Skip to main content

गण: वंदन करीतो गजाननास

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: वंदन करीतो गजाननास

यावे गणास गणपती आज
नमन करीतो आम्ही तुम्हास
रसीक जमले तुमचा भास
होवूद्या गौळणवग खास
वंदन करीतो गजाननास ||धृ||

कार्यारंभी वंदन करूनी
गणास आळवी शुभशकूनी
हाती घेतली डफतुणतूणी
द्यावा आशिर्वाद आम्हास
वंदन करीतो गजाननास ||१||

सरस्वतीचे लेणं लिहूनी
गान मंदिरी गाणं गावूनी
नम्र होवूनी तिजला वंदूनी
विनवितो बुद्धी देवीस
वंदन करीतो गजाननास ||२||

कला आमची रसीका दाखवाया
भाग्यवंत पुण्यवंत आम्ही ठराया
लवकर येवूनी आम्हास पावा
गणात नित भजतो तुम्हास
वंदन करीतो गजाननास ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०८/२०१०

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1285
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया