Skip to main content

राजकारण

संघटनापालट-2

लेखक अन्वय यांनी रविवार, 25/10/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
राज आणि काका बरेच दिवसांनी भेटत होते. बोलत होते. त्यामुळे बराचवेळ दोघे एकमेकांना डोळे भरून पाहात होते. नि:शब्द निरव शांतता त्या भव्य दिवाणखान्यात दाटून राहिली होती. मदतनीस आत निघून गेला होता. "काय म्हणतेय तब्येत?'' त्या शांततेत राजचा स्वर घुमला. "अजून ठणठणीत आहे. तू बघतोच आहेस.'' काका उपरोधाने बोलले. कधीकाळी आपल्या आवाजानं भल्याभल्यांची भंबेरी उडवणाऱ्या काकांचा आवाज थकल्याचं राजला स्पष्टपणे जाणवत होतं. त्यांना बोलताना मधेमधे धापही लागत होती.

नव्या `इतिहासा'ची `नांदी'?

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/10/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
हाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या असताना त्या मुद्‌द्‌यांवर प्रचाराची राळ उठविण्याऐवजी राज ठाकरे यांना "टार्गेट' करून विधानसभा निवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न बूमरॅंगसारखा उलटल्याने "युती'ची वाताहात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिला ठोसा लगावून शिवसेनेला घायाळ करणाऱ्या "मनसे'चा "दुसरा ठोसा' विधानसभेच्या निवडणुकीत बसल्याने शिवसेना-भाजप युती जायबंदी झाली आहे.

संघटनापालट

लेखक अन्वय यांनी शुक्रवार, 23/10/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राजच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. पण दिवसभर शुभेच्छांचे फोन, प्रत्यक्ष भेटी, पत्रकार परिषद यामुळे तो थोडा थकलेला होताच. रात्री साडेसातच्या सुमारास त्याने आपल्या सचिवाला बोलावले. "हे बघ, आता मला कोणाचे फोन देऊ नकोस. मी कुणालाही भेटणार नाहीये. आराम करतो जरासा. कळलं का?'' राजसाहेबांचा आदेश घेऊन सचिव मान डोलावून निघून गेला... राज दिवाणखाण्यात आला. त्यानं सोफ्यावर अंग टाकून दिलं. समोर वडील आणि काका यांचे फोटो होतेच. ते दोन्ही फोटो न्याहाळताना त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. "बाबा असते तर, त्यांना आज किती आनंद झाला असता.'' राज स्वत:शीच पुटपुटला.

(बहुधा)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/10/2009 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल बहुधा वाचुन लिहण्याचा मोह आवरला नाही :( त्यांना त्याचे मोहरणे रुचलेच नसावे त्यांचे त्याचे बंध कधी जुळलेच नसावे बंधाचे हे नाव ठाकरे, गोजिरवाणे, भावा- र्थाचे बीज इथे रुजलेच नसावे भावांनी तोडली, जपावी, असली नाती, नेते मन त्यांचे, महाभारतच बघावे !
काव्यरस

आगीशी खेळ!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 20/10/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यांची, सर्वसामान्यांची, अतिसामान्यांची आणि असामान्यांची दिवाळी असते, तशीच राजकीय नेत्यांनाही दिवाळी असतेच की! त्यांच्या घरीही गोडधोड पदार्थ होतात, वेगवेगळे फराळाचे प्रकार केले जातात, आप्तेष्ट-नातेवाइकांना निमंत्रणं धाडली जातात, अगदी आनंदाचा महोत्सव असतो म्हणा ना! हां. इतरांपेक्षा राजकारण्यांची दिवाळी वेगळी म्हणायची ती या अर्थानं, की दिवाळीच्या आगचे-मागचे वातावरण कसे आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. सध्याचे त्यांचे ग्रहमान, पक्षश्रेष्ठींची मर्जी, सध्या असलेली जबाबदारी, येऊ घातलेली संकटं, विरोधकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, या सगळ्यावर त्यांच्या दिवाळीचा "मूड' ठरत असतो.

दोन कोल्ह्यांची (इसापनीतीबाहेरील) सुरस कथा!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 19/10/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy-Cathy Scott-Clark लिखित पुस्तक वाचत आहे. सध्या फक्त २० टक्केच वाचून झालेय. पण या भागात जे वाचले त्यावरून दोन गोष्टी ल़क्षात येतात त्या इथं मांडाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहितोय. (१) रोनाल्ड रेगन यांची हॉलीवूडमधील एक अभिनेता म्हणूनची कारकीर्द कितीही अयशस्वी झाली असो, पण राष्ट्रपती या भूमिकेत त्यांनी जे आपलं अभिनयकौशल्य दाखविलं ते असामान्यच होतं असे म्हणावं लागेल. चेहरा 'सरळ' ठेवून इतकं धादांत खोटं बोलण्याचं त्यांचं प्राविण्य फारच श्रेष्ठ दर्जाचं होतं यात शंका नाहीं (त्याचा वापर भारताच्या विरुद्ध केला गेला म्हणून "कौतुकास्पद" म्हणवत नाही हे मात्र खरं!).