे तर फस्त करायचेच
पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत
त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे,
मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे .......
हे मात्र फक्त माणसातच !
- शिवकन्या.
काव्यरस
वाचने
4758
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमची कविता आली की मी बरेचदा
तुमची कविता आली की मी बरेचदा वाचतेच. ही कविताही आवडली.
ठिक!
ठिक!
याप्रकारच्या कविता तुमचा
याप्रकारच्या कविता तुमचा ब्रँड आहे!
येऊंद्या!!
पुढील 'फक्त माणसांत'
पुढील 'फक्त माणसांत' कवितेच्या प्रतीक्षेत. काही दिवसांपूर्वीच तुमची आठवण काढली होती. छान कविता.
फार दिवसांनी तुमची कविता आली.
फार दिवसांनी तुमची कविता आली. आवडली.
दाद
दाद
आवडली.
आवडली.
त्रोटक वाटली.
त्रोटक वाटली.