मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

लाजाळू

ॐकार ·
एक बागायतदार होता. एका वर्षी पावसाने झोडपून काढल्याने त्याच्या घरासामोरील एका बागेचे फार नुकसान झाले. त्यामुळे तो बागायतदार फार दु:खी झाला. अनेक वर्षे त्याने स्वतः नवनवीन रोपटी आणून, कलमं करून, खतपाणी घालून ती बाग फुलवली होती. आता आपण परत काही ती बाग फुलवायची नाही असे त्याने ठरवले. पुन्हा असा पाऊस झाला तर पुन्हा असे दु:ख आपल्याला सोसवेल की नाही अशी त्याला चिंता वाटत होती. वर्षभरात त्या बागेतल्या काही रोपट्यांनी आपोआप माना वर केल्या. तग धरून राहिलेली रोपटी पुन्हा तरतरून आली. पण त्या बागेत रान माजल्यासारखे दिसत होते. बागेची काळजी घ्यायला कोणी नव्हते.

"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा

सुधीर काळे ·
"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा
ही मुलाखत कांहीं CNN सारख्या उतरती कळा लागलेल्या (Decadent) पाश्चात्य वृत्तसंस्थेवरील मुलाखत नसून "अल् जझीरा" या अरबी वृत्तसंस्थेने घेतलेली मुलाखत असून ती कालच (२१ जून ०९ला) अल् जझीरा चॅनेलवर प्रसारित झाली. अल्-कायदा या संघटनेचा ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचा तिसर्‍या क्रमांकाचा नेता मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर ’अल्-कायदा’च्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरायला मागे-पुढ

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १०

प्रसन्न केसकर ·
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय

सुधीर काळे ·
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी कैरो येथील मुस्लिम जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा संक्षिप्त परिचय हा लेख या आधी कुठेही प्रकाशित झलेला नाहीं. सर्वप्रथम मिसळपाववर प्रसिद्ध करताना मला हर्ष होत आहे. महत्वाचे: या भाषणातील (बहुतेक) सर्व मतें ओबामांची आहेत. यजमान इजिप्तच्या जनतेचे आभार मानीत, आम अमेरिकन जनतेच्या व खास करून अमेरिकन मुस्लिम जनतेच्या जागतिक शांतीसाठीच्या सदिच्छांचा उल्लेख करीत व "अस्सलाम आलेकुम" असं खास इस्लामी थाटाचं अभिवादन करीत व टाळ्यांच्या कडकडाटात ओबामा कैरो विश्वविद्यालयाच्या सभागारात प्रवेश करते झाले. ओबामांची एक खासियत आहे. ते कधीच तिरकस बोलत नाहींत.

शिवसेना पुन्हा उभी राहील?-उत्तरार्ध

सुधीर काळे ·
पूर्व प्रकाशन-सकाळ वेब एडिशन-१६ जून २००९ http://beta.esakal.com/2009/06/16161359/pailteer-shivsena-feature.html OR http://tinyurl.com/lz46st शिवसेना पुन्हा उभी राहील?-उत्तरार्ध ज्याला इंग्रजी भाषेत sequel म्हणतात व मराठीत ज्याला पूरक लेख म्हणता येईल या प्रकारात मोडणारा हा लेख सकाळ वेब एडिशनवर प्रकाशित झालेल्या शिवसेनेच्या पुनरुत्थानावर लिहिलेल्या माझ्या लेखाला वाचकांकडून मिळालेल्या प्रतिसादांवर आधारित आहे व हा लेखही वाचकांना आवडेल अशी आशा आहे. सर्वप्रथम जे मराठी माणसांचे "दैवत" आहेत त्या मा. बाळासाहेबांना प्रणाम करून या दुसर्‍या भागाची अथश्री करतो.

पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात?

सुधीर काळे ·
पाकिस्तानमधील अराजकाची बीजे कशात? (This article was published in eSakal's web edition http://beta.esakal.com/2009/06/05114456/international-Pakistans-cond.html or http://tinyurl.com/kjldqp) आज पाकिस्तानात जे अराजक माजले आहे त्याची मूलभूत कारणे शोधली तर एक गोष्ट सहज दिसते की पाकिस्तानने स्वत:च्या खर्चासाठी लागणारे पैसे स्वत: कधीच कमावले नाहीत.

शिवसेनेचा निलाजरेपणा

टायगर ·
सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे. त्यांना कायदा कळतो की नाही, असाच प्रश्‍न पडतो.

शिवसेना पुन्हा उभी राहील?

सुधीर काळे ·
नमस्कार, आमचे स्नेही तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा सभासद होतांना मला आनंद होत आहे. ह्या संकेतस्थळाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! सुधीर काळे, जकार्ता. शिवसेना पुन्हा उभी राहील? (पूर्वप्रसिद्धी - http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh.html) मी एक सामान्य माणूस आहे. मी कुणी "शिवसैनिक' नाही; पण बाळासाहेबांबद्दल खूप आदर असलेला व शिवसेनेला मनोमन मानणारा असा एक मराठी माणूस आहे. रोज इमाने-इतबारे कामावर जाणारा, दहा-बारा तास "पाट्या टाकणारा' व महिन्याच्या एक तारखेला मिळणाऱ्या पगारावर घराचा चरितार्थ चालविणारा!