मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

काही किस्से असे तसे !!! भाग १

वरुण मोहिते ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वी आम्हाला ड्रायविंग ची फार हौस होती . म्हणजे गुजरात , कर्नाटक ,मध्य प्रदेश अश्या ठिकाणी कामासाठी जायचं असेल तर अगदी विमानाचं तिकीट कॅन्सल करून पेट्रोल च्या पैश्यात ते ऍडजेस्ट करून निवांत गाडी चालवत जायचो . (मित्र असताना तर लडाख पर्यंत पण गेलोय )हे एकटा असतानाचं सांगतोय. बाकी खर्च स्वतःचा गाडी चालवताना .पण मजा यायची निरीक्षण करत चालवायला .हॉटेल वैगरे बुक असायचीच कंपनी कडून . तर एकदा चंद्रपूर च्या पॉवर प्लांट साठी माझ्यावर जबाबदारी आली . म्हणजे बाहेर जायचं परदेशात परत यायचं आठवड्याभरात मग चंद्रपूर ला जायचं .१-२ वेळा नागपूर ला विमानातून उतरून गेलो चंद्रपूर ला .

कास्तकारी :(

अॅस्ट्रोनाट विनय ·
लेखनविषय:
आज पाऊस येईन रोजच वाटतं वाट पाह्यता पाह्यता डोळ्यात पाणी दाटतं मळ्यातल्या विहरीपरी मनबीन आटतं जमिनीतल्या भेगांसंगं उर महं फाटतं चिंबओल्या वावराचं स्वप्न पहा वाटतं कुटका गिळून पडल्यावर झोपाच कुठं वाटतं कर्जाच्या ओझ्यानं सम्दं गणित हुकतं घरगुती चिंतायनं स्मशानगाव पेटतं कास्तकारी करणं आता पाप केल्यावानी वाटतं बैलावानी मलेबी मरून जा वाटतं

पुस्तकं

मितान ·
लेखनप्रकार
पुस्तकं जिवंत असतात. जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो. अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात. काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात. अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.

हे फक्त माणसातच !

शिव कन्या ·
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

( वरपरीक्षा )

रातराणी ·
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

तापतो उन्हाळा, निसर्ग देई गारवा

ऋतु हिरवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हंगामी भाज्या आणि फळे यांनी बाजार नुसता फुलला आहे. द्राक्षांचे घडच्या घड टोपल्या भरून दिसत आहेत. हिरवी आणि काळी ... आता द्राक्षे स्वस्त ही झाली आहेत. कलिंगडं, टरबूज, खरबूज यांचे ठिकठिकाणी स्टॉल लागले आहेत. हातगाड्यांवर केरळी लोक हे एवढे मोठाले फणस घेऊन बसले आहेत. कैऱ्या , करवंदे बघून तोंडाला पाणी सुटत आहे. ताडगोळे खरेदी करायला लोकांची गर्दी उसळत आहे. चिक्कूच्या टोपल्या भरल्या आहेत. काजूची पिवळी केशरी बोन्डे किंवा काजूची फळे कलात्मक रित्या टोपल्यात बायांनी लावून ठेवली आहेत. त्यांचे रंग लोकांना आकर्षित करून घेत आहेत. जवळच काजूबियांच्या टोपल्याही भरल्या आहेत.

दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस) चि शरण्या (उर्फ पिन्नीस) उद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्‍या आहेत. पाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दिलेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते. मला तो दिवस अगदी कालच्या सारखा आठवतो. सन्ध्याकाळी ४ पासून मी अस्वस्थ येरझार्‍या घालतो होतो. डॉक्टरीण बाई मध्ये मध्ये येऊन काय काय सान्गून जात होत्या.

अभी ची तनु

अभी ची तनु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ ( अभी गावाकडे ) आज सकाळ पासुनच जाधवांच्या घरी धावपळ सुरु होती . कारण जाधवांचा एकुलता एक मुलगा अभिमन्यु उर्फ (अभी) आज घरी येत होता.

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

गवि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ क

मिपाच्या नव्या थीमची ओळख

नीलकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया. सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे. १) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल. २) मेन्यु - सध्या वरच्या मेन्युमध्ये साहित्य प्रकार नावाचा मेन्यु आहे.