'आन्ना' वय वर्ष ४५
त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं, त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला कधी पाहिलं नाही, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची, आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला...