मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्लिडींग हार्ट....

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्‍या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न. भेटता रक्तस्त्राव हृदय फुले कळाली अमर प्रेम कहाणी "ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे गात आहेत विरह गाणी वेदना त्याच्या जीवाच्या तेव्हांच मला कळाल्या भंगून हृदय जेंव्हा रक्त पाकळ्या गळाल्या घालून मान खाली, वृक्ष (विपींग चेरी)अश्रु ढाळीत होते जणू जखमेवरी तयांच्या फुंकर घालीत होते लेवूनी पुष्पे भग्न दिलाची झुरते आपुल्या मनाशी आजुनही जपत आहे कहाणी भंगल्या दिलाची अपसूक मी वदलो, ऐक बोल अनुभवाचे दु:खात असते का कधी कोण कुणी कुणाचे? ऐशा किती कहाण्या आणी किती विराण्या जगतास काय त्याचे मग अर्थ काय झुरण्याला!!!!....

वाचन 4368 प्रतिक्रिया 0