सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms
उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे. त्यांना कायदा कळतो की नाही, असाच प्रश्न पडतो.