Skip to main content

कृष्णा नी बेगने..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 28/06/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा नी बेगने..(येथे ऐका) (हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी.

ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 27/06/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख इतरत्र पूर्वप्रकाशित. काल हा लेख मिपावर लिहावयास गेलो परंतु कामकाजानिमित्त मिपा बंद होते, त्यामुळे अन्य संस्थळावर लिहिला होता. आज मिपा सुरू झालेले पाहिले म्हणून इथेही डकवत आहे.. --तात्या. माझे किती क्षण राहिले.. (येथे ऐका, येथे अनुभवा!) दूर कुठेतरी आमिरखासाहेब मारवा आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश भट मारवा उलगडून सांगताहेत..! 'माझे किती क्षण राहिले..

आठवणीतल्या मैफली - १

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 24/06/2010 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईला आयायटीत असतानाची गोष्ट. झेवियर्स कॉलेजने 'मल्हार के प्रकार' सादर करण्यासाठी गंगुबाई हनगळाना आमंत्रित केलं होतं. गंगुबाईना माझ्या सांगितीक अनुभूतीच्या अवकाशात एक विशेष स्थान आहे. या कार्यक्रमापूर्वी मी त्यांना रेडिओवर संगीतसभांमध्ये फक्त ऐकायचो. प्रत्यक्ष मैफल ऐकायचा हा पहिलाच योग होता. झेवियर्स मधली ही मैफल बर्‍यापैकी रंगली होती, पण मला काही तरी हवं होतं आणि ते मिळत नसल्याची एक रुखरुख मनाला लागली होती.

पल पल है भारी..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 23/06/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
पल पल है भारी.. (येथे ऐका) स्वदेस चित्रपटातल्या रामलिलेतलं एक अतिशय सुंदर गाणं.. पल पल है भारी वो विपदा है आई मोहे बचाने अब आओ रघुराई.. स्वराच्या तबल्याचा छान भजनी ठेका. जौनपुरी रागातला सुंदर मुखडा. राग जौनपुरी. आपल्या रागसंगीतातला एक अतिशय गोड, कारुण्याने भरलेला राग! आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ या पुढल्याच ओळीत जौनपुरी बदलला आहे.. जौनपुरीत वर्ज्य असलेले शुद्ध गंधार, शुद्ध निषाद अचानक ताबा घेतात आणि जौनपुरीच्या सुरावटीत हा अचानक झालेला बदल कानाला सुखावून जातो.

गाणे हवे आहे: नंद नंदन बिलमाई... mp3

लेखक संजय अभ्यंकर यांनी बुधवार, 23/06/2010 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
नंद नंदन बिलमाई... कजरारे घिरि माई माई रे... असे काहिसे शब्द आहेत. हे गाणे mp3 रुपात हवे आहे. हे भक्तीगीत मीराबाईचे भजन आहे. एके काळी रेडीयोवर मंगलप्रभात मध्ये वाजत असे. बहुदा लताजी किंवा सुधा मल्होत्रा ने गाईले आहे. बरेच गुगलूनही सापडत नाही. कोणी मिपाकर देऊ शकेल काय?

मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 23/06/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टर मदन मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२) २८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७. अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया. हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”.