नमस्कार !
मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.
एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग..