शिवसेनेचा निलाजरेपणा
लेखनप्रकार
सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms
उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे. त्यांना कायदा कळतो की नाही, असाच प्रश्न पडतो. शिवसेनेत हुकूमशाही आहे म्हणून देशात किंवा राज्यातही हुकूमशाही आहे, असा उद्धव यांचा समज झालेला दिसतो. परंतु देशात अजूनही लोकशाही व्यवस्था चांगल्या पद्धतीने नांदते आहे, हे कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे. इथे हजारेंच्या खूनाची सुपारी देणाऱ्याची बाजू घेत नाही. परंतु आमचे सरकार आले म्हणजे एखाद्याला फाशी दिली जाईल, हे विधान निश्चित कायद्याला धरून नाही. फाशीचा निर्णय हा न्यायालयाचा अधिकार आहे. तो अधिकार न्यायालयाने अजून तरी उद्धव ठाकरे यांना दिलेला नाही. त्यामुळे असे विधान करणे अर्धवटपणाचे तर आहेच; परंतु ते जनतेची दिशाभूल करणारेही आहे. उद्धव ठाकरे उद्या उठतील आणि युती शासन सत्तेवर आल्यास नारायण राणे आणि राज ठाकरे यांना फाशी देण्यात येईल, असेही म्हणतील! कारण जे विरोधात बोलतात, ते शिवसेनेला जगाचे शत्रू वाटतात...
लाज बाळगा!
भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या या महात्म्याचा आता शिवसेनेला पुळका आला आहे. पण 1998 मध्ये याच शिवसेना-भाजप सरकारने हजारेंना तुरुंगात टाकले होते. त्यावेळी अण्णांचे मोल त्यांना कळले नव्हते का? आता निवडणुकीसाठी मुद्दा मिळाला शिवसेना तो "कॅश' करीत आहे. याच उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब अण्णांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते. त्यांनी बाळासाहेबांच्या तोंडाला हात का लावला नाही? आता पोकळ बाता मारून काय उपयोग?...
वाचने
4242
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
आम्ही सत्तेवर आल्यावर अमक्या तमक्याला फाशी देउ असे म्हणणे आमच्या कडे दुसरा मुद्दा नाही असे कबूल करणे.
In reply to शम्भर टक्के सहमत by उनाड
पण टायगरसाहेब, शिवसेनेच्या कथित निलाजरेपणाबद्दल बोलण्याआधी इथे आपण आपल्या खर्या नावानिशी लिहा. टोपणनावाआड लपून एखाद्यावर टीका करणे सोपे असते. आजकाल उठसूठ शिवसेनेवर टीका करण्याची फॅशन आली आहे. :)
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
In reply to असो. by अनंता
उद्धव ठाकरेंचा अभ्यास कच्चा दिसतोय. त्यांच्या या अज्ञानमूलकतेचाच फायदा त्यांच्या भोवताली असणाऱ्या कोंडाळ्याने घेतला आहे. युद्धव यांचा इगो पोसून ते आपापली घरे भरताहेत. उद्धव यांना राज यांना हरलेले बघायचे आहे; पण ते काही नियती होऊ देत नाही. कारण केलेली पापे याच जन्मी भोगावी लागतात, असे म्हणतात. उद्धव हा अत्यंत गर्विष्ठ, अपरिपक्व प्रवृत्तीचा माणूस वाटतो. त्यांची विधाने, भाषणे आणि पत्रकार परिषदा यातून त्यांची प्रवृत्ती ठळकपणे डोकावते. राज ठाकरे यांच्याविषयी ते अत्यंत तुच्छतेने बोलतात. अशा प्रकारे बाळासाहेब स्वत:ही कधी राजबद्दल बोललेले नाहीत.
एक प्रसंग आठवतो. वाचण्यात आलेला आहे. दोन तीन वर्षे झाले असावीत...
एका पावसाळ्यात मातोश्रीला पाण्याने वेढले होते. त्यावेळी बाळासाहेबांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. ते स्वत: राज यांच्या घरी मुक्कामास गेले होते. परंतु उद्धव आपल्या वैयक्तिक कुटुंब कबिल्यासह एका पंचतारांकित हॉटेलात वास्तव्यास गेले होते म्हणे. राज यांच्या घरी बाळासाहेब गेले; पण उद्धव गेला नाही. राज यांचे घर उद्धव, त्याची मुले आणि बायको सामावणार नाही इतके छोटे नक्कीच नसेल! तेव्हा तर राज ठाकरे शिवसेनेतच होते. यावरून उद्धव यांच्या मनात राजविषयी किती राग आहे हे उमगते.
आयते मिळालेले राखणे हेही मोठे कष्टाचे काम आहे. एवढे कष्ट उद्धवला करता येणार नाही, हे तितकेच खरे!
In reply to बाळासाहेब राजच्या घरी by घोडीवाले वैद्य
एका पावसाळ्यात मातोश्रीला पाण्याने वेढले होते.
२६ जुलै २००५.. कसा विसराल तो दिवस..? अख्खी मुंबापुरी जलमय झाली होती..!
--सुहास
In reply to असो. by अनंता
अनंतराव,
टोपणनांवाने न लिहिता खर्या नांवाने लिहायला सांगत आहात. पण विचारांचा विरोध वा प्रतिवाद हा मुद्यांनी न करता गुद्द्यांनी करायची शिवसेनेची परंपरा आहे. आठवा, 'सोबतकार' ग. वा. बेहेरे यांना 'सेनापती की शेणापती' हा लेख लिहिल्याबद्दल मुंबईत कसे चोपून काढण्यात आले होते. हाफकिन् च्या येमुल यांच्या तोंडाला कसे काळे फासण्यात आले होते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
चुकिचि दुरुस्ति....याच उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब अण्णांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते...बाळासाहेब असे म्हणाले नसुन..बाळासाहेब......."याच उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब अण्णांना वाकड्या नाकाचा गांधी म्हणाले होते...असे वाचल्याचे स्मरते
In reply to चुकिचि by अविनाशकुलकर्णी
नाही नाही. वाकड्या 'तोंडा'चा गांधी च म्हणाले होते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
In reply to नाही नाही. by नितिन थत्ते
आता त्यांचं काय "वाकडं" आहे ह्यावर इथं वाद घालून कोणाचं ** वाकडं होणार आहे का हो ? पब्लिक हाताला मिळेत ते तानत बसतं राव
In reply to आता by टारझन
मागचे काही दिवस लई वैचारिक का काय म्हणतात तशी ताणाताणी चालली होती. त्याचा हँग ओव्हर अजून उतरला नाहीये.
खराटा
(रंग माझा वेगळा)
In reply to चुकिचि by अविनाशकुलकर्णी
नाही. वाकड्या 'तोंडा'चा गांधी च म्हणाले होते.
कारण अण्णांचे तोंडच वाकडे आहे.
व्यंगचित्रकाराची नजर आहो ती!
In reply to चुकिचि by अविनाशकुलकर्णी
बबनराव घोलप आणि महादेव शिवणकर ह्या भ्रष्ट मंत्र्यांना काढुन टाकावे म्हणुन अण्णा हजारे ह्यानी उपोषण केले होते.ह्यावरुन 'रिमोट कंट्रोल ' आणि 'आदरणीय अण्णा' लेख लिहिणारे गडकरी भडकले होते. शेवटी प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यावर दोन्ही मंत्र्यांना हाकलण्यात आले.ह्याचवेळी 'वाकड्या तोंडाचा गांधी' असे ठाकरे हजारेना म्हणाले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मी जर सत्ते वर आलो तर फडतुस धागे काढणार्याला फाशी देणार
=))
=)) =))
=))
आहो तुम्ही णका घाबरू तुम्हाला नाय फाशी .. फडतुस धागे काढणार्याला म्हणालो मी !! बाकी कोणता नेता काय बकवास करतो ह्या कडे आपण दुर्लक्ष करावं .. आपण सुज्ञ असलो की काय बोलणे आणि काय बकवास .. हे लगेच कळते
- टाराज ठाकरे
मिसळपाव नवनिर्माण सेणा
In reply to मी जर by टारझन
अफजल गुरु आनि त्या कसाबला ध्यानात ठ्येव गड्या.
मिसल्पाव नवनिर्माण सेनेत येउ का असे विचारणारा .
फाशीचा निर्णय हा न्यायालयाचा अधिकार आहे. तो अधिकार न्यायालयाने अजून तरी उद्धव ठाकरे यांना दिलेला नाही.
हे बाकी खरंच! उद्धवांचा अंमळ गैरसमज झालेला दिसतो! :)
'आपले सरकार आले म्हणजे आपल्याला एखाद्याला डायरेक्ट फाशी द्यायचा अधिकार पोहोचतो!' हा समज एक तर अज्ञानमूलक तरी आहे किंवा अत्यंत दर्पोक्तियुक्त तरी आहे!
असो..!
सेनेच्या कार्याधक्षांची अज्ञानमूलक वा दर्पोक्तियुक्त विधाने पाहता एकंदरीत सेनेला अखेरची घरघर लागल्याचे समजते!
आपला,
(मनसेप्रेमी) तात्या.
एख्याद्या दिव्याची ज्योत विझताना एकदम मोठि होते तसा हा प्रकार आहे.
या असल्या गोष्टीत शक्ती वाया नका घालु हो! हे सगळे एकाच माळेचे मणी.
निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे फक्त मजा अनुभवायची!
सामान्य माणूस किती बेदरकार झाला आहे. निवडणूक होईपर्यंत आपण त्यांची मजा पाहात राहणार आणि एकदा का ते सत्तेत आले की, ते जनतेची अवस्था दयनीय करून मजा पाहात बसणार, हे आपल्या लक्षात कसे येत नाही. इतका बेजबाबदारपणा करून चालणार नाही, सॅंडी साहेब!
गेली चाळीस वर्षे शिवसेना पक्ष राजकारणात आहे. एकदा सत्ताही त्यांच्याकडे गेली; परंतु मराठी, मराठी असे भजन करण्यापलिकडे त्यांचे रचनात्मक काम काय? दूरगामी विचार करून त्यांनी उभारलेला एखादा प्रकल्प सांगताही येणार नाही आणि दाखविताही येणार नाही.
हे मतदार निगरगट्ट झाल्याचे परिणाम आहेत. माझा व्यक्तिश: उद्धव ठाकरेंना विरोध नसून ते जी बेताल आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत त्याला आहे. उद्धव ठाकरे यांनी काहीही बोलावे आणि जनतेने ते ऐकून घ्यावे, हे चुकीचे आहे. त्यांना जाब विचारालाच गेला पाहिजे. अण्णा हजारेंच्या खुनाची सुपारी देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही फाशी कशी देणार याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडे मागितलेच गेले पाहिजे. हे कुणी विचारत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. म्हणूनच त्यांची भीड चेपली आहे. आता मीडियादेखील इतका स्वस्त (चीप) झालाय की कुणी काहीही बोलेले, तरी त्याचे विधान शंभरवेळा दाखविले जाते. यामुळे सवंग प्रसिद्धी मिळविण्याची सवय राजकीय नेत्यांना लागली आहे. त्यातल्या त्यात शिवसेना हा तर नाकर्त्या नेत्यांचा पक्ष आहे. त्यांना तर असली थेरं चांगली जमतात.
इतका बेजबाबदारपणा करून चालणार नाही
चर्चा केल्याने जबाबदार आहोत असे थोडेच आहे टायगरदादा?
हे नेते लोक निवडणुका आल्या की असेच व्यक्तव्य करणार, आणि आपल्यासारख्या लोकांना भरकटवणे हाच तर खरा उद्देश.
आपल्यासारखे मतदार त्याला जास्तच गंभीरपणे घेतात. तरी अशा विधानांची तुर्तास तरी मजा अनुभवा. जबाबदारी मतदान करताना पार पाडा... चर्चा करुन काय बी हाशील नाय.
In reply to इतका by सँडी
चर्चा करुन काय बी हाशील नाय.
सॅंडीसाहेब तुम्ही फार सुखवस्तू किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातील दिसताय. चर्चा करून फायदा काय, असा तुमचा सवाल आहे. परंतु कोणतेही मोठे आंदोलन किंवा चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची उर्मी ही चर्चेतून मिळते. समूहात चर्चा होते. वाद झडतात आणि मग एक निर्णय निश्चित केला जातो. त्यानुसार पुढील कार्यवाही होते. हे एखाद्या आंदोलनात भाग घेतलेल्या व्यक्तीला चांगले समजू शकेल. सॅंडीसाहेब तुमची पार्श्वभूमी काय आहे, हे माहीत नाही. चर्चेची जर गरज वाटली नसती, तर मिसळपावचे सभासदही तुम्ही झाला नसता.
उद्धव ठाकरे अद्याप "बाल"बुद्धीतून बाहेर आलेले नाहीत हेच खरे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
भडक वक्त्यव्ये केली की अमाप प्रसिध्दी मिळते असे त्यांना माहीत आहे. म्हणुन उचलली जीभ लावली टाळुला असा प्रकार ते करुन बसलेत. परंतु भारतात लोकशाही नांदते आहे हे ते सोयिस्कर रित्या विसरतात. असो राजकारण करायचे तर भडक वक्त्यव्ये करावी लागतात हे मान्य करुत परंतु त्यात राजकिय व्यवहार कुशलता असावी असे आपणा सर्वांचे एकमत (बारामती नसावे) असावे.....
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
In reply to राजकिय व्यवहार कुशलता असावी by आम्हाघरीधन
च्यायला टाळुला जिभ कशी लावतात बॉ ?
असो, सगळेच पक्ष निलाजरे आहेत. ते म्हणतात ना हमाम मे सब नंगे तसली गत आहे.
महानिर्लज्ज
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
बालिश बहु जनतेत बडबडला.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085
शम्भर टक्के सहमत