मागे उभा मंगेश ....

काव्यरस
प्रेरणा सांगायला हवीच आहे का? ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे , तेव्हा कपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये. (पैसा)तायडे, सॉरी... :P मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! ओढणी ती माथ्यावरी 'स्टोल' मुखा कव्हर करी मोबाइल रुळे उरी 'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! जन्मजन्मांचा मी वासू इथे कधी तिथे बसू प्रेमी, म्हणावे की कामी? नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! इरसाल म्हमईकर

'आन्ना' वय वर्ष ४५

लेखनविषय:
लेखनप्रकार
'आन्ना' वय वर्ष ४५ त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं, त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला कधी पाहिलं नाही, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची, आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला...

स्थापत्य- एक कला भाग २

लेखनप्रकार
पहिला भाग लिहील्यानंतर बर्‍याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं! -------------- प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर. 'माझं एक टुमदार दुमजली छानसं घर असावं' अशी अपेक्षा माणूस करत असतो.

हवा के साथ साथ..

लेखनविषय:
लेखनप्रकार
ह्या भारतवारीत अशाच निवांत गप्पा चाललेल्या असताना काकूने एअर फ्रायरचा विषय काढला. विषय मोठा टेम्टिंग होता. गरम हवेचे झोत वेगात फिरवून फ्रेंच फ्राइज पासून केकपर्यंत कोणतेही पदार्थ तयार केले जातात आणि तेलाचा वापर त्यात नगण्य असतो ही गोष्टच क्रांतिकारी होती. अर्धा चमचा तेलात कटलेट आणि एक चमचा तेलात समोसे बनतात अशा संभाषणातले समोसे, कटलेट, पेस्ट्री असं सारखं सारखं ऐकून जीभ चाळवली आणि कोपर्‍यावरच्या वडेवाल्याकडून वडे, भजी आणलेच आम्ही..

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

लेखनप्रकार
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग.

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले.

दयेच्या छावण्या

पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

प्रेरणादायी प्रकाश!!

लेखनप्रकार
सूर्य उगवतो आणि मावळतो. दिवसा सूर्य प्रकाशमान असताना पृथ्वीवरील सगळेजण त्याचा फायदा घेतात. मावळताना एकटा सूर्य मावळतो. सगळे जग सूर्याबरोबर मावळत नाही. रात्री सूर्य नसतो म्हणून त्याला काहीजण दूषणे लावतात तर काहीजण दिवसभर प्रकाश दिल्याबद्दल रात्री सूर्याचे आभार मानून झोपी जातात. यश हे उगवत्या सूर्यासारखे तर अपयश हे मावळत्या सूर्यासारखे असते.... तुम्हाला मिळालेल्या यशात सगळे भागीदार होतात व श्रेय घेतात. तुमच्या अपयशाचे भागीदार कुणीच नसते. तुम्ही एकटेच तुमच्या अपयशाला जबाबदार ठरता.

हापिस

लेखनविषय:
रात्री ऊशिरापर्यंत मी कपाटाशेजारी वाट बघत बसलो. टाईमपास म्हणुन दोन चार वडापाव हाणले. सगळी सामसुम झाल्यावर सावधपणे अंदाज घेत बाहेर आलो. टकल्या अजुन कंप्यूटरवर रिपोर्ट करत बसला होता. एकतर यानं अप्रायजल मध्ये काशी केलेली. आणि आज हा महाडांबिस माणुस मी चार दिवस राबराबुन बनवलेली एक्सेल शीट स्वत:ची म्हणुन वरती पाठवत होता. त्याखाली एक पेशल नोट टाकुन, "Lower order is not working fine, but I am working hard to get report on time. sorry for late. thanks" (मला सीसी मध्येपण ठिवलं न्हाय) मग मी एक लांबसडक लोखंडी बांबू हातात घेतला. (हो, हेच बनतं आमच्या कंपनीत). हळुच मागनं जाऊन त्याचं टक्कालचं फोडलं.
Subscribe to राहणी