मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाङ्मय

‘कालान्तर’ : समाजातल्या व्यापक पडझडीचे वास्तवदर्शन

हेमंतकुमार ·
ok गेल्या 50-60 वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करणारा 43 लेखांचा हा संग्रह. हे लेख मुळात लोकमत दैनिकाच्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय कमावले आणि काय गमावले यांचा हा ताळेबंद. त्यातून लक्षात येते की, कमावण्याच्या बाजूला थोडेच असून गमावण्याच्या बाजूला मात्र भरपूर आढळले आहे. काही स्वागतार्ह बदलांपेक्षा पडझड मात्र कितीतरी अधिक व चिंताजनक आहे.

इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)

कुमार जावडेकर ·
भाग १: इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना भाग २: इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी भाग ३: इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?) पुरेसे प्रतिनिधी मिळाल्यावर कार्यक्रमाच्या तयारीसाठी गांधीजींनी सगळ्या व्याख्यात्यांची 'गोलमेज' परिषद आयोजित केली. मात्र यमसभेत मेज नसल्यामुळे ती नुसतीच 'गोल' परिषद झाली. त्यातून ‘परिषद’ ह्या शब्दाचा ज्या पक्षाशी संबंध असतो त्या पक्षाशी गांधीजींचा संबंध नसल्यामुळे त्यातून त्यांना मिळाला तो फक्त ‘गोल’! गांधीजींचा ‘ओन गोल’...

काल पाकिट रिकामे केले..

तुमचा अभिषेक ·
काल पाकिट रिकामे केले.. पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता. कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला.. गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली. एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते. एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला.. आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही. एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला..

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

राघवेंद्र ·
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.

घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो

उपेक्षित ·
कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील. पण हे क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात, अस वाटत की त्या अमरत्वाचा शाप मिळालेल्या अश्वत्थाम्या प्रमाणे आपल्याला पण हा युगानु युगे वाट पाहण्याचा शाप मिळालेला आहे का ? एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासतो आहे.

गीतारहस्य चिंतन-प्रकरण ७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार

Bhakti ·
गीतारहस्य-७ कपिलसंख्याशास्त्र किंवा क्षराक्षरविचार वेदांतींनी कणाद यांच्या परमाणु' सिद्‌धांताऐवजी कपिलाचार्यांचा सांख्य सिद्‌धांताला अद्वैत सिद्‌धांत न सोडिता बऱ्याच अंशी ग्राह्य धरले आहे. सांख्य शब्दाचा अर्थ- १.सांख्य हा शब्द सं-ख्या धातूपासून निघाला असल्यामुळे त्याचा पहिला अर्थ मोजणारा असा होतो. कपिलशास्त्रांतील मूलतत्वे 'पंचवीस' असल्यामुळे त्यांस 'मोजणारे' या अर्थी सांख्य विशिष्ट नाव मिळाले. २.नंतर सांख्य म्हणजे सामान्यतः तत्त्वज्ञान (सर्व प्रकारचे) असा व्यापक अर्थ बनला. ३.ईश्वरकृष्णाचा (इ.स.

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti ·
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

विजुभाऊ ·
पुस्तक परिचय पुस्तक : लढा आळशीपणाशी लेखक: चकोर शाह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस. परिचय कर्ता : चकोर शाह. रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री: इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की. या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

Bhakti ·
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.