Skip to main content

राजकारण

झडती

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 26/07/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.

चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 25/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मित्राने झेटगिस्ट (Zeitgeist) नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म पहायला दिली. ही फिल्म २००७ मधे पीटर जोसेफ नावाच्या माणसाने बनवली. झेटगिस्ट एक जर्मन शब्द आहे. ज्याचा डिक्शनरीप्रमाणे अर्थ होतो - the spirit of the time; general trend of thought or feeling characteristic of a particular period of time. जवळपास दोन तासांची ही फिल्म खालील तीन भागात मांडली आहे. भाग १. आत्तापर्यंत सांगितली गेलेली सर्वोत्कृष्ट कथा (येशूच्या अस्तित्वाचा शोध): पुरातन काळापासून (धर्म अस्तिवात यायच्या आधीपासून), सूर्याला लोक प्रचंड मानतात.

`पग' घुंगरू...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 20/07/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा : ही पाहा pug "गद्दारांना शिवसेना भवनात स्थान नाही!'' उद्धव ठाकरे गरजले, तशी सर्वांचीच पळापळ झाली. विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश असताना कोण गद्दार शिवसेनेत पुन्हा घुसण्याचा किंवा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, हे काही कळेना.

पारध झालेला तो पारधी - २

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 16/07/2009 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहजकाकांनी व्य. नि. मलाही केला होता. तो धागा खूप पुढं गेल्यानं हा नवा धागा काढतोय. मूळ धागा
---
सहजरावांचे म्हणणे - सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न.

लाजाळू

लेखक ॐकार यांनी शनिवार, 27/06/2009 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक बागायतदार होता. एका वर्षी पावसाने झोडपून काढल्याने त्याच्या घरासामोरील एका बागेचे फार नुकसान झाले. त्यामुळे तो बागायतदार फार दु:खी झाला. अनेक वर्षे त्याने स्वतः नवनवीन रोपटी आणून, कलमं करून, खतपाणी घालून ती बाग फुलवली होती. आता आपण परत काही ती बाग फुलवायची नाही असे त्याने ठरवले. पुन्हा असा पाऊस झाला तर पुन्हा असे दु:ख आपल्याला सोसवेल की नाही अशी त्याला चिंता वाटत होती. वर्षभरात त्या बागेतल्या काही रोपट्यांनी आपोआप माना वर केल्या. तग धरून राहिलेली रोपटी पुन्हा तरतरून आली. पण त्या बागेत रान माजल्यासारखे दिसत होते. बागेची काळजी घ्यायला कोणी नव्हते.

"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 23/06/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा
ही मुलाखत कांहीं CNN सारख्या उतरती कळा लागलेल्या (Decadent) पाश्चात्य वृत्तसंस्थेवरील मुलाखत नसून "अल् जझीरा" या अरबी वृत्तसंस्थेने घेतलेली मुलाखत असून ती कालच (२१ जून ०९ला) अल् जझीरा चॅनेलवर प्रसारित झाली. अल्-कायदा या संघटनेचा ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचा तिसर्‍या क्रमांकाचा नेता मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर ’अल्-कायदा’च्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरायला मागे-पुढ

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १०

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 21/06/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 18/06/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय हा लेख या आधी कुठेही प्रकाशित झलेला नाहीं. सर्वप्रथम मिसळपाववर प्रसिद्ध करताना मला हर्ष होत आहे. महत्वाचे: या भाषणातील (बहुतेक) सर्व मतें ओबामांची आहेत. यजमान इजिप्तच्या जनतेचे आभार मानीत, आम अमेरिकन जनतेच्या व खास करून अमेरिकन मुस्लिम जनतेच्या जागतिक शांतीसाठीच्या सदिच्छांचा उल्लेख करीत व "अस्सलाम आलेकुम" असं खास इस्लामी थाटाचं अभिवादन करीत व टाळ्यांच्या कडकडाटात ओबामा कैरो विश्वविद्यालयाच्या सभागारात प्रवेश करते झाले. ओबामांची एक खासियत आहे. ते कधीच तिरकस बोलत नाहींत.

शिवसेना पुन्हा उभी राहील?-उत्तरार्ध

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 17/06/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशन-सकाळ वेब एडिशन-१६ जून २००९ http://beta.esakal.com/2009/06/16161359/pailteer-shivsena-feature.html OR http://tinyurl.com/lz46st शिवसेना पुन्हा उभी राहील?-उत्तरार्ध ज्याला इंग्रजी भाषेत sequel म्हणतात व मराठीत ज्याला पूरक लेख म्हणता येईल या प्रकारात मोडणारा हा लेख सकाळ वेब एडिशनवर प्रकाशित झालेल्या शिवसेनेच्या पुनरुत्थानावर लिहिलेल्या माझ्या लेखाला वाचकांकडून मिळालेल्या प्रतिसादांवर आधारित आहे व हा लेखही वाचकांना आवडेल अशी आशा आहे. सर्वप्रथम जे मराठी म