Skip to main content

राहणी

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 06/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

व्यायामी ओव्या

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 27/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा अवघ्या जगाला नको त्याची हाव आरोग्याचा ठाव घेतो कोण ठेविले अनंते तैसे न रहावे नेटके ठेवावे शरीरासी पायात सामर्थ्य हातामधे बळ स्नायूंना हो पीळ असावाच असो जिम किंवा असो खोली छोटी असावी सचोटी व्यायामात कुणी उचलती वजने ही फार संसाराचा भार पुरे कुणा वेल्ला म्हणे जेथे सहा बिस्किटे पहा असे तेथे पहिलवान करावेच अॅब्स भले प्लँक बिंक नेहमीच थिंक पॅाझिटिव्ह करावी न व्यर्थ जनाचिया पर्वा पहा आणि ठरवा आरशात आरोग्यचि एक उद्दिष्ट असावे आपण झटावे त्याच्यासाठी जरी देव पूर्ण करेल कामना संकटी सामना स्वतःचा

हे हृदय कसे बापाचे......!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

७ 'कधीपण-कुठेपण' व्यायामप्रकार

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 18/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग पोस्ट इंग्रजीत आहे. तिचा दुवा हा खाली दिलेले ७ व्यायामप्रकार असे आहेत की जे कुठेही केले जाऊ शकतात. या व्यायामप्रकारांत शरिरातील अनेक सांधे, स्नायू कार्यत्यामुळे, त्यामुळे हे कंपाउंड एक्सरसाइजेस या वर्गात मोडतात. जिम लावेपर्यंत, लावायच्या आधी, किंवा लावायचं नसेल तर, हे व्यायामप्रकार तुमच्या दिनचर्येचा भाग होऊ शकतात. आधी महत्वाचे: - नेहमी निगेटिव मूव्हमेंट हळू करावी. ५ आकडे मोजत निगेटिव मूव्हमेंट होणे आदर्श. उदा.

तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?

लेखक खेडूत यांनी सोमवार, 15/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला . सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती. मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

श्वास

लेखक मनो यांनी रविवार, 07/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ही वेळ कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. त्याचं वय फक्त ८ वर्षाचं. मनसोक्त खेळायचं हुंदडायचं ते वय . पण आज तो एका गाडीत मागल्या सीटवर कसाबसा श्वास घेत आपल्या मृत्युशी झगडत होता. गाडी रोजच्या रात्रीच्या मालवाहक trucks च्या रांगेत अडकली होती आणि त्याचा बाप त्या चक्रव्यूहातून दवाखान्याचा रस्ता शोधत होता. त्याचा बाप हा एक अमेरिकन पत्रकार, new york times सारख्या प्रतिष्ठीत वृत्तसंस्थेचा भारतीय उपखंडातला वार्ताहर. बायको, ब्राम आणि एडन ही दोन मुले असे चौकोनी कुटुंब. दिल्लीत काम करायची संधी चालून आली तेंव्हा त्याने ती उत्साहाने आणि पूर्ण तयारीनिशी पत्करली.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

बाटली आणि दारू.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 23/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना... डुआयडीने आता सगळे.... "स्कोअर सेटल" करू.....!! उपद्र्व हा अनंत काळचा... मिपाबरोबर कायम रहायचा... घरात चारच माणसे आणि... दारात चारशे चपला सारू..... नव्या आयडीच्या बाटलीत भरली शिळ्या विचारांची जुनीच दारु.... त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही... मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !! आडून आडून सगळे करिती हल्ला... भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला.... एकटा दुकटा कोणी लागता हाती.... चला त्याला आडवे करू !!