बात निकलेगी तो...
लेखनविषय:
तू म्हणालास, कविता लिहिणार... पण जरा जपून हो!
प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!
नको लिहूस चंद्र बिंद्र किंवा कंकणभरला हात
इथं सगळेच ओळखतात "त" वरून ताकभात..
विस्कटलेल्या केसांवरून उगाच करतील भलते तर्क.
एका नजरेत ओळखतील सरलेली वयवर्षं..
सहज म्हणून विचारतील इतका तू उदास का रे?
उतरलेला चेहरा मग न बोलता सांगेल सारे..
तुझ्या हरेक शब्दाचा अगदी कीssस पाडतील
बोलता बोलता हळूच माझं नाव काढतील.
तेव्हा मात्र सांभाळ हं, चेहरा ठेव कोरडा
एक जरी हलली रेष, अनर्थ होईल केवढा..
आणखी एक गोष्ट तू कटाक्षाने पाळ,
कितीही मनात आलं तरी माझा उल्लेख टाळ..
एकदा नाव कळलं की लोकं तिथंच थांबतील काय?
आपल्या छोट्ट्या गोष्टीला मग लांबच लांब फुटतील पाय..
म्हणून म्हटलं, कविता लिहितोयस पण जरा जपून हो!
प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!
वाचने
3564
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
मस्त
आवडली
साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे
In reply to साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे by कर्नलतपस्वी
इतका सुंदर काव्यत्मक प्रतिसाद
छान
मस्त
कविता आवडली आणि कवीचा
सरिता, भागो , चाणक्य, पटाईत
खूपच सुंदर
व्वा, खुप सुंदर कविता.
अरे वाह !
फार सुंदर
छान जमून आलीय
जबरा प्राचीताई, आवडली
शिल्पा नाईक, बिरुटे सर,