Skip to main content

प्रिय राहूल देशपांडे,

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/09/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राहुल देशपांडे, (केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद, मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही.

बेहती हवा सा था वो..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 29/08/2010 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
बेहती हवा सा था वो...(येथे ऐका..) ३ इडियटस् चित्रपटातलं हे अप्रतिम गाणं. एका हरवलेल्या मित्राबद्दलचं हे मनोगत.. विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही.

केव्हा तरी पहाटे..

लेखक इला यांनी रविवार, 29/08/2010 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना एका मैत्रिणीने केव्हा तरी पहाटे हे गाणं म्हटलं...तर त्यावरून एका मैत्रिणीला याच गाण्यासाठी काही ओळी सुचल्या. मग त्यानंतर सगळ्यांनाच हा फीवर चढला...हे माझेही काही प्रयत्न - ही कडवी चालीत बसत नसली तरीही त्यातील भावार्थ गाण्याला अनुरूप असा आहे या शांतशा क्षणांनी मागितली साथही कुणाची ती साथ मागताना ही रात सरून गेली.. शब्द माझे भिजताना सजवून रात्र गेली हे शब्द वेदनांचे सुचवून रात्र गेली.. बघा तुम्हालाही अजून काही सुचतंय का?

कलात्म :- गोष्ट नव्या विचारांची... !!!

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 24/08/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी कलात्म हा विशेषांक वाचल्यानंतर लिहिलेले काही ... कला हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच, कलेच्या विविध अंगावर सातत्याने चर्चा होत आलेली आहे. त्याशिवाय, वेगवेगळया perspective ने त्याचा अभ्यासही झाला आहे, होत आहे. मात्र कलेचा सामाजिक अंगाने फारसा अभ्यास झालेला दिसत नाही, निदान मोठ्या प्रमाणात झालेला नाही असे मला वाटते . म्हणूनच या विषयाला वाहिलेला "कलात्म" विशेषांक हे एक युनिक प्रॉडक्ट आहे. तसे पहायला गेले तर कलेवर सामाजिक अंगाने १० वर्षापूर्वीच काही व्हायला हवे होते , नाही का? पण, ते आत्ता होतयं!! असो , देर हे लेकिन दुरूस्त है !

पल पल दिल के पास...

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 23/08/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन माझा मित्र चंद्रशेखर महामुनीचे आहे. आधी इ-सकाळवर प्रकाशित झालंय पण त्याच्या परवानगीने इकडे प्रकाशित कर्तेय... पल पल दिल के पास... हर शाम आँखोपर तेरा आँचल लहेराये, हर रात यादों की बारात ले आये मै सॉंस लेता हूँ, तेरी खुशबू आती है इक महका महका सा, पैगाम लाती है मेरे दिलकी धडकन भी, तेरे गीत है पल पल दिल के पास, तुम रहती हो जीवन मिठी प्यास, ये कहती हो... प्रियतमेच्या आठवणींचं, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भासणाऱ्या तिच्या हव्याहव्याशा अस्तित्वाचं इतकं अप्रतिम वर्णन खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं.

सरदारी बेगम

लेखक शरद यांनी रविवार, 08/08/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
बिनधास्त "सरदारी बेगम" हा चित्रपट श्री.श्याम बेनेगल यांनी १९९६ साली काढला.एका सत्यकथेवर आधारलेला हा चित्रपट छान होताच पण तो आजही लक्षात रहातो त्यातील अतीव सुंदर गाण्यांनी. जावेद अक्तर यांची गीते, भाटिया यांचे संगीत व आशा भोसले, आरती अंकलीकर, शुभा जोशी या तीन मराठी गायिकांच्या सुरेल आवाजांचा असा काही घाट जमून आला आहे की "क्या कहिये". कोठीवर गायली जाणारी ठुंबरी. होरी, टप्पा यांचा सुरेख उपयोग करून घेतला आहे. सिनेमा दुर्लक्षून आज आपण त्यातील दोन गाणी बघू. पहिले आहे "चाहे मार डालो राजा".

गण: वंदन करीतो गजाननास

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: वंदन करीतो गजाननास यावे गणास गणपती आज नमन करीतो आम्ही तुम्हास रसीक जमले तुमचा भास होवूद्या गौळणवग खास वंदन करीतो गजाननास ||धृ|| कार्यारंभी वंदन करूनी गणास आळवी शुभशकूनी हाती घेतली डफतुणतूणी द्यावा आशिर्वाद आम्हास वंदन करीतो गजाननास ||१|| सरस्वतीचे लेणं लिहूनी गान मंदिरी गाणं गावूनी नम्र होवूनी तिजला वंदूनी विनवितो बुद्धी देवीस वंदन करीतो गजाननास ||२|| कला आमची रसीका दाखवाया भाग्यवंत पुण्यवंत आम्ही ठराया लवकर येवूनी आम्हास पावा गणात नित भजतो तुम्हास वंदन करीतो
काव्यरस

३० जुलै - वसंतराव देशपांडे यांचा स्मृतिदिन

लेखक भारी समर्थ यांनी मंगळवार, 03/08/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दर्‍याखोर्‍यातून बेफाम दौडत जाणार्‍या घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर ऊन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पहायला ऊन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. - पु.ल. देशपांडे फार दिवसांपूर्वी ’नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी ’बगळ्यांची माळ फुले’ गायले होते. त्यावेळी गाण्याचे मूळ गायक ’वसंतराव देशपांडे’, अशी प्रथमच माहिती मिळाली. पण, वसंतरावांची पहिली खरी ओळख झाली ती पुलंनी त्यांच्यावर लिहीलेल्या एका लेखातून.

विरासत

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 03/08/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.