आय डोन्ट सी यू!
(सदर लेख राजकारणाचे विडंबन असून, राजकारणाचा, विडंबनाचा, (तथाकथित) उपरोधिक लिखाणाचा तिटकारा असलेल्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. गेल्यास होणाऱ्या त्रासास लेखक जबाबदार राहणार नाहीत.)
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे "आयसीयू'त असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजारपणाच्या आधीपासूनच बऱ्याच जणांना राजकीय धक्के देऊन त्यांची राजकीय प्रकृती बिघडवून टाकली होती. रुग्णालयात असतानाही ते असे काही करतील, याची भल्याभल्यांनाही कल्पना नव्हती.
अडवानींनी ठाकरेंची भेट मागितली आणि ती नाकारल्याची चर्चा भाजप-शिवसेनेपेक्षाही प्रसारमाध्यमे आणि कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'तच जास्त रंगली.
मिसळपाव